तामिळ नाडू  मधील पंच समाज आणि शैव 

मी हे पूर्वी सांगितलेले आहे कि शैव लोकांच्यात वर्ण जाती न्हवत्या पण समाज होते हे समाज पुढील प्रमाणे 

१ तमिळ कम मध्ये समाजाला मक्कल म्हणत तिथे मरूत मक्कल हे शेती करणारे होते मूळ हनुमान हा या समाजातून आलेला होता 

२  कुर्रवन मक्कल हे जंगलात राहायचे मी नेहमी सांगितलेले आहे की शंकराच्या स्कंदाचे 

दक्षिणेकडे अधिपत्य होते आणि शंकर-पार्वतीने त्यालाच दक्षिण ही दिशा दिली होती त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात जसा खंडोबा तसा या समाजात मुरुगन हा शिवपुत्र यांचा देव होता 

३ मुल्लई मक्कल म्हणजे पशुपालक ह्यात प्रामुख्याने धनगर सणगर गवळी समाज होते 

४ न्येतेल मक्कल म्हणजे कोळी विशेषता समुद्राच्या काठी किंवा नदीच्या काठी व मासेमारी किंवा मीठ तयार करणारे समाज होते मराठी भाषेत ह्यांना कोळी आणि आगरी म्हणतात 

५ पलई मक्कल पर्वतावर राहणारे पहाडी लोक 

असे पाच समाज दिसतात पुरोहित समाज स्वतंत्र समाज म्हणून अस्तित्वात नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे 

रामायणामध्ये नेमक्या मरुत लोकांनी रामाचे का स्वागत केले असे का चित्रण केले गेले असा प्रश्न आपण विचारायला हवा त्याचे उत्तर असे की मरुत समाजानेच प्रथम उत्तरेकडून आलेल्या स्थलांतरित लोकांचे दक्षिणेकडे स्वागत केले.हे साधारण उत्तरेकडे बौद्ध राजे लोकांनी त्यांची हकालपट्टी सुरु केले तेव्हा दक्षिणेत आले सुरवातीला कर्णाट म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक नंतर तामिळ नाडू (त्या काळात केरळ हाही तामिळ नाडूचा भाग होता व दक्षिण भारतात कर्णाट ,आंध्र व तामिळ अशा तीन उपसंस्कृती होत्या  ) अन्यथा बाकीचे सर्व समाज या स्वागताला तयार नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे रामायणात त्याचे प्रतिबिंब पडलेले आहे न्येतेल समाजातूनच पुढे वाणी आणि पणी पुढे आले आणि त्यांनी रोमन लोकांशी ही व्यापार केलेला आपणाला दिसतो

या मक्कलकालानंतरच संगम काळ आला आणि नैतिक नियम आणि आचरणही आले पुढे मग आगमांचा काळ आलेला दिसतो त्याला ब्राह्मण लोक काळाभर काल म्हणत असले तरी आहे काळ महत्त्वाचा काळ मानला पाहिजे लोक शैव , जैन आणि बौद्ध यांचा प्रचंड प्रभाव या काळावर पडलेला दिसतो यानंतर मात्र साम्राज्य काळ सुरू झालेला दिसतो सातवाहनांच्या साम्राज्यापासून ते चेर ,चौल, पांड्य यांच्या साम्राज्यांच्या पर्यंत हा सगळा कालखंड प्रचंड भरभराटीचा दिसतो 

याच कालखंडामध्ये भक्तीचे बीज रोवले गेले मात्र केवळ शिवलिंगाचे साधे शिवालय बाजूला पडले आणि विशाल बृहद मंदिरे उभी राहू लागली आणि ते पुढे वाढत जाऊन अंधार कालखंड सुरू झाला हळूहळू वैष्णव धर्माची वर्णव्यवस्था सर्वच इतर धर्मांनी स्वीकारली आणि मग समाज गेले जाती येऊ लागल्या दक्षिण भारत सुद्धा मध्ययुगात जायला सुरुवात झाली 

धर्म युगाचा उदय झाल्यानंतर साहजिकच मूळ पंडित असलेल्या परंतु आता ब्राह्मण बनलेल्या पुरोहितांचे वर्चस्व वाढले ब्राह्मण आणि वेल्लाळ अशा दोन जाती तयार झाल्या ब्राह्मण वैष्णव होते तर ब्राह्मणे तर स्पष्ट आणि स्वच्छपणे शैव होते पुढे पुढे शहरांची संख्या वाढत गेली तशी शहरातल्या लोकांनी वैष्णव धर्म स्वीकारायला सुरुवात केली मात्र तरीही शैव धर्माचे वर्चस्व कमी झाले नाही वैष्णव बनत काही लोकांना शहरांमधले आपले स्वतःचे वर्चस्व उंचावत ठेवायचे होते साहजिकच शहराबाहेरचे सर्वच्या सर्व लोक शैव होते शैव राहिले शहरात मात्र वैष्णव धर्म अधिक पसरत गेला अर्थात तरीही त्याला मर्यादा नेहमीच होती सर्व जमीन देवाची झाली आणि राजा देव झाला साहजिकच संपूर्ण आर्थिक संरचना ही मंदिर केंद्री होत गेली ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची युती झाली आणि बहुदा गीतेमध्ये त्याचेच प्रतिबिंब पडलेले आहे कारण भगवद्गीतेमध्ये या दोनच लोकांना पुण्य योनी म्हटले आहे इतर सर्व विशेषतः दक्षिणेत पाप योनी झाले यात व्यापारीही आले अर्थातच प्रत्यक्ष लोक जीवनामध्ये यातल्या कुठल्याच गोष्टीला फारसे स्थान नव्हतं शैव आपल्या टेचातच जगत होते अर्थात ही ही परिस्थिती बदलत गेली जेव्हा दहाव्या शतकानंतर दुरेशन धर्माने संपूर्ण व्यवस्था धर्म व्यवस्था ताब्यात घ्यायला सुरुवात केली त्यासाठी आचार्य शंकरांचे तत्वज्ञान अवस्था दर्शन वापरत आद्य शंकराचार्य ही संकल्पना पुढे आली आणि त्यांच्यातून वेदांत जन्मला यातूनच पुढे हिंदू धर्माची स्थापना व्हायला लागली

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे