TYPE KAVITA
माझ्या अहंकाराचे कमाल नखरे
मलाच कळत नाहीत किती खोटे किती खरे
मोक्षाच्या काठाला अजूनही उभा
आणि समोर तुझे अंग नाजूक आणि बोचरे
रोज करतो आहे मी तुझ्याशी संग
रोज जात आहेत माझ्या शरीराला चरे
एक तुझा गंध
बाकी सर्व बेबंध
एक तुझा फुलोरा
बाकी सर्व डोलारा
एक तुझेच वेड
बाकी सर्व वाय झेड
कुठून निर्माण झाले हे प्रेम
ही तर नव्हती माझ्यासाठी फ्रेम
कधी टांगला गेला तुझा काळजात फोटो
मी तर मागितला होता मनाकडे तुझ्याविरुद्ध व्हेटो
आणि आता असा तुझ्यापुढे झुलत
एक वृक्ष आहे तुझ्या नावाचा फुफुसाच्या आतमध्ये फुलत
त्या मुंबई शहरावर करत मात
असे तर नाही ना मी करत आहे स्वतःचाच घात
करियर तर समोर पडले
करतोय आशुतोष गोवारीकर फोन
आणि तू म्हणतेस मला नाही आवडत त्याच्या भाषेचा टोन
कळत नाहीये काय घडते आहे
माझ्यात काय उमलते आहे माझ्यात काय झडते आहे
टीव्ही पाहण्याचा टाइमपास कधीच संपला
एकेक एपिसोड आयुष्याचा माझ्या आत खपला
आता मांडावी चूल तर गॅसचे बिल दिसते
जिथे पहावे दिल तिथे डील दिसते
फुलते लीली फुलतो गुलाब
मी कळून घेतो तुझ्या फुलांचा रुबाब
तुझे हृदय राहते दरवळत तू नोकरीवर
फक्त एक मीच आहे जो आहे बेकार करतो आहे खाली वर
काहीतरी संपले आहे
आणि माहित नाही काय जन्मले आहे
श्रीधर तिळवे नाईक
(चॅनेल या सिरीज मधील चॅनेल ज्ञ: लव , लव इन अँड लव आउट या काव्यफायलीतून )
Comments
Post a Comment