भविष्य पाहणारी माणसे श्रीधर तिळवे नाईक
कुठल्याही राष्ट्रांमध्ये किंवा राज्यामध्ये भविष्य पाहणाऱ्या लोकांची आवश्यकता असते हे ते लोक असतात जे समाजाला पुढे घेऊन जातात किंवा पुढे कसे जायचे ते सांगतात
माणसाच्या श्रद्धा युगात माणूस हा प्रामुख्याने अनुभवावर अवलंबून होता त्यामुळे साहजिकच ज्याचा जगाचा अनुभव जास्त आहे असा माणूस भविष्याच्या संदर्भात महत्त्वाचा होता अशा लोकांना भारतीय परंपरेत शहाणा वाईज असे म्हटले जाईल वैदिक परंपरेमध्ये अशा लोकांना ऋषी अशी संज्ञा आहे तर पाश्चात्त्य देशांमध्ये या लोकांना seer म्हणतात गरीब शोकांतिका मध्ये नेहमीच असा कोणी ना कोणीतरी seer असतो जो भविष्य पाहत असतो म्हणजे ईडीपस या नाटकामध्ये असा एक शहाणा मनुष्य दिसतो त्याच्याजवळ विजडम असते म्हणजे शहाणपण असतं आणि त्या शहाणपणाच्या जीवावर तो संपूर्ण टोळीला किंवा जानपदाला मार्गदर्शन करत असतो अनेकदा राजा ऐकत नाही आणि मग त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात
भगवान शंकरांच्या मुळे जेव्हा सर्वत्र मोक्षयुग अवतरले तेव्हा साहजिकच भविष्य पाहण्याची जबाबदारी मोक्षकावर आली आणि त्यांना दार्शनीक असा शब्द सुद्धा आला ग्रीक परंपरेमध्ये मात्र ही जबाबदारी तत्त्वज्ञावर टाकण्यात आली साहजिकच याच लोकांनी भविष्य पाहायला सुरुवात केली
पुढच्या धर्म युगामध्ये मात्र यासाठी एस्ट्रोलॉजी व ऍस्ट्रोलॉजर ज्योतिषी यांचा उदय झाला आणि ज्योतिषीच भविष्य सांगायला लागले धर्म युगामध्ये श्रद्धा महत्त्वाची असल्यामुळे इथे सुद्धा ग्रहांच्यावर श्रद्धा महत्वाची ठरू लागली साहजिकच जिथे जिथे धर्मयुगे आली तिथे तिथे ज्योतिष शास्त्राचा प्रभाव वाढत गेला अपवाद फक्त इस्लाम असेल कारण इस्लाम धर्म कमी आणि श्रद्धा जास्त आहे किंबहुना सर्व जुडाईक धर्मामध्ये श्रद्धेचा प्रभाव प्रचंड असल्याने तिथे ज्योतिषशास्त्राला मान्यता नाही त्यामुळेच मी अनेकदा जुदा एक परंपरेतील जुडा एक परंपरेतील धर्मांना महाश्रद्धा म्हणतो
पुढे विज्ञान युगाले आणि भविष्याचा विचार वेगळ्या पद्धतीने व्हायला लागला आणि त्यातूनच विजनरी म्हणजेच द्रष्टा ही संकल्पना उदयाला आली आणि हे जे द्रष्टे लोक होते ते समाजाला मार्गदर्शन करायला लागले इतकेच नव्हे तर सामाजिक सुधारणांच्या चळवळीमध्ये भविष्य पाहणाऱ्या लोकांना द्रष्टे असे म्हणणे स्वाभाविक होऊन गेले किंवा राजकीय आर्थिक आणि सामाजिक भविष्य सांगणाऱ्या सर्वच तत्त्वज्ञ लोकांना मानसिक रस्ते म्हणू लागले माणसे द्रष्टे म्हणू लागली उदाहरणार्थ कार्ल मार्क्स सारखा मनुष्य हा आर्थिक क्षेत्रातला द्रष्टा म्हणून ओळखला जात होता कारण त्याने सांगितली त्याच पद्धतीने रशियन राज्यक्रांती घडली होती असा मार्क्सवादी लोकांचा समज होता
तंत्रज्ञान जेव्हा उदयाला आले तेव्हा मात्र या संदर्भातल्या संकल्पना बदलत गेल्या आणि डिझायनर महत्त्वाचा होत गेला हे लोक भविष्याचे डिझायनर होते आणि ते भविष्य सांगायला लागले अनेकदा भविष्याचे डिझाईन करून द्यायला लागले
यानंतर जी जमात निर्माण झाली तिनेच आजच्या समाजाचे फाउंडेशन स्टोन टाकलेले आहेत ती म्हणजे फ्युचरॉलॉजिस्ट तिची सर्वात तंत्रज्ञानाच्या युगात झाली तरी तिला खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली ती चौथ्या नवते मध्ये ! मी स्वतः या जमातीतला आहे मला लोक नेहमी काय करतो म्हणून विचारतात तेव्हा मी म्हणतो मी फ्युचरॉलॉजिस्ट आहे यामध्ये पिठाचा टक्कर पासून पीटर ड्रकर पासून अल्विन टॉफलर पर्यंत अनेक लोक येतात भविष्यात काय घडणार याचा नेमका अंदाज या लोकांना होता चीनने तर अल्विन टॉफलर ला पैसे देऊन बोलवले होते आणि त्याने चीनचे भविष्य उत्तम रीतीने डिझाईन करून दिले नकाशा तयार केला आणि त्या नंतरच चीन कुठे गेला आहे ते आपण पाहतोय
चिन्ह तंत्रज्ञानामध्ये मात्र नवीन फ्युचर ईस्ट फ्युच रिस्ट ही संकल्पना उदयाला आली आहे कारण इथे प्रत्यक्ष काम करावे लागते हे ते लोक आहेत जे चिन्ह तंत्रज्ञानाचे भविष्य डिझाईन करतात यांना आपण मराठीमध्ये भविष्यक म्हणू शकतो सध्या तरी अशा लोकांचा प्रचंड अभाव भारतामध्ये आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये अशा लोकांची प्रचंड गरज आहे जे लोक हे बघतील तेच खरे भविष्याचे निर्माते आहेत प्रत्येक कंपनीमध्ये तुमच्याकडे एक तरी फ्युचरॉलॉजिस्ट किंवा फ्युचरीस्ट पाहिजे जो कंपनीचे भविष्य कार्पोरेटचे भविष्य कार्पोनेटचे भविष्य व्यवस्थित पाहू शकेल भारतात अशा लोकांचा दुष्काळ आहे किंबहुना आपल्या राजकारणी लोकांना याबाबतीत कसलीही अक्कल नाही जे चीनला जमले ते आपल्याला जमले नाही याचे सर्वात मोठे कारण आपल्याकडे या प्रकारचे लोक नाहीत आणि या प्रकारचा विचारपण नाही
आज भाजपची जी वाट लागलेली आहे त्याचे सर्वात मोठे कारण त्यांच्याकडे या दोन्ही जमातींचा अभाव आहे त्यामुळे साहजिकच परंपरेत राहून विचार करणारे लोक या लोकांनी प्रचंड प्रमाणात जमवले पण असे लोक भविष्य बघू शकत नाही भविष्य बघायला तुमच्याजवळ फ्युचरॉलॉजिस्टच लागतो किंवा फ्युचरिस्ट लागतो
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment