स्वातंत्र्य आणि जीववाचवणी श्रीधर तिळवे नाईक 

माणसाच्या जीवन चक्रात पहिले चक्र हे दोन गोष्टींशी संबंधित असते कामचक्र आणि जीववाचवणीचक्र ज्याला आपण वाचवणीचक्र म्हणू हे आदिम चक्र असल्याने ते तुमच्या लैंगिक अवयवांच्या सर्वाधिक जवळ असते यानंतर प्रत्यक्षात जेव्हा कृती करण्याचा प्रसंग येतो तेव्हा हे चक्र सर्वाधिक प्रथम काम करते या वाचवणी चक्रामध्ये भय अंगभूत असते त्यामुळेच भयापासून मुक्ती हा मोक्ष मिळवणाऱ्या माणसाला मुख्य अजेंडा म्हणून ठेवावा लागतो 


माणसाला स्वातंत्र्य हवे असते मात्र स्वतःच्या जीवाची किंमत मोजून नाही आणि हितेच भयाचा प्रवेश होतो आणि माणसाला स्वातंत्र्याचेसुद्धा भय वाटायला लागते जर स्वातंत्र्यामुळे जीव जाणार असे तर मनुष्य अशा स्वातंत्र्याला कवटाळत नाही आणि इथूनच खरा गोंधळ सुरू होतो विचार कृती आणि आचार कृती करावीच लागते त्याशिवाय जगणे शक्य होत नाही पण त्यासाठी स्वातंत्र्य लागतेच लागते किमान पक्षी स्वतःच्या क्षेत्रामध्ये तरी कृती करण्याचे स्वातंत्र असावे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे किंबहुना जिथे स्वातंत्र्य असते जिथेवर स्वातंत्र्य असते तिथे तिथे वर तुमचा एरिया क्षेत्र होय एकदा का तुमचे स्वातंत्र्य संपुष्टात आले तर तुमची त्या एरियावरची सत्ता सुद्धा आपोआप संपुष्टात आहे किंवा तुमची सत्ता संपुष्टात आली की तुमचे स्वातंत्र्य ही आपोआप संपुष्टात येते गुलामगिरी म्हणजे माणसाचे संपूर्ण स्वातंत्र्य नष्ट करून त्याला आपल्या हिशेबाने चालवणे सर्वसाधारणपणे माणसे गुलाम बनतात याचे कारण माणसे जीव वाचवणे निवडतात भगवान शंकरांनी ज्या मुद्रा दिलेली आहेत त्यामध्ये अभय मुद्रा ही त्यामुळेच विलक्षण मानली जाते आणि ती प्रत्येक साधकाने कमवायला हवी असा प्रत्येक तंत्राचा आग्रह आहे अभय मुद्रे शिवाय शेवटची महामुद्रा प्राप्त होत नाही 


स्वातंत्र्य आणि स्वतंत्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत स्वतंत्रामध्ये मनुष्य आपण नेमके कोणत्या तंत्राचे आहोत हे ओळखून त्या तंत्राप्रमाणे जगायला सुरुवात करतो माणूस नेहमीच संस्कार तंत्राने बद्ध असतो त्याच्यावर ज्या तंत्राचा संस्कार झालेला असतो तेच तंत्र तो अनेकदा आपले तंत्र समजते प्रत्यक्षात असे असेलच असे नाही म्हणजे लहानपणापासून भारतामध्ये इस्लाम आल्यापासून भक्ती तंत्र शिकवले जातात भावतंत्र शिकवले जाते याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की आपल्या संतांना ज्ञानतंत्र किंवा शरीर तंत्र किंवा क्रिया तंत्र किंवा शक्ती तंत्र हे सुद्धा उपलब्ध असू शकते आणि ते त्याचे स्वतंत्र असू शकते याचा विसरच अनेक पालकांना पडलेला असतो अनेकदा खुद्द पालक संस्करा तंत्राप्रमाणे संस्कार तंत्राप्रमाणे वागत असतं ते स्वतः स्वतंत्र असत नाही साहजिकच पिढ्यानपिढ्या संस्कार तंत्र चालू राहते


मनुष्याने सर्वात प्रथम स्वतंत्र कुठले हे निश्चित केले पाहिजे अन्यथा तो दुसऱ्या तंत्रात परतंत्रामध्ये भटकत राहतो अनेक बुद्धिजीवी लोक त्यांचे तंत्रज्ञान तंत्र असून सुद्धा घरामध्ये जाऊन भक्ती करत बसतात हा खरे तर विनोद असतो पण हा संस्कार तंत्रामुळे घडत असतो याचा एक दुष्परिणाम संपूर्ण समाजावर असा झालेला आहे की संपूर्ण समाज भावतंत्र केंद्रित झालेला आहे त्याला प्रामुख्याने दोन धर्म जबाबदार आहे वैष्णव धर्म आणि इस्लाम या दोघांनीही इतर सर्व तंत्रांचे चेष्टा केलेली दिसते आणि भक्ती सर्वांच्या डोक्यावर लादलेली दिसते जोपर्यंत ही भक्ती लाभलेली आहे तोपर्यंत समाजामध्ये ज्ञान , शरीर , शक्ती, आणि क्रिया यांचा योग्य तो विकास होत नाही त्यांना योग्य ती किंमत मिळत नाही मूल्य मिळत नाही म्हणूनच दुसऱ्याच्या स्वतंत्राची कदर तुम्हाला असली पाहिजे अन्यथा दुसऱ्यांच्या तंत्रामध्ये भटकत भटकत मनुष्य आयुष्य वाया घालवतो अनेक जण म्हणतात की मोक्षाच्या आम्हाला आकर्षण नाही याचे कारण अनेकदा भक्ती तंत्र असते भक्तीत मजा येत नाही आणि दुसरे तंत्र कसे चालवायचे ते ठाऊकच नसते साहजिकच ज्ञान भक्ती मध्ये कोंडले जाते आपल्याकडे कवितांच्या सारखे आणि चित्रपटांच्या सारखे कलाप्रकार सुद्धा मुद्दाम म्हणून जाणीवपूर्वक भक्तीचा भावाचा जयजयकार करत राहतात हे पॉलिटिक्स आहे आणि हे भावाचे पॉलिटिक्स आहे भक्तीचे पॉलिटिक्स आहे ते चटकन कळत नाही 


स्वातंत्र्य हे मात्र गणात्मक आणि राज्यात्मक असते मी मागेच म्हटल्याप्रमाणे गण हा अनेक समाजांनी बनलेला असतो आणि समाज हा अनेक गोतावळ्यांच्या पासून बनलेला असतो आणि गोतावळा हा अनेक कुटुंबांनी बनलेला असतो हे सर्व घटक अनेकदा माणसाला नियंत्रित करायला बघतात त्याच्या शारीरिक ऍक्टिव्हिटी त्याच्या बौद्धिक ऍक्टिव्हिटी त्याच्या भावात्मक ऍक्टिव्हिटी त्याच्या शाक्त ऍक्टिव्हिटी त्याच्या कृती म्हणजेच कर्मात्मक ऍक्टिव्हिटी नियंत्रित करायची धडपड केली जाते आणि म्हणूनच स्वातंत्र्याचा प्रश्न इथे निर्माण होतो स्वातंत्र्य हे नेहमीच माणसाच्या स्वतंत्राच्या बाहेर असते ते सामाजिक असते ते गणात्मक असते ते राजकीय असते ते कौटुंबिक असते इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले म्हणजे त्यांनी आपले राजकीय सामाजिक आणि कौटुंबिक स्वातंत्र्य स्वतःच्या ताब्यात घेतले त्यावर नियंत्रण निर्माण केले 15 ऑगस्ट आपण त्यासाठी साजरा करतो कारण आहे या नियंत्रणापासून आपण मुक्त झालो आणि हे अत्यंत आवश्यक होते याबद्दल स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी धडपड केली प्रयत्न केले त्या सर्वांनाच आपण सॅल्यूट मारला पाहिजे कारण स्वातंत्र्य नसले की स्वतंत्रता फार अवघड होऊन बसते अनेकदा पारतंत्र्यात सुद्धा स्वतंत्र विकसित करत माणसांनी मोक्ष मिळवलेला आहे इंग्रजांच्या काळात सुद्धा काही लोक मोक्षाला पोहोचलेच पण कळत नकळत अनेक लोकांच्या साधक असण्याला बाधा आधी इंग्रजांचे राज्य हे कळत नकळत त्यांच्या साधनेला बाधक ठरले किंबहुना परकीय राजवटी या नेहमीच मोक्षाला बाधक ठरत असतात म्हणूनच परकीयांचे राज्य असता कामा नये केवळ भारतच नाही प्रत्येक भूप्रदेश ज्याची स्वतःची संविधाने बनलेली आहेत तो तो स्वातंत्र्यात असणे गरजेचे आहे सध्या या स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका अमेरिकेसारख्या राष्ट्रातून आणि इस्लाम सारख्या धर्मातून होतो आहे अनेक इस्लामिक राजवटींनी अलीकडे ख्रिश्चन धर्माला पूर्णपणे मनाई केलेली आहे हे असे घडते कारण इस्लामला एकदा का राज्य मिळाले की तो अनेकदा इतर धर्मांच्या वर बंदीच घालायला लागतो आपल्याकडच्या अनेक लोकांना बहुतेक आफ्रिका दिसत नाही यातला सर्वात मोठा विनोदी भाग जर कुठला असेल तर तो म्हणजे ज्या लोकांनी पाकिस्तानने बांगलादेश स्वतंत्र मागितला ते लोक पाकिस्तानच्या आणि बांगलादेशचे फार कमी संख्येने होते या उलट ज्यांनी पाकिस्तान मागितला त्यापैकी जवळजवळ 50 टक्के लोक भारतामध्येच थांबलेले आहेत याबाबतीत नेमके काय घडले याची अत्यंत शास्त्रशुद्ध तपासणी कोणीतरी केली पाहिजे होती कारण जे पाकिस्तान मागतात ते उद्या आणखीन काही मागितल्याशिवाय गप्प बसणार नाहीत याबाबतीतले राजकारण अतिशय स्पष्ट आहे कुठलातरी टापू घ्यायचा आणि तिथे आपली सगळी लोकसंख्या जमा करत न्यायची अशी इस्लामची पॉलिसी आहे भारतात हळूहळू असे टापू तयार व्हायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक नगरामध्ये आणि शहरांमध्ये मुस्लिम वस्त्या पद्धतशीरपणे स्वतंत्र असतात सामूहिक मजहबी ऍक्टिव्हिटी हे इस्लामचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे एकेकाळी ते रोमन कॅथोलिक चर्चेचे होते आज ना उद्या भारतीय स्वातंत्र्याला या सर्व टापूंच्यामधून शह मिळायला सुरुवात होईल त्याआधी काही करायचे याचा कसलाही उपाय हिंदुत्ववादी लोकांच्याकडे नाही कारण हे लोक ब्राह्मणवादी झालेले आहेत मला स्वतःला स्पष्टपणे दिसते की हे भारताबाहेर स्थलांतरित होण्याच्या बेतात असतात त्यामुळे संपूर्ण ब्राह्मण धर्म हा आज ना उद्या भारताबाहेर स्थलांतरित झालेला असेल त्यामुळे याचा विचार ब्राह्मणे तर लोकांनीच अत्यंत खोलात जाऊन करणे गरजेचे आहे हा धोका आत्ता नाहीये तो साधारणपणे 2080 च्या आसपास येईल 


मी हे सांगतोय म्हणून मला खुळचट म्हटले जाईल याची मला कल्पना आहे पण 2080 वर्षी जेव्हा हे कोणी वाचेल त्याला निदान एवढे कळावे की एक मूर्ख असा होता जो याबद्दल सांगत होता 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे