क्वांटमवाद, स्थानिक वाद , देशीवाद ,उत्तर आधुनिक वाद आणि ट्रम्प श्रीधर तिळवे नाईक 


१९३५ नंतर हळूहळू quantam फिजिक्स प्रस्थापित होत गेले आणि उत्तरआधुनिक विज्ञान हे सिल्याबस चा भाग होत जाणे अटळ बनले त्यातला पहिला प्रभावी सिद्धांत सापेक्षतेचा होता ज्याची सुरुवात आईन्स्टाईनने केली होती दुसरा टप्पा हायझनबर्गमुळे सुरू झाला ज्यामध्ये पोझिशन आणि ज्ञान यांचा संबंध प्रस्थापित झाला आणि पोझिशन फार महत्त्वाची झाली पोझिशन चे सर्वात मोठे वैशिष्ट्य जर काय असेल तर ते म्हणजे पोझिशन ही नेहमी स्थानिक म्हणजेच लोकल असते कारण पोझिशन वैश्विक असत नाही जर का पोझिशन वैश्विक असेल तर आपोआपच तिला वैश्विक सत्य सापडले असते परंतु प्रत्यक्षात असे होत नाही याचे कारण पोझिशन नेहमीच सापेक्ष नेहमीच लोकल असते स्थानिक असते साहजिकच 1930 पूर्वी जी प्रचंड मेटॅन्यारेटीवज होती ज्यांना वैश्विक सत्य सापडल्याचा साक्षात्कार होत होता ती कोसळायला सुरुवात झाली याचा सर्वाधिक मोठा फटका हा मार्क्सवादाला बसला कारण मार्क्सवाद हा नेहमीच वैश्विक सत्याची भलावण करत होता या उत्तराधुनिक विज्ञानाने आधुनिक विज्ञान आणि पुरोगामी विज्ञान मोडीत काढले आणि रसेल सारख्या आधुनिक तत्त्वज्ञाला स्वतःच्या पोझिशन्स बदलणे भाग पडले 


उत्तरआधुनिक तत्त्वज्ञानामध्ये स्थानिक वादाचा झालेला उदय ही मुळातच उत्तर आधुनिक विज्ञानाची quantam विज्ञानाची देणगी आहे आणि विज्ञानाच्या क्षेत्रापासूनच उत्तर आधुनिकतेचा तत्त्वज्ञान म्हणून प्रचंड प्रभाव पडायला सुरुवात झाली पोझिशन ही लोकल असते पण जेव्हा एखादी व्यक्तीच लिहित असते निरीक्षण करत असते तर ती स्वतः लोकल असते तिची पोझिशन लोकल असते म्हणजेच एका अर्थाने व्यक्ति म्हणजे पोझिशनल लोकॅलिटी असते आणि पोझिशनल डोक्यालिटीही असते 


1940 पर्यंत सर्व काही सायंटिफिक क्षेत्रात चालले होते परंतु अचानक तत्कालीन सर्व लोकल पोझिशन्स या परंपरेने प्रचंड भारावलेले असतात असे चित्र निर्माण झाले किंवा निर्माण केले गेले विशेषतः हिटलरने धार्मिक प्रश्न केंद्रस्थानी आणून परंपरा केंद्रस्थानी आणली भारतामध्ये जिना यांनी हेच केले याचा एक दुष्परिणाम असा झाला अचानक या उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाचा तिसरा पाया परंपरेचा उदय हा बनला परंपरा फक्त एकटी आली नाही ती स्वतःच्या सोबत धर्म घेऊन आली आत्तापर्यंत विज्ञानाबद्दल ही शक्यता वाटत होते की विज्ञान हे वैश्विक सत्य सांगते पण उत्तर आधुनिक विज्ञानानेच वैश्विक सत्य सांगण्याऐवजी लोकल सत्य सांगायला सुरुवात केली आणि त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की जर विज्ञान वैश्विक सत्य सांगत नसेल तर मग वैश्विक सत्य कोण सांगणार? आणि यातूनच धर्माचा पुन्हा प्रभाव वाढला आणि वैश्विक सत्य सांगण्याची जबाबदारी पुन्हा धर्माकडे आली किंबहुना वेस्ट चा सर्वात मोठा घातक प्रकार तिथे मोक्षाचा अभाव असणे हाच होता या लोकांना मोक्ष माहीत नसल्याने त्यांनी वैश्विक सत्यासाठी म्हणून धर्म आणला याउलट आशियाई धर्मामध्ये किंवा इंडियन धर्मामध्ये स्पष्ट आणि स्वच्छपणानं वैश्विक सत्य मोक्ष असतो त्यामुळे साहजिकच उत्तराधुनिकतेचा फार मोठा वैचारिक धक्का हा मोक्ष - निर्वाण केंद्री आशियाई देशांना कधीच बसला नाही कारण वैश्विक सत्यासाठी या देशांच्या मध्ये कायम मोक्ष उपलब्ध होता निर्वाण उपलब्ध होते दुर्दैवाने युरोप मधून आणि युरोपियन धार्मिक परंपरेतून आयात झालेल्या देशी वादाला हे कळले नाही आणि त्यातूनच मोक्षाचे पुनर्जीवन करण्याऐवजी या लोकांनी धर्माचे पुनर्जीवन करायला सुरुवात केली याचा दुष्परिणाम असा झाला की पूर्ण पणे परंपरा वाद आणि परंपरा वादाच्या नावाखाली उत्तरब्राह्मण धर्माचा उदय झाला आणि तो वाढत गेला पसरत गेला आणि आता सत्ता सुद्धा त्याच्या ताब्यात जाते की काय अशी शंका यायला लागलेली आहे 


उत्तर आधुनिक युगामध्ये धर्म केंद्रस्थानी आणण्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो इस्लामचा आहे इस्लामने धार्मिक कट्टरतेमुळे धर्माची बाजू इतक्या तीव्रपणे पाश्चात्त्य देशांमध्ये आणि अरेबिक देशांच्या मध्ये इतकी धरून ठेवली की सर्वात प्रथम पाकिस्तान निर्माण झाला आणि त्याच वेळेला मग इस्त्राईल पण निर्माण झाला म्हणजेच जुडाईक परंपरेतील दोन धर्म ज्यू आणि इस्लाम हे धर्माच्या आधारे राष्ट्रवाद निर्माण करायला लागले यातला धोका अनेक उत्तरवादी लोकांना कळलाच नाही परिणाम असा झाला की धर्म बोकांडी बसला अनेक ठिकाणी तर डार्विनला बाजूला काढून धार्मिक सिद्धांत क्रिएशन सिद्धांत कॉलेजच्या सिल्याबसमध्ये शाळेच्या सिल्याबस मध्ये अभ्यासाला लागले ही विज्ञानाची वैचारिक पिछेहाट होती जी विज्ञानाला आणि वैज्ञानिकांना अपेक्षितच नव्हती मुख्य म्हणजे पुढे पुढे देशीवादाने आणि उत्तर आधुनिक वादाने त्यांचे विज्ञानाशी असलेले नातेच तोडले आणि जणू काय आपण सार्वभौम व स्वायत्त आहे असा आव आणत एक नवीनच उत्तराधुनिक विचित्र गुंतागुंतीचे जग निर्माण केले आणि जगभर या उत्तराधुनिक वादाने आपले राज्यकर्ते आणले जे प्रचंड धार्मिक होते आणि त्याच वेळेला अतिशय उत्तम करमणूक करणारे होते 


आज जो ट्रम्प यांचा उद्योग चाललेला आहे तो खऱ्या अर्थाने अमेरिका उत्तराधुनिक झालेली असल्याचे लक्षण आहे स्वतःची लोकल आयडेंटिटी शाबूत ठेवण्यासाठी आत्तापर्यंत जो जागतिक बहाना निर्माण करण्यात आला तो जागतिक बहाना आता वगळण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि संपूर्ण जगाचे कल्याण हा अजेंडा बाजूला ठेवून आता अमेरिकेचे कल्याण भले मग ते जागतिक कल्याणाच्या नावाने येत असेल केंद्रस्थानी आलेले आहे म्हणजेच एका अर्थाने हे ग्लोकलैयजेशन आहे ट्रम्प हे एखाद्या विदूषकाप्रमाणे करत आहेत असे सकृत दर्शनी वाटते पण मुळात उत्तराधुनिक सगळ्याच राज्यकर्त्यांना ड्रामेबाजेची विलक्षण हौस आहे त्यामुळे सर्वच उत्तर आधुनिक नेत्यांचे राजकारण 70 एम एम ड्रामा चालू असलेले आहे आणि त्यांचा लोक फक्त ऑडियन्स आहे त्यावर प्रचंड विश्वास आहे उत्तर कोरिया मध्ये तर हे तीव्रतेने जाणवते 


तुम्ही जर का इलेक्ट्रॉनचे किंवा कोणत्या कणाचे निरीक्षण करायला गेला तर तो सतत पोझिशन बदलत असतो उत्तर आधुनिक नेता हा सतत अशी पोझिशन बदलत असतो उदाहरणार्थ ट्रम्प त्या इलेक्ट्रॉन सारखेच आहेत सारखे पोझिशन बदलत असतात कधी तरंग असतात तर कधी कण असतात आणि आपण आता त्यांना तरंग स्वरूपात बघतोय म्हणेस्तोवर ते कण झालेले असतात जवळजवळ सर्वच राज्यकर्त्यांच्या बाबतीत हे घडताना दिसते याचे कारण स्थिती इतक्या वेळा इतक्या वेगाने बदलत असते की कोणाचाच तिच्या स्थिती गतीवर कंट्रोल नाही साहजिकच राजकारण कुणाला लक्षात येत नाही काय चालले तेही लक्षात येत नाही आपण गोंधळून जातो जग संपूर्णपणे केऑस झालेले आहे आणि आपण कन्फ्युजन झालेलो आहोत असा साक्षात्कार वारंवार होत राहतो 


जे लोक पुरोगामी वादी आहेत ते अजूनही पारंपारिक विज्ञानासारखे स्थिर विज्ञान हे सत्य देणार या आयडिया लॉजिकल स्ट्रान्सवर विश्वास ठेवत कुठेही गोंधळून न जाता आपली मांडणी करत राहतात पण त्यांनाही हे नेमके काय चालले आहे हे कळणे अवघड होऊन बसले आहे 


प्रश्न असा आहे की सतत बदलणाऱ्या वास्तवाचे करायचे काय आणि इथेच चौथ्या नवतेची एन्ट्री होते चौथी नवता असे सांगते की आपण जर का सगळ्या positions ची संभाव्यता गृहीत धरली आणि त्यांचे गणित तयार केले मॅप तयार केला तर प्रोग्रामिंग होऊ शकते आणि कोणत्या वेळी काय हे आपल्या ध्यानात येऊ शकते अलीकडच्या काळात गुगल मॅप हा असा मोबाईल मॅप झालेला दिसतो ट्रम्प ही जर का एक एनटीटी मानली तर आपण त्यांचे मॅपिंग काय आहे त्या मॅपिंगची काय काय पॉसिबिलिटी आहे त्यांची मॅपिंग करण्याची शैली काय आहे ते नेमके नेटवर्क कसे बांधतात आणि त्यांच्या नेटवर्क्सचा इतर नेटवर्क्सशी काय संबंध आहे याचे जर का एक गुगल मॅपिंग सारखे मोबाईल मॅपिंग करू शकलो आणि ते शक्य झाले तर आपणाला त्यांच्या संदर्भात काय करता येईल हे ठरवता येऊ शकते मी स्वतः माझ्या फ्यूचरलॉजीमध्ये या गोष्टी करत असतो व्यक्तीला तुम्ही जर का स्थिर मानले तर सगळा गोंधळ होतो त्याऐवजी तिला जर का तुम्ही मोबाईल एनटीटी मानले तर काही आकलन होऊ शकते आणि उपायही शोधता येतात अर्थात यापुढे प्रत्येक उपाय हा तात्कालीकच आणि काळाने मर्यादित असणार अवकाशाने मर्यादित असणार दिशेने मर्यादित असणार 


उत्तराधुनिकतेने फक्त प्रश्न निर्माण केले समस्या मांडली परंतु उत्तरे दिली नाहीत उलट परंपरा शोधत त्यांनी भूतकाळात उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षामध्ये भूतकाळात कधीही उत्तरे असत नाही अगदी धर्म सुद्धा तुम्हाला नवीनतम करावा लागतो मांडावा लागतो त्यामुळे उत्तर आधुनिकतेने देशी वादाच्या नावाखाली परंपरेची उसनवारी करून जी उत्तरे शोधली ती फारशी कामाला येताना दिसत नाहीत भारतातली एकही समस्या भाजपला सोडवता आलेली नाही याचे सर्वात मोठे कारण परंपरा कुठलीही समस्या सोडवू शकत नाही तुम्ही मग जास्तीत जास्त नेहरूंनी काय केले नाही हे सांगत बसता परंपरेने आणि इतिहास आणि काय केले नाही हे सांगत बसता परंतु आत्ताच्या काळातले प्रश्न सोडवू शकत नाही कारण होऊन गेलेली व्यक्ती उदाहरणार्थ नेहरू ही परंपरा असते आणि तुम्ही त्यात स्वतःला आणि स्वतःच्या पार्टीला स्वतःच्या गव्हर्मेंटला बुचकळत बसता परंतु उत्तरे हातात लागत नाहीत फक्त ब्लेमिंग गेम हाताला लागतो त्याने काय होणार ?


त्यामुळेच नवी उत्तरे देण्याची जबाबदारी चौथ्या नवतेवर आहे ही जबाबदारी चौथी नवता कशी पार पडते यावर संपूर्ण जगाचे भवितव्य आता अवलंबून आहे डोनाल्ड ट्रम्प हा या अर्थाने मेकअप कॉल बनून आलेला वेकअप कॉल आहे तो ब्रेकप केल्याशिवाय डी कोड केल्याशिवाय चौथ्या नवतेपुढे पर्याय नाही अन्यथा मेकअप केलेला आर्टिस्ट म्हणून एक उत्तर आधुनिक नेता जगभर एक नवा पॉलिटिकल ड्रामा जन्माला घालत राहील आणि हा तिसरे महायुद्ध निर्माण करू शकतो शेवटी जगात एकच गोष्ट अनलिमिटेड असते मूर्खपणा !


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे