कविता तिसरा
सवंगणक आणि संगणक
अंकांच्या मांडीवर झोपत
टंच टच डोळ्यात
अंगणक
स्क्रीन पुढे स्किन
उभार पातलेला
पाताळातून
मी पातळ सोड म्हणत नाही
घट्ट धरून ठेव म्हणतो
ठेवी ठेवत काढत
कधी कधी एटीएम वापरत
रत
ओठ सवयीचे
आणि चुंबनही
सवयींच्या वर मात करत
ढंगणक
त्वचा ढगा ढगातून खोकते म्हणून काय झालं
वक्षमुळे हिरवीगार
तार तार ठार ठार पार पार विज
आकाशात जाण्याचा विसा काढत
मी थकून पडलोय की झडलोय ?
तू मोरपिसे गोळा करतीयेस
आणि तुझी इंद्रियांची वही एक्साईटेड
मला माहित नाही एक्साईटमेंट संपल्यानंतर
ही एंटरटेनमेंट कुठे जाणार आहे ?
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील लव्ह सेक्स अँड एल्सेट्रा या काव्यफायलीतून)
तू एकटीच नाहीस जगात माझ्यासाठी
दुसरीही आहे तयार आत माझ्यासाठी
ती नाचते आहे आपल्या मस्त धुंदीत
सर्वांना वाटते ती नाचते प्रेमात माझ्यासाठी
माझी फकीरी सुद्धा दुसऱ्यावर चालते
माझा बाप उभा आहे दुकानात माझ्यासाठी
ती येते तेव्हा टाकते इतके व्यापून मजला
जागाच उरत नाही मला माझ्यात माझ्यासाठी
हे प्रेम आहे की भावनांचा कोंडमारा
लाटा गलबलणाऱ्या हलतात माझ्यासाठी
जो आहे बाहेर त्याला भेटाया ती गेली
भेटाया तिला आलो जी आहे घरात माझ्यासाठी
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
वैयक्तिक द्वेषाची कावीळ
आणि आत तुझ्या
अहंकाराचा पीळ
नाते बरबाद होईल नाहीतर काय होईल
जरी कितीही घातली शारीरिक सुखाने शीळ
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
इतकेही तुला कळत नाही फायदा देत असतो
आपण सत्ता देतो तेव्हा कायदा देत असतो
सत्तेत जाणारा प्रत्येक जण शोषक बनत असतो
आणि जो शोषित असतो तोच त्यांना कायदा देत असतो
ही खरे तर गुंतागुंतीची पण मजबूत मिठी आहे
अफजल खान आहेत त्यांच्या हातात आपण कायदा देत असतो
आता नाही पुढच्या वेळी पुढच्या वेळी पुन्हा पुढच्या वेळी
आपण विश्वास ठेवत जातो तो वायदा देत असतो
फायदा कायदा वायदा सर्व त्याच्याच ठायी एकवटलेले
तरीही काही उरलेले आपण जियादा देत असतो
कुठेतरी आपणालाच कोणी पद्धतशीर विकत घेतलेले असते
आपण स्वतःला विकतही नाही तरी फायदा देत असतो
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मला माझ्या ह्या आयुष्याचा कंटाळा आलाय
किती जगायचा तोच तोच साचा कंटाळा आलाय
तेच कॉलेज ते चेहरे तेच विद्यार्थी तीच प्रयोगशाळा
विज्ञानाचा तोच तोच ढाचा
कंटाळा आलाय
मी सायन्स साईड सोडावी का ? काय पकडावे
मला जे वाटते ते खुणा आहे की खाचा कंटाळा आलाय
कसे भाऊंना सांगावे असे जगणे पटत नाही
अख्ख्या हृदयाच्या झाल्यात काचा कंटाळा आलाय
असे काही चिखलांचे अंगण दिले आहे की
सुटका नाही जिथून जे म्हणते नाचा कंटाळा आलाय
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
मोटारीत बसून त्यांनी समुद्र पाहिला
त्यांचे म्हणणे त्यांनी डोळ्यात समुद्र वाहिला
त्यांची बुद्धिमत्ता अशी त्यांना बघून सारे कळते
निसर्गाने डोक्यात आणि गुडघ्यात एक मेंदू दिला
बुद्धिमत्तेला तर कधीच डायबिटीस होत नाही
म्हणूनच विचारत नाही साखरेचा समुद्र त्यांनी का पिला
जे चालले आहे ते दिल्लीमध्ये चालू द्या
डोळे आउटडेटेड झाले तिथे गॉगल इन झाला
त्या पंतप्रधान आहेत त्यांना कोण थांबवणार
कालच आणीबाणी विसरून मी फोटो त्यांचा पाहिला
श्रीधर तिळवे नाईक
(बाळबोध कविता या काव्यफायलीतून)
वो यु गया है जैसे लौटेगा नाही
साथमे कई नक्षे हैं भटकेगा नही
हर बल्ब, ट्यूबलाइट ऑफ की है
इतना अंधेरा कर चुका है अतित दिखेगा नही
फुल क्या खुशबू भी नही छोडी है
इतना बंदोबस्त किया की घर महकेगा नहीं
किचनमें फ्रिज पे लगी हर चिठ्ठी गायब
ऐसा लगता है की खत वो अब लिखेगा नही
इस कदर घर मे साफसफाई है
की दिल मे मलाल है मगर लगेगा नहीं
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल ज्ञ: लव, लव्ह इन अँड लव आउट
)
मंजिलपे कुछ नही बस शिव है शून्य है
शरीर तो बस शक्ती का एक्सपेरिमेंट है
यहाँ कोई कामयाबी नही चलती
शुरू से अंत तक सफरही सफर है
अल्ला तो शिव का बस एक सगुण रूप
सेकडो पहचानोमेंसे वो एक पहचान है
आर्टिफिशियल है अपने मजहबपे गरुर
इसे अच्छी तरीकेसे समझना इंटेलिजन्स हैं
एक किताबमें कभी दुनिया समाई होती है क्या?
जो एक किताबमे समाये वो ना अल्ला ना ईश्वर हैं
तुने परवरदिगार को भी छोटा कर दिया
और इसके पीछे तेरा छोटा कद है
तू सोचेगा नही कितना भी मै कहू
क्यूँ की तेरे सोचपे मजहबका लॉक है
आपने इस बेवकूफीमें एक दिन तू मरेगा जरूर
मुझे अभी सी दिखती तेरी सडी हुई लाश है
गम ये नही की तू मरेगा गम ये है की
तेरे लाशके साथ दिखती मानव संस्कृतीकीभी लाश हैं
कई बार अंदरके जानवर ने अंदरका इन्सान खतम किया
ये मेरी बदनसीबी है की यही इतिहास हैं
(चॅनेल सिरीज मधील चॅनेल लव , लवर अँड टेरर या काव्यफायलीतून)
Concerns कोणालाच असत नाही
तोही प्रोफेशनल झालाय
आणि त्यासाठी तुला इस्पितळात ऍडमिट व्हावे लागेल
संन्यास स्वीकारलास तेव्हाच
समाजमान्य एकटेपण स्वीकारलेस
स्वीकारलेस की जगण्याची टिकण्याची जबाबदारी तुझी स्वतःची आहे
रोग समाजाकडून आला की निसर्गाकडून आला
हा मुद्दा नाही
मुद्दा हा आहे की मरणाला टेकून तू समोरच्या माणसाला करुणेच्या नजरेने बघू शकतो का?
डॉक्टरला द्यायला तुझ्याजवळ पैसे नाहीत
त्यामुळे तोही मुद्दा नाही
हे जे अंगात आणि अंगावर पसरलेले आहे
ते तू कसे काढणार हा मुद्दा आहे
मोक्ष मिळाला नाही
पण मरणाची गॅरंटी आहे अशी ही सिच्युएशन
पंक्चुएशन्स करण्याआधीच पूर्णविराम समोर
त्वचा पूर्ण ठासली गेलेली
आणि ठेच जागोजागी
मोडकळीला आलेले शरीर घेऊन
तुला या शहरात टिकायचे आहे
एकट्याने
घाबरून जाऊ नकोस
एकटेपणा आजार आणि तू
हे डेडली कॉम्बिनेशन नाही का ?
आजाराला सुद्धा एंटरटेनमेंट म्हणून पाहता आले पाहिजे
इंटरवल तर आली
निदान दि एंड पर्यंत कर्मणूक सेलिब्रेट कर
श्रीधर तिळवे नाईक
(निर्वाण या सिरीज मधील निर्वाणापूर्वीच्या कविता या काव्यफायलीतून)
जानता हु फ्रेंडशिप यहा विथ बेनिफिट्स हैं
दस मायक्रोसॉफ्ट एक्सेल पाच इमोशनल बिट्स हैं
साथ रहना भी है और दूरीभी रखनी है
इस रिश्ते में टचेस डिस्टन्स विथ कंपोझिट्स हैं
थोडा ब्लड प्रेशर बढता रहेगा चिंता ना कर
सिर्फ स्टँडिंग नही इस रिश्ते मे बैठने के लिए सिटस हैं
उपरवाले से नाराज होकर करोगे क्या
इससे अच्छा है उसे नकारही दो उसके कहाँ यहाँ फिट्स हैं
प्यार मे भी आज कल इतना डर हैं फैला हुआ
यही सही है हर रिश्ता, रिश्ता विथ बेनिफिट्स हैं
(नेट सीरिज मधील नेट लव या काव्य फायलीतून)
कळून आलेले आतून
ते सांगणे प्रेषित बनून
सतत चिंतन चांगले काय
त्या चिंतनाला ईश्वर बनवून
आणि एखादा शून्याचा स्पर्श
त्याच्यापुढे अख्खी त्वचा वाकवून
हे असे लोकांच्या विरोधात जाणे
आणि शांतपणे जाणे क्रूसावर चढून
रिस्क अमर होण्याची घेत
मरायचे शेवटी मर्त्य कवटाळून
श्रीधर तिळवे नाईक
(डे कॅथलॉन सिरीजमधील डेकॅथलॉन: अनकॅटेगरीकल:भक्ती या काव्यफायलीतून)
Comments
Post a Comment