शिवारकऱ्यांनी वारकऱ्यांचे काय करायचे किंवा शैव धर्माने वारकरी संप्रदायाचे काय करायचे श्रीधर तिळवे नाईक 


आषाढी किंवा कार्तिक एकादशी आली आणि वारीची चर्चा सुरू झाली की शैवधर्मीय जे लोक आहेत त्यांच्यापुढे खूप प्रश्न निर्माण होतात अर्थातच यामागे एक मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे शिवारकरांनी वारकऱ्यांचे काय करायचे किंवा शैव धर्माने वारकरी संप्रदायाचे काय करायचे ? सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातला मीडिया मग ते एबीपी चॅनेल असो किंवा झी असो किंवा आणखी कुठले हे कधीही बहुजन समाजाच्या बाजूने उभे राहत नाही त्यामुळे कायमच वारकरी संप्रदाय हा कसा वैष्णव संप्रदाय म्हणून प्रोजेक्ट होईल याविषयी ही सर्व चॅनल्स अत्यंत जागृत असतात बहुजन समाजाला अधिकाधिक गुमराह कसे करता येईल याविषयी दक्ष असतात साहजिकच वारकरी संप्रदायाचा प्रचार जास्तीत जास्त वाढत जातो आणि त्याचे मूळ शोधण्याची जबाबदारी कोणीही घेत नाही वास्तविक यासंदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे पुरावे देत रा चि ढेरे यांनी विठ्ठल हा मूळ शैव दैव होता हे सिद्ध केलेले आहे निष्कर्ष मात्र त्यांनी स्पष्टपणे आणि स्वच्छपणाने नोंदवलेला नाही याचे कारण त्यांना कळत नकळत त्यांच्या काळाचा वारकरी संप्रदायाचा साठोत्तरी दबाव झेलावा लागला ते त्यातून कधीही बाहेर पडले नाहीत पण आता 21व्या शतकामध्ये जिथे बहुजन समाज पूर्णपणे जागृत झालेला आहे आणि ओबीसी समाज आणि बीसी समाज पूर्णपणे जागा झालेला आहे तिथे आता आपण अधिक मोकळेपणाने या विषयावर लिहू शकतो 


महाराष्ट्रामध्ये ही जी सर्व धर्माची स्थिती झाली त्याला पंडित लोकांनी स्वतःचे करून घेतलेले ब्राह्मणीकरण जबाबदार आहे वास्तविक सगळेच मग ते चितपावन असो जे मूळचे ग्रीस देशातून आले होते किंवा सारस्वत असो जे मूळचे अफगाणिस्तानातून आले होते किंवा देशस्थ वराडी आणि कराडे असो जे इथलेच मूळचे द्रविड पंडित होते हे सर्वच मूळचे पंडित आहेत परंतु या लोकांना स्वतःचे सर्वोच्च स्थान देत ब्राह्मण लोकांनी जे पाचव्या शतकाच्या आसपास महाराष्ट्रात आश्रयार्थी म्हणून आलेले होते आत्मसात करायला सुरुवात केली आणि हळूहळू दहाव्या शतकात या लोकांनी या सर्वांना सामावून घेत ब्राह्मण वर्ण हा सर्वोच्च वर्ण म्हणून कसा केंद्रीय स्थानी येईल आणि क्षत्रिय कसे आपले ऐकतील या अंगाने व्यवस्थित तुफानी प्रचार केला या प्रचाराला सर्वच्या सर्व पंडित लोक बळी पडले जे मराठी पंडित होते जेव्हा तुमचा पुरोहित वर्ग तुमच्या धर्मापासून पाठ फिरवतो तेव्हा फार मोठी पंचायत होते त्यानंतर गुरव लोकांनी तरी किमान हा किल्ला व्यवस्थित लढवायला हवा होता परंतु दुर्दैवाने याच वेळेला मुस्लिम सत्ता आली आणि हा किल्ला लढवण्यासाठी लागणारे राजकीय बळ त्यांना मिळाले नाही हे राजकीय व शेवटी त्यांना पुन्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मिळेल मिळाले आणि पुन्हा एकदा शैव-धर्माची पुन्हा स्थापना झाली हर हर महादेव पुन्हा एकदा केंद्रस्थानी घोषणा म्हणून आली दुर्दैवाने हे स्वातंत्र्य फार काळ शैव-धर्माला टिकवता आले नाही आणि याला पुन्हा पंडितच जबाबदार होते वास्तविक भट घराणे हे मूळचे पंडित ज्यांची गणना नंतर नंतर महाराष्ट्रामध्ये चक्क शूद्रांच्यात होत होती आणि जे पहिल्या बाजीराव पर्यंत स्वतःला मराठा म्हणवून घेत होते ते अचानक पुन्हा ब्राह्मण धर्माच्या नादाला लागून पुन्हा ब्राह्मण झाले आणि सेवधर्माचे संपूर्ण स्वातंत्र्य या लोकांनी धोक्यात आणले इथूनच वारकरी संप्रदाय नावाचा एक संप्रदाय अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागला पण असेल कार्यकर्ते इथूनच वारकरी संप्रदा यामध्ये मुक्त झालेला पुरुष किंवा स्त्री मिळणे मुश्किल झाले कारण याही संप्रदायांमध्ये पुरोहित शाही आली आणि ब्राह्मणांचा प्रवेश होत ब्राह्मणांनी वारकरी संप्रदायाचे संपूर्णतः ब्राह्मणीकरण केले आणि या संप्रदायाला वर्ण जाती व्यवस्थेने पूर्णपणे ग्रासून टाकले 


प्रश्न असा आहे की पंडित लोक आता तरी शहाणे होणार आहे की नाही ? हा ब्राह्मण होण्याचा मोह आता तरी सोडणार आहेत की नाहीत ? की केवळ स्वतःला उच्च वर्ण मिळतो म्हणून स्वतःच्या धर्माकडे पाठ करून बसणार आहात ? चुका नेहमीच घडतात अगदी ज्यू धर्मातल्या पुरोहितांनी सुद्धा अशा चुका केलेल्या दिसतात परंतु नंतर ते शहाणे झाले पंडित लोक शहाणे होणार आहेत की नाही ? पंडित हा समाज सर्व लोकांना खुला असतो हे लक्षात घेतले पाहिजे त्यामुळे अनेक कोळी वंजारी समाजातले लोक नंतर पंडित झालेले दिसतात आणि आश्चर्यकारकरीत्या नंतर ते स्वतःला ब्राह्मण समजायला लागले असे दिसते बहुजन समाजातील अनेक आडनावे त्यामुळेच ब्राह्मण लोकांच्या मध्ये सुद्धा वावरताना अलीकडे दिसतात त्याचे कारण हेच आहे पंडित हा समाज सुद्धा भविष्यात ओपन असला पाहिजे आणि सर्व विद्वान बहुजन समाजातल्या लोकांनी स्वतःला पंडित म्हणवून घ्यावे बाबासाहेब आंबेडकर किंवा शरद पाटील किंवा आ ह साळुंखे यांच्यासारख्या विद्वानांचा पंडित बाबासाहेब आंबेडकर किंवा पंडित शरद पाटील किंवा पंडित आ ह साळुंखे असाच उल्लेख करावा त्याशिवाय पर्याय नाही आणि हे उपकार म्हणून करू नये तर त्या लोकांचा अधिकार आहे म्हणून करावे 


अर्थातच दुसरे कारण मुस्लिम धर्माचा विजय होय भारतात जेव्हा जेव्हा युरेशन धर्म विजयी होतात तेव्हा तेव्हा भारताचा पाडाव होतो भारत पराभूत होतो हा इतिहास आहे उदाहरणार्थ ब्राह्मण धर्म जेव्हा विजयी व्हायला लागला तेव्हा पर्शियन लोकांनी आक्रमण केले आणि आपण त्यांच्याकडून पराभूत झालो जेव्हा ब्राह्मणांचा श्रुतीस्मृती धर्म विजयी व्हायला लागला तेव्हा आपण शक हुंणांच्याकडून पराभूत झालो आणि जेव्हा आपण गुप्त काळात वैष्णव होत गेलो तसे तसे आपण दुबळे पडत शेवटी मुस्लिम लोकांच्याकडून पराभूत होत गेलो प्रश्न एवढाच आहे की आत्ता आपण नेमके युरेशियन होत चाललो आहोत का आणि तसे झालो तर पुन्हा आपला पराभव होणे अटळ आहे का ? इतिहासापासून आपण योग्य तो धडा शिकून पुन्हा एकदा आगमीक होत विजयी होणार आहोत ? गेली बाराशे वर्षे शैव धर्मी लोक वारंवार पराभव निवडत आहेत आणि यामागे कायमच युरेशियन धर्मांची गुलामगिरी हे कारण राहिलेले आहे तेव्हा निदान आता तरी एकविसाव्या शतकात शहाणे व्हा स्वतःचे ब्राह्मणीकरण घडवले म्हणजे आपली उंची वाढेल या भ्रमात राहू नका या भ्रमातून बाहेर या 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे