मोक्ष साइड इफेक्ट्स

 १


चार मर्डर केलेले गुंड 

सभ्यतेला टर्म्स कंडिशन डिक्टेट करतात 


नरकातला राखीव राजकारणी कोटा संपलाय 

नवीन नरक निर्माण होतायत 


लायकी असलेले लोक 

लायकी नसलेल्या लोकांच्याकडून नियंत्रित होतायत 


वाळवंटात गेले तर वाळू काळी वाळू करून 

तिचे शॉर्टेज निर्माण करेल अशी जमात 

सर्वत्र 


ह्या सिलिकॉन युगात 


बॅलेट पेपर टिश्यू पेपर झालाय 

आणि इश्युज बुलेटसारखे लोडेड 

पण न उडणारे 


रक्त पक्षांतर सांडत चाललंय 

आणि आयडियालॉजी रक्तबंबाळ 


तू एक सामान्य 

राजकारणाची कॅडबरी 

गोड बनवत कितीकाळ खाणार आहेस 



राजकरण गुंडांचं शेवटचं आश्रयस्थान राहिलेलं नाहीये 

ते गुंडांचं गुंडगिरीनंतरचं नेक्स्ट करिअर झालंय 


नैतिकता कायद्यात इम्पॉर्टन्ट बनवून 

प्रशासनात इम्पोटन्ट बनवणारी प्रोसेस 


तुझं मत फक्त कुठल्या गुंडाला विजयी करायचं 

एव्हढंच ठरवणार असेल तर 

स्टुपीडिटी स्पायडरमॅन बनून उडेल नाहीतर काय ?


तुझं मत आणि पक्षाचा ओपिनियन 

ह्यांच्यात अंतर काय ?


मतदान अद्याप कायदेशीर आहे 

कारण ते बेकायदेशीर ठरवण्याची गरज त्यांना नाही 


स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव नाही 

मतदानाचं आहे 



नेते कि कुत्रे 

असा प्रश्न आला तर 

लोक कदाचित कुत्रेच निवडतील 

आणि नेत्याचा अदृश्य पट्टा 

आपल्या गळ्यात बांधतील 


ज्ञान ज्याचं मूळ आहे 

नैतिकता जिचं कुळ आहे 

ते असं कुणी बिघडवलं ?


लोकांना स्वतःची नैतिकता ठरवता येत नाही हे कुणी ठरवलं ?


राजकीय वास्तव केवळ विनोद म्हणून कोण सादर करतं ?

आणि राजकारणाला करमणूक समजून कोण हसतं ?


आपण कुऱ्हाडीसाठी आपल्या देहाचं लाकूड द्यावं 

आणि लाकूडतोड्यानं आपल्याला झाड समजून आख्ख कापावं ?


शेवट सभ्य होण्याचे दिवस संपले असं समजावं का ?


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्षाच्या कविता ह्या काव्यफाईलीतून )

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे