नरेंद्र मोदी

 मोदींचा राजकीय शेवट जवळ आला आहे का? श्रीधर तिळवे नाईक 


ब्राह्मणवाद हा मूलतः भगतवादाचा वैदिक अविष्कार आहे .सांख्य धर्म आणि ब्रह्म धर्म स्वीकारून वैदिक श्रद्धेने वैदिक धर्म तयार केल्यानंतर तो मोक्षाकडे जाणार हे लक्षात आल्यानंतर ब्राह्मण भगत वर्गाने मोक्ष स्वीकारला पण सर्व वैदिक कर्मकांडे जशीच्या तशी राहतील याची पूर्ण काळजी घेतली अर्थात तरीही जेव्हा क्षत्रियांनी ब्राह्मणांना प्रभुत्व दिले नाही तेव्हा मात्र ब्राह्मणांना बंड करण्या खेरीज काहीही पर्याय राहिला नाही आणि ब्राह्मण धर्म हा ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान अबाधित राखण्यासाठीच निर्माण झाला जे वैदिक क्षत्रिय होते त्यांना पद्धतशीरपणे हटवले गेले त्यातूनच परशुरामाची दंतकथा निर्माण करण्यात आली क्षत्रिय हे फक्त वैदिक असतात हे लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे क्षत्रियांचा नाश म्हणजे योध्यांचा नाश नव्हे फक्त वैदिक धर्मात असणाऱ्या योद्धांचा अस्त म्हणजे परशुराम अवतार होय प्रत्यक्षामध्ये हे क्षत्रिय कसे नाहीसे झाले याबद्दल अनेक प्रश्न आहेत त्यावर वेगळी चर्चा केलेलीच आहे 


ब्राह्मण धर्माने आणि ब्राह्मण वर्णाने स्वतःची एक स्ट्रॅटेजी डिझाईन केलेली आहे ती म्हणजे बहुजन समाजामधून किंवा क्षत्रियांच्या मधून अत्यंत पराक्रमी असणाऱ्या माणसाला निवडायचे त्याची प्रचंड स्तुती करायची त्याला देव बनवून किंवा विष्णूचा अवतार बनवून आपल्या कह्यात आणायचे त्याच्या ठाई विशिष्ट पद्धतीने भय निर्माण करायचे आणि मग त्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात आणून त्याला तेच निर्णय घ्यायला लावायचे जे निर्णय त्यांना स्वतःला घ्यायचे असतात भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये ही गोष्ट वारंवार घडलेली दिसते किंवा फक्त घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसतो अर्थात फक्त ब्राह्मणच असे करतात असे नाही इतर सर्व धर्मांचे भगत जगभर हेच करत असतात अगदी शैव धर्मात सुद्धा जे भगत उरले होते त्यांनीच पुढे शैव-धर्माचे निर्माण करत संपूर्ण शैव धर्म आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला होता हेच लोक पुढे ब्राह्मण धर्माला साथ देणारे झाले यांनीच पुढे सर्व मंदिरे आपल्या ताब्यात घेतली दोन्ही धर्मातला भगतांचा मिलाफ किंवा युती ही बघण्याजोगी आहे या युतीतूनच आत्ताचे हिंदू धर्माचे पुरोहित तयार झालेले आहेत 


ब्राह्मणधर्माने प्रथम शांतपणाने हेडगेवार प्रभाव कमी होत जाईल याची काळजी घेतली मग सर्वात प्रथम गोळवलकर गुरुजींच्याद्वारे विचारधन निर्माण करत संपूर्ण राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा ब्राह्मणवादी करण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे करण्यात आला आणि सावरकर व ठाकरे यांचे हिंदुत्व हे ब्राह्मणी हिंदुत्व बनत गेले जनसंघ निर्माण झाला वाढवला गेला पण ह्याला जो पाठिंबा मिळायला हवा होता तो काही मिळाला नाही ब्राह्मणी हिंदुत्वाच्या जीवावर आपण यशस्वी होऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर ब्राह्मणांनी चाल बदलली आणि ते त्यांच्या नेहमीच्या शैली प्रमाणे वैष्णवांच्या कडे वळली वैष्णव हिंदुत्वाची मांडणी मुळातच सावरकर व ठाकरे यांनी केलीच होती ही मांडणी साहजिकच गीतेला प्रमाण मानणारी होती आणि खुद्द लोकमान्य टिळक सुद्धा जे मांडत होते ते वैष्णव हिंदुत्व होते याच वैष्णव हिंदुत्ववादाला अधिकाधिक पुढे करण्यात आले आणि त्यातूनच पुढे राम मंदिर चळवळ निर्माण झाली आणि आता मात्र त्या हिंदुत्वाला प्रचंड मोठा पाठिंबा मिळायला लागला ब्राह्मणांना स्वतःलाही हे अनपेक्षित होते रामायण आणि महाभारत या दोन टेलिव्हिजन मालिकांनी याबाबत त्यांना प्रचंड सहकार्य केले साहजिकच शैवधर्मी लोकांना सुद्धा आपली स्वतःची भगवान शिवावरची सिरीयल आणावी लागली जी धीरज कुमार यांच्याद्वारे आणली गेली ज्यामध्ये शिवाचे काम माझ्या मित्रानेच केले होते या वैष्णव हिंदुत्वाचे अत्यंत सगुण स्वरूप लाल कृष्ण आडवाणी यांनी जहाल पद्धतीने आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी मवाळ पद्धतीने सादर केले हे दोन नेतेच हिंदुत्वाचे चेहरे बनत गेले साहजिकच हे दोघेही प्राईम मिनिस्टर होणार असे चित्र तयार होऊ लागले त्यातील अटल बिहारी वाजपेयी हे जास्त लोकप्रिय असल्याने आणि जास्त भरवशाचे वाटत असल्याने साहजिकच त्यांना प्रथम पुढे आणले गेले आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले वैष्णव हिंदुत्वाचा हा प्रचंड मोठा विजय होता प्रबोधनकार ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी हे वैष्णव हिंदुत्वाचे चेहरे असल्याने साहजिकच त्यांच्या कारकीर्दीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांची युती होणे अटळ होते कारण दोघांचेही चेहरे वैष्णव अधिक होते या युतीचा एक फायदा असा झाला की कळत नकळत महाराष्ट्रामधले सर्व ब्राह्मणेतर लोक भाजपबाबत पॉझिटिव्ह बनत गेले आणि महात्मा फुले यांनी निर्माण केलेली सर्व ब्राह्मणे तर चळवळ ही हिंदुत्वामध्ये विसर्जित होऊ लागली 


दुसऱ्या बाजूला विशेषता वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय असल्याने वारकरी संप्रदायातले सर्व वारकरी हे भाजपकडे जाऊ लागले मात्र तरीसुद्धा संपूर्ण विजय प्राप्त होत नव्हता सीटा कमी पडत होत्या 


यातूनच मग जो शैव चेहरा देऊ शकतो अशा चेहऱ्याची शोधयात्रा सुरू झाली आणि शेवटी राजर्षी महाराजांच्या पर्यंत ती पोचली या महाराजांनी सर्वात प्रथम नरेंद्र मोदी त्यांचे शिष्य असल्याने त्यांना पुढे केले आणि भारतात प्रथमच हर हर महादेव म्हणत एक व्यक्ती पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून दाखल झाली तिने प्रथम गुजरात काबीज केला आणि नंतर संपूर्ण देश ! 


या स्ट्रॅटेजीचे मूळ मुळातच शिवाजी महाराजांच्या वेळेला जे करण्यात आले त्याच स्ट्रॅटेजित होते प्रथम शिवाजी महाराजांना वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करायला लावला नंतर दक्षिणेपासून त्यांना तोडण्यासाठी ते मूळचे दाक्षिणात्य असले तरी त्यांना अत्यंत जाणीवपूर्वक त्या काळामध्ये वैष्णव बनलेल्या राजपुतांशी जोडण्यात आले आणि त्यांना अनेक प्रकारची गॅरंटी देण्यात आली प्रत्यक्षामध्ये त्यांची तब्येत सुधारलीच नाही आणि महाराज पुन्हा एकदा शैव राज्याभिषेकाकडे वळले मात्र यानिमित्ताने वैदिक धर्माचा प्रवेश शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये झाला यानंतर संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा हेच घडवण्याचा प्रयत्न झाला परंतु संभाजी महाराज हे संपूर्णपणे शैवधर्मी असल्यामुळे या वैदिक धर्माची डाळ शिजली नाही आणि ब्राह्मण धर्माला तर थोडाही वाव उरला नाही आणि इथेच मग संभाजी महाराजांच्या विरोधात कारस्थाने शिजायला लागली पुढे मग पद्धतशीरपणे बाजीराव पेशव्यांनी मस्तानीशी विवाह केला याचे निमित्त करून नानासाहेब पेशव्यांना पूर्णपणे ब्राह्मणधर्मी करण्यात आले आणि त्यानंतर पेशवाई ही पूर्णपणे ब्राह्मणधर्मी बनत गेली. मात्र तिने मूळचा मराठा स्वभाव पूर्णपणे सोडला नाही कारण तो सोडला तर साम्राज्य आणि राज्य टिकणारच नव्हते


नरेंद्र मोदी यांना हर हर महादेव अशी घोषणा करायला लावत बहुजन समाजाचा चेहरा म्हणून प्रस्तुत करण्यात आले आणि नरेंद्र मोदी प्रथमच प्रचंड बहुमत घेऊन हिंदुत्वासाठी उभे राहिले असे यश खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा मिळालेले नव्हते जनतेचा संपूर्ण पाठिंबा शैवधर्मी चेहऱ्याकडून मिळतो हे माहीत असलेल्या ब्राह्मणधर्मी लोकांनी पुन्हा एकदा व्यवस्थित शैव धर्माला वापरून घेतले 


नंतर मग साहजिकच हा संपूर्ण हिंदुत्वाचा आखाडा पुन्हा ब्राह्मण धर्मी कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला थेट ब्राह्मण धर्माचा जयजयकार आणता येत नाही हे माहीत असल्याने प्रथम पुन्हा एकदा वैष्णव धर्म हिंदुत्व आणले गेले आणि नरेंद्र मोदी यांना हर हर महादेव सोडून आता जय श्रीराम म्हणा असे सांगण्यात आले दुसरी निवडणूक ही पुन्हा हरहर महादेव म्हणूनच लढवण्यात आली जेणेकरून प्रचंड बहुमत मिळावे आणि ते मिळाले मात्र बहुमत मिळाल्या मिळाल्या नरेंद्र मोदी वैष्णव मंदिरांच्या कडे जाऊ लागले इथूनच वैष्णव चेहऱ्याची पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि याचे कलमीनेशन राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करून रामाची पूजा बांधण्यात आली आणि आश्चर्यकारकरीत्या या पूजेमध्ये कुठल्याही शैव पुरोहिताला सामील करून घेतले गेले नाही एकही गुरव किंवा तत्समशैव पुरोहित बोलावला गेला नाही त्याला पूजेचा मान दिला गेला नाही मी असे होणार आहे हे आधीच माझ्या शैव पुरोहित लोकांना सांगितले होते त्यावेळेला ते कुणाला पटले नाही पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा ते घडले तेव्हा मग सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार केला पाहिजे याची जाणीव हळूहळू होऊ लागली 


एकदा का वैष्णव धर्मी हिंदुत्व प्रस्थापित झाले की आपोआपच ब्राह्मणधर्मी हिंदुत्व आणता येईल असे ब्राह्मणधर्म हिंदुत्वाला वाटते ते एकदा आले की मग वर्ण जाती व्यवस्था पूर्णपणे सामाजिक व्यवस्था म्हणून आणता येईल असा हा कयास आहे संविधान बदलून त्या जागी नवीन स्मृति कशी आणता येईल यासंदर्भात सुद्धा योजना तयार आहेत मात्र त्या कशा अमलात आणायच्या याबद्दल एकमत होत नाहीये थोडक्यात पाकिस्तान जसा इस्लामिक बनत गेला तसाच भारत सुद्धा मनुस्मृतीक बनवण्याचा प्रयत्न होणार नाही याची कसलीही खात्री आता उरलेली नाही 


हे थांबवण्याचा उपाय अंतर्गत पातळीवर शैव हिंदुत्वाचे पुन्हा एकदा जोरदार पुनर्जीवन हाच होता व आहे तर बहिर्गत प्रयत्न पुन्हा एकदा सेक्युलर लोकांचे पुनर्जीवन हा आहे किंवा मग तिसरा आगमवादी पर्याय अत्यंत सशक्त करत जाणे म्हणजेच शैव बौद्ध जैन हे एकत्र येणे हा आहे पण तो पर्याय नीट निर्माण व्हावा म्हणून ज्या गोष्टी फुले यांनी करायला हव्या होत्या त्या त्यांच्या काळामध्ये निर्माण झाल्या तरी त्याला जे आकार द्यायला हवे होते ते देण्यामध्ये बहुजन समाजाला अजून पूर्ण यश आलेले नाही या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरच जबाबदारी होती परंतु ती पार पाडली गेली नाही त्यांनी शैव श्रुती सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आणि तिथेच हिंदुत्ववादाचे यश निश्चित होत गेली बाबासाहेबांना हे त्या काळात कळले नाही याचा व्हायचा तोच परिणाम झालेला आहे आणि आता सर्व आंबेडकरवादी शैव धर्माच्या पूर्णपणे विरोधात गेलेले आहेत त्यामुळे फुले आंबेडकर वाद हा तिसरा पर्याय उभा करेल ही शक्यता मावळत चाललेली आहे कारण मुळातच पांडुरंगाच्या पूजे पाशी जात आणि वारकरी संप्रदाय स्वीकारत महाराष्ट्रातल्या आंबेडकर वादाने आत्महत्या पत्करलेली आहे हे सर्व करण्यामध्ये देशी वादाचा प्रचंड मोठा वाट आहे कारण देशीवादाने देशी वादाच्या नावाखाली वारकरी संप्रदाय सशक्त केला आणि त्याचे कळत नकळत परिणाम आज असे झालेले आहेत की महाराष्ट्राचा मुख्य धर्म शैव धर्म आहे याचा विसर पडून महाराष्ट्राचा मुख्य धर्म वैष्णव धर्म आहे अशी गैर समजूत आता खरी समजूत झालेली दिसते खुद्द ओबीसी समाजच उदासीन होताना दिसतो किंवा भाजप वादी होताना दिसतो हे साठोत्तरी पिढीचे पाप आहे आणि ते त्यांच्या पदरात घातलेच पाहिजे मुळात वैष्णव आणि शैव हे काय प्रकरण आहे हे साठोत्तरी पिढीला कधीही कळले नाही त्यांनी ब्राह्मणांनी जोरदारपणे केलेला प्रचार स्वीकारला तो म्हणजे शैव हा स्वतंत्र धर्म नसून तो एक संप्रदाय आहे आजही अनेक नव्वदोत्तरी देशी वाद्यांना ते कळत नाही आणि आता कळेल असे वाटत पण नाही 


महाराष्ट्रातला आणि भारतातला वैष्णव धर्म हा भाजपच्या बाजूने झुकत गेला आणि आता तो पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे त्यामुळे भाजपमधले कोणीही महानुभव पंथाचे नाव सुद्धा घेत नाही किंवा महात्मा गांधींना पूर्णपणे शत्रू मानले जाते कारण हे महानुभव धर्म आणि गांधीवाद हे नव वैष्णववादी होते जे जातीव्यवस्थेच्या आणि वर्णव्यवस्थेच्या विरोधात उभे राहायला लागले होते त्यामुळे ज्याला मी नववैष्णव वाद म्हणतो त्याला मुळात भाजपमध्ये जागाच नाही आणि वारकरी पंथामध्ये नव वैष्णव वादाला सुद्धा जागा नाही ती कशी आहे असा संत शिरोमणी तुकारामाचा आधार घेत सिद्धांत मांडला जातो परंतु प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्ष पुरावे तसे सांगत नाहीत नाहीतर महानुभव पंथापेक्षा वारकरी पंथ वेगळा झालाच नसता दोन्ही मधला फरकच हा आहे की महानुभव हा नववैष्णववादी आहे तर वारकरी हा सनातन कर्मठ वैष्णववादी आहे त्यामुळे वैष्णवादाला सध्या तरी पाठिंबा देणे म्हणजे सनातन कर्मठ वैष्णववादाला पाठिंबा देणे हाच आहे 


भारतात नेहमीच वैष्णव धर्म हा सनातन ब्राह्मण धर्माला वाट करून देतो त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्यापुढे खरा पेच उभा राहील किंबहुना तो त्यांच्यापुढे उभा ठाकलेला आहे एक तर त्यांना पूर्णपणे ब्राह्मणवाद राबवण्याखेरिज पर्याय नाही किंवा मग त्यांना शैव हिंदुत्व पुढे रेटून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात बंड करावे लागेल अन्यथा आत्तापर्यंतचा इतिहास लक्षात घेता ब्राह्मण धर्माच्या दृष्टीने जनतेचा पाठिंबा ब्राह्मणधर्माला मिळवून देणे हे नरेंद्र मोदी यांचे इतिहास दत्त कार्य संपलेले आहे प्रश्न असा आहे की त्यांची बदनामी करून त्यांना घालवण्यात येईल की अत्यंत सन्मानाने त्यांना निरोप देण्यात येईल ? शक्यता अशी ही आहे की खुद्द नरेंद्र मोदी यांनाच यासंदर्भात पर्याय विचारला जाईल आणि त्यानंतर जो पंतप्रधान येईल त्याला ब्राह्मणी हिंदुत्ववाद राबवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही हे सर्व काही थांबवणे फक्त भाजप आणि राष्ट्रीय सेवक संघातल्या शैव लोकांना ओबीसीबीसी आणि आदिवासी लोकांना शक्य आहे इतरांना ते शक्य नाही त्यांना स्वतः एकत्र येऊन यासंदर्भात आपल्या लोकांचे काय होणार हे समजून घ्यावे लागेल कारण ब्राह्मण धर्म येणे म्हणजे ओबीसीबीसी आणि आदिवासी यांचे कंबरडे मोडणे 


आपण हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण धर्म आणू नये असे म्हणणारे अनेक ब्राह्मण खुद्द हिंदुत्वामध्येच आहेत त्यांना संपूर्ण चळवळ आपण मागे नेऊ आणि खड्ड्यात पडू याची जाणीव आहे नितीन गडकरी हे या हिंदुत्वाचे या ब्राम्हण धर्माचे पण ब्राह्मणी नसलेले नेते आहेत पण ते आता किती मदत करू शकतील हे सांगता येणे कठीण आहे 


या सगळ्या प्रकारांमध्ये पुरोगामी लोकांची प्रचंड गोची झालेली दिसते वैष्णव धर्म पुढे टाकत आणि सर्व शैव धर्मियांचा पाठिंबा मिळवत हिंदुत्वाने अत्यंत धूर्तपणाने पावली टाकली ही पावले आपल्या विरोधात जाणार आहेत याची बहुजन समाजाला कल्पना आली नाही शैव धर्माची सतत उपेक्षा करणाऱ्या पुरोगामी लोकांना काय चालले ते कधीच कळत नाही त्यामुळेच हिंदुत्व त्यांच्या आकलनाच्या बाहेर जात राहते शिवाजी महाराजांच्या काळात हे लोक असते तर त्यांनी निश्चितपणे संभाजी महाराजांच्या विरोधात कारवाया केल्या असत्या इतके हे लोक इनोसंट किंवा मूर्ख आहेत 


थोडक्यात काय नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या हातामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तेच ठरवतील की ब्राह्मणी हिंदुत्व स्वीकारायचे की शैव हिंदुत्व कंटिन्यू करायचे?


त्यांच्या ठाई सर्व राजकीय ताकद एकवटली जाईल याची काळजी पद्धतशीरपणे घेण्यात आलेली आहे तेव्हा आपल्या हातात फक्त वाट बघणे आहे की नरेंद्र मोदी नानासाहेब पेशवे होतात की पुन्हा शिवाजी महाराज होतात ?


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे