धनाढ्यता , श्रीमंती , प्रगती , विकास आणि भरभराट 

श्रीधर तिळवे नाईक 


माणसाच्या आदिम युगात संपत्तीची कल्पना तितकीशी प्रभावी नव्हती परंतु श्रद्धा युगात हळूहळू धन ह्या संकल्पनेने प्रवेश केला आणि ज्याच्याकडे धन आहे तो धनगर वा धनवान ही संकल्पना उदयाला आली हे धन प्रामुख्याने पशुधन होते आणि पशुपालन हाच या काळातला मुख्य व्यवसाय होता 


पुढे शेतीचा उदय झाला आणि मोक्ष काळामध्ये पशुधना बरोबरच इतर धनांचाही उदय झाला मात्र हे धन प्रचंड नव्हते या धनाचा त्याग केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशी संकल्पना हळूहळू द्यायला आले आणि त्यातूनच संन्यास नावाची संकल्पना जन्म पावली 


यानंतर आलेल्या धर्मयुगामध्ये मात्र शेती केंद्रस्थानी आली आणि धर्म ही राजकीय विचारप्रणाली सर्वत्र उदयाला येऊन तिने या शेतीला धार्मिक स्वरूप द्यायला सुरुवात केली यातूनच एक धार्मिक व्यवस्था उदयाला आली आणि ही धार्मिक व्यवस्था सर्व गोष्टींचे नियंत्रण करायला लागली त्यातूनच पशुपालक धर्म जाऊन हळूहळू कृषीनिष्ठ धर्म उदयाला आले ज्यांच्या केंद्रस्थानी शेती हा व्यवसाय होता युरोपमध्ये ज्यू धर्म हा पशुपालननिष्ठ होता तो जाऊन रोमन कॅथोलिक हा शेतीनिष्ठ धर्म उदयाला आला या धर्माने सर्व जमिनीची मालकी ही राज्य शासनाकडे सोपवायला सुरुवात केली अगदी सरंजाम दादांच्या जमिनी सुद्धा राजाच्या ताब्यात कधीही येऊ शकत होत्या आणि याला धर्म या तत्त्वाचा आधार होता कारण धर्म ही मुळातच राजकीय विचारप्रणाली होती तिचा उद्देशच मुळात राज्यसंस्थेला मदत करणे हा होता तिने राज्य ही संस्था अत्यंत बलिष्ठ केली धर्म आणि राज्य यांच्यामधले नाते हे ज्ञान आणि सत्ता यांच्या मधले नाते होते या धर्मसंस्थेनेच श्रीमंती ही संकल्पना जन्माला घातली आणि श्रीमंतीची मालकी ही प्रामुख्याने चर्च आणि राज्य या दोन संस्थांच्याकडे गेली श्रीमंतीची मालकी ही एक तर देवाकडे असते म्हणजेच चर्चे या संस्थेकडे असते किंवा पुरोहित संस्थेकडे असते किंवा राजा हा देवाचा अवतार असल्याने राजाकडे असते अशातऱ्हेचे हे मुख्य गृहीतक आहे संपूर्ण मनुस्मृतीची मांडणी ही या गृहीतकाच्या आधारे केली गेलेली आहे


भारतात ही मालकी पुरोहित प्रामुख्याने ब्राह्मण आणि राज्य या संस्थांच्या कडे गेली या काळातल्या वैश्य लोकांना कायमच भय असायचे की राजा यायचा आणि आपली सारे संपत्ती ताब्यात घ्यायचा अशाच प्रकारची भीती नंतर कारागिरांच्यातसुद्धा निर्माण झाली व्यापारी आणि कारागीर एकत्र येऊन बंड करू शकतात हे लक्षात आल्यानंतर धर्म या संस्थेने अत्यंत जाणीवपूर्वक वैश्य आणि शूद्र असे दोन वर्ण निर्माण केले अन्यथा पूर्वी हे सर्व वैश्य होते अगदी शेती करणारा सुद्धा वैश्य होता पण अत्यंत जाणीवपूर्वक कारागीर लोकांना शूद्र म्हणजे एका अर्थाने गुलाम या कॅटेगरीत ढकलण्यात आले 


आज ना उद्या हा वर्ग उठाव करणे अटळ होते आणि हा उठाव सुरू झाला तो साधारणपणे मोहम्मद पैगंबरच्या नेतृत्वाखाली ! हा पहिला वैश्य लोकांनी स्थापन केलेला धर्म होता आणि खुद्द महंमद पैगंबर हे व्यापारी होते साहजिकच त्यांच्या धर्माचे स्वरूप आतापर्यंत चालत आलेल्या धर्मांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळे आणि अनेक गोष्टींचा करार करणारे होते त्यामुळेच इस्लाम मध्ये अगदी लग्न सुद्धा करार आहे मात्र हा धर्म पुढे राज्य संस्थेने ताब्यात घेतला आणि अत्यंत जाणीवपूर्वक बाकीचे सर्व पुरावे नष्ट करत कुराण हे एकमेव टेक्स्ट स्वतःच्या सोयीसाठी म्हणून केंद्रीभूत केले आणि महंमद पैगंबर यांना शेवटचा प्रॉफेट ठरवून आपली सत्ता अत्यंत बळकट करून टाकली या आधीचे धर्म म्हणजे मोजेसने स्थापन केलेला धर्म हा अंतिमत: मेंढपाळ समुदायाने स्थापन केलेला धर्म होता आणि जीजसचा धर्म वैश्य पण कारागिराने स्थापन केलेला म्हणजे सुताराने स्थापन केलेला धर्म होता महंमद पैगंबर पहिले असे धर्म संस्थापक होते जे व्यापारी होते त्यामुळे साहजिकच त्या धर्माची मांडणी ही आधीच्या धर्मापेक्षा अधिक वेगळी होती दुर्देवाची गोष्ट अशी की हा धर्म नंतर राज्यसंस्थेने पूर्णपणे बदलला आता जो इस्लाम आहे तो पूर्णपणे राज्यसंस्थेचा धर्म आहे राजकीय विचारप्रणाली आहे आणि म्हणूनच त्याच्या विरोधात उभे राहावे लागते 


यानंतर आलेला दुसरा व्यापारी धर्म म्हणजे लिंगायत धर्म होय या धर्मानेही आकाशात असलेला देव जमिनीवर आणला आणि मंदिरात असलेला देव हा लोकांच्यात आणला याचे कारण सुद्धा बसवेश्वर हे स्वतः मंत्री होते आणि त्यांचा दैनंदिन व्यापाराशी जवळचा संबंध होता हे होते 


हीच गोष्ट यानंतर उदयाला आलेल्या वैश्य लोकांच्या तिसऱ्या धर्मात होती हा धर्म होता शीख धर्म ! भारतात आज सुद्धा सर्वाधिक व्यापारी हे शीख धर्मात आणि लिंगायत धर्मात आढळतात आणि त्यामुळेच भिकारी ही या धर्मांच्यात आढळत नाहीत त्याचे सर्वात मोठे कारण त्या धर्मांचे स्वरूपच मुळात व्यापारी संस्थांच्या आधारे निर्माण झालेले आहे शेती करणाऱ्या लोकांच्या पेक्षा या लोकांची विचारसरणी वेगळी होती आणि ती अधिक प्रोग्रेसिव्ह होती असे म्हणता येते या धर्मांनी श्रीमंती ही संकल्पना अतिशय केंद्रस्थानी आणली कोणाला आवडो ना आवडो परंतु औरंगजेबाच्या काळातच भारत हा देश चीनच्या पुढे होता याचे कारण पुन्हा तेच आहे औरंगजेब धार्मिक पातळीवर कसाही असो परंतु व्यापाराच्या पातळीवर तो अत्यंत आडवांस होता 


या तीन नव्या धर्मांनी पूर्णपणे जगाच्या केंद्रस्थानी व्यापार आणायला सुरुवात केली आणि म्हणूनच मग ख्रिश्चन धर्मात सुद्धा उठाव झाला आणि तिथे व्यापाराला पूरक असा चौथा धर्म उदयाला तो म्हणजे प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म ! याने कामाला अतिशय महत्त्व दिले आणि" वर्क इज वरशीप "ही संकल्पना अतिशय यशस्वी पणाने राबवली या धर्माच्या उदया नंतरच युरोपची जहाजे अधिक जोमाने जगभर धडकली आणि त्यांनी राज्य या संस्थांच्या मध्ये जास्त इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली आणि इथूनच साम्राज्यवादाची सुरुवातही झाली या लोकांचा मूळ आदर्श इस्लाम होता इस्लाम आपली राज्य स्थापन करू शकत असेल तर आपण का नाही करू शकत असा हा प्रश्न होता आणि त्याचे उत्तर होकारार्थी आले होते ज्याला आज आपण पुरोगामी वाद म्हणतो तो प्रत्यक्षामध्ये व्यापारी धर्माने केलेली व्यापारी क्रांती आहे त्याला आता युरोपच्या इतिहासामध्ये मार्कण्टाइल एज असे म्हटले जाते 


याच व्यापारी लोकांनी पुढे मग फ्रेंच राज्यक्रांती घडवली आणि तिने जगभर स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचा प्रसार केला व्यापारी लोकांना स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तिन्ही तत्वांची अत्यंत आवश्यकता होती कारण त्यांना राज्यसंस्थेपासून स्वतःला स्वातंत्र्य हवे होते त्यांना राजा बरोबर समता हवी होती आणि कामगार वर्गांच्या मध्ये बंधुत्व हवे होते शेतकरी वर्गामध्ये प्रामुख्याने बंधुत्व मिसिंग होते परंतु व्यापारी लोकांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांच्या मध्ये मात्र अशा प्रकारच्या बंधुत्वाची शक्यता जास्त होती जी एकत्र श्रमाने बांधली जाईल यामुळेच पुढे कामगारांच्या संघटना निर्माण होत गेल्या भारतात तर कामगारांच्या श्रेणी सुद्धा निर्माण झाल्या होत्या भारतातल्या शेतमजुरांच्या संघटना कधीही शेतीच्या काळामध्ये निर्माण झाल्या नाहीत परंतु व्यापारी लोकांच्या काळामध्ये मात्र कामगारांच्या संघटना उभ्या राहू लागल्या या युगामध्ये त्यामुळे प्रगती नावाची गोष्ट केंद्रस्थानी आली मार्क्सवादी लोकांनी तर प्रगतीवाद नावाची एक संकल्पनाच डेव्हलप केली हा प्रगती वाद राष्ट्राची सतत प्रगती होत असते यावर विश्वास ठेवणारा होता आपल्याकडे पुरोगामी कालखंडापासून प्रेरणा घेऊनच हिंदुत्ववाद किंवा हिंदू राष्ट्रवाद सतत प्रगत होत असतो अशी संकल्पना आहे ती सुद्धा या काळातूनच पावलेली आहे साहजिकच व्यापारी लोकांचे प्रभुत्व हिंदुत्वावर असणे ही अटळ गोष्ट आहे 


धर्मयुगाने श्रीमंती ही गोष्ट एक आर्थिक संकल्पना म्हणून राबवली आणि श्रीमंती कशी येते यावर चर्चा झालेली दिसते श्रीमंतीच्या अनेक व्याख्या सुद्धा या काळामध्ये जन्माला आलेल्या दिसतात 


त्याउलट व्यापारी युगामध्ये हळूहळू युगामध्ये हळूहळू प्रगती ही संकल्पना केंद्रस्थानी आली व्यापारात प्रगती झाली पाहिजे असे प्रत्येक व्यापाऱ्याला वाटायला लागले आणि प्रगती मोजण्याचे साधन म्हणून फायदा प्रॉफिट केंद्रस्थानी आला अगदी मार्क्सवादी लोक सुद्धा फायद्याच्या भाषेत बोलतात आणि हा फायदा कसा मिळतो या प्रश्नाचे उत्तर कामगारांचे शोषण करून मिळतो असे देतात 


याला शह दिला तो इंडस्ट्रियल रीवोल्युशनने ! या इंडस्ट्रियल रीवोल्युशन ने आधुनिकता ही संकल्पना जन्माला घातली आणि मॉडर्न उद्योगपती निर्माण करायला सुरुवात केली या काळातल्या अर्थशास्त्राने त्यामुळे विकासाची संकल्पना राबवली प्रगती ही आपोआप होत असते परंतु विकास हा मात्र घडवावा लागतो असा हा विचार असतो म्हणजेच प्रगती ही ज्ञान प्रधान संकल्पना आहे परंतु विकास मात्र कृती प्रधान संकल्पना आहे जेव्हा मोदी यांनी विकासाची गॅरंटी दिली तेव्हा आम्ही विकास घडवू असे ते म्हणत होते त्याचे कारण तेच होते की विकास घडवला जातो अशीच आपल्याकडे समजूत आहे कारण ती तशीच आपल्याकडे आलेली आहे आणि ती प्रामुख्याने उद्योगपती वर्गाने निर्माण केलेली आहे साहजिकच कुठला उद्योगपती आपल्या उद्योगाचा विकास घडवतो याकडे अर्थशास्त्रज्ञ बारकाईने लक्ष देऊ लागले आणि यातूनच पुढे विकासाच्या भोवती अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना फिरायला लागल्या विकासामध्ये नफा ही संकल्पना असते परंतु त्यापेक्षा उलाढाल ही संकल्पना जास्त महत्त्वाची ठरत जाते कुठल्याही कंपनीचा किंवा कार्पोरेटचा टर्नओव्हर किती हा सर्वात मोठा प्रश्न असतो नफा खाली वर होत असतो परंतु उलाढाल सतत चालू असलेली पाहिजे काही कंपन्या तर केवळ उलाढाल चालतात म्हणून जिवंत असतात त्यांच्यापासून मिळणारा प्रॉफिट काही परवडणारा नसतो 


चौथ्या नवतेच्या काळामध्ये मात्र आता ही संकल्पना भरभराट अशी आलेली आहे ही वास्तविक तशी जुनी कल्पना आहे परंतु तिला काही नवीन आयाम मिळालेले आहेत आधुनिक आणि उत्तराधुनिक काळामध्ये विकास नेमका कसा होतो विकासाची कारणे काय अशा प्रकारच्या प्रश्नांची चर्चा होती. आता भरभराट प्रोस्पॅरीटी ही संकल्पना केंद्रस्थानी आल्याने भरभराट कशी होते असा प्रश्न अर्थशास्त्रापुढे सतत असतो भरभराट या शब्दाच्या केंद्रस्थानी भर आणि भराट असे दोन शब्द आहेत भर टाकणे आणि भराव टाकणे अशा पद्धतीने ही संकल्पना विकसित होत आहे औद्योगिक विकास युगात भांडवल बँकांच्याद्वारे उभा करणे किंवा शेअर मार्केटच्या द्वारे उभा करणे ही संकल्पना केंद्रस्थानी होती चौथ्या नवतेत इंडेक्स आणि ग्राफ सतत पाहिले जातात उलाढाल किंवा नफा या दोन अंगाने फक्त गोष्टी होत नाहीत कंपनीची ब्रँड इमेज सर्वाधिक महत्त्वाची बनत जाते कंपनीच्या मार्फत कोणते आयकॉन सादर केले जातात ते महत्त्वाचे ठरते जाहिरातींना प्रचंड महत्व प्राप्त होते उत्पादनापेक्षा उत्पादनाची जाहिरात जास्त महत्त्वाची ठरत जाते सादरीकरण ही संकल्पना विक्री पेक्षा महत्त्वाची ठरत जाते अनेकदा प्रॉडक्ट फालतू असून सुद्धा लोक केवळ त्याचे सादरीकरण उत्तम झाले म्हणून सुरुवातीच्या काळात विकत घेतात पण अर्थातच आता लक्षात येते आहे की सादरीकरणामुळे जास्तीत जास्त सुरुवातीचा कालखंड नीट होतो नंतर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला प्रॉडक्टची क्वालिटीच मदत करते यामुळे केवळ क्वालिटीवर एखादे प्रॉडक्ट चालेल याची गॅरंटी देता येत नाही ती सेमीऑडिटी म्हणून कशी कॅश झाली समाजामध्ये ते फार महत्त्वाचे ठरत जाते ज्याला कॉलिटी चा ब्रँड बनवता येतो तोच टिकतो ज्याच्या क्वालिटीचा ब्रँड बनत नाही त्याची गुणवत्ता कचऱ्यात जमा होते 


यातूनच मग हळूहळू प्रोस्परिटीच्या वेगवेगळ्या कथा उदयाला येतात शाहरुख खान कुठून आला आणि तो कसा मन्नत पर्यंत पोचला अशी प्रोस्परिटी स्टोरी स्पॉन्सर केली जाते त्यासाठी हिरो हा खूप खालचा दाखवावा लागतो अनेकदा तर हे खोटे असले तरी चालते त्यातूनच मग चाय वाला ते पंतप्रधान अशी स्टोरी तयार होते हे सर्व प्रॉस्पॅरीटी केंद्रस्थानी आल्यामुळे घडत असते 


अशाच कथा काही कंपन्यांच्या सुद्धा असतात आणि त्याही समाजामध्ये वारंवार मीडिया सादर करत असतो कारण भरभराट कशी झाली यामध्ये वाचकांना सुद्धा इंटरेस्ट असतो 


प्रश्न असा आहे संपूर्ण समाजाची भरभराट होऊ शकते का समाजातल्या सर्वच घटकांची भरभराट होऊ शकते का? अजून तरी या प्रश्नांची खात्रीलायक उत्तरे मिळालेली नाही कदाचित भविष्यात ती मिळतील .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे