डे कॅथलॉन भक्ती
चिखल माखलेला तुझ्या अंगावर
चिखलाने आंघोळ करेल स्वच्छ ?
काढायास मळ हवे जळ निर्मळ
इथे पाणी सकळ मळलेले
तुझी वारी म्हणजे नेमकी काय आहे जर चिखलच वाहे चिखलावर
तू तर पाणीही केले चिखलमय
नदीसुद्धा झाली चिखलमय
इतकी घाण केली तरी पवित्र कशी
कधी तू केली नदी स्वच्छ
आतून बाहेरून तूच आहे
चिखल
चिखलाची कलकल तुझी भक्ती
कर नदी स्वच्छ बाहेर आणि आतली त्यानेच धुतली जातील पापे
बाकी कर्मकांड आहे आडदांड
नशा तुझी मांड मीडियात
वारी झाली सवय तोच ताल तीच लय
चिंता आणि भय घनदाट
केवळ पलायन चाललेले आहे
रस्त्यावर वाहे पलायनच
थकलास पळून की मग ये घरी
नळी स्वच्छ पाणी कर आंघोळ
नावाने करायची स्वतःच्या की देवाच्या
कायेचा कोपच्या जलमुग्ध
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन :अनकॅटेगरीकल :भक्ती या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment