बाळबोध कविता

तू जाशील पण परतणार नाही

फुले मरतील बाग गाणार नाही 


तू ज्या धर्माकडे जाते आहेस 

तो धर्म कधीही सुधारणार नाही 


मर्त्यतेवर कोणी मात केली 

या मातीत कोण मिळणार नाही?


जो तो दुसऱ्याला हुकूम देतो 

कोणाचाच हुकूम चालणार नाही 


या सगळ्या गोंधळापेक्षा प्रेम बरे 

प्रेमाशिवाय जगास काही बरे करणार नाही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


तू म्हणालीस म्हणून घराबाहेर पडलो निमूटपणे 

माहित होते विषारी तरी फळास लगडलो निमूटपणे


बोलू सुद्धा दिले नाहीस ओठ माझे केलेस लॉक 

एकटाच एकांतात स्वप्नात बडबडलो निमूटपणे


गाडीमध्ये रात्री काढल्या दिवस काढले सूर्याखाली 

उन्हात कधी काळोखात मी तडफडलो निमुटपणे 


दिली नाहीस कधी बेछूट वागण्याची तू किंमत 

तुला आली फुले आणि मी झळझडलो निमुटपणे 


 रस्त्यावरती हिंडतो आहे मी आता बेहोशी मध्ये

आठवत नाही कुठल्या जिन्यावरून गडगडलो निमुटपणे


इतकेच आहे आठवते की तुला दोन डोळे होते 

आणि तुझ्या नाकासमोर मी चडफडलो निमुटपणे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

पता नही क्या मगर कुछ लोगोंका कुछ औरही चलता है 

सामने होते हैं मगर दिमाग किसी और जगह हिलता हैं 


लगता है अपनी तरह इसी दुनिया मे पैदा हुए थे मगर 

शायद ही उनकी आँखोका नजारा दुनिया से मिलता हैं 


वो आपकी हाँमे हाँ और ना में ना मिलाते रहते है 

बाद में पता चलता है वो किसी और भाषा मे जलते हैं 


चुपचाप किसी समुंदर की तरह सामने बैठते है 

मचलतेभी है तो किसी लहर की तरह मचलते है


लगता है उनसे ये दुनिया संभाली नही जाती 

बादमें पता चलता है वे वो थे जो दुनियाको संभलते है 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


 मैं जब भी आता हूं सामने आईना होता है 

पता नही उनके महलमें और क्या क्या होता है 


घाट घाट का पानी पीकर वो समझा रहे है मुझे 

प्यास कैसी होती है प्यासा कैसा होता है 


मैने लिख दिया उनका पानीपे सुनहरा नाम 

मुझेभी देखना था बादल कौन सा दिवाना होता है 


बुराई क्लब खोल के बैठे है कुछ चंद लोग 

सुना है मेरे नामका वहाँ एकमतसे फैसला होता है 


मोहब्बत ब्रेललिपी है सिर्फ अंधा पढ सकता है 

जिसकी आँखें खुली उसे भाषासे जाना होता है


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


रात्र

दिवसानंतर पुन्हा परतते रात्र

सूर्याविरुद्ध गुन्हा करते रात्र 


रातराणीचा दरवळतो परिमळ 

रात्रभर स्वभाव जपते रात्र 


दिसते छोटे प्रत्यक्षात प्रचंड 

ज्या चांदण्यात वावरते रात्र 


कुठे कोणास स्वतंत्र अस्तित्व

हवेत ना दिवस ना असते रात्र


मला घरी परतायलाच हवे

दिवस मोजत ती काढते रात्र


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


इतका ना कंटाळा यावा आपल्याच आयुष्याचा 

की आपल्या आयुष्याकडे आपण घासाव्या टाचा 


इतकेही कुठल्या नदीने न येऊ द्यावेत पूर 

की बुडणाऱ्यांच्या मरणाचा बनून जावा साचा 


प्रत्येक बांधला गेलेला न कोसळावा पूल 

एखादा टिकावा आणि गवगवा व्हावा त्याचा 


माझा फाटला आहे खिसा आता इतका 

की 

त्वचेलाही खिशाखाली पडल्या आहेत खाचा 


त्यांनी माझ्या मरणाची दिली अशी बातमी की 

अलगद माझ्या आयुष्याचा कोसळून पडला ढाचा 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मेरा घर काच का है पत्थर तो फेको 

तेरे पास एक ही दिल है बराबर तो फेको 


नाराज नही हो जाऊंगा मै कभी तुमसे मगर 

अफवा ना फेको मेरे बारे में कोई खबर तो फेको 


जंग लढ रही हो उसका नही है मुझे मलाल 

इधर उधर नही कोई नजर मेरे दिलपर तो फेको 


बस खुदके दिल को कभी तुम बुझने ना देना 

यकीनन बुझेगा थोडा ऑइल दिलके अंदर तो फेको 


मुझे किसी खुदा या कयामत का इंतजार नही 

खुदा नहीं दिखा सकती झूठ बोलने का हुनर तो फेको


 श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

तुझ्याबरोबर शक्य होता म्हणून मी रोमान्स केला 

उत्तम डान्स फ्लोर होता म्हणून मी डान्स केला 


तुला हवा जो होता तो महान पुरुष मी नव्हतो 

लग्नासाठी कुणी हवा म्हणून मला तू चान्स केला 


या क्षणी ही कळत नाही तू हवी होतीस की गरज होतीस 

या प्रश्नाने छळ केला उत्तरांशी मी रोमांस केला 


आधीच ऍडव्हान्स बुकिंग करावे तसे मला तू बुक केले 

दुसरा चांगला पिक्चर दिसला त्याला तू मग आडवांस केला 


आता पुन्हा गरज आहे म्हणून तर तू परतली आहेस 

मी प्यारीस समजावे तुला म्हणून तर माझा फ्रान्स केला


आता अशा डेस्टिनेशन वर आपण दोघे पोचले आहोत 

आपण तमाशा बनलो आहोत म्हणून लोकांनी डान्स केला 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


आयुष्याच्या शेवटी तो उदास आहे 

त्याला कळत नाही तो नापास की पास आहे 


त्याला असे वाटते की सर्व वळसा घालून गेले 

पाठलाग करावा म्हटले तर पायात ऱ्हास आहे 


कधी थप्पड पडली कधी गुलाब गालावर टेकले 

त्वचेवर मात्र दोन्हींचा टिकलेला सुवास आहे 


कधी नम्र झाले कधी यश माजोरडे झाले 

नेमके कशामुळे मिळाले केवळ अदमास आहे 


मरताना माहीत होते की आपण कधीतरी मरणारच 

जगतानाही कळले होते जगणे मरणदास आहे


कधीही भेटलो नाही मी मरणाऱ्या आजोबांना 

मला इतकेच माहीत माझा आज्जा खास आहे


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


कोई मेरे लिये खडा नही 

और दुनिया मे कोई खुदा नही


किसी तरह से मुझे चलना होगा 

पाव मेरे हैं मगर रास्ता मेरा नाही 


सब छोडके चले गये है सच है 

मगर येभी सच है कि मै तनहा नही 


ज्यादा से ज्यादा क्या होगा मौत होगी 

और मै अभी भी मौत से डरा नही 


भेज दो और दो चार मेरे लिए कातिल 

मै पुरी तरह से अभी मरा नही 


श्रीधर तिळवे नाईक


ढगांनो तुम्ही निरक्षर आहात आणि मी कालिदास नाही 


यक्ष संपले संपवले गेले 

त्यांचा कुठेही भास नाही 


सरकारने आणले पोस्ट ऑफिस 

तिला चिठ्ठ्याच पाठवाव्या म्हणतो


तेव्हा पाणी टाका 

अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करून 


सध्या तरी माझी तहान गळ्यापूरती मर्यादित आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


सेक्स किया है कोई गुनाह नही 

और किसी धर्मग्रंथसे मांगी पनाह नही 


बदन तो मिल गये इसमे क्या प्रॉब्लेम 

क्या हुआ गर एक दुसरे की चाह नही 


मै तो उसके खूबसूरती पे ही मर मिटा

खूबसूरती पे मरना कोई गुनाह नाही


मैने सिर्फ मेरी बदन की आवाज सुनी 

हो सकता है वो उतनी अथाह नहीं 


वैसे भी गहराई मे जाके क्या मिलता है 

तुम कहते रहो आत्मा मेरी राह नही


करने से पहले भी उसे स्ट्रेट कहा था 

मुझे कोई मोहब्बत नही मुझे कोई चाह नही 


जो होना था वो दोनों में अपनी मर्जी से हुआ 

किसी को मिरची लगी तो वो मेरा गुनाह नही 


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

आई-वडिलांशी आपण चांगलेच असतो 

कारण त्यांच्याकडून नेहमी आपण घेत असतो 


त्यांच्यावर खरे प्रेम आहे की नाही कळणे कठीण 

ते कळण्यासाठी आपण कुठे त्यांना काही देत असतो 


त्यांच्यापैकी काही लावतात आपल्यासमोर तराजू 

आणि आपणही कधीकधी आपल्या हातात तराजू घेत असतो 


आपणाला त्यांच्याकडून मिळणारी इस्टेट असते 

आणि कधीकधी आपण त्यांची खरी इस्टेट असतो 


हे सगळे ओलांडून जर वाहत असेल पाणी 

तरच ओळखाल त्यांच्या समुद्रामुळे निर्माण झालेली आपण नदीच असतो


मला असे आईबाप लावले ज्यांनी फक्त प्रेम केले 

आणि मीही त्यांच्यासमोर फक्त प्रेमच असतो


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)


मला माझ्या ह्या आयुष्याचा कंटाळा आलाय 

किती जगायचा तोच तोच साचा कंटाळा आलाय 


तेच कॉलेज ते चेहरे तेच विद्यार्थी तीच प्रयोगशाळा 

विज्ञानाचा तोच तोच ढाचा 

कंटाळा आलाय 


मी सायन्स साईड सोडावी का ? काय पकडावे 

मला जे वाटते ते खुणा आहे की खाचा कंटाळा आलाय 


कसे भाऊंना सांगावे असे जगणे पटत नाही 

अख्ख्या हृदयाच्या झाल्यात काचा कंटाळा आलाय


असे काही चिखलांचे अंगण दिले आहे की 

सुटका नाही जिथून जे म्हणते नाचा कंटाळा आलाय


श्रीधर तिळवे नाईक 

(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे