नेट स्पंद

 माझा देव कधी झोपलाच नाही 

कधी जागलाच नाही तर 

झोपणार कसा 


मी म्हणालो 

तुला कुठल्या मूर्त आकारात टाकू 

तर म्हणाला 

मी मुर्त्यांचा कारखाना टाकला 

म्हणून तर ही जीवसृष्टी आहे 

माझी मूर्ती तुम्ही मर्त्य लोक काय बनवणार 


मी म्हणालो 

मग बाई का जन्माला घातली ?

तर म्हणतो 

मुर्त्या जन्मताना मी विचार करत नाही 

मूर्ती मेल कि फिमेल 

जेल झाली कि झालं 


माझ्यापुढं प्रश्न आता वारी लावू का नको 

तर प्रश्न कळल्यासारखा म्हणाला 

जे कालातीत आहे 

त्याला काय आषाढ आणि काय कार्तिक 

काय एकादशी आणि काय पौर्णिमा 

मी काय तुमच्या चंद्र सुर्याइतका लिमिटेड आहे का 

माझ्या एका थेंबात करोडो सूर्य अब्जावधी चंद्र 


मी मग वारीचा सगळा तामझाम उधळून टाकला 

आणि नाचायला सुरवात केली 

तर मला माझ्यासोबत डान्स करतांना दिसला 

मी काय विचारणार इतक्यात म्हणतो 

"गॉड म्हणजे काय पप्पू वाटला तुला? 

कि गॉड कान्ट डान्स साला म्हणतोयस  ?

नाचत  रहा 

म्हणत

गॉड इज डान्स साला "


(नेट सिरींजमधील नेट : स्पंद ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून )

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे