मवाळ हिंदुत्व जहाल हिंदुत्व आणि गणपती उत्सव शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
गणपती उत्सव आला की भारतामध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांच्या अंगाने चर्चा सुरू होते आणि गणपती उत्सव विशेषता सार्वजनिक गणपती उत्सव कोणी सुरू केला आणि गणपतीही पेशवे यांची कुलदेवता होती की नाही या अंगाने चर्चा आणि वादविवाद सुरू होतात
लोकमान्य टिळक यांचे विचार प्रणाली समजून घ्यायची असेल तर एक मूलभूत गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे ती म्हणजे भारतातल्या सर्व विचार प्रणाली ह्या कळत नकळत त्यांच्या आधी जन्मलेल्या राजकीय विचारप्रणालीला म्हणजेच धर्मांना फॉलो करत असतात म्हणजेच युरेशियन लोक आपोआपच वैदिक विचारप्रणाली, ब्राह्मणी विचार प्रणाली , वैष्णव विचार प्रणाली आणि हिंदू विचार प्रणाली अशा तऱ्हेनेच मांडणी करत राहतात म्हणजे काँग्रेसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सुरुवातीला राजा राम मोहन राय यांची वैदिक विचार प्रणाली उदयाला आलेली दिसते आणि काँग्रेसने नेहमीच भारतीय प्रबोधनाचा आद्य आरंभ राजा राम मोहन राय यांना मानले आहे काँग्रेसचा आरंभ ब्राह्मणांच्या हितसंबंधावरच आधारित होता म्हणजे ब्रिटिश सरकारमध्ये आणि राज्यांमध्ये भारतीयांच्या राखीव जागा वाढवणे हाच काँग्रेसचा अजेंडा होता जरी आता ह्या अजेंडाचा काँग्रेसला विसर पडला असला तरी ! काँग्रेसचा हा ब्रिटिश धारजीनेपणा लोकमान्य टिळकांनी झुगारून दिला नाही परंतु त्यांनी अंतर्गत पद्धतीने बंद केले हे निश्चित! त्यामुळेच लोकमान्य टिळक यांना ब्राह्मणी काँग्रेसचा चेहरा मानावा की वैष्णव काँग्रेसचा चेहरा मानावा हा प्रश्न आता निर्माण होतो माझ्या मते 1914 पर्यंतचे लोकमान्य टिळक हे ब्राह्मणी काँग्रेसचेच पुरस्कर्ते होते म्हणून तर शाहू महाराजांच्या वरून वेदोक्त प्रकरण झाले तेव्हा सार्वजनिक राजकीय करण करणाऱ्या गणपतीचा उत्सव हा हिंदुत्ववादी ब्राह्मणी काँग्रेसच्या लोकमान्य टिळक यांनी सुरू केला असे म्हणता येते मात्र त्याची आद्यता त्यांना देता येईल की नाही याबद्दल मला शंका आहे
टिळकांचा stand 1914 नंतर बदलत म्हणजेच गीता रहस्य लिहून झाल्यानंतर बदलत वैष्णव होत गेला नंतर मात्र वैष्णव काँग्रेस जन्माला आली आणि तीच काँग्रेसचा चेहरा झाली न्यायमूर्ती रानडे ,बॅरिस्टर गोखले, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या चौघांनी मिळून वैष्णव काँग्रेसचा चेहरा तयार केलेला आहे त्यानंतर मात्र काँग्रेसने हिंदू चेहऱ्याकडे दुर्लक्ष केले म्हणजे झाले असे की कळत नकळत शैव धर्माकडे आणि हिंदू धर्मातल्या शैव पंथाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले कारण मुळात महात्मा गांधी यांनीच त्यांच्या अतिरेकी अहिंसेच्या संकल्पनेमुळे शैव-धर्माकडे दुर्लक्ष केले होते जैन आणि बौद्ध धर्माचा इतका पगडा पडला होता की शैव दिसेनासे झाले हर हर महादेव म्हणणारा एकही काँग्रेसचा पुढारी या काळामध्ये दिसत नाही याचा पुरेपूर फायदा शेवटी हिंदुत्ववादी लोकांना झाला याचे एक कारण असेही होते की कळत नकळत हरहर महादेव म्हणणारे लोक हे मराठा होते आणि काँग्रेसला तिने कितीही स्वतःला स्वच्छ मानो परंतु मराठी माणसाबद्दल आकस होता मराठी साम्राज्याबद्दल आकस होता याचे एक मोठे कारण नथुराम गोडसे याने केलेला गांधीजींचा खून होता हिंदुत्व वाद हा कळत नकळत आपल्याला प्रतिस्पर्धी विचारसरणीचा वाद बनणार आहे याची कल्पना काँग्रेसला कुठेतरी होतीच हिंदुत्ववादी टिळकांना काँग्रेसने कधीही अध्यक्ष म्हणून स्वीकारले नाही किंबहुना ते अध्यक्ष म्हणून कधीही निवडून येणार नाहीत त्याची पुरेपूर काळजी काँग्रेसने घेतली बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमध्ये यायला हवे होते परंतु अनेक ब्राह्मणी विचारांच्या नेत्यांना कळत नकळत अस्पृश्यतेबाबत ठाम भूमिका घ्यायची नव्हती किंबहुना याबाबत गांधीजी सुद्धा खूपदा हलत होते त्याचे कारण काँग्रेसवर असलेले ब्राह्मण पुढाऱ्यांचे वर्चस्व ! काँग्रेसमध्ये समाजवादी लोक नसते तर काँग्रेस अस्पृश्यतेच्या विरोधात इतकी ठाम झाली असते की नाही याबद्दल मला शंकाय . यातच बाबासाहेब आंबेडकर कळत नकळत ब्रिटिशांच्या बाजूनेच आहेत याची पक्की खात्री काँग्रेसला होती आणि काँग्रेस ही कळत नकळत सामाजिक नंतर बघू राजकीय स्वातंत्र्य प्रथम मिळवू या निष्कर्षापर्यंत पोचली होती खरे तर काँग्रेसची सुरुवातच मुळात राजकीय होती कारण तिला शासन संस्थेत सुरुवातीपासूनच नोकऱ्या हव्या होत्या एका अर्थाने काँग्रेस सत्तावादी होती तिचा तत्वनिष्ठ शी काही संबंध नव्हता तो टिळकांच्या मुळे आला टिळकच असे पहिले पुढारी होते ज्यांनी ब्रिटिशांशी स्टेट संघर्ष पत्करला त्या काळात अगदी हिंदुत्ववादाचे सुद्धा अनेक कैवारी लोक ब्रिटिश शासनाची नोकरी करण्यातच धन्यता मानत होती भले ते आता काहीही म्हणोत. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार लोक स्वातंत्र्यसंग्रामामध्ये दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आंबेडकरांच्या बाबतीतही हाच गोंधळ होता की त्यांना सामाजिकता प्राथमिक लेवल प्राथमिक प्रश्न वाटत होती काँग्रेसने आणि काँग्रेसला फॉलो करणाऱ्या नेत्यांनीच शैव लोकांना तुमचा धर्म हा हिंदूचा उपपंथ आहे हा ब्रिटिशांनी सुरू केलेला अजेंडा चालू ठेवत गंडवले त्यामुळे शैव असलेला बहुजन समाज हातोहात फसतच गेला आपली ओळख विसरत गेला
मी हे मागेच सांगितले आहे की हिंदुत्ववादात सुद्धा वैदिक हिंदुत्ववाद हा दयानंद सरस्वती ब्राह्मणी हिंदुत्ववाद हा विष्णुशास्त्री चिपळूणकर वैष्णव हिंदुत्ववाद हा लोकमान्य टिळक ,अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यासारख्या लोकांनी पुढे आणला आहे भाजपाची स्थापनाच वैष्णव हिंदुत्वाच्या आधारे झाली त्या आधीचा जनसंघ हा वैदिक आणि ब्राह्मणी हिंदुत्वाने भारावून गेला होता त्यामुळे त्याला कधीही लोकमान्यता मिळाली नाही १९८० नंतर मात्र शैव हिंदुत्वाला हळूहळू जाग यायला लागली अर्थात आम्हाला मिळणारा प्रतिसाद खूप कमी होता पण हळूहळू तो वाढत गेला आणि नरेंद्र मोदी हे कदाचित पहिले असे राजकीय नेते होते ज्यांनी आपली राजकीय घोषणा हर हर महादेव केली बसवेश्वरांच्या वर बोलणारे सुद्धा ते पहिले पंतप्रधान होते लिंगायत धर्म स्वतंत्र मानायचा आणि शैव-धर्म स्वतंत्र मानायचा नाही असाही काहीसा विरोधाभास काँग्रेसने अमलात आणला म्हणजे शैव धर्माच्या पाशुपत दर्शनातून निर्माण झालेला दुसरा धर्म (पाशुपत दर्शनातून निर्माण झालेला पहिला धर्म हा पाशुपत धर्म आहे आणि त्याचा उल्लेख तसा अनेक प्राचीन पुस्तकांच्यातून होतो अगदी महाभारतातही येतो)हा स्वतंत्र धर्म मानायचा आणि जो मूळ धर्म आहे तो मात्र स्वतंत्र नाही तो मात्र एका धर्माची शाखा आहे असे सांगायचे यातला विरोधाभास भल्याभल्या विचारवंतांना कधी कळाला नाही त्यामुळेच अनेकदा होते असे की शैव उत्सव जेव्हा येतात तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा एक फरक पुढे आणला जातो गणपती उत्सव सुरू झाला की ह्या चर्चा सुरू होतात त्यातूनच मग गणेश उत्सव कोणी सुरू केला हा प्रश्न पडतो गणपती ही पेशव्यांची कुलदेवता होती हे खरे परंतु नानासाहेब पेशव्यांनी शैव-धर्माचा त्याग केला होता हेही खरे ! त्यानंतरचे पेशवे हे वैष्णव होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यामुळेच ते श्रुतीस्मृतीपुराणोक्त धर्म पाळत होते आणि शेवटचा दुसरा बाजीराव तर स्वतःला श्रीकृष्ण समजत होता जिजाबाई किंवा ताराबाई कधी सती गेल्या नाहीत पण रमाबाई वगैरे सर्व सती गेल्या कारण नंतरच्या पेशव्यांनी वैष्णव धर्म स्वीकारला होता शिवाजी महाराज ते पहिल्या बाजीरावपर्यंत अस्पृश्यता पाळली जात नव्हती पण नंतर मात्र ती उदयाला पुन्हा आली वैष्णव झालेल्या यादवांच्या काळामध्ये सुद्धा अस्पृश्यता पुन्हा आली होती आणि तत्कालीन पुस्तकांच्या मध्ये तसा उल्लेख मिळतो अर्थात दक्षिण आणि उत्तर यांच्यामध्ये उत्तरेकडे आणि केरळ मध्ये अस्पृश्यता पूर्णपणे प्रस्थापित झाली कारण उत्तरेमध्ये व केरळमध्ये वैष्णव धर्म हा पूर्णपणे प्रस्थापित झाला आणि पुढे तोच हिंदू झाला मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये आपणाला होळकरांच्या सारखा मनुष्य राजा झालेला दिसतो याचे कारण मुळातच त्या सुरुवातीला शैव राजवटी होत्या नंतर मग होळकरांच्या बरोबर संघर्ष सुरू झाला त्याचे एक कारण कळत नकळत होळकर यांची धनगर जात होती ते मुळात ताकतीने एवढे प्रचंड होते की जास्त आवाज करून चालणार नाही याची कल्पना ब्राह्मण धर्मी पेशवाई राजवटीला होती अन्यथा त्यांना नक्कीच पराभूत करण्याची इच्छा बाळगली गेली होती आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ती पूर्णही केली गेली
त्यामुळे गणपती उत्सव सुरू झाला तेव्हा ती पेशव्यांची कुलदेवता होती म्हणून सुरू झाला हे खरंच आहे मी स्वतः हे मांडलेले आहे पण हा टिळकांचा विचार होता हे लक्षात घ्यायला हवे किंबहुना गणपती या शैव अवैदिक देवतेचे ब्राह्मणीकरण आणि वैदिकीकरण किती झाले हेच नीट तपासण्याची आता गरज आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाने कळत नकळत हा उत्सव भारतीय केला ही ही वस्तुस्थिती आहे
सध्या एक अतिशय परफेक्ट अजेंडा चालवला जातोय तो म्हणजे सर्वच्या सर्व शैव देवता या कशा विष्णूच्या आणि त्याच्या अवतारांच्या आखत्यारीत होत्या हे दाखवणे हे अर्थातच अनेकदा हर हर महादेव अशी सुरुवात करून किंवा असा शेवट करून केले जाते त्यामुळे आपल्याला असे वाटते की अरे हे तर शैव करत आहेत पण कथा बारकाईने वाचल्या की कळते की हे सर्व वैष्णवीकरणाच्या अजेंड्याखाली चाललेले आहे मुळातच अमिष त्रिपाठी यांनी लिहिलेल्या ट्रीयॉलॉजी च्या नावाखाली याची नव्याने सुरुवात झाली होती अलीकडे आलेला ए एम ज्योती कृष्णाचा पवन कल्याण मुख्य भूमिकेत असलेला हरी हर वीर मल्लू हा दक्षिणात्य तेलगू चित्रपट असाच प्रयत्न आहे अर्थातच दक्षिणेत शैव धर्माशी कोणी पंगा घ्यायला जात नाही त्यामुळे शेवटी पुन्हा एकदा शैवधर्म आणलेला आहे ब्राह्मण्य या गोष्टी अतिशय बारकाईने करत असते ते सहजासहजी लक्षात येत नाही त्यामुळे खूप बारकाईने वाचन करावे लागते या मागचा उद्देश स्पष्ट आहे तो म्हणजे संपूर्ण भारतीय समाजाचेच युरेशीयिकरण करणे ते एकदा साध्य झाले की मग मूळचा वर्ण जाती व्यवस्थेचा अजेंडा बाहेर काढायला हे लोक मोकळे ! ब्रेन वॉशिंग हे कायमच ब्राह्मणांचे धोरण राहिलेले आहे आणि ते ते इतक्या शिताफीने करतात की ते चटकन लक्षातच येत नाही मात्र हळूहळू ते झिरपत जाते वस्तुस्थिती अशी आहे की बहुजन समाजातले अनेक विचारवंत पुढारी समजावून समजावून बहुजन समाजापुढे आता थकलेले आहेत . इतिहासामध्ये इतक्यांदा शूद्र अति शूद्र बनून सुद्धा जर का एखाद्या धर्माला अक्कल येत नसेल तर मग कठीण आहे मुळातच काही अतिशहाणे बहुजन विचारवंत मागल्या दाराने वैष्णव धर्माचा उंट तंबूत घेतात त्यांना हे कळतच नाही की हे सुरुवातीचे मुखवटे असतात आणि चेहरा कळेतोवर उशीर झालेला असतो
एक गोष्ट मात्र बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो . देव तुमच्या मनातले जाणत असेल तर तुम्हाला हे कळले पाहिजे की मोठे मोठे ढोल वाजवून आणि तेही कानाच्या क्षमतेला झेपणार नाहीत इतका आवाज करून तुम्ही नेमके काय साधत आहात ? तुम्ही स्वतःसाठी नाचत आहात की गणपतीसाठी त्याला आदर द्यावा म्हणून नाचत आहात आणि वाजवत आहात? यातून नेमक्या कोणत्या सदभावना तुमच्या देवतापर्यंत पोहोचत आहेत?
आपले उत्सव अवैज्ञानिक होता कामा नये हे मी वारंवार सांगतोय कानाची क्षमता विज्ञानाने सांगितलेली आहे मग आपण ती का ओलांडावी ? मी हे नेहमी सांगत आलेलो आहे की विज्ञान आणि वैज्ञानिक परंपरा ही शैव दर्शनाची खासियत आहे पण ती आपल्या कृतीतून पण दिसली पाहिजे जे युरेशियन बाहेरून आले ते आपल्यापेक्षा अडाणी होते आमच्याकडून शिकले असे सांगायचे आणि नंतर वर्तमानात मात्र आपण सुद्धा विज्ञानाबाबत अडाणी वागायचे याला काही अर्थ नाही तेव्हा विज्ञानाच्या मर्यादेत बसूनच आवाज करा ध्वनी ठेवा
नाचणे नृत्य करणे हा आपल्या धर्माचा अंगभूत हक्क आहे कारण शेवटी भगवान शिव नटेश्वरपण आहे नटराज ही आहे . नाचण्याचा हक्क डावलला जाणार नाही याची काळजी आपण घेतलीच पाहिजे आयुष्य हे आल्हादासाठी आहे आपण नाचलेच पाहिजे पण आपल्या गोष्टींचा त्रास जर आपल्याच भाऊ बहिणींना होत असेल तर त्यांच्याच कानांना त्रास होणार असेल तर आपणाला काळजी घ्यायला नको का ? शेवटी जे वाजवतात त्यांच्याही कानांना इजा होण्याची शक्यता असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे आपल्याच हातांनी आपल्याच कानावर आपण बहिरे होण्याची ही आफत का ओढवून घ्यावी ? आपले नेते कधीही आपणाला या गोष्टी समजावून सांगणार नाहीत पण आपण त्या नीट समजून घ्यायला नको का ? आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे तेव्हा काळजी घ्या मित्रांनो आपण सारे विज्ञानाचे पाईक आहोत हे सिद्ध करा
मोक्षाची सुरुवात ही करुणा या गुणापासून होते निदान आपल्या कानांच्यावर तरी करुणा दाखवा दया दाखवा .
हर हर महादेव जय शिवजी जय भवानी जय गणेश !
शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment