Channel Elcetra

 बाहेरच्यांनी माजायचे किती 

आतल्यांना छेडायचे किती


घरे असतीलही शांत शांत 

निखारे त्यांच्यावर फेकायचे किती


आतल्यांनीही विचार करावा 

आतले आळस जपायचे किती 


कधीतरी रणांगण होणारच 

वाटाघाटीत ठरवायचे किती 


तुला माती आत्मसात करायची नाही 

तुला सोडून द्यायचे किती 


निघून जाण्याचा पर्याय आहे 

ठरव सोबत न्यायचे किती 


येताना कफल्लक होतास 

जाताना माजायचे किती 


सहनशीलतेला अंत असतो 

मरणापर्यंत शेवट आणायचे किती


ही शेवटची वॉर्निंग आहे 

समजावून समजावून समजवायचे किती?


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल एल्सट्रा या काव्य फायलीतून)


मरायला टेकलेलो आहे 

कण्यात वाकलेलो आहे 


पूर्वीही हजारदा मेलो 

नव्याने वाकलेलो आहे 


पाहू काय रंग घेऊन येतो 

म्हणतोय झाकलेलो आहे 


झाकलेलीच मूठ होती 

नागड्याने टाकलेलो आहे 


शेवटी हेही सर्व संपेल 

बोलताना खोकलेलो आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरीज मधील चॅनेल सेटरा एलसेल्टरा   काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे