चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सेट्रा
मी तुझ्या प्रेमात नाही
किंवा असं म्हणता येईल कि
तू मला नकार दिल्यावर
मी असं म्हणतोय कि
मी तुझ्या प्रेमात नाहीत
किंवा असं म्हणता येईल कि
तुझ्यापेक्षा कुठल्या तरी रिक्षावाल्याचा प्रेमात पडून
मी बरबाद होईन
असं तू रोखठोक बोलल्यामुळं
मी तुझ्या प्रेमात नाही
पण ज्या अर्थी मी ही कविता लिहितोय
त्या अर्थी मी तुझ्या प्रेमात आहे
मी पाहतोय कि
माझ्या डोळ्यांना कुलूप घालून
तू चावी घेऊन निघून गेलीयेस
मी पाहतोय कि
माझे दात तू घश्यात घातलीयेस
आणि पृथ्वीवर ते विखरून पडून
त्यांची कवळी थरथरतिये
मी पाहतोय कि
माझ्या खोलीत धुळीने माखलेले कागद उडतायत
ज्यांच्यावर झाडे लावा झाडे जगवाची
जाहिरात आहे
मी तुला सेक्सची ऑफर दिली
आणि तू म्हणालीस
"तुझ्यापेक्षा कुठल्या तरी रिक्षावाल्याचा प्रेमात पडून
मी बरबाद होईन "
आणि निघून गेलीस
इतकंच तर घडलं आपल्यात
मी प्रेम केलंच नाही तुझ्यावर
कि केलं ?
मी तुला कॉलनी समजलो कि काय
काय न्हवतं तुझ्याकडं
डोळ्यांचे निळे डायमंड
त्वचेच्या पाण्यावर रेघा ओढणारे
त्यांचा चहा बनवणारे
सरळ नाकाच्या कृतक नसलेल्या रेषा
मोडलेल्या गाण्यांना दुरुस्त करणाऱ्या
सेक्स क्राफ्ट जाणणारे ओठांचे फुगवटे
चुंबनाचे ज्वालामुखी पाळणारे
मी तर फक्त लाव्हा मागितला
आणि तू म्हणालीस
"तुझ्यापेक्षा कुठल्या तरी रिक्षावाल्याचा प्रेमात पडून
मी बरबाद होईन "
आणि निघून गेलीस
ओळख तर काहीच न्हवती आपली
पण पहिल्याच भेटीत कोल्हापुरी होण्याचे डेअरिंग
माझ्यात जन्मजात
आता ऊर्जा कयामतीत जाऊन काही दिवस तंबाखू मळेल
आणि रिक्शावाल्यांना बघत म्हणेल
इनके कपडे मेरे कपडोंसे सफेद कैसें ?
श्रीधर तिळवे - नाईक
(चॅनल : लव , सेक्स एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)
कविता आणि शरीर
सेक्युलर का धार्मिक तत्व
कळत तर नाही काही
ढवळून निघते जडत्व
दिशांचा लागत नाही
मला कॉन्टॅक्ट नंबर
पूर्वीसारखे नाही
मावत दुर्बिणीत अम्बर
व्हिडिओवर व्हिडीओ पडतो
आपण करतो ब्रेकप पूर्ण
क्रिस्टललाईनवर देतो
देह ऑर्डीनरी चूर्ण
गाडीतून निघून जातेस
पाडापाडीचा सरफेस अंत
करिअर करणाऱ्यांना
नकोसा बॉयफ्रेंड संत
मी तुला अडवत नाही
तूंही सोडतेस गाव
दोघांनाही ठावे
देहाची आपल्या धाव
श्रीधर तिळवे
(चॅनेल सिरींजमधील चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सट्रा ह्या काव्यफाईलीतून )
बाईला पाप शोभते
पुरुषाचे पुण्य कापरे
दोघांना समजत नाही
कोणाला कोण वापरे
शरीराचा परफॉर्मन्स
आजकाल मॅटर करतो
हॉन्टिंग करते माईंड
देऊनही आत काय उरतो
संभोग असतो कि असतो
सेल्फ रिप्रेझेंटेशन
वाटते मिटींग होईल
संपल्यावर एक्स्प्रेशन
इम्प्रेशन होईल चेक
देह हा होईल बाऊन्स
देहातून कसे काढावे
उफ्फ आणिक ऊन्स
ऑथेंटिक इमोशन्स
असतात कि त्या नसतात
शरीर उभे असतांना
त्या का खाली बसतात
जेनुइननेस कुठे उडतो
शिल्लक फक्त अत्तर
बाहेर बढाया मारतो
येऊन गेल्या सत्तर
श्रीधर तिळवे
(चॅनेल सिरींजमधील चॅनेल लव्ह सेक्स अँड एल्सट्रा ह्या काव्यफाईलीतून )
Comments
Post a Comment