मोक्ष आफ्टर इफेक्ट्स

 जन्मताना कितीही यातना झालेल्या असोत 

बारसे थाटामाटाने झाले पाहिजे 


लग्नात प्रेम असो नसो 

वेडिंग सेरीमनी वाटले पाहिजे 


मरण कसेही असो कोणाचेही 

स्मशानयात्रा इव्हेंट वाटली पाहिजे 


शेवटी 

जो जन्मताना गाजला 

लग्न करताना वाजला 

आणि मरताना 

ज्याचे फोटो व्हिडिओ इव्हेंटिंग झाले 

त्याचे जगणे सार्थक झाले 


नाचा 


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष या सिरीज मधील आफ्टर इफेक्ट या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे