निर्वाण सिरीज
Concerns कोणालाच असत नाही
तोही प्रोफेशनल झालाय
आणि त्यासाठी तुला इस्पितळात ऍडमिट व्हावे लागेल
संन्यास स्वीकारलास तेव्हाच
समाजमान्य एकटेपण स्वीकारलेस
स्वीकारलेस की जगण्याची टिकण्याची जबाबदारी तुझी स्वतःची आहे
रोग समाजाकडून आला की निसर्गाकडून आला
हा मुद्दा नाही
मुद्दा हा आहे की मरणाला टेकून तू समोरच्या माणसाला करुणेच्या नजरेने बघू शकतो का?
डॉक्टरला द्यायला तुझ्याजवळ पैसे नाहीत
त्यामुळे तोही मुद्दा नाही
हे जे अंगात आणि अंगावर पसरलेले आहे
ते तू कसे काढणार हा मुद्दा आहे
मोक्ष मिळाला नाही
पण मरणाची गॅरंटी आहे अशी ही सिच्युएशन
पंक्चुएशन्स करण्याआधीच पूर्णविराम समोर
त्वचा पूर्ण ठासली गेलेली
आणि ठेच जागोजागी
मोडकळीला आलेले शरीर घेऊन
तुला या शहरात टिकायचे आहे
एकट्याने
घाबरून जाऊ नकोस
एकटेपणा आजार आणि तू
हे डेडली कॉम्बिनेशन नाही का ?
आजाराला सुद्धा एंटरटेनमेंट म्हणून पाहता आले पाहिजे
इंटरवल तर आली
निदान दि एंड पर्यंत कर्मणूक सेलिब्रेट कर
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण या सिरीज मधील निर्वाणापूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment