Channel series
साक्षात्कार श्रीधर तिळवे नाईक
१
तू निघून जाणार नाहीस
दुसरे निमंत्रण म्हणून पुन्हा पुन्हा उगवशील
समोर नसताना समोरच्याविषयी बोलणे
याची भाषेलाही आता सवय आहे
तिच्या मांसाला एकनिष्ठता ठाऊक नाही
आणि हाडांना तर
अनेक चेहरे कॅल्शियम म्हणून लागतात
ज्या मुली स्वतःलाच बिघडवून घेण्यात हुशार असतात
त्यांच्या इतिहासाची चौकशी करू नये
तुझ्या जीभेतच तुझे उद्देश होते
आणि तुझ्यापासून सावध करण्याचे उपदेश
गटांगळ्या खातच गटारांना मिळाले
हे असं होतं
व्यभिचार सशासारखा उड्या मारत जातो
झोपतो
आणि पश्चाताप
कासवासारखा मागे राहत शर्यत जिंकतो
जी जिंकणे निरर्थक असते
२
माझं प्रेम होतं
प्रश्न ते एकतर्फी होतं
की तिच्या बाजूनेही होतं
हा प्रश्न तुझ्यामुळे उपस्थित
नाहीतर मी निश्चितच होतो
सगळं दुतर्फा म्हणून
आकाश एकच होतं
पण चांदणं तीन ढगांच्या वर पडलं
पृथ्वी एकच होती
पण जमीन तीन वहिवाटदारांच्या कडे गेली
आता विनंती केली म्हणून
तिला पश्चाताप झाला असं समजावं
की तिच्या शरीराचा आवेग स्पष्ट दिसत असताना
तिला थांबवावं ?
गुंतागुंत तिनेच निर्माण केलीये
आणि निमित्त मात्र तू आहेस
तुझ्या मित्राने तुझ्या विषयी स्पष्ट कल्पना दिली होती
हा दुसऱ्यांच्या बायका चोरण्यात निपुण आहे म्हणून
आणि तरीही मी तुला घरात घेतला
याचा अर्थ मी मूर्ख होतो
तिला मोलकरीण हवी होती
आणि तुझ्या घरात ती उपस्थित होती
मोलकरणीसाठी तुला आमंत्रण
निमित्तकारण
संबंधांच्या फुलांना झडायला वेळ कुठे लागतो
हृदयाचा वृक्ष किडण्यामध्ये निपुण असतो
तुझ्यासारखे साप कात टाकतात
आणि मागल्या दाराने आत शिरतात
ईडन गार्डन दोघांचीच होती
ती तू ईश्वराशिवाय बिघडवलीस
किंवा कदाचित ईव्ह माझी नव्हती हे मला पटवायलाच तुझा अवतार होता
पापांच्या गर्दीशी कनेक्ट व्हायला इमोशनल वायरिंगला वेळ लागत नाही
तिच्या मोडून पडलेल्या प्रतिमांचे ढिग
ढीग डाँग
सिंग साँग म्हणायला जिभेवर कुठे दिग्दर्शन शिल्लक होते
मेडल्स सारखी मॉडेल्स वाटत जाणारा काळ
लंपास केले गेलेले पासवर्डस
सिच्युएशनच्या बॅटवरून सुटलेली ग्रीप
गुरु म्हणायचे आणि गांड मारायची
सीडक्शनचा डावच टाकायचा असतो
तेव्हा नात्याला बेंबी असते कुठे ?
३
तुझ्या सिडक्शनने तिचे माझ्यावरचे प्रेम संपले
की मुळात माझ्यावर प्रेम नाही हे तिला कळले?
वसंत उसळतात आणि कोसळतात
झाडांना आपली मजबुती बनवावी लागते
दुःखी करून जाणारा वारा
श्वासांच्या कानाखाली वाजवतोय
मेस तर झाली
जखमा तर झाल्याच
त्यांच्यात थांबून किती काळ आंबुन जायचं ?
काळजावर हात ठेवत
किती काळ विचारत राहायचं
तुला खात्री आहे ना
४
सार्वजनिक भाषा लैंगिकतेत खाजगी होते
आपल्या आयुष्याचे प्रायव्हेट पार्ट रिपेरिंगसाठी पब्लिक मध्ये टाकता येत नाहीत
भरवसा तर कोणाचाच देता येत नाही आजच्या युगात
वचने काटकांसारखी मोडली जाऊ शकतात
रुपये मोजून कवी खरेदी केले जाऊ शकतात
कविता नाही
पण तुझे रूप म्हणजे रुपया नव्हते
म्हणून तर ती खरेदी केली गेली
लोक प्रकाशाकडून आंधळे बनवले जाताना
समांतर सूर्य शोधणारा माझ्यासारखा माणूस
तुझ्यापुढे आऊटडेटेड झाला
माझी स्त्री तुझ्यापुढे नागडी झाली
आणि तिच्या शरीराचे संगीत ऐकणारे कान
माहित नाही कसे पण बहिरे झाले
कदाचित तिलाही हे कळले असावे
म्हणून तर माझ्या exit ची मागणी आकांताने येतीये
माझा कापला गेलेला गळा
प्रतिसाद देण्याच्या स्थितीत नाही
प्रेम मेले
तिच्या आतले
आता मी तिच्या काळजात चांदणे वेचायला गेलो तरी
माझ्या हातात गोवऱ्याच येणार
मला इतकंच कळून चुकलंय
शेणाला गोल्डन टच देता येत नाही
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील ज्ञ: लव ,लिव इन अँड लव आऊट या काव्यफायलीतून)
भारत समजायचा असेल तर
सर्वात प्रथम संस्कृत फेकून द्यायला हवी
आणि थेट माणसात उतरायला हवं
तुझे आजोबा रंगनाथांचे शिष्य होते त्याबद्दल आदर
पण संस्कृत ही मिसअंडरस्टॅण्डिंगची पाठशाळा आहे
असा माझा फील असेल तर
मी तो मारावा का
समाजशास्त्रात ब्लॉक होऊन विटा मोजणं
आणि इरावती दुर्गेत तुलना करणं
ह्यापलिकडेही जग आहे
माझ्या विषयात रस घे असं मी म्हणत नाहीये
मला तुझ्या विषयात रस आहे
म्हणून तुला माझ्या विषयात रस असला पाहिजे
ही लेनदेन झाली
प्रेम न्हवे
आपल्या घरात आपल्या आपल्या दोन वाटा
ना मिटिंग पॉईंट
ना मेल्टिंग पॉईंट
अहंकाराचा हिमालय
आणि अंतःकरण कसं सह्याद्री आहे
ताटं घे
जेवूया
दि एन्ड मध्ये
श्रीधर तिळवे - नाईक
(चॅनल : लव , सेक्स एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)
भिंती चांगदेवांच्या मनातल्या
आता चालवून दाखवाव्या लागत नाहीत
त्या डिजिटल झालेत
स्वतःहून चालत राहतात
चांगदेवाला कळत नाही
त्यांना कसं हाताळायचं
तो ज्ञानेश्वरांच्या शोधात आहे
त्याला अजूनही कळत नाही
भिंती त्याच्या होत्या
आणि त्यांना चालवणारा ज्ञानेश्वर त्याच्या आतच होता
ज्या दिवशी भिंती चालत असल्या तरी
भिंतीच आहेत हे त्याला कळेल
तेव्हा त्याला त्याच्या आतला ज्ञानेश्वर सापडेल
तोवर चालू द्या
जो वर चालतायत
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल : स्पिरिच्युअल या काव्य फायलीतून)
कुठलेही फील्ड निवड
पण त्याबरोबर अनिश्चितता निवड
नाहीतर इनबॉक्स मध्ये घुटमळत राहशील
आणि आऊट ऑफ बॉक्समधून येणारे लोक
तुझ्या करिअरचा वध करतील
कसं आहे
स्पर्धा आहे
आणि स्पर्धा कधीच इनबॉक्स कडून नसते
स्पर्धा नेहमीच
आऊट ऑफ बॉक्समधून येणाऱ्याच्याकडून असते
तेव्हा इनबॉक्समध्ये वळवळायचं की आऊट ऑफ बॉक्सबाहेर चळवळ करत
वळवळ लाथाडत
धोक्याचे धूर उडवत
पुढं सरकत राहायचं ?
जग म्हणजे काही मळलेली पायवाट न्हवे
हा हमरस्त्यांचा चक्रव्यूह आहे
जो एका निश्चितीनंतर
स्वतःचे पूल बांधायला लावतो
तेव्हा फ्लायवे बांधता येत असतील
तर टिकशील
अन्यथा माशी म्हणून मळवाटेवर पळवाटेवर
उडत राहशील
आणि लोक तुला माशी समजून मारतील
हा देश तसाही माशीचळ लागलेल्या रिकामटेकड्यांचा आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरीच्युअल ह्या काव्यफायलीतून )
शुरू मेरी बरबादियोंका सिलसिला हुआ है
आज उनके साथ रस्ते पे तमाशा हुआ है
वैसे भी कहा उनको रिश्तों को संभालना था
वो हम है जिन्होने बॅलेन्स संभाला हुआ है
हर हादसे मे उनकी तरफसे दो चार ईटे आई
दिलका मकान उनके पास गिरवी रखा हुआ हैं
मुंहपे ना ताला था ना इज्जत की फिकर थी
उनके सामने अच्छेअच्छोंका गरुर फिका हुआ है
उनके साथ रिश्ता तोडते नही तो क्या करते
उनके पक्ष मे कानून का फैसला हुआ है
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव्हर टेलर अँड टेररिझम या काव्यफाईलीमधून)
खाजगी श्रीधर तिळवे नाईक
खाजगी अवयव
ताजगीत असतात
माजगीत पोहचतात
मी त्यांना आजगीत आणण्याचा प्रयत्न करतो
फेल जातो
माझ्या अपयशांच्या न्यूज बनतात
ज्या न्यूडपेक्षा चालवाचाळव करण्यात कमी नसतात
खाजगी अवयव उत्सुकता निर्माण करतात
उत्सुकता चालवतात चाळवतात
मालवतात
खाजगी अवयव वैयक्तीक कर्तृत्वावर अवलंबून असतात
त्यांचा गाजावाजा फक्त सार्वजनिक असतो होतो
प्रत्यक्षात त्यातील दहा टक्केच यशस्वी होतात
आणि ९० टक्क्यांना ढकलून वजनाने हलक्या होतात
खाजगी अवयव
पब्लिकमध्ये शेअर आणतात
पब्लिक होतात
मात्र त्यांच्या उत्तान बैठका
एकमेकावर ताण करत
खाजगीत होतात
ज्या अनेक सार्वजनिक निर्णय घेतात त्यांना खेळवतात त्यांच्याशी खेळतात
खाजगी अवयव
तुम्ही फक्त पोर्नोग्राफर म्हणून शूट करू शकता
खाजगीत पाहू शकता
मात्र त्यांना थिएटर रिलीज द्यायला
तुमच्यात सार्वजनिक दम लागतो
नाहीतर सेन्सॉरकडून खाजगी दबाव निर्माण करत
त्यांना अंगवस्त्राइतकी मेंदूच्या कपाटात जागा देत
कपडे आणि कपाटे सांभाळणारी संस्कृती निर्माण करावी लागते
खाजगी पराभूत होत नाही कारण खाजगी कायमच मात करत माता बनते बनवते
आणि विजयी होते
खाजगीची ही लैंगिक ताकद सहजासहजी कळत नाही
तुम्ही खाजगीतूनच आलेले आहात
तुमचा डावा हातही डावा पायही
मी म्हणूनच खाजगीत डावे उजवे करत नाही
मला माहित आहे
देह
दोन्ही हातांनी दोन्ही पायांनी दोन्ही डोळ्यांनी दोन्ही कानांनी दोन्ही नाकपुड्यांनी दोन्ही फेपड्यांनी
चालत असतो
खाजगीच्या पलीकडे फक्त एकच गोष्ट असते
मोक्ष
ती इतकी उघडी इतकी नागडी आणि सर्वत्र असते
की कोणालाच दिसत नाही
लोकांना फक्त खाजगीच गोष्टी दिसत असतात
एकमेकांच्या
बाकी सार्वजनिक फक्त अधिक खाजगी असते
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल निर्वस्तु या काव्यफायलीतून)
लोक श्रीधर तिळवे नाईक
१
लोक खूप स्ट्रॉंग असतात
त्यांचा उथळपणा खूप स्ट्रॉंग असतो
त्वचा पाहणारे त्यांचे डोळे विकट असतात
जे बिकट न पाहता
सरसकट पाहतात
तू त्यांचे काय करू शकतोस ?
२
लोक व्यवस्था बनवतात
तिचे काहीही करता येत नाही
लोक धर्म बनवतात
त्याचे काहीही करता येत नाही
लोक कार्पोरेट बनवतात
त्यांचे काही करता येत नाही
लोकांचे काहीच करता येत नाही
कारण लोकांच्याकडे लोकसंख्या असते
३
लोकांची शाही आली कि
लोकांचे प्रश्न सुटतील
असं तुला वाटलं होतं
आणि लोक त्यांच्या शाहीतही
देव आणि राजे वसवत राहिले
नेते आणि अभिनेते देव्हाऱ्यात बसवंत राहिले
लोकांच्या शहाणपणावर अनेक अफवा बेतल्या गेल्या
आणि शेवटी गंज सापडल्यावर कळले
मेटल्स नाहीसे झालेत
४
एक आयुष्य
लोकांच्या कल्याणासाठी वेचलेलं
लोकांच्या मूर्खपणात वाया गेलं
आता ह्या आयुष्याचं
तू काय करणारेस ?
५
लोक
त्यांच्यासाठी वाया गेलेल्या आयुष्याचे फोटो बनवतात
किंवा पुतळे
एरव्ही लोकांना त्यांच्यासाठी वेचल्या गेलेल्या आयुष्याविषयी
काहीही देणेघेणे नसते
लोक स्वार्थी असतात
आणि लोकांचा स्वार्थ ज्यांना वापरता येतो
त्यांना ते नेते बनवतात
तुझा निस्वार्थीपणा
हा त्यांच्यासाठी फक्त चेष्टेचा विषय आहे
तेव्हा हे वाया गेलेले आयुष्य नीट गोळा कर
समाधी लाव
लोकांच्यातून त्यांच्या नीचपणातून मुक्त होण्याचा
आणि त्यांच्या मूर्खपणाला माफ करण्याचा सर्वोत्तम उपाय
मोक्ष आहे
श्रीधर तिळवे नाईक
{चॅनेल सिरींजमधील चॅनेल स्पिरिच्युअल ह्या काव्य फाईलीतून }
१
मोहाच्या दऱ्या खोटं बोलतात
वासना आणि आपण यांच्यात अंतर किती
जादूमंतर किती
या शहरात इमारती झाडासारख्या उगवलेल्या वाटतात
लिफ्ट म्हणजे मजले बांधणारे सरकते सिमेंट
वासनांची निमंत्रणे धुळीसारखी
असं नाही कि तुझ्याबद्दल माहीत नाही
तरीदेखील त्वचेवर पाईप्स आणि काचा
डोळ्यात गाणाऱ्या भींती आणि लिफ्ट देणाऱ्या खाचा
मला आवरायला हवं त्वचेचं अंग पृथ्वीचे सुख
राख होण्यापूर्वीच सावरायला हवा त्वचेचा कोळसा
नाहीतर जंगल काय किंवा शहर काय
वासनेच्या आगीत मैलोगणती राख
आणि हृदयात त्यांच्या बातम्या
२
निसर्गानं बाईला इतकं सुंदर का बनवावं
कि मी पुरुष आहे म्हणून मला बाई सुंदर वाटते
तपशिलांच्या आणाभाका घेता येत नाहीत
डिटेल्स टेल्स सांगताना सुंदर दिसतात
बाई कळायला सात जन्म पुरत नाहीत
आणि आठव्या जन्मात ती आयुष्यात येत नाही
म्हणते ,"अशा अडाणी पुरुषाबरोबर आता आठवा जन्म कोण काढेल ?"
३
तारुण्य मादक
त्यात पापाचे उदक
हंस बनते बदक
उडत राहतो
४
संभोग म्हणजे काळाला पडलेलं भोक
बासरी वाजवणारे
त्यातूनही गाणी तयार करतात
५
तू कोणाचीतरी कोण
येतीयेस
पार्ले गर्ल अजूनही चेहऱ्यात शाबूत
मी तुला बिस्किटासारखी खाल्ली असती
जर तू माझी बायको असतीस
विचार येतोय
आणि मला कळतंय हाच तो मोहाचा क्षण
ज्यात हिमालय गडगडतात
६
तुला डिवोर्स घ्यायचा आहे
आता मी तुला काय मानावे
विवाहित कि अविवाहित ?
संभ्रम भ्रमन्ती करतायत
मी नवल कर झालोय
इतक्या फास्ट असमाधान ?
असंतोषाचे काळे आरसे
कानांच्या खिडक्या खुल्या
दरवाज्यांची आदळाआपट
संसाराचे ग्रीस ऑइल भाषेला पिळत
भावनांचे पीळ आणि बिळे उंदीर लापता
"मी ड्रेसविषयी विचार करत राहिले
जागी झाले तेव्हा शरीर उरले होते "
संसार कायमच फुटपाथवर येतो कि काय ?
कि हे व्यभिचाराचे अरबन आमंत्रण आहे ?
७
"आपण टॅलेंटविषयी टॉलरन्ट असलं पाहिजे "
मी तुझ्या टॅलेंटला पहात स्वतःला समजावतोय
तुझी बोर्डात आलेली गुणवत्ता
आम्ही तयार केलेली नाही
कॉम्पलिकेटेड हार्मोन्सची हार्मनी कुणाला सापडलीय ?
वासनेला सोन्याचे मुकुट घातले म्हणून ती थोडीच गोल्डन होते ?
तुझा डिव्होर्स होणार हे मला फ्लॅश सांगतोय
मी त्याला गती द्यावी
कि चाकांच्यातली हवा काढून घेऊन
त्याला स्लो मोशन करावे ?
८
तुझ्या शरीराला एकाचवेळी चाफ्याचा आणि सॉसचा वास
तुझ्या गालाला चांदणं पडतं
तुझं मांस खाटकाखाली जाऊ नये
इतकी काळजी तर घ्यायलाच हवी
मी तुझ्या जाणिवेची जबाबदारी घेतोय का ?
कि माझ्या मोहाला मी बौद्धिक सुपारी देतोय ?
तुझ्या शरीराच्या मादकतेला कौन माईका लाल भुलणार नाही ?
माझ्या वासनेची जीभ हुळहुळतीये
मी तिला छाटावे
कि सावकाश रसवंती निर्माण करत
तुलाच चाटावे ?
९
लस्ट बस्ट होतीये
आतल्या आत
ज्याला न मिळते तळणी
त्याला पृथ्वीचे मीठ अळणी
आग लावून गेलेली तुझी मोरपिसे
मला मोर बनवतायत
वाच श्रीधरा वाच आंब्यांच्या वनात वाच
ढगांचा कापूस पिंजत बसशील
आणि कळणारही नाही अशा जागी नासशील
१०
ज्या दगडापासून ईश्वराची पूजा सुरु होते
तो दगड म्हणजे बाई
आता तो स्वतःच्या डोक्यात घालायचा
कि देहाच्या देव्हाऱ्यात ठेवायचा
ज्याने त्याने ठरवावे
११
तू स्वतःच्या राष्ट्राची राष्ट्रपत्नी
तुला राष्ट्रपती हवाय
तू भाषेचा आरंभ
आणि तुला सभारंभ हवाय
तू भगत भगवतीची
आणि सवय भागवताची
तू नदीचे मुळाक्षर
समुद्राची सिग्नेचर
तू आकाशाचा प्रकाश
काळजाची ट्यूबलाईट
तू ज्ञानाचे फळ खाऊन
अनुभवाला ज्ञानमुक्त करणारी रँडम इमोशन
पुरुषाची ट्युशन घेणारी मोशन
तू मीच
माझ्यासारखी दिसणारी
१२
भ्रम कुठून सुरु झालाय
आणि प्रेम कुठून सुरु झालंय
मी रेल्वेवर स्वार होऊन
तिला घोडी का बनवतोय
हे कुठले स्टेशन आहे
जे अस्वलासारखें दिसूनही
हिरवेगार वाटतंय ?
ही कुठली बिल्डिंग
जिथे भाषा पुरेशी न वाटल्याने
शरीरे भिडवावीशी वाटतायत ?
मी ओठांवर ओठ टेकवतोय
कि वादळाला साइन करत
वारा बाणवतोय ?
आवेगांचे किस फडफडतायत
बाथरुममधला नळ पाण्याचा ताशा वाजवतोय
लेझीम सत्तर एमएम सुरु
आणि अचानक कुणीतरी आल्याने इंटरवल
१३
हे घडायला नको होते आणि घडले
हे घडायला नको होते म्हणून इंटरवलवर अडले
तू मॅरीड असल्याची सणसणीत अभिव्यक्ती आदळली
आणि सेक्स थंड झाला
मी ओशाळा
इथे ओशाळला सेक्स
१४
अचानक मला जाणवतंय
शेवटी हे चोरटे आहे
मग ते कितीही गोमटे दिसो
कॉमन बदनशीबी
आणि तरीही गिल्टचे गिलोटिन नाही
का नाही
कि डिवोर्सचा फ्लॅश आलाय म्हणून सर्व नैतिक वाटतंय ?
१५
आवाज गमावलेल्या दिशातून दगड येतायत
जे ढगासारखे दिसले होते
पृथ्वी माझ्या पायात टाचा घासतिये
मी तिला आता कोणत्या हाय हिल्स देऊ ?
१६
आपण पुढे सरकतोय पुढे सरकतोय पुढेच सरकतोय
मी कविता लिहितोय कविता लिहितोय कविताच लिहितोय
सनातन भगव्यापेक्षा मी हिरवी सडन डेथ का निवडली ?
कि आयुष्याने पाठवलेला हा धडा होता
मी कानाला खडा लावावा म्हणून ?
१७
तू नाहीस
तुझ्याबरोबरचा तो काळही नाहीये
मी बसलोय ह्या समुद्रापुढे
आपल्या संबंधाचे पंचांग घेऊन
नक्षत्रांचा आपण दोघांनी मिळून केलेला चुरा
आजही माझा फडशा पाडतो
आपल्या संबंधाला व्यभिचार म्हणावे कि प्रेम
कि कोणतीच फ्रेम न लावता
त्यांना फोटो समजावे ?
एक निश्चय ध्रुव ताऱ्यासारखा माझ्यात सेटल होतोय
ह्यापुढे मॅरीड स्त्रीशी सेक्स नाही
जो आचार आपलं लोणचं करतो
त्याला ताटात वाव नाही
तू म्हणशील
हा तर सनातन निष्कर्ष झाला
मी म्हणतो
आपले शरीर माझ्या ह्या निष्कर्षापेक्षा सनातन आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सीरीजमधील चॅनेल स्पिरीच्युअल ह्या काव्यफाईलीतून )
तू एक अभूतपूर्व बाई आहेस
सेक्स्मध्ये वाया चाललेली
चंचलतेला धुंमारे फुटू शकतात
किंवा तिचा पिसारा फुलवता येतो
तुला स्वतःलाच फुलवायचे नसेल तर
मी काय करू शकतो?
देह साजरा करावा
पण त्यांचे प्रदर्शन मांडू नये
तू अभिनेत्री असतीस तर प्रदर्शनही मान्य केले असते
पण तू थेट आयुष्यात अभिनय करतेस
आणि त्याला खरं समजतेस
तुझ्यातल्या अनेक व्यक्तींचा ताळमेळ नीट बसत नाहीये
हा खरा घोळ आहे
मी बहूमुखीपणा सोड म्हणत नाही
पण तोंडाचा दांडपट्टा आवर म्हणतोय
बोल्ड असावं पण मोल्ड होत
तू सिच्युएशनच्या आकाराप्रमाणे
अवतार घेत नाहीस
हा खरा प्रॉब्लेम आहे
रावण बनायला हरकत नाहीं
तो आजच्या युगाचा नायक आहे
पण सीतेचे अपहरण करण्यापेक्षा
दहा मंदोदरी आपल्यातच तयार कराव्यात
काय आहे ?
राम अस्तित्वातच नाहीं
आणि पृथ्वी
पादांक्रात व्हायला दहा मुखांनी मोकळी आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनल सिरीजमधील चॅनेल ज्ञ : लव्ह, लव इन लव्ह आऊट ह्या काव्य फायलीतून)
तुझ्या आईकडून तुझ्यात आलीय बुद्धिमत्ता
बापाकडून इमोशनल इंस्टबिलिटी
मला तुझ्यातल्या तुझ्या आईचा मोह आहे
मात्र तुझ्यातला तुझा बाप मला डिस्टन्सवरच ठेवावासा वाटतो
मुले जन्माला घालायची तर ती तुझ्या इतकी बुद्धिमान व्हावीत
ही अपेक्षा चुकीचे आहे का ?
माझी क्रिएटिव्हिटी त्यांच्यात झिरपेलेच
माझ्यात माझ्या सीकेपी आजीची दार्शनिक बुद्धिमत्ता आहे
पण ती मुलांच्यात उतरणार नाही
माझ्यात नाईकांची संगीतप्रतिभा आहे
आणि संघटन
ती आपल्या मुलांच्यात उतरेलच
माझ्यात तिळव्यांची चित्रकला आहे
आणि इमोशनल हळवेपणा
प्रॉब्लेम एकच आहे
आपल्या दोघांचाही अनुवंशिक बौद्धिक अहंकार
तो मुलांच्या शंभर टक्के उतरणार
तेव्हा बघ
मुले जन्माला घालण्याचा प्रोग्राम अटळ वाटत असेल तर
सगळ्या जानुकीचा नीट विचार कर
मुलं कर्तुत्ववांन निपजतीलच
त्याबद्दल मला शंका नाही
प्रॉब्लेम फक्त एकच आहे
तिळवे आणि नाईक
दोघांच्याहीमध्ये असलेली मोक्षाची आस
जी तुझ्याही घराण्यात अनुवंशिक आहे
ती मात्र मुलांच्यात उतरणारच
जिथे माझाच मोक्ष तुला परवडत नाही
तिथे मुले अशी जन्मलेली चालणार आहेत काय ?
ज्ञ
तू नुसतेच वावटळत चाललीयेस
आणि मी जनेटीक हवामानाचा अंदाज घेतोय
तुला वाटतंय मी किनाऱ्यावर आहे
आणि तू समुद्रात
प्रत्यक्षात मी समुद्र कसा हाताळता येईल
त्याचा किनाऱ्यावरून नीट विचार करतोय
तिळवे पिढ्यानपिढ्या मूळचे कोळी होते मग पुरोहित झाले म्हणूनही असेल
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीजमधील ज्ञ : लव, लव इन , लव आऊट या काव्यफायलीतून)
१
मी निराशावादी कविता लिहितोय म्हणून शिव्या घालणारे
आता स्वतःच निराशावादी लिहीतायत
वास्तव शेवटी नागड्या देहाने समोर ठाकतं
आणि तुमचे रोमँटिक कपडे उतरवतं
पळून जाण्यापेक्षा जे जसं आहे तसं पहा
पाय फक्त पळण्यासाठी नाहीत
दोन पायांवर ठामपणे उभे राहण्यासाठीही आहेत
२
मानवता सत्यकेंद्री असली तरच टिकते
नाहीतर फ्रस्टेशनच्या स्टेशनवर सतत रेंगाळायला लागते
धूर्त माणसे
रोमँटिसिझमचा वापरही धंद्यासाठी करतात
३
मला सौंदर्य दिसत नाही असं नाही
पण मला त्याचे काटेही दिसतात
गुलाब त्यांनाच फळतात
ज्यांना काटे पेलता येतात
बाकी फक्त गुलाबांच्यावर कविता लिहून
एस्थेटिकली फॅट होतात
४
माझी कर्तव्यं मी कधीच सोडत नाही
शांतपणे आवाज न करता पार पाडत असतो
डाव्या हाताचं दान उजव्या हाताला कळू देऊ नये
ही संन्याश्यांना आज्ञा आहे
मी ती पाळतो
मला कर्तव्य व्हायोलिनप्रमाणे वाजवता येते
हा माझा सद्गुण आहे
श्रीधर तिळवे नाईक
( चॅनेल सिरीज मधील चॅनेल स्पिरिच्युअल या काव्यफायलीतून)
लोक श्रीधर तिळवे नाईक
१
लोक खूप स्ट्रॉंग असतात
त्यांचा उथळपणा खूप स्ट्रॉंग असतो
त्वचा पाहणारे त्यांचे डोळे विकट असतात
जे बिकट न पाहता
सरसकट पाहतात
तू त्यांचे काय करू शकतोस ?
२
लोक व्यवस्था बनवतात
तिचे काहीही करता येत नाही
लोक धर्म बनवतात
त्याचे काहीही करता येत नाही
लोक कार्पोरेट बनवतात
त्यांचे काही करता येत नाही
लोकांचे काहीच करता येत नाही
कारण लोकांच्याकडे लोकसंख्या असते
३
लोकांची शाही आली कि
लोकांचे प्रश्न सुटतील
असं तुला वाटलं होतं
आणि लोक त्यांच्या शाहीतही
देव आणि राजे वसवत राहिले
नेते आणि अभिनेते देव्हाऱ्यात बसवंत राहिले
लोकांच्या शहाणपणावर अनेक अफवा बेतल्या गेल्या
आणि शेवटी गंज सापडल्यावर कळले
मेटल्स नाहीसे झालेत
४
एक आयुष्य
लोकांच्या कल्याणासाठी वेचलेलं
लोकांच्या मूर्खपणात वाया गेलं
आता ह्या आयुष्याचं
तू काय करणारेस ?
५
लोक
त्यांच्यासाठी वाया गेलेल्या आयुष्याचे फोटो बनवतात
किंवा पुतळे बनवतात
एरव्ही लोकांना त्यांच्यासाठी वेचल्या गेलेल्या आयुष्याविषयी
काहीही देणेघेणे नसते
लोक स्वार्थी असतात
आणि लोकांचा स्वार्थ ज्यांना वापरता येतो
त्यांना नेते बनवतात
तुझा निस्वार्थीपणा
हा त्यांच्यासाठी फक्त चेष्टेचा विषय आहे
तेव्हा हे वाया गेलेले आयुष्य नीट गोळा कर
समाधी लाव
लोकांच्यातून त्यांच्या नीचपणातून मुक्त होण्याचा
आणि त्यांच्या मूर्खपणाला माफ करण्याचा सर्वोत्तम उपाय
मोक्ष आहे
श्रीधर तिळवे नाईक
{चॅनेल सिरींजमधील चॅनेल स्पिरिच्युअल ह्या काव्य फाईलीतून }
१
मोहाच्या दऱ्या खोटं बोलतात
वासना आणि आपण यांच्यात अंतर किती
जादूमंतर किती
या शहरात इमारती झाडासारख्या उगवलेल्या वाटतात
लिफ्ट म्हणजे मजले बांधणारे सरकते सिमेंट
वासनांची निमंत्रणे धुळीसारखी
असं नाही कि तुझ्याबद्दल माहीत नाही
तरीदेखील त्वचेवर पाईप्स आणि काचा
डोळ्यात गाणाऱ्या भींती आणि लिफ्ट देणाऱ्या खाचा
मला आवरायला हवं त्वचेचं अंग पृथ्वीचे सुख
राख होण्यापूर्वीच सावरायला हवा त्वचेचा कोळसा
नाहीतर जंगल काय किंवा शहर काय
वासनेच्या आगीत मैलोगणती राख
आणि हृदयात त्यांच्या बातम्या
२
निसर्गानं बाईला इतकं सुंदर का बनवावं
कि मी पुरुष आहे म्हणून मला बाई सुंदर वाटते
तपशिलांच्या आणाभाका घेता येत नाहीत
डिटेल्स टेल्स सांगताना सुंदर दिसतात
बाई कळायला सात जन्म पुरत नाहीत
आणि आठव्या जन्मात ती आयुष्यात येत नाही
म्हणते ,"अशा अडाणी पुरुषाबरोबर आता आठवा जन्म कोण काढेल ?"
३
तारुण्य मादक
त्यात पापाचे उदक
हंस बनते बदक
उडत राहतो
४
संभोग म्हणजे काळाला पडलेलं भोक
बासरी वाजवणारे
त्यातूनही गाणी तयार करतात
५
तू कोणाचीतरी कोण
येतीयेस
पार्ले गर्ल अजूनही चेहऱ्यात शाबूत
मी तुला बिस्किटासारखी खाल्ली असती
जर तू माझी बायको असतीस
विचार येतोय
आणि मला कळतंय हाच तो मोहाचा क्षण
ज्यात हिमालय गडगडतात
६
तुला डिवोर्स घ्यायचा आहे
आता मी तुला काय मानावे
विवाहित कि अविवाहित ?
संभ्रम भ्रमन्ती करतायत
मी नवल कर झालोय
इतक्या फास्ट असमाधान ?
असंतोषाचे काळे आरसे
कानांच्या खिडक्या खुल्या
दरवाज्यांची आदळाआपट
संसाराचे ग्रीस ऑइल भाषेला पिळत
भावनांचे पीळ आणि बिळे उंदीर लापता
"मी ड्रेसविषयी विचार करत राहिले
जागी झाले तेव्हा शरीर उरले होते "
संसार कायमच फुटपाथवर येतो कि काय ?
कि हे व्यभिचाराचे अरबन आमंत्रण आहे ?
७
"आपण टॅलेंटविषयी टॉलरन्ट असलं पाहिजे "
मी तुझ्या टॅलेंटला पहात स्वतःला समजावतोय
तुझी बोर्डात आलेली गुणवत्ता
आम्ही तयार केलेली नाही
कॉम्पलिकेटेड हार्मोन्सची हार्मनी कुणाला सापडलीय ?
वासनेला सोन्याचे मुकुट घातले म्हणून ती थोडीच गोल्डन होते ?
तुझा डिव्होर्स होणार हे मला फ्लॅश सांगतोय
मी त्याला गती द्यावी
कि चाकांच्यातली हवा काढून घेऊन
त्याला स्लो मोशन करावे ?
८
तुझ्या शरीराला एकाचवेळी चाफ्याचा आणि सॉसचा वास
तुझ्या गालाला चांदणं पडतं
तुझं मांस खाटकाखाली जाऊ नये
इतकी काळजी तर घ्यायलाच हवी
मी तुझ्या जाणिवेची जबाबदारी घेतोय का ?
कि माझ्या मोहाला मी बौद्धिक सुपारी देतोय ?
तुझ्या शरीराच्या मादकतेला कौन माईका लाल भुलणार नाही ?
माझ्या वासनेची जीभ हुळहुळतीये
मी तिला छाटावे
कि सावकाश रसवंती निर्माण करत
तुलाच चाटावे ?
९
लस्ट बस्ट होतीये
आतल्या आत
ज्याला न मिळते तळणी
त्याला पृथ्वीचे मीठ अळणी
आग लावून गेलेली तुझी मोरपिसे
मला मोर बनवतायत
वाच श्रीधरा वाच आंब्यांच्या वनात वाच
ढगांचा कापूस पिंजत बसशील
आणि कळणारही नाही अशा जागी नासशील
१०
ज्या दगडापासून ईश्वराची पूजा सुरु होते
तो दगड म्हणजे बाई
आता तो स्वतःच्या डोक्यात घालायचा
कि देहाच्या देव्हाऱ्यात ठेवायचा
ज्याने त्याने ठरवावे
११
तू स्वतःच्या राष्ट्राची राष्ट्रपत्नी
तुला राष्ट्रपती हवाय
तू भाषेचा आरंभ
आणि तुला सभारंभ हवाय
तू भगत भगवतीची
आणि सवय भागवताची
तू नदीचे मुळाक्षर
समुद्राची सिग्नेचर
तू आकाशाचा प्रकाश
काळजाची ट्यूबलाईट
तू ज्ञानाचे फळ खाऊन
अनुभवाला ज्ञानमुक्त करणारी रँडम इमोशन
पुरुषाची ट्युशन घेणारी मोशन
तू मीच
माझ्यासारखी दिसणारी
१२
भ्रम कुठून सुरु झालाय
आणि प्रेम कुठून सुरु झालंय
मी रेल्वेवर स्वार होऊन
तिला घोडी का बनवतोय
हे कुठले स्टेशन आहे
जे अस्वलासारखें दिसूनही
हिरवेगार वाटतंय ?
ही कुठली बिल्डिंग
जिथे भाषा पुरेशी न वाटल्याने
शरीरे भिडवावीशी वाटतायत ?
मी ओठांवर ओठ टेकवतोय
कि वादळाला साइन करत
वारा बाणवतोय ?
आवेगांचे किस फडफडतायत
बाथरुममधला नळ पाण्याचा ताशा वाजवतोय
लेझीम सत्तर एमएम सुरु
आणि अचानक कुणीतरी आल्याने इंटरवल
१३
हे घडायला नको होते आणि घडले
हे घडायला नको होते म्हणून इंटरवलवर अडले
तू मॅरीड असल्याची सणसणीत अभिव्यक्ती आदळली
आणि सेक्स थंड झाला
मी ओशाळा
इथे ओशाळला सेक्स
१४
अचानक मला जाणवतंय
शेवटी हे चोरटे आहे
मग ते कितीही गोमटे दिसो
कॉमन बदनशीबी
आणि तरीही गिल्टचे गिलोटिन नाही
का नाही
कि डिवोर्सचा फ्लॅश आलाय म्हणून सर्व नैतिक वाटतंय ?
१५
आवाज गमावलेल्या दिशातून दगड येतायत
जे ढगासारखे दिसले होते
पृथ्वी माझ्या पायात टाचा घासतिये
मी तिला आता कोणत्या हाय हिल्स देऊ ?
१६
आपण पुढे सरकतोय पुढे सरकतोय पुढेच सरकतोय
मी कविता लिहितोय कविता लिहितोय कविताच लिहितोय
सनातन भगव्यापेक्षा मी हिरवी सडन डेथ का निवडली ?
कि आयुष्याने पाठवलेला हा धडा होता
मी कानाला खडा लावावा म्हणून ?
१७
तू नाहीस
तुझ्याबरोबरचा तो काळही नाहीये
मी बसलोय ह्या समुद्रापुढे
आपल्या संबंधाचे पंचांग घेऊन
नक्षत्रांचा आपण दोघांनी मिळून केलेला चुरा
आजही माझा फडशा पाडतो
आपल्या संबंधाला व्यभिचार म्हणावे कि प्रेम
कि कोणतीच फ्रेम न लावता
त्यांना फोटो समजावे ?
एक निश्चय ध्रुव ताऱ्यासारखा माझ्यात सेटल होतोय
ह्यापुढे मॅरीड स्त्रीशी सेक्स नाही
जो आचार आपलं लोणचं करतो
त्याला ताटात वाव नाही
तू म्हणशील
हा तर सनातन निष्कर्ष झाला
मी म्हणतो
आपले शरीर माझ्या ह्या निष्कर्षापेक्षा सनातन आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सीरीजमधील चॅनेल स्पिरीच्युअल ह्या काव्यफाईलीतून/)
हे सगळे गुडी गुडी काम बे भरवश्याचे
हे चंचल नाजूक तामझाम बे भरवश्याचे
केवळ इलेक्ट्रिक इमोशनल वायर ऑन
कधीही करू शकतात ऑफ इंतजाम बे भरवश्याचे
तुझ्यासाठी असेल ही दिलदार पार्टी
त्यांनाच माहित ज्यांनी अड्जस्ट केले दाम बे भरवश्याचे
मला सहन होत नाही हे ड्रेसेसचे प्रदर्शन
जिथे बॉडी आहे ट्रेडिशनल नाम बे भरवश्याचे
घरी जाऊन तरी मी काय करणार
आहे
तिथेही वाट बघत असतील इंतकाम बे भरवश्याचे
श्रीधर तिळवे नाईक
(नेट सीरिज मधील नेट बॉलीवूड या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment