चॅनेल बॉलीवूड
त्या त्या चित्रपटा पुरतीच दोस्ती
नंतर कोण लक्षात ठेवतो ही मस्ती
सगळे संबंध तात्कालीक असतात
आत्ताच फोटो काढ नंतर कुठे असणार हस्ती
कुठलाही फायनान्स पर्मनंट नाही
सगळ्या तिजोऱ्या तात्कालीक तात्कालीक गस्ती
नंतर कुठे पुन्हा इथे यायचे आहे
हे लोकेशन आहे ना घर आहे ना वस्ती
मोबाईलवर देवघेव तर चालेलच
जोवर एकमेकाला गरजेची धास्ती
फिल्म फ्लॉप झाली तर भेटू नको
त्या बिल्डिंगमध्ये राहू नये जी आहे खचती
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल बॉलीवूड या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment