मोक्ष आफ्टर इफेक्ट

 रियल इंटीलिजन्स घट 

आर्टिफिशीयल इंटीलिजन्स वाढ 


आता सूजेला मी माझा अवयव मानावं काय 

एक्स्टेंडेडचा तमाशा आयुष्याचा फोकस ?


जे फ्रिक ते किक 


माझ्या डोळ्यांच्यावर मायेचा ताण 

मी आता माझी बुबुळं भाड्याने द्यावीत काय ?


रक्तात वाळवत ठेवलेले स्फटिक 

वाळवंटाची तयारी करतायत काय ?


आसक्त्यांचा अंत नाही 

संत आर्टिफिशियल 


इंटरनेट साधन म्हणता म्हणता जगणं बनलंय 

अन जगन अजूनही कमळ बघतोय 


माहितींचे अदृश्य डोंगर उचलतांना मी XXमान 


राXला सन्मान दिला तर 

XX म्हणतोय 

छाती फोडून फोटो दाखव 

नाहीतर आर्टिफिशीयल इंटीलिजन्सचा फायदा काय ?


मेलो ह्याचं दुःख नाही 

छाती भलत्याच ठिकाणी उमटली 

ह्याचं दुःख आहे   


श्रीधर तिळवे नाईक 

(मोक्ष सीरीजमधील आफ्टरइफेक्ट ह्या काव्यफाईलीतून )

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे