कदाचित आधीच टाईप केलेल्या कविता

सत्याभोवती अनेक असत्यांनी दुकाने थाटलेली असतात 

पण सत्याला त्यामुळे काहीही फरक पडत नाही

कारण सत्य शेवटी दुकानांच्या भाऊ गर्दीतही सत्यच राहतं 


हळूहळू दुकानांचा बाजार बनतो 

दुकाने मॉल होतात 

सत्य दिसेनासे होते 

पण तरीही सत्य सत्यच असते 

वाळवंटातील एखाद्या अवचित वाढलेल्या वटवृक्षासारखे अचंबित करणारे 


लोक म्हणतात वाळवंटात वड वाढत नाही 


आणि सत्य तर वाळवंटातही उभे असते 

मॉलमध्ये उभे असते


ते प्रत्येक वस्तूमधून डोकावते 

ते खरेदी करणाऱ्या हातात हलत राहते 

ते पैशाच्या आवाजात झुळझुळते 

ते कॅश क्रेडिटच्या अभ्यासक्रमात सळसळते 


व्यवस्था सत्य वाचू देत नाही 

सत्य वाचलं न गेलेल्या पुस्तकासारखे पडून असते 

पण असते 


सत्याचा ध्वनी कानावर आदळतच राहतो 

हे जग बनवत राहतो 


हळूहळू सत्य हे केवळ शाब्दिक सवय बनून जाते भाषेमध्ये 

लोक केवळ सवयीने सत्याविषयी बोलत राहतात 


सत्य सवय होते 

सुटत तर नाही 

पण उपयोगी नाही 


आणि माणूस स्वतःही 

जगण्याची सवय झालेले मशीन बनतो 


शेवटी हे मशीन मरते 

आणि सत्य पुन्हा रसरशीत 

हिरवेगार

जगण्याच्या दाही दिशा मोकळ्या ठेवत


श्रीधर तिळवे नाईक

(निर्वाण सिरीज मधील निर्वाणानंतरच्या कविता या काव्यफायलीतून)


प्रत्येक वेळी जन्मलेल्या प्रत्येक जनावराला 

माणूस बनवणे 

एक अखंड सातत्य 

टिकवावे लागणारे


तू जनावर म्हणून जन्मलास 

आणि माणूस झालाच नाहीस 


का झाला नाहीस ?


तुझ्या आई-वडिलांची ही जबाबदारी नव्हती का ?

त्यांनी का तुला जनावरच राहू दिले की 

त्यांनी मनुष्य प्रथम जनावरच असतो हे साधे सनातन सत्य डावलले 

आणि जन्मजात माणूसपणाचा हट्ट ऑटोमॅटिक केला?


आईच्या पोटातून जे येते 

ते जनावरच असते 

त्याला माणूस बनवावे लागते 


समाज हे कृत्रिम जंगल आहे 

त्याचे नियम नाही पाळले की ते पाशवी बनते 

तू पाशवी बनलास म्हणून तर अत्याचार केलास 


तू अपयश आहेस आमच्या सर्व व्यवस्थांचे 

तू जाणीव आहेस की 

अजूनही जनावर शिल्लक आहे 

आणि शिल्लक राहतेच 

संपत नाही 


तू का संपत नाहीस ?


वासना इतक्या टोकेरी होतात कशा?


कायदा केवळ डोक्यावरचे केस कसे बनतो ?


कायद्याचा धाक खाक कसा होतो ?


बेभानपणा कसा स्वभाव बनतो ? 


रक्त इतके पिसाळते कसे?


वीर्य संपूर्ण मेंदूचा ताबा कसा घेते? 


मी तुझ्यासारख्या अनेकांना कानाखाली वाजवलेल्या आहेत 


तुला फाशी देऊन नाहीसे करावे असे वाटावे 

इतकेही नागडे निर्लज्जपण 

मी तुमच्यासारख्यांच्या चेहऱ्यावर पाहिलेले आहे 


भोग हवा आत्ता नि इथेच 

ही तडस येते कुठून ?


नकार झेलण्याची सभ्य रीत कशी शिकवावी ?


किं काही तुझ्यासारखेच राहणार 

कायम आडवे येणारे 

कधीच न सुधारणारे ?


मी शार्प शूटर्सनाही गांधीवादी बनवलेले आहे 

पण साला तुमची जमात मात्र संपत नाही 

शार्पशूटर निदान कळतात 

तुम्ही कुठे लपलेला असता ते कळतही नाही


सभ्यता शिकवण्याच्या सगळ्या शिक्षणतऱ्हा अपंग करून टाकणारे तुमचे व्यंग 


की हे सर्व हिंसेचे मादक

आवर्तनाय ?

अहंकाराचा स्फोटक थयथयाट

ज्याचा कामवासनशी संबंधच नाही?


जेलमध्ये ठेवून तुझ्या सेल्स बदलतील? 

की फाशीच द्यावे निर्लज्ज बेलगाम वासनेला? 


माझ्या हातात ऑर्डर आहे 

जिला एक सिस्टीम द्यायची आहे


तुझ्या बलात्काराने ऑर्डर 

डीसऑर्डर बनवलीये 

आणि माझ्यापुढे प्रश्न तुला सिस्टीम बाहेर ठेवण्यासाठी जेल पुरेशी आहे की मृत्युदंड ?


फाशीचा निकाल देताना मीही अनेकदा माझ्या शाईत खून वळवळताना पाहिलेला आहे 

जणू एक झुरळ 


मी तुला नाहीसा होण्याची सजा देत 

आणि माझ्या पाठीवर एक झुरळ वळवळत


माझी पाठ अशा अनेक वळांनी भरून गेली आहे 


मी सामोरा आहे आरशासमोर 

आणि मला माहित नाही 

तुझ्या चूकचूकणाऱ्या मृत्यूत माझा नेमका सहभाग किती


मी म्हणतोय मी शिकारी आहे 

आणि मी एका जनावराची शिकार केलेली आहे 


शंभरदा हे पटविन 

डायरीत लिहीन 

आणि मग हा सगळा घटनाक्रम सवयीचे मेमरी कार्ड बनेल


काळ भल्या भल्या जनावरांना सपाट करतो 

एवढा एकच दिलासा 

या आयुष्यात जगण्याला हलका करतो 


शेवटी स्किन इज फ्लॅट

जिचा गवगवा शरीरभर होतो


श्रीधर तिळवे नाईक


(चॅनेल सिरीजमधील चॅनेल वर्ड्स या काव्य फायलीतून) शत्रूंच्यावर टीका करणारे 

शत्रूंची जाहिरात करत असतात 


जीवन आणि आयुष्यातील बाई 

एकमेकांच्या विरोधात ठाकत असतील तर 

बाई बदल 


म्हातारपणापर्यंत रोमांस टिकत नाही 

प्रेम पेशन्सवर टिकते 


तिनं तुला शत्रू म्हणून घोषित केलं 

ह्याचा अर्थ 

तीच अजूनही तुझ्यावर प्रेम आहे 


ती खूप दुःखी होती म्हणून ती प्रेमाला हो म्हणाली 

थोडी सुखी झाली म्हणून आयुष्यातून निघाली  

समजून घे 


दुःख कधीकधी इतकं खोल असतं 

कि पाण्यासाठी 

तुझ्यासारख्या समुद्रालाही हो म्हणतं


समुद्र हा फक्त खोलातून 

वर येण्यासाठी केलेली उपाययोजना असते 


प्रेम पुरावे सोडत नाही 

फक्त कविता सोडतं 

आणि कोर्टाला कविता पुरावे म्हणून मान्य नाही 


आंधळ्या तारुण्याने डोळे उघडले 

हे काय कमी आहे 


फक्त मीरा रोडला जाणं बंद कर 

म्हणजे मृत्यूही जगण्याला कारण पुरवायला लागेल 


पृथ्वी आकाशातून निळी 

आणि जमिनीवरून हिरवी असते 


तेव्हा आभाळातच चिता जळाली पाहिजे 

हा हट्ट सोडून दे 


चिता कुठेही पेटली तरी पिवळीच दिसणार - स्वीकार 


नात्याचा मृत्यूही सापेक्ष आणि क्वांटम असतो 


त्याला नेटवर्कमध्ये ठेव 


आपोआप सपाट होईल 


श्रीधर तिळवे - नाईक

(चॅनल : लव , सेक्स एण्ड एलसेट्रा ह्या काव्यफाईलीतून)


मिले साज इसतरहकी दिलसे सितार निकले

वक़्तभी ठहर जाये ठहरावसे प्यार निकले


यकीन तो नहीं हैं मेरा यहाँ किसी शख्सपे  

इसबार शायद यहाँ कोई वफादार निकले 


जुदाइमे तड़पभी इसकदर घनी हो  

 हीरोंसेभी मेरे तेरे अश्क़ चमकदार निकले 


हर आग बुझती हैं अपनीभी बुझेगी मगर 

बूझते समय इश्क़का उससे निखार निकले 


मैं इस शहरमे इस उम्मीदसे आया हूँ 

मैं अच्छा बागबाँ बनु वो खुशबूदार निकले 


श्रीधर तिळवे नाईक

( एका भारतीय विद्यार्थ्याचे उदगीर अप्रकाशित ह्या काव्यफाईलीतून )

मी कुणाला इथे हवा आहे 

हाच एक प्रश्न खरा आहे 


कितीही महाभारते लिहू शकतो 

माझ्यातील हव्यास मोठा आहे 


ते तुला कह्यात आणू शकतात 

जरी त्यांचा जेमतेम आवाका आहे 


त्यांची खरी ताकद संघटीतपणा 

अन्यथा शौर्याला कूठे पल्ला आहे


ते टोळ्याटोळ्यांनी चालून येतील 

ज्यांचे टारगेट तुझी सभ्यता आहे 


श्रीधर तिळवे नाईक 

(डेकॅथलॉन सिरिजमधिल डे कॅथलॉन वर्डस ह्या काव्यफायलीतून)

मला पृथ्वीसाठी बनवलं गेलं होतं 

पृथ्वीवरच पाठवलं गेलं 

वांदा एकचं झाला 

दुसऱ्या प्लॅनेटसाठी बनवण्यात आलेल्या बायका 

पृथ्वीवर थेट आयुष्यात दाखल झाल्या 


त्यांच्या बुद्धिमत्ता ब्लंट कि चंट कळेस्तोवर 

शरीरसंबंध डन झाले होते 

अन मातृमुखी स्तनांचे पागोडे उल्गडेतोवर 

बेडरूम खुर्ची मांडून बसली होती 


हृदयाचं ट्रेनिंग झालं नाही 

आणि रक्तातल्या ट्रेन्स 

लोकल्सनी ताळ्यावर आणल्या होत्या


सतत परकेपण अनुभवनाऱ्या बायकांना पुरुष आपला वाटावा म्हणून काय करावं?


आईला विचारलं तर आईं म्हणाली 

बायकांच्यापुढें बायकांना पुरुषच लागतात 


पण परकेपणाच काय 


मूल झालं की निघून जातो 

आणि पुरुष ही आपल्या आई बनवण्यासाठी धाडलेली गेस्ट रूम आहे हे कळून चुकलेले असतं 


बाईकडे अख्खा प्लॅनेट म्हणून बघ 

मॅच्युअर् होशील 


गेली कित्येक वर्षे मी प्लॅनेटसची बहीणगर्दी सांभाळत 

फुगे उडवतोय 


श्रीधर तिळवे नाईक 

(चॅनेल सिरिजमधील लव अंडर टेररिझम ह्या काव्य फायलीतून)

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे