मी खाली मुद्दामच जे कृष्णमूर्ती यांचा फोटो आणि त्यांचे म्हणणे लावलेले आहे
ते म्हणतात ,"the speaker does yoga and Pranayam everyday . It is not a religion but an activity "
मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की प्राणायाम आणि इतर सर्व गोष्टी या मूलभूत गोष्टी आहेत आणि त्यांच्यावर मूलभूत काम तर सर्वच साधक करत असतात मग ते व्याख्यानात काहीही बोलोत जे कृष्णमूर्ती यांनी स्वतःच खाली दिलेले विधान केलेले आहे मात्र प्रत्येक वेळेला truth is pathless असे सांगितलेले आहे प्रत्यक्षामध्ये सुरुवातीची सर्वसाधारण साधना सर्वांनाच व्यवस्थित करावी लागते त्याशिवाय तुम्ही सविकल्प समाधी पर्यंत पोहोचू शकत नाही एकदा तुम्ही सविकल्प समाधी पर्यंत पोहोचलात की मग जे कृष्णमूर्ती लागू होतात कारण सविकल्प समाधीनंतर खरोखरच फक्त सत्य उरते आणि ते कोणत्याही मार्गाने मिळू शकत नाही म्हणूनच मग truth is pathless हे सत्य होऊन जाते किंबहुना स्पष्ट सांगायचे तर माझ्या अनुभवावरून सांगतो की सत्य तुमच्याकडेच स्वतःहून चालत येते तुम्ही किती स्वतःला मोकळे करत जातात त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे शैव परिभाषेत सांगायचे तर तुम्ही शिव म्हणजे शून्य बनावे लागते तुम्ही शून्य बनलात की आपोआपच महा शून्य तुमच्यात येते किंबहुना ते तुम्हाला शोधतच असते पण तुम्ही शून्य होत नाही आणि तुम्ही शून्य होत नाही म्हणूनच शिव तुमच्यात प्रवेश करू शकत नाही शून्य आणि महा शून्य ही वेगळी नसतात परंतु आपल्या बॉडीमध्ये शून्य निर्माण करावे लागते एकदा आपली बॉडी शून्य झाली की ताबडतोब सेकंद सुद्धा न लावता महा शून्य तुमच्यात प्रवेश करते प्राचीन काळी यासाठी पापणी लवायच्या आत असे म्हटले जात असे
त्यामुळेच जे कृष्णमूर्ती जे म्हणतात त्याने सुरुवात करू नका मात्र सर्वीकल्प समाधीनंतर मात्र जे कृष्णमूर्ती हे सर्वाधिक अपलाय होतात तेव्हा आधी सुरुवात तर करा .
Comments
Post a Comment