बाळबोध कविता

 माघार घ्यायला लागलेत 

आजार आपोआप बरे व्हायला लागलेत 


उशिरा का होईना सद्बुद्धी सुचली 

जे कुलूप होते ते उघडणारे दार व्हायला लागलेत


मुळात त्यांनी काट्यांची सक्ती आणायलाच नको होती 

आता नामुष्की अशी की फुलांचे हार व्हायला लागलेत 


हे असे होते विचार न करता केले की 

आर पार लढाई होण्याआधीच पार व्हायला लागलेत 


चला आपणही त्यांना माफ करूया 

मूर्खांना अक्कल आली मूर्ख दिलदार व्हायला लागलेत 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


बापाचा उपदेश 

प्रत्येक पोरगी कशाला पाहिजे 

जी तुझ्यासाठी योग्य उशाला पाहिजे 


वासना काय अफाट सुटणार 

तिला इंद्रियांच्यात बांधायला पाहिजे 


असूही आपण बहुपोरीवाले

निसर्गावर कंट्रोल ठेवायला पाहिजे 


मुलांमुळेच संसार जन्मतो 

मुलांना नीट वाढवायला पाहिजे 


चांगला असेल किंवा रटाळ 

हा गाडा पुढे रेटायला पाहिजे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कोई फुल नही डरता कभी किसी आगसे 

जानता है सुरज का भी वास्ता है बागसे 


सांस हवा की उधार ली हुई रकम नही 

ये आग का रिश्ता है रखा हुआ आग से 


तेरी खुशबू तो कब से उड गई तेरे खतो से 

अलमारी अभीभी पूछ रही है मेरा क्या नाता बागसे 


वो कभी मुझे मिलने अब आता नही 

कहता है कौन मिलायेगा अपना हाथ आग से


पता नही कैसे मगर दिल को सुकून आ गया 

शायद कोई उड गया हमेशाके लिए दिमागसे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


हार कोई तमाशा एन्जॉय करता रहा 

बनना नही था फिरभी मैं जोकर बना रहा


फिर मुझे एक बार मोका मिले ना मिले 

ये सोचके जिंदगीमे किसी तरह जिंदा रहा 


उसने तकलिफोंको पढनेकी इजाजत नही दी है

ये सोच के ताउम्र आँखोसे सवाल पूछता रहा


मुझसे भी काम निकलेगा सोचकर कॉन्टॅक्ट मे रहे 

मै भी काम दे सकता हुं सोचकर संभाषण बढाता रहा 


कभी तो उधारी चुकायेगा कर्ज कभी उतरेगा 

इसी खयालमें कई राते चांद चमकता रहा


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


प्यार कहो इसे या इश्क कहो या कहो प्रेम

जो भी है इसका आरंभ है तेरा खुबसूरत बदन 


मैने मानाही नही की मेरा रकीब मेरा दुश्मन है 

जानता था लोग आते जाते रहेंगे गर वो है चमन 


क्या हुआ की अचानक सब नया लगने लगा 

नजारा बदल गया या बदल गई मेरी नजर 


मैं वो मजनू नही हू जो मोहब्बत मे जान दे 

जानता हु जिंदा रहकर ही पा सकता हू मोहब्बत


मैने आय लव यू कहते हुए दे दिये काटे

देखता हू सफर चाहते है या मेरे साथ ऐश


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ते धर्माला किरकोळ समजतात 

त्यांना ना त्यातील घोळ समजतात 


त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नको

ते सौंदर्याला घोळ समजतात


त्यांनी समुद्राची भरती चोरली 

ते पाण्याला कल्लोळ समजतात 


त्यांच्या फोटोग्राफमध्ये उमटत नाही 

जे तिच्या मादकतेला लोळ समजतात 


खिडक्या तंगड्या फासटून मेल्या 

लोक माझ्या घराला बोळ समजतात 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

दिल का कतल करके दिमाग को जिंदा छोडना 

जैसे किसी महायुद्ध मे एक उडता परिंदा छोडना 


कहा कहा से सिखी है तुमने ये अदाये 

खुद शर्माना और मुझे शर्मिंदा छोडना


हा भी और ना भी समझे तो क्या समझे बिना जवाब दिलको बनाकर दरींदा छोडना 


तेरे घर आकर तेरे वालिद को बताना चाहता हु 

मगर बताऊ क्या? तेरा मुझे चुनकर चुनिंदा छोडना?


किसी को बता भी नही सकता हु मै मेरा हाल

मिलती हो जैसे पुण्य कर्म रोज का मुझे जिंदा छोडना


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)


दिल का कतल करके दिमाग को जिंदा छोडना 

जैसे किसी महायुद्ध मे एक उडता परिंदा छोडना 


कहा कहा से सिखी है तुमने ये अदाये 

खुद शर्माना और मुझे शर्मिंदा छोडना


हा भी और ना भी समझे तो क्या समझे बिना जवाब दिलको बनाकर दरींदा छोडना 


तेरे घर आकर तेरे वालिद को बताना चाहता हु 

मगर बताऊ क्या? तेरा मुझे चुनकर चुनिंदा छोडना?


किसी को बता भी नही सकता हु मै मेरा हाल

मिलती हो जैसे पुण्य कर्म रोज का मुझे जिंदा छोडना


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)


मी जिवंत आहे याहून अधिक सुख नाही 

यापेक्षा अधिक मला कशाची भूक नाही 


कशाला हवे आहेत भविष्याचे काल्पनिक मजले

माझ्या पायापेक्षा काहीही अधिक मजबूत नाही 


इतिहास मागे टाकून मी कधीच वर्तमानात आलो 

जो इतिहासात गेला त्याला वर्तमान नाही 


जो आत्ताच येतो आहे तो श्वास पुरेसा आहे 

जो श्वास निघून गेला तो मजला माहीत नाही 


मी आजचा सूर्य पाहतो आजचा चंद्र पाहतो 

दुसरे कोणतेही घरी माझ्या कॅलेंडर नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


सूर्य आगीचा गोळा आहे 

आणि तो पृथ्वीला लोळा गोळा करण्यासाठी उगवतो 


माझ्या खिडकीतून 

मी त्याचा चोळामोळा करण्याचा प्रयत्न करतो 


हा माझा अहंकार आहे 

हे तर उघडच आहे 


प्रॉब्लेम इतकाच आहे 

की तो संपूर्ण ब्रह्मांडाने स्पॉन्सर केला आहे की 

सूर्याने पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करतानाच माझ्या आत घातला 

हे मला कळत नाहीये


माझ्या आत अज्ञान कोसळतय

आणि बाहेर सूर्याचा प्रकाशपाऊस सुरूच आहे 


खरी शोकांतिका 

किरणधारांच्यात 

माझे कपडे माझ्या त्वचा भिजतायेत 

आणि मी आतून प्रकाश कोरडा आहे 

हीच आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)


ना आकाशाची प्रतीक्षा 

ना पृथ्वीवर ऋतूंची 


आई 

तू स्वतःच एक ऋतू आहेस 

जिथून माझे हवामान सुरू होते 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


पाऊस शेवटी फुलात उमलला

प्रत्येक फुलात 

त्याने भेदाभेद केला नाही 


प्रत्येक फुलाला उमलण्याची संधी दिली 


ती मनुष्यजमात होती 

जिने फुलांना नावे ठेवून 

 अमंगळाला भेदाभेदाला सुरुवात केली


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मी चूळ फेकत नाही 

कारंजा फेकतोय 


मी पाणी फेकलेल नाही 

मी स्वतःला निर्जंतुक केलय 


तू फोटो काढ 

मी थोडासा माझ्या आतल्या पेंटिंग मध्ये भटकून येतो 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


माझ्या कविता वाचायच्या तर शक्तिशाली डोळे हवेत 

त्या तू वाचल्यास म्हणून 

तुझी पाठ थोपटणार नाहीत 


त्या त्या तुला कन्फरंट करतील 

आणि तू काय मिस केलयस ते सांगतील


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


ध्वनीचा स्फोट होण्याआधीच ऐकू आला इको 

वळून पाहिले तर दिसली बायको 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

जे घेऊन गेलो होतो 

तेच घेऊन परतलोय


डोळ्यात छापलं गेलंय एक शहर नवं 

पण ते अद्याप तरी कोल्हापूरइतका आवाज करत नाही 


बाकी सुटकेस टस की मस झालेली नाही 


कदाचित मी सुटकेस होऊनच परतलोय


श्रीधर तिळवे नाईक 

( बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मी मेल्यावर 

ते भेटायला आले 


त्यांनी माझे फोटो काढले 

हार घातले 


मी त्यांना शेवटपर्यंत कळू दिले नाही 

मी अजून जिवंत आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


नदीका पानी नहीं देखता किनारों से पता चलता है 

कब सुरज निकला शहर में समाचारोंसे पता चलता है


आज तक अभी तक तो वो बेवफा नही हुई है 

कल वफादार रहेगी की नही बेवफादारोंसे पता चलता है


मैने उसमे चांद और चांद में उसको देखना किया बंद 

उसकी रोशनी किस टाईप की 

पहरेदारोंसे पता चलता है


कभी चरागों से हुआ करते थे अब बने हैं ट्यूबलाइट

किस हदतक होंगे उजाले बिजलीबिल के नजारोंसे पता चलता है


ये शहर बहुत बडा शहर यहाँ हादसे नही होते 

और गर होते भी है तो अखबारोंसे पता चलता है


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


अगर कुछ जलाना है तो जो है पुराना वो जला 

और जो नया आ रहा है तू उससे हाथ मिला 


जो टूट गये है उन रिश्तों को अब ना तू याद कर 

उन्हे कुछ तेरी पडी नही फिर तुझे है क्यूँ गिला 


चंद लम्हे हर रिश्ते मे हमेशा अच्छे रहते है 

उनके लिये क्यूँ परेशानीयोंका बरदाशत करे सिलसिला 


जब तक कोई मजहब नही आता बाजार महकते रहेंगे

फिर अचानक दोनो तरफ से कातिलों का चलेगा काफिला


कई रास्ते आज भी है मेरे दिल में ठंड की तरह 

कभी तूभी आकर दिल में सिगरेट की तरह उनको जला


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्य फायलीतून)


तुझ्या ओठावर झालेले माझे अवतरण 

चुंबन : न बोललेल्या कित्येक गोष्टींचे स्पष्टीकरण


एकमेकाला कळले ना मग झाले खूप झाले 

कुठे लोकांना सांगायला जाते होईल फक्त मनोरंजन 


लोकांचे काय ते आज आहेत  उद्या असणार नाहीत 

आपण एकमेकांचे आज आहोत आजच आपले अवतारीकरण 


एकमेकांना प्रसन्न झालो आता कशाला हवे देऊळ 

एकमेकांना ओवाळत राहू एकमेकांचे करू  भजन 


जेव्हा कोणीच कोणाचे नसते तेव्हा लागतात देव इथे 

आपण एकमेकाला पुरेसे  एकमेकांचे आहोत संतुष्टिकरण 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


I am happy without reason 

They try to find the reason 

So I focus on the reason

And now I am not happy 

Because I don't know the reason 


Shridhar Tilve 


(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तेरे मेरे बीच मे तू किसी को ना खडा कर 

गुस्सा भी करना है अगर तो मुझपे सिधा कर


नही बता सकते हम जमाने को क्या हुआ 

तू भी चुप्पी रख और प्रायव्हेट मामला कर 


तुने गलत लोगोंको बिना मतलब साथ दिया 

वो गलतिया करते रहेंगे तू पल्लू सीधा कर 


हो सके तो चुपचाप निकल तू अपनी गॅंग से 

उसमें तेरी भलाई है खुदका थोडा भला कर


मैं जो कह रहा हुं एक दिन समझमें आयेगा

मुझपे यकीन नही है तो तू वक्त पे भरोसा कर 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


गल्ली गल्लीत देईन चोप

की उडून जाईल तुझी झोप 


दुर्लक्ष करतोय पण कळते 

काय चाललाय तुझा खटाटोप


तुझी दुकाने सर्वत्र आहेत 

कशी येणार तुला झोप 


पावना म्हणून आलायस तर 

यजमानावर सोपंव झोप


माझ्याच घरात राहणार तर 

कर स्वतः चा अस्तित्वलोप


थांबायचेही आहे निघायचेही 

ठरव लवकर की काढू तोफ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कुछ दिन दिल में रहा करके सेंटीमेंटल चला गया 

मुझे तो ओनर लगा था वो होके रेंटल चला गया 


शायद उसके गोरे रंग पे मैं थोडा मर मिटा 

मुझे इंडिया बनाकर वो ओरिएंटल चला गया 


मुझे हमेशा लगा था की मेरा प्लॅनिंग अक्युरेट हैं 

प्लान बनके आया था वो एक्सीडेंटल चला गया 


शायद अब लाईफ लॉन्ग कोई रिस्क उठाऊंगा नही 

जो रिस्क प्रोन झोन था वो बनके सिम्पल चला गया


अब ना कोई चाहत रहेगी ना ही कोई चाहनेवाला 

जो आयेगा टेम्परेरी होगा जो था एटर्नल चला गया 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तेरे मेरे बीच मे तू किसी को ना खडा कर 

गुस्सा भी करना है अगर तो मुझपे सिधा कर


नही बता सकते हम जमाने को क्या हुआ 

तू भी चुप्पी रख और प्रायव्हेट मामला कर 


तुने गलत लोगोंको बिना मतलब साथ दिया 

वो गलतिया करते रहेंगे तू पल्लू सीधा कर 


हो सके तो चुपचाप निकल तू अपनी गॅंग से 

उसमें तेरी भलाई है खुदका थोडा भला कर


मैं जो कह रहा हुं एक दिन समझमें आयेगा

मुझपे यकीन नही है तो तू वक्त पे भरोसा कर 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


गल्ली गल्लीत असा चोप

की उडून जाईल तुझी झोप 


दुर्लक्ष करतोय पण कळते 

काय चाललाय तुझा खटाटोप


तुझी दुकाने सर्वत्र आहेत 

कशी येणार तुला झोप 


पावना म्हणून आलायस तर 

यजमानावर सोपंव झोप


माझ्याच घरात राहणार तर 

कर स्वतः चा अस्तित्वलोप


थांबायचेही आहे निघायचेही 

ठरव लवकर की काढू तोफ?


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तू म्हणालीस म्हणून घराबाहेर पडलो निमूटपणे 

माहित होते विषारी तरी फळास लगडलो निमूटपणे


बोलू सुद्धा दिले नाहीस ओठ माझे केलेस लॉक 

एकटाच एकांतात स्वप्नात बडबडलो निमूटपणे


गाडीमध्ये रात्री काढल्या दिवस काढले सूर्याखाली 

उन्हात कधी काळोखात मी तडफडलो निमुटपणे 


दिली नाहीस कधी बेछूट वागण्याची तू किंमत 

तुला आली फुले आणि मी झळझडलो निमुटपणे 


 रस्त्यावरती हिंडतो आहे मी आता बेहोशी मध्ये

आठवत नाही कुठल्या जिन्यावरून गडगडलो निमुटपणे


इतकेच आहे आठवते की तुला दोन डोळे होते 

आणि तुझ्या नाकासमोर मी चडफडलो निमुटपणे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

स्टॅलिनसाठी श्रीधर तिळवे नाईक 


शेवटी त्याचे कारेपण आयुष्याने ठोकले 

जे जे होते व्हर्जीन ते ते त्याचे चोखले 


सगळे संपते तेव्हा स्वातंत्र्य लागले हातांशी 

माहीत नाही हातांनी ते का क्रूरपणे हाताळले 


झालेल्या तुरूंगवासांनी उभे केले साम्राज्य 

मग त्यानें सिंहासन इतरांना कैद करण्यास वापरले 


लाखो वर्षाचे वचन एका वर्षात बारगळले 

मग जे जे झाले ते कलेमध्ये विखुरले 


जो तो आसपास फेकतो आहे शपथ घेऊन 

ह्यामध्ये खऱ्याचे मात्र गळे पूर्ण कटले 


आयुष्य हे असेच असते अन ते असेच राहणार 

लोकांनीं असे म्हणत प्रेत त्याचे उचलले 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता ह्या काव्यफायलीतून)

सर्व संपल्यात जमा आहे 

सत्य बोलणे हाच गुन्हा आहे 


त्याला मारून तर परतलो होतो 

आता समोर पाहतो तर पुन्हा आहे 


कशी कारागृहे खुली होत राहतात 

कुणाजवळ त्यांचा नकाशा आहे 


कैदेत आनंदाने राहू लागले 

म्हणती हीच तर जगण्याची आभा आहे 


शासक तर सर्वत्र एकाच चेहऱ्याचे 

काळाचा कॅमेरा वेगळा चेहरा देणारा आहे 


शेवटी मी माझ्यातच वारेन आणि जळेन

खांदा देतील ते पकडले जाण्याचा धोका आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे