शैव पालकांनी मुलांशी कसे वागावे श्रीधर तिळवे नाईक 


 १ प्रत्येक मुलाला सांगा की नेहमी सत्य बोलावे खरे बोलावे खोटे बोलू नये त्याला सांगा की जर हे सत्यावर चालले आहे आपण सर्वच एकमेकांशी खोटे बोलू तर जगात जगताच येणार नाही मी जर तुझ्या ताटात बटाट्याची भाजीच वाढणार आहे तर मी बटाट्याची भाजीच वाढली पाहिजे मी म्हणालो की पोकळ्याची भाजी वाढणार आणि प्रत्यक्षात बटाट्याची भाजी वाढली तर तू जेवशील का खाण्यापिण्यापासूनच खरं बोलण्याची सुरुवात होते जगण्याला खरं बोलण्याचा अधिकार आहे आपण सगळे एकमेकांशी खरं बोलतो म्हणूनच आपण कुटुंब म्हणून जगू शकतो तेव्हा खरे बोलावे कधीही खोटे बोलू नये कारण जग खर्‍यावरच चालते खोट्यावर चालत नाही 

२ अहिंसा हीच जगण्याचा आधार आहे मात्र स्वतःचे संरक्षण हा आपला अधिकार आहे तेव्हा प्रत्येक मुलाने आणि मुलीने स्वसंरक्षणासाठी एखादी मार्शल आर्ट शिकलीच पाहिजे सर्व शैवांना सांगण्यात येते की त्यांनी आपल्या गल्लीत एखादी मार्शल आर्ट शाळा सुरू करावी ज्ञानशाळा सुरू करावी जिच्यात मार्शल आर्ट शिकवली जाईल विज्ञान तंत्रज्ञान चिन्हविज्ञान चिन्हतंत्रज्ञान शिकावे समोर जर एखादी व्यक्ती हिंसक असेल तर तिच्याशी कसे वागावे सर्वात प्रथम समजावणी करावी त्याला किंवा तिला सांगावे की हिंसा करू नकोस आणि निघून जावे दुसऱ्यांदाही समोरची व्यक्ती हिंसा करत असेल त्यासाठी प्रवृत्त करत असेल तर स्वतःचे संरक्षण करावे आणि त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये द्यावी पोलिसांच्या कडून कारवाई करावी तिसऱ्यांदाही ती व्यक्ती हिंसाच करणार असेल तर तिला घायाळ किंवा जखमी करावे किंवा चाय बंदी करावे पोलीस स्टेशनला न्यावे आणि पोलिसांच्या कडून आवश्यक ती कारवाई होते की नाही ते पहावे चौथ्यांदा ती व्यक्ती तरीही हिंसा करत असेल तर स्वतःचे संरक्षण करून जे जे करता येणे शक्य आहे ते करावे स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्यावी पोलीस यंत्रणाची मदत घ्यावी त्यांचे मार्गदर्शन घ्यावे यदाकदाचित पोलीसच करप्शन करत असतील तर त्यांची तक्रार सीनियर लोकांच्याकडे करावी ज्येष्ठ अधिकाऱ्यांना त्यासाठी भेटावे अजिबात घाबरून जाऊ नये योग्य तऱ्हेने काम करणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा आदर करावा त्यांना सन्मान द्यावा आणि शैव संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करावा समाजात जे जे उत्तम काम करतात त्यांना आदर सन्मान मिळेल याची काळजी सर्वांना घ्यावी अशा प्रकारचा कार्यक्रमात सर्व पालकांनी सहभागी व्हावे शैव लोकांनी नेहमीच चांगल्या कामात एकमेकाला सहकार्य करावे एकमेकांशी जोडलेले असावे अशावेळी संरक्षणासाठी इतर शैव लोकांनीं त्यांना साथ द्यावी शक्यतो आक्रमण करू नये जर आवश्यक वाटेल तरच आक्रमण करावे व्यक्तीने आक्रमण करू नये देशाने आक्रमण तेव्हाच करावे जेव्हा संपूर्ण देशाचे नुकसान समोरचा देश करत असेल 


३ हिंसा हे कुठल्याच घटनेचे सोल्युशन नसते हे जसे कळले पाहिजे तसेच अन्नाबाबतही वस्त्राबाबतही निवाराबाबतही आक्रमक होणे योग्य नव्हे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण हे योग्य मार्गाने मिळवावे जेवढे गरजेचे आहे तेवढेच खावे जेवढे आवश्यक आहे तेवढेच वस्त्र घालावे दुसऱ्यांना अन्न आणि वस्त्रावरून चिडवू नये स्वतःच्या आरोग्याची स्वतःच काळजी घेण्यासाठी व्यायाम करावा आणि स्वतःच्या घराचे क्षेत्र उगाच वाढवत बसू नये प्रत्येक व्यक्ती मागे जास्तीत जास्त 500 स्क्वेअर फिट एवढे क्षेत्र असावे त्यामध्ये मेडिटेशन करण्यासाठी एक रूम असावी आणि शैवांचे पंचसिद्ध म्हणजेच शंकर ,पार्वती, गणपती ,स्कंद आणि नंदी यांची स्थापना असावी शिवलिंगाची स्थापना करावी यांच्याद्वारे योग उपाय किंवा शरीर उपाय , ज्ञान उपाय, क्रिया उपाय , भक्ती उपाय , शक्ती उपाय यांचे शिक्षण द्याव या पाची उपायांची लहानपणीच मुलांना कल्पना द्यावी ते समजून घ्यावेत अन्न वस्त्र आरोग्य निवारा आणि शिक्षण हे आपल्या मुलांना देणे आपले कर्तव्य आहे याचे भान असू द्यावे शासन या संदर्भात काय काय करते ते पाहावे आणि शासनाच्या ज्या योजना असतात त्यांचा फायदा घ्यावा मुलगा असो अथवा मुलगी समानता असावी मुलांना आणि मुलींना वेगवेगळा न्याय असू नये दोघांनाही शिकवावे आणि वाढवावे आणि दोघांनीही आपल्या आई-वडिलांना पाहण्याची जबाबदारी घ्यावी म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुलाचे आणि मुलीचे कर्तव्य आहे आजोबा आणि आजीची सेवा करणे नातवंडांचे कर्तव्य आहे आणि आपल्या नातवंडावर प्रेम करणे आणि संस्कार करणे हे आजी आजोबांचेही कर्तव्य आहे हे बिंबवावे पालकांना सांभाळणे प्रत्येक मुला मुलीचे कर्तव्य आहे याचे भान असावे साठ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक वृद्धाला सांभाळणे त्याची काळजी घेणे ही शासनाची ही जबाबदारी आहे याचे भान शासनाला असणे आवश्यक आहे जेव्हा शक्य असेल तेव्हा कर्ज द्यावे धनदान करू नये त्याऐवजी अन्नदान करावे वस्त्रदान करावे निवारा दान करावे आरोग्य दान करावे शिक्षणदान करावे मात्र धनदान करू नये कोणाच्याही हातात पैसा ठेवू नये त्याऐवजी कर्ज द्यावे मात्र अशा वेळेला किती वर्षाची मुदत ठेवायची याचे भान बाळगावे शक्यतो गरीबाच्या घरी कर्ज वसूल करायला जाऊ नये त्याच्यासाठी या सर्व गोष्टीवर काळाची मुदत लादू नये क्षमता असूनही कोणी कर्ज फेडत नसेल तर मात्र त्याच्या दारी अवश्य जावे आणि कर्ज वसूल करावे शिक्षण, उद्योग आणि व्यवसायासाठी घेतलेले कर्ज सर्व मेहनत करून शक्य असेल तर फेडावे कोणाचेही कर्ज बाकी ठेवणे हे योग्य नव्हे काम करणाऱ्या चांगल्या संस्थांना दान देऊ नये पण देणग्या द्याव्यात आणि ह्या देणग्या नेहमीच चेकनेच द्याव्यात कॅश कोणालाही देऊ नये


४ भरपूर साठा करू नये आवश्यक असेल इतका साठा करावा मात्र अन्न वस्त्र निवारा यांची तरतूद ही शासकीय पातळीवर किमान वर्षभराची असावी लोकशाही किंवा तत्सम व्यवस्थेचाच पुरस्कार करावा राजेशाही किंवा एखाधिकारशाही मान्य करू नये मतदान करावे आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न खाऊ नये वस्त्र घालू नये आवश्यकतेपेक्षा अधिक जमीन बाळगू नये अपवाद शेती व व्यवसाय होय वा धंदा होय तिथे मात्र व्यवसायाच्या आवश्यकतेइतकी जमीन बाळगावी 


५ प्रत्येक मुलाने आणि मुलीने आपल्याला आवश्यक असा पार्टनर शोधला पाहिजे कुठल्याही मुलाला आणि मुलीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे हा अधिकार मुलीला जितका आहे तितकाच मुलालाही आहे पार्टनर स्वतःच्या धर्मातलाच असला पाहिजे इतर धर्मातल्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम बसले असेल तर तिला आपल्या धर्मात घ्यावी आणि विवाह करावा अर्थात ज्यांचा मोक्षावर विश्वास आहे त्यांना त्यांचा धर्म घरात पाळू द्यावा ज्यांचा मोक्षावर विश्वास नाही अशा सर्व धर्मांतील जोडीदारांना आपल्या धर्मात घेतल्याशिवाय लग्न करू नये मुलीच्या संमतीशिवाय किंवा मुलाच्या संमतीशिवाय विवाह करू नये विवाह करताना वर्ण जात जमात यापैकी काहीही पाहू नये कुठल्याही मुलीला शारीरिक पातळीवर आक्रमक होऊन छेडू नये आणि बलात्कार तर अजिबातच करू नये बलात्कार करणे हे महापाप आहे आणि ह्याला कडक शिक्षा असलीच पाहिजे स्त्रीला नेहमीच कविता वगैरे पाठवून प्रपोज करावे चांगल्या भाषेत प्रपोज करावे तिच्याशी बोलताना उत्तम चांगली आणि सभ्य भाषा वापरावी अनुचित शब्द तिच्या अनुमतीशिवाय वापरू नयेत तिच्या अनुमतीशिवाय तिला स्पर्श करू नये तिला विचारावे की मी स्पर्श करू शकतो का तिला विचारावे कीस चुंबन घेऊ शकतो का आणि मगच किस घ्यावा मुलाला जन्म देण्याची आवश्यकता ही दोघांनी ठरवावी स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्या गर्भाशयात मूल घालू नये मुलांना जन्म द्यायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार नवरा आणि बायको दोघांनाही आहे जर एकाला मूल जन्माला घालायचे आहे आणि दुसऱ्याला मुल जन्माला घालायचं नाही अशी स्थिती असेल तर शक्यतो लग्न होऊन देऊ नये अशी लग्न करू नयेत जर दोघांनाही लग्न करून मुलाला जन्म द्यायचा असेल नसेल तर असे लग्न करण्याची अनुमती द्यावी शक्यतो दोन मुलांच्या पेक्षा अधिक मुलांना जन्म देऊ नये अर्थात जो देश लोकसंख्येपासून वंचित आहे अशा ठिकाणी मात्र मुलांची संख्या वाढवावी जिथे प्रचंड लोकसंख्या आहे तिथे शक्यतो एकच मूल जन्माला घालावे मुलाच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची जबाबदारी आरोग्य शिक्षणाची जबाबदारी ही सर्वांच्या वरच आहे यात पालक जसे येतात तसे शासनही येते 


६ कधीच कुठल्या गोष्टीचे आकर्षण इतके वाढू देऊ नये की चोरीचा मोह व्हावा अचौर्य आणि अस्तेय हे पाळावेत ना कोणाचे अनुकरण करावे ना कोणाचे क्रिएटिव वर्क चोरावे दुसऱ्यांचे श्रम चोरणे हा गुन्हा आहे तो करू नये जुगार खेळू नये प्रत्येक श्रमिकाला योग्य तो मोबदला द्यावा कुणालाही फुकट राबवून घेऊ नये जर पैसे देता येणे शक्य नसेल तर तसे आधीच सांगावे पैशाचा व्यवहार काम सुरू करण्याआधीच ठरवावा आणि तो कागदावर उतरवावा कागदावर ठरलेले पैसे द्यावेत


७ मुलांना सांगावे की जीवनाचा मुख्य उद्देश मोक्ष आहे ह्याशिवाय अर्थ आणि काम आहे आणि मोक्षाच्या एक यम नियम दोन आसन तीन प्राणायाम चार धारणा पाच ध्यान सात सात आठ निर्विकल्प समाधी अशा पायऱ्या आहेत है मोक्षाचे अष्टांग आहे हे अष्टांग ११४ तंत्राद्वारे प्राप्त होऊ शकते पंच-उपायाद्वारे प्राप्त होऊ शकते मोक्षामध्ये नेहमीच यम नियम विधी नियम पालन करणे गरजेचे असते कायद्याचे पालन करावे चुकीचा कायदा किंवा विधी नियम असेल तर त्यासाठी सत्याग्रह करावा मात्र हिंसक योजना करू नये सत्याग्रहाने काम भागत नसेल तर लाठी मोर्चा काढावा त्यानेही काम भागत नसेल तर त्रिशूल मोर्चा काढावा मात्र त्रिशूल लाकडी असावेत त्या नंतरही जर शासकीय संस्थाच प्रचंड प्रमाणात हिंसक होत असतील तर आणि तरच हिंसेच्या संदर्भात विचार करता येतो अन्यथा कुठल्याही शासनाविरोधात अहिंसा हाच उपाय असला पाहिजे प्रथम सत्याग्रह धरावा आणि कसलेही शस्त्र हाती न धरता मोर्चे काढावेत शासनालाही समजवावे कायदा खरोखरच दुरुस्त करणे आवश्यक आहे का यावर खोलवर चर्चा करावी मात्र कायदे बदलणे आवश्यक आहे असे वाटले तरच कायदे बदलावेत अन्यथा कायदे बदलू नये सर्वच कायद्यांचा आधार द्वादशशिले म्हणजे १सत्य २अहिंसा ३सुपरीग्रह ४ अचौर्य व सुश्रम ५ निर्व्यसनीपणा ६ सुकाम अथवा ब्रह्मचर्य ७ निरहंकार ८ नि अमरत्व ९ सुसंबध व सत्संग व करुणा १० सुकिर्ती ११ सुज्ञान , कुशलता व अप्रमाद १२ अस्तेय हाच असला पाहिजे 

मद मोह मत्सर निंदा चुकीच्या मार्गाने कीर्ती मिळवणे यापासून प्रत्येकाने दूर राहणे आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीने समाज आणि अर्थशास्त्रामध्ये पैसा मिळवण्यामध्ये चांगलाच मार्ग अवलंबावा आपल्याला नेमके काय आवडते ते पाहावे आणि त्यातच करिअर करावे ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या करू नयेत त्यांच्यावर उपजीविका करू नये याबाबत स्वतःची आस आस्था पहावी आवड पाहावी प्रथम स्वतःची जीविका काय आहे ते पहावे कारण जीविका म्हणजे स्वतःला जी गोष्ट आवडते ज्या गोष्टीत श्रम करायला आनंद मिळतो अशी गोष्ट अशा गोष्टीच्या द्वारेच पैसे कमावणे योग्य होय जीविका शक्य नसेल तिने अन्न वस्त्र निवारा मिळत नसेल तरच उपजीविका निवडावी सर्व पालकांनी आपल्या आपत्यांचा कल नेमका कुठे आहे ते पाहावे आवड कुठे आहे ते पाहावे आणि त्याप्रमाणेच त्याला जीविका करण्याची अनुमती द्यावी 


८ कुठल्याही गोष्टीचा मद माज चढू देऊ नये मद हा विनाशकारी असतो आपल्या जवळ जे आहे त्याचा अहंकार बाळगू नये आपल्या जवळचे ज्ञान हे दुसऱ्याला द्यावे मात्र ते योग्य जागी जाते आहे की नाही याची काळजी घ्यावी जी द्वादशशिलता पाळत नाही किंवा त्या दिशेने काही प्रयत्नही करत नाही अशा व्यक्तीला ज्ञान देऊ नये


९ कुठल्याही श्रमाची लाज करू नये शारीरिक श्रम करण्याचीही लाज बाळगू नये भरपूर श्रम करावेत मेहनत करावी कौशल्य मिळवावे शिक्षण घ्यावेच घ्यावे शिक्षण मेहनत कौशल्य शिकावे आणि वाढवत न्यावे सर्वांशी मधुर बोलावे लोकांच्या संपर्कात राहावे संपर्क वाढवावा अपयश आले तरी खचून न न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करावेत ही यशाची गुरुकिल्ली आहे यश मिळवणे पाप नाही यश मिळवणे हे पुण्य आहे मात्र ते द्वादशशिलता पाळूनच मिळवले तरच ते खरे यश होय चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे तात्कालीक असते त्याचा कोणीही विसर पडू देऊ नये यशासाठी चुकीचा मार्ग निवडू नये स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवावा प्रतिभेवर विश्वास ठेवावा शिव आणि शक्ती तुमच्या पाठीशी नेहमी असतात हे लक्षात ठेवावे तुम्ही योग्य मार्गाने गेलात तर शिव आणि शक्ती तुम्हाला यश देतातच


१० संपूर्ण मानव जात एक आहे संपूर्ण जीवसृष्टी एक आहे याचा कधीही विसर पडू देऊ नये कसल्याही प्रकारचा वर्णभेद कसल्याही प्रकारचा जातीभेद कसल्याही प्रकारचा जमाती भेद पाळू नये कसल्याही प्रकारच्या विषमतेला उत्तेजन देऊ नये कुठल्याही प्रकारच्या शोषणाला सहन करू नये आणि शोषण होऊ देऊ नये शोषण करू नये राष्ट्र हे आवश्यक असेल तर राष्ट्रीय कायदे पाळावेत आंतरराष्ट्रीयता आवश्यक असेल तर आंतरराष्ट्रीय कायदे पाळावेत शासन संस्थेत फक्त द्वादशीशीलता पाळणारा माणूस निवडून द्यावा पाठवावा कसल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला शासन संस्थेत जागा देऊ नये शासन संस्था आपली कर्तव्य पार पाडत असेल तर तिला उत्तेजन द्यावे तिचे कौतुक करावे शासन संस्था कर्तव्य पार पडत नसेल तर तिच्यावर टीका करावी वेळप्रसंगी आंदोलन करावे युद्धे शक्यतो टाळावीत युद्धांच्यामुळे दोन्ही राष्ट्रांचे नुकसान होते हे ध्यानी ठेवावे मात्र आपला भूप्रदेश कधीही सोडू नये आपल्या भूप्रदेशावर कोणी आक्रमण करेल तर आपल्या भूप्रदेशाचे संरक्षण करावे जर हे आक्रमण दोन पेक्षा अधिक वेळा झाले तर त्याचा भूप्रदेश बळकावावा आणि तिथे आपले शासन आणावे 


११ आपल्या द्वादशशीलतेचा प्रचार करावा आणि ते स्वतःही आचरणात आणावे तसा संपूर्ण प्रयत्न करावा प्रत्येक मंदिरात एक शाळा एक कला शाळा एक हॉस्पिटल निर्माण करावेत ज्यांना कोणीच नाही त्यांना निवारा पुरवावा प्रत्येक मंदिराने लिंगर म्हणजेच लंगर घालावा आणि भुकेलेल्यांना अन्न घालावे त्यांना वस्त्रे द्यावीत गरीब लोकांच्या आरोग्याची काळजी पूर्णपणे घ्यावी त्यांच्याजवळ पैसे नसतील तरी त्यांचे इलाज करावेत त्यांच्यावर उपचार करावेत लग्न शक्य असतील तर शिवलिंगापुढेच लावावी किंवा मग सरकारी दरबारी रजिस्टर लग्न करावे लग्नाची सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावीत निर्माण करावीत बारा शैव उत्सवांचा जल्लोष करावा ते साजरे करावे प्रत्येक नवरात्रीला दिवाळीला आणि महाशिवरात्रीला सर्वांनी आपल्या प्रदेशात एकत्र यावे कुंभमेळ्याला सर्वांनीच आपापल्या जवळ असलेल्या नदीत उतरावे प्रथम नदी साफ करावी आणि उतरावे नदीचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी सर्व प्रदेश प्रदूषण मुक्त राहील याची कायमच शैवाने काळजी घ्यावी ज्ञानाचे विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे चिन्ह विज्ञानाचे चिन्ह तंत्रज्ञानाचे सहकार्य करावे एकमेकांशी देवाण-घेवाण करावी ज्ञान एकमेकांना द्यावे ज्ञान वाढवावे नवीन ज्ञानाची कास धरावी आणि मुलांच्यावर त्यांचे संस्कार करावेत काशी ही आपली धार्मिक राजधानी आहे हे लक्षात ठेवावे आणि एकदा तरी आयुष्यात काशीला जावे काशीत गेल्यावर शंकराची पूजा करावी पार्वतीची पूजा करावी शिवलिंगाची पूजा करावी घरात दररोज शिवलिंग पुजावे मात्र पुजाअर्चनेत अति वेळ घालवू नये द्वादशशीलतेचे आचरण हीच खरी पूजा होय याचे भान असावे आठवड्यातून किमान एकदा आपल्याजवळ असलेल्या शिव मंदिरात किंवा शक्ति मंदिरात किंवा गणपतीच्या किंवा स्कंदाच्या किंवा नंदीच्या किंवा त्यांच्या अवतारा असलेल्या मंदिरात किंवा एखाद्या सिद्धाच्या मंदिरात जावे शिवलिंगाला पुजावे किंवा पंच सिद्धांच्या अवतारांना पुजावे जर एखादा सिद्ध जिवंत असेल तर त्याला पुजावे दुसऱ्या धर्मातील सिद्ध असेल तर त्याला मान द्यावा दुसऱ्या धर्मातील एखादी व्यक्ती जर द्वादशशीलता पाळत असेल तर तिचा आदर करावा विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकताना कुणाचाही धर्म पाहू नये सर्वांच्याकडून विज्ञान आणि तंत्रज्ञान चिन्ह विज्ञान आणि चिन्ह तंत्रज्ञान शिकावे सर्व प्रकारचे ज्ञान गोळा करावे सर्व प्रकारच्या कला शिकाव्यात कौशल्य शिकावीत मात्र नैतिकता सोडू नये द्वादशशिलता सोडू नये आपली आवड काय आहे आपली आस्था काय आहे ते नीट पहावे प्रत्यक्ष प्रमाण पाहावे काही वेळा अनुमानात्मक प्रमाण पहावे मात्र एखादी गोष्ट प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होत नसेल तर तिच्यावर विश्वास ठेवू नये चिन्ह प्रमाण सुरुवातीला आवश्यक आहे मात्र वय वर्षे १८ नंतर प्रत्येकाने चिन्ह प्रमाण जर पुराव्यासह दाखल होत असेल तर स्वीकारावे गुरु ज्ञान देणारी व्यक्ती ही कोणत्याही लिंगाची असू शकते ती स्त्री असू शकते तसेच पुरुषही असू शकते किंवा इतर लैंगिकताही तिचा चॉईस असू शकतो ती काय ज्ञान देते ते सर्वाधिक महत्त्वाचे मानावे


१२ आपल्या द्वादशशिलतेचा मोक्षाचा सर्वांना उपदेश द्यावा प्रचार करावा प्रसार करावा त्यासाठी जगभर व्हावे जगभर जावे संपूर्ण ब्रह्मांडात जावे संपूर्ण शिवांडात जावे शिवाय जर कोणी शैव-धर्मात येत असेल तर त्याला आत घ्यावे याबाबत ना जेंडर अर्थात लिंग बघावे ना वर्ण बघावा न जात बघावी ना धर्म बघावा ना देश बघावा ना वेष बघावा ना आर्थिक स्थिती बघावी ना सामाजिक स्थिती बघावी ना राजकीय स्थिती बघावी ना ज्ञानीक स्थिती बघावी ना शारीरिक स्थिती बघावी ना भोगोलिक स्थिती बघावी ना अवकाशिक आणि ना कालिक स्थिती बघावी या पृथ्वीतलावर असणारी ब्रह्मांडात आणि शिवांडात असणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव शैव धर्म स्वीकारू शकते याची जाणीव ठेवावी तिला प्रवृत्त करावे मात्र जबरदस्तीने धर्मांतर करू नये धर्मांतर घडवण्याचा हक्क प्रत्येक शैव व्यक्तीला आहे ओम नमः शिवाय हा मंत्र तीन वेळा म्हणायला लावावा आणि शिवलिंग एक दिवस गळ्यात घालावे किंवा दोन तास पुजावे म्हणजे धर्मांतर पूर्ण झाले असे समजावे त्या व्यक्तीला आपले यमनियम आणि द्वादशशीलता समजावून सांगावी जीवनशैली समजावून सांगावी अर्थ काम मोक्ष नीट समजावून सांगावेत आपल्या मुलांनाही या गोष्टी नीट समजावून त्यांच्यावर तसेच संस्कार करावेत 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे