राहुल गांधी
राहुल गांधी यांचे भाषण श्रीधर तिळवे नाईक
विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी केलेले भाषण निश्चितच त्यांचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट भाषण आहे त्यांना नेहमीच्याच शैलीत विरोध करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे खरा पण तो फारसा कामाला येणार नाही ते हिंदू विरोधी बोललेत असा गैरसमज करून देणे हा यावरचा उपाय नाही कारण त्यांनी तसं केलेलं नाही यदाकदाचित या लाईनने भाजप जाईल तर ती राजकीय आत्महत्या असेल कारण जनता बदललेली आहे आणि विरोधी पक्ष मजबूत आहे भाजपाला नवीन सिच्युएशन अजूनही हाताळता येत नाहीये हे या भाषणाच्या वेळी ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्यावरून स्पष्ट झाले नरेंद्र मोदी यांना बहुदा विसर पडलेला आहे की शेवटी ह्या शैव लाईनची सुरुवात त्यांनीच हर हर महादेव म्हणत केली होती २०१४ लां जे त्यांनी निवडणुकीत केले ते राहुल गांधी यांच्यामुळे थेट संसदेत दाखल झालेले आहे खरे तर जय श्रीरामला हे मिळालेले उत्तर आहे मी मागेच एका लेखात म्हटल्याप्रमाणे शैवांना साईड लाईन करून भाजप पुढे जात आहे आणि त्याचा इलेक्शन वर नक्की परिणाम होईल तसा तो झाला आणि आता जर राहुल गांधी हीच लाईन घेऊन पुढे जाणार असतील तर मग नरेंद्र मोदी यांची पंचायत होणे अटळ आहे कारण त्यांना जो पाठिंबा होता तो या शैव विचार प्रणालीमुळेच होता त्यांनी स्वतःच त्याकडे पाठ फिरवली आणि आता राहुल गांधीनी ही लाईन पकडावी हे भाजपासाठी आश्चर्यकारक आहे मुळात हे का घडले तर तुम्ही जय श्रीराम हे इतके केले की कोणीतरी मग हर हर महादेव म्हणत येणारच होता तसा तो राहुल गांधींच्या रूपाने आला याबाबत महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांचे राहुल गांधी यांनी ऐकले नाही असे दिसते कारण महाराष्ट्रात महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा अपवाद वगळता पुरोगामी लोक शैवांच्या विरोधात आहेत त्या उलट उत्तर भारतात दक्षिण भारतात परिस्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्रात जरी त्यांची ही लाईन अजिबो गरीब वाटली तरी महाराष्ट्र बाहेर ती तशी वाटणार नाही खरे तर मूठभर पुरोगामी लोकांच्यामधला हा प्रॉब्लेम आहे कधी ना कधीतरी त्यांनाही ते कळेलच
दुसरी गोष्ट जे काही घडले आहे त्याची पार्श्वभूमी फार जुनी आहे मी मागे एका लेखात सांगितल्याप्रमाणे मुळात पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रथम पंडित आहेत आणि त्यांना ते कश्मीरमधून आल्याने आणि कश्मीरमध्ये तो संपूर्ण शैव प्रदेश होता त्यामुळे ब्राह्मण नव्हे तर पंडित असतात होते त्यामुळे पंडित म्हटले गेले होते त्याचा त्यांना प्रचंड फायदा झाला कारण शैव लोकांच्यात ते प्रचंड लोकप्रिय होते. शैवांनी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला हा पाठिंबा १९८५ पर्यंत इंटॅक्ट होता शहाबानो प्रकरणानंतर तो आटत गेला नेहरू घराणे हे शैव आहे सर्वांना माहिती आहे पण शहाबानू प्रकरणानंतर हळूहळू हे घराणे ख्रिश्चन झाले की काय अशी शंका पसरत गेली विशेषत: भाजपने याबाबतीत खूप प्रचार व प्रसार केला
तिसरी गोष्ट राहुल गांधींना खरे तर हे फार पूर्वी सुचले होते त्यांनी मागच्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत स्वतःची ओळख शैव ब्राम्हण सांगितली होती पण मणीशंकर सारख्या काही अति शहाण्या लोकांनी असे कराल तर पाठिंबा गमवाल असे भय घातले त्यामुळे गुजरात बाहेर पुन्हा त्यांनी भाषणे बदलली त्या विधानसभा निवडणुकीत गुजरात मध्ये काँग्रेसने काटे की टक्कर दिली होती मी त्यावर लिहिलेही होते कारण असा प्रचार फार उशिरा सुरू झाला आणि हा अचानक राहुल गांधींनी थांबवला आता तो हा प्रचार ही लाईन कंटिन्यू करतील की नाही मला माहित नाही कारण काँग्रेसमध्ये काही लोक असे आहेत ज्यांना ही लाईन आवडत नाही मात्र संसदेत जीतक्या उघडपणाने त्यांनी ती घेतलेली आहे ते बघता कदाचित ही लाईन कंटिन्यू राहील मी खात्री देत नाही कारण त्यांच्या आसपासचे युरेशियन लोक त्यांना भडकवत असतात
चौथी गोष्ट डरो मत डराओ मत हे कुंडलिनी तंत्राचे वाक्य ज्या तऱ्हेने राहुल गांधी यांनी वापरले तो एक कुशल वापर होता या तंत्रातील पुरोगामी आविष्कार हा साईनाथ साईबाबांनी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे डरो मत मैं हुं अशा वाक्याने केला होता यालाच अभय मुद्रा असे म्हटले जाते राहुल गांधी यांनी याचा वापर पुन्हा पुन्हा केला खरे तर हे फार पूर्वीच केले गेले असते तर ते आत्तापर्यंत पंतप्रधान झाले असते असो देर आये दुरुस्त आये ! बहुदा शैव दिशेने जायचं की नाही याविषयी शंका असावी पण आता हे भाषण म्हणजे ही दिशा निश्चित झाल्याचे लक्षण आहे इतक्या उघडपणे प्रथमच राहुल गांधींनी हा डिस्कोर्स पकडला आहे याचा महाराष्ट्रात नेमका काय पडसाद असेल याबद्दल अनेकांना प्रश्न आहेत पण स्पष्ट सांगायचे झाले तर संपूर्ण ओबीसी आणि बीसी(अर्थात कडवे नवबौद्ध वगळून) आणि आदिवासी या गोष्टीमुळे काँग्रेसच्या मागे जाऊ शकतात अर्थात हे करणे महाराष्ट्रात खूपच अवघड जाते कारण महाराष्ट्रात अजूनही हवा अशी आहे की महाराष्ट्र वैष्णव आहे आणि ही हवा इथल्या पुरोगामी लोकांनी बनवलेली आहे
पाचवी गोष्ट मुळात राहुल गांधींचा मोक्षाकडे असणारा कल हा खूपदा उघडपणे व्यक्त झाला आहे पण त्यांच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना राजकारणात यावं लागलं सुरुवातीला गौतम बुद्ध व नंतर शैव असा त्यांचा प्रवास झालेला आहे( आकांताच्या प्रदेशात बुद्ध फक्त वैयक्तिक पातळीवर चांगला वाटतो आतंकाच्या प्रदेशात सार्वजनिक जीवनात मुळात प्रचंड भय पसरवले जाते की माणूस शैव होतो )तो अनेक ठिकाणी त्यांनी व्यक्तही केला होता पण जाहीर शक्यतो यायचा नाही कारण आसपास सगळे युरेशियन लोक! भारत यात्रेतच हळूहळू त्यांना कुठे ना कुठेतरी हा साक्षात्कार झाला असेल असे दिसते बहुजनांचा हा देव बहुजनवादी राजकारण्यांना कळत नाही असा एक फार मोठा गैरसमज काही कर्मठ लोकांनी पसरवलेला आहे प्रत्यक्षात शैव बोलत नाहीत ते थेट व्यक्त होतात आणि युद्धात मग हर हर महादेव म्हणत उतरतात घाबरणे हा शैवांचा पिंडच नव्हे आणि याला कारण मुळात भगवान शंकरांचा उपदेश निर्भय व्हा (अघोर व्हा असा मूळ शब्द आहे तो खूप बदनाम केला गेला घोर म्हणजे भय आणि चिंता मराठीत माझ्या काळजाला घोर लागला आहे असा वाक्प्रचारच येतो अघोर होणे म्हणजे भय आणि चिंते पासून मुक्त होणे) हे त्यांनी अनेकदा सांगितलेले आहे अघोर होण्याचे तंत्रही अनेकदा सांगितलेले आहे पण या तंत्राला बदनाम करण्याचे उद्योग काहींनी केले पण प्रत्यक्षात बहुजन समाजाने काही हे सोडलेले नाही तुम्ही एका मर्यादेपर्यंत या देशातल्या बहुजन समाजाला घाबरवू शकता त्यानंतर नाही कळत नकळत राहुल गांधींनी हेच अधोरेखित केलेले आहे त्यामुळे भाजपने बदललेले राहुल गांधी स्वीकारावेत केसेस टाकून तुम्ही जिंकाल असे जर वाटेल तर तुम्ही भ्रमात आहात अशी एक लाईन भाजपात सुरू होऊ शकते म्हणून सांगतो मुळात अशा तऱ्हेने त्यांचे सदस्यत्व काढून घेणे हेच चुकीचे होते हे एका मर्यादेपर्यंत लोक ऐकतात पण नंतर ते ऐकत नाहीत हा शैवांचा इतिहास आहे त्यामुळे असा विचार करू नये हल्ली काहीजणांनी विवेक सोडलेला आहे म्हणून हे सांगावेसे वाटते
प्रश्न असा आहे की मग शैव विरुद्ध वैष्णव असा वाद निर्माण होणार आहे का ? माझ्या मते नाही कारण हा धार्मिक क्षेत्रातला वाद आहे तो राजकारणात न आलेला बरा मुळात राम आणि कृष्ण हे शिवभक्त असल्याने शैव त्यांना शैवच मानतात या शैव भक्तांच्यातून विष्णूचे अवतार कसे तयार झाले हा एक फार मोठा प्रश्न आहे त्यामध्ये मी इथे जात नाही कारण या विषयावर अनेकदा मी लिहिले आहे बोललो आहे शैवांचे राम आणि कृष्ण हे वेगळे आहेत हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे हा वाद वैचारिक राहावा असा माझा नेहमीच आग्रह आहे मुळात तो वर्ण आणि जाती यांच्या बद्दलच्या दृष्टिकोनामुळे निर्माण झाला. शैव वर्ण जाती मानत नाहीत आणि वैष्णव मानतात त्यातून होणारा हा वाद आहे वैष्णवांनी व हिंदूंनी वर्ण जात सोडली तर हा वाद शिल्लक राहत नाही यदा कदाचित हा वाद राजकीय होत गेला तर मात्र भविष्यात अत्यंत गुंतागुंतीची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती उद्भवू शकते शैवांच्या दृष्टीने जय संविधान ही घोषणा योग्यच आहे कारण दंडनीतीबाबत त्या त्या काळाचे आकलन आणि ज्ञान प्रमाण मानत संविधान बनवले गेले पाहिजे असे शैव मानतात शैवांना कुठलीच स्मृती मान्य नाही त्यामुळे मनुस्मृतिही मान्य नाही भाजपने मनुस्मृती विषयी आपले धोरण बदलणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पुढच्या इलेक्शनस हरणे अटळ आहे कारण डरो मत डराओ मत हे आता जनतेचे घोषणापत्र बनणे अटळ आहे भाजपने वैष्णववादाचा अतिरेक केला तरीही शैवांनी पूर्ण पाठिंबा काढून घेतला नाही मात्र हा अतिरेक असाच चालू राहिला तर भविष्यात हा पाठिंबा राहील याची कसलीही खात्री देता येत नाही राहुल गांधींच्या या भाषणाने बरेच काही बदललेले आहे त्याचे नीट आकलन करून घ्याल तरच तराल अन्यथा बुडण्याचे शेकडो मार्ग उपलब्ध असतातच
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment