अक्ष आणि प्रत्यक्ष श्रीधर तिळवे नाईक
शैवधर्मी लोकांच्यात अक्ष ही संकल्पना फार महत्त्वाची मानली जाते अक्ष म्हणजे डोळा असा अर्थ असला तरी तो अलीकडचा अर्थ आहे असे अनेकांना वाटते प्रत्यक्षात तो फार प्राचीन आहे पहिला डोळा दुसरा डोळा आणि तिसरा डोळा यातील तिसरा डोळा ही संकल्पना भारतात भगवान शंकरांच्या मुळे खूपच लोकप्रिय झाली त्याचा संबंध थेट मोक्षाशी आहे किंबहुना मोक्ष हाच तिसरा अक्ष तिसरा डोळा होय तो ज्याचा उघडला तोच सत्य होऊन जातो सत्य शोधले जात नाही सत्य होता तुम्ही सत्य होता म्हणजे जो निरीक्षक आहे तो सत्य होतो जेव्हा तुम्ही सत्य होता तेव्हा तुम्ही नाहीसे झालेले असता म्हणजेच निरीक्षकच नाहीसा झालेला असतो साहजिकच सत्याविषयीचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनतात आणि मोक्ष अनाकलनीय राहतो म्हणूनच मोक्षाबाबत मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अंत असेही म्हटले जाते आपल्याकडे सत्य हा शब्द अलीकडे इतक्या उथळ पद्धतीने वापरला जातो की तो जणू काय ज्ञान या प्रक्रियेशी संबंधित आहे असे वाटत राहते याचे कारण पाश्चात्य देशांमध्ये सत्य हा शब्द फारच सोपा करून वापरला जातो ज्ञानतंत्र नेहमी सत्यापाशी पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच सत्य हेच शिव असते शिव हेच सत्य असते शिव हेच शून्य असते शून्य हेच सत्य असते शिव शून्य सत्य या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत तर एकालाच दिलेली वेगवेगळी नावे आहेत त्याला एक ही म्हणणे अवघड आहे कारण त्याला शून्य म्हटले जाते जय कृष्णमूर्ती यांनी त्याला फक्त "ते ''असे नाव दिले होते मोक्षाानंतर ते कायमस्वरूपी अवतरत राहते तुमच्यात आणि तुमच्या बाहेर किंबहुना तुमचे आणि तुमच्या बाहेरचे यामध्ये वेगळेपण राहत नाही व्यवहारामध्ये तुम्ही येता तेव्हा कधीकधी हे अवतरण थोडेसे बॅकसीटला जाते तेही समोरच्याला कम्फर्टेबल वाटावे म्हणून ! अर्थात हा ही निर्णय कुठलाही मनुष्य घेत नसतो तर सत्यच हा निर्णय घेत असते किंबहुना हे घडत असतं आणि त्याची आपोआपता कोणीही थांबवू शकत नाही मुळात लोक पूर्ण पणे स्वतःला बंद करून असतात ते अंतात जगत असतात मर्यादेत जगत असतात चुकून एखादा कोणी थोडासा जरी ओपन झाला तरी त्याला अचानक मग त्याचा प्रत्यय येतो आणि तो मग समोरच्या अवतरण पुढे स्तब्ध होतो झोपतो अनेकदा भक्त होतो समोरच्या व्यक्तीला जिच्यामार्फत हे अवतरण पोचलेले असते गुरु करतो अर्थात हे खूप दुर्मिळ घडतं . पण ते कधी कधी घडत आणि घडलं की मग एक वेगळाच फिनॉमिना सुरू होतो
दुसरा शब्द आहे माया !!! इंद्रियांच्या मर्यादेत आणि इंद्रियांच्या मार्फत तयार झालेल्या इंद्रिय उपकरणांच्या मर्यादेत जे जे येऊ शकते ते माया ! माया हे असे वास्तव असते जे संपूर्णपणे कधीच दिसत नसते आपल्याला हे ब्रम्हांड कधीही अजूनही संपूर्ण दिसलेले नाही पण ते असते आणि त्या असण्याला आपण माया म्हणतो माया म्हणजे दिसणारे असणे किंवा इंद्रियशक्य होणारे असणे
वास्तव म्हणजे इंद्रिय बद्ध होणारे असणे किंवा इंद्रिय बद्ध माया ! माया इंद्रिय शक्य असते तर वास्तव इंद्रिय बद्ध असते इंद्रियांच्या कक्षात येथे किंवा इंद्रियांनी बनवलेल्या उपकरणांच्या कक्षेत येते माणूस आपल्या इंद्रियांचे एक्सटेंशन करू शकतो दुर्बिन वगैरे गोष्टी बनवू शकतो म्हणून इंद्रियांचे एक्सटेंशन सुद्धा आता इंद्रियांच्यात सामील करावे लागते इंद्रिय शक्य आणि इंद्रिय बद्ध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे माणसाला मर्यादित उपस्थितीचा शाप आहे ही उपस्थितीची मर्यादा त्याच्या शरीराची मर्यादा असते तो शरीर ओलांडून आपली उपस्थिती वाढवत राहतो वेगवेगळ्या उपकरणांच्याद्वारे स्वतःला अधिकाधिक सर्वत्र उपस्थित करायला लागतो पण तरीही या सर्व उपस्थितीला मर्यादेचा शाप आहे आणि इथूनच माणसाच्या ज्ञानाच्या मर्यादेला सुरुवात होते अलीकडे ती अधिकाधिक समजून येऊ लागली आहे एकेकाळी विज्ञानाची जी प्रचंड हवा झाली होती तिला आता या मर्यादित उपस्थितीने वेसण घातलेली आहे मर्यादित उपस्थितीचा सिद्धांत नेमका अचूक कसा मांडायचा हा फार मोठा प्रश्न या क्षणी विज्ञाना पुढे आहे कारण माया सतत बदलत असते स्वतःची उपस्थिती सादर करते गायब होते गायब होते सादर करते आणि तिचा वेग इतका प्रचंड आहे की तो पकडे पर्यंत नाहीसा झालेला असतो यातूनच मग तथ्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणजेच जे वास्तव शेवटी इंद्रियांच्या मर्यादेत शक्य होते आणि इंद्रियांना गोचर होते त्याच्याच आधारे शेवटी माणसाला जगावे लागते खरंतर माणसाला जगण्यासाठी ते पुरते म्हणूनच अनेकदा तथ्याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही अशा प्रकारचे सिद्धांतन होऊ शकते अनेकदा तर माणसाने तथ्याच्या पलीकडे का जावे असा प्रश्न निर्माण होतो अनेकदा सर्वसामान्य पद्धतीने सामाजिक पद्धतीने जगताना आपण तथ्याच्याच आधारे जगत असतो सत्य माया आणि वास्तव हे आपल्याला जगण्यासाठी फार गरजेचे वाटत नाही थोडक्यात जगण्यासाठी तथागत असणे पुरते पण माणसाची गंमत अशी आहे की माणसाला धड तथागत सुद्धा होता येत नाही जो तथ्याची गतीच जाणतो तो तथागत ! गौतम बुद्ध स्वतःला तथागत म्हणून घेतो त्याचे कारण तथ्याच्या पलीकडे त्याच्या काळामध्ये जाणे गरजेचे वाटत नव्हते पण नंतर विसाव्या शतकामध्ये खूप परिस्थिती बदलत गेली आता हे तथ्य तरी स्थिर असते का तर नाही त्या तथ्याला गती असते आणि म्हणूनच तथागत असणे म्हणजे फक्त तथ्यच जाणणे नव्हे तर सत्याची गती जाणणेही असते म्हणजेच निरीक्षक तथागत होतो तेव्हा जेव्हा तो तथ्य आणि तथ्याची गती जाणतो आपला सगळा आयुष्याचा खेळ हा तथ्याच्या आधारे खेळला जातो तथ्य जाणण्यासाठी प्रज्ञा अत्यंत आवश्यक असते मात्र दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा प्रज्ञाने जगत नसतो तर आपण मर्यादित प्रज्ञा म्हणजेच बुद्धी वापरत असतो कारण आपल्याला तथ्यापेक्षा त्यातून मिळणाऱ्या रिझल्ट वर अधिक फोकस करायचा असतो
हे तथ्य माणसाच्या इंद्रियांच्यात आणि मेंदूमध्ये आणि अवयवांच्या मध्ये गोचर होऊन ठसते या ठसण्यामुळेच ठसे निर्माण होतात आणि माणूस म्हणजे ठशांची जत्रा बनतो एका अर्थाने माणसात उमटलेले तथ्य म्हणजे ठसा होय माणूस असे ठसे गोळा करत जातो आणि त्यातूनच त्याचे ठाशीव तयार होते स्मृती या ठाशीवचा एक भाग असते आणि ती जेव्हा ठसे ठोस होतात तेव्हा बनते याचा एक दुष्परिणाम असा होतो की आपण ठशांच्यातच संतुष्ट राहायला लागतो आणि ठाशीव बनत जातो म्हणजेच एका अर्थाने आपणाला तथागत व्हायचे नसते आपणाला ठाशीव व्हायचे असते कधीकधी बुद्धिमान व्हायचे असते जास्तीत जास्त तथागत आणि बुद्ध व्हायचे असते
जेव्हा आपण या अवस्था ओलांडून तथागतच्या पलीकडे तथ्याच्या पलीकडे जातो तेव्हा आपोआपच भाषा संपलेली असते आणि मौन येते जो तथ्याच्या पलीकडे जातो तो मुनी असतो म्हणूनच गौतम बुद्धाचा उल्लेख अनेकदा शाक्य मुनी असा केला जातो किंबहुना अशोकाच्या कालखंडापर्यंत गौतम बुद्धाला शाक्य मुनीच म्हटले जात होते आणि ते योग्य होते एका अर्थाने मुनी, तथागत , बुद्ध , बुद्धिमान आणि ठाशिव (शैव परिभाषेत ज्याला शिवाचा "ठो'' ही कळत नाही असा मनुष्य म्हणजे ठाशीव ! हा ठाशिव जेव्हा बुद्धिमत्ता गमावतो तेव्हा तो ठोंब्या बनतो )या एकाच उपस्थितीच्या पंचमिती five डायमेन्शन आहेत आणि या उपस्थितीला सिद्ध म्हणता येते सिद्ध म्हणजे जो सत्याला उपलब्ध झाला आहे तो ! आणि म्हणूनच गौतमचा प्रश्न आला की तो सिद्ध गौतम होतो सिद्धार्थ होतो सिद्धार्थ गौतम होतो पण एकंदरीत जगभरात गौतम बुद्ध गौतम बुद्ध हे इतकं झालं आहे की शाक्य मुनी हे अशोक कालीन नावसुद्धा आता गायब झालेले दिसते याचे कारण मुळातच गौतम बुद्धाने या संदर्भात पाळलेले मौन आहे अनेकदा होते असे की जे रिसिव्ह करणारे असतात त्यांच्या मर्यादा पाहून बोलावे लागते सिद्ध गोतमने हे वारंवार केलेले आहे
ज्ञानतंत्राने मोक्षाला पोचलेला मनुष्य हा फक्त कधीच आपल्या मोक्षा पाशी थांबत नाही तो गणपती अथवा शास्ता बनतो आणि शिस्त देतो ही शिस्त त्या त्या काळामध्ये काय योग्य आहे हे पाहून दिली जाते आणि ती फक्त त्या काळापूर्तीच मर्यादित असते दुर्दैवाने आपल्याकडे ती जणू काय अमर असल्यासारखे सर्व काही चालत चालते यातूनच मग शिस्त तुमच जाते आणि तुंबत जाते आणि एकदा का तिचे वाहने तिचे प्रवाही असणे बंद झाले की ती शिस्त तो धम्म कुजायला लागतो श्रमण परंपरेने शै व शिस्तीला धम्मा असे का म्हटले हा फार मोठा प्रश्न आहे कारण धम्म म्हटल्यानेच पुढे मग धर्म झाला आणि कुठल्याही गोष्टीचा धर्म झाला की राजकारण सुरू होते किंबहुना मी खूपदा सांगितलेले आहे की धर्म ही राजकीय विचार प्रणाली असते आणि हे लक्षात न घेणारे लोक मग तिला आध्यात्मिक वगैरे मानून फार मोठा घोटाळा समाजामध्ये माजवत असतात शिस्तीची आवश्यकता असते किंबहुना समाज शिस्तीशिवाय चालूच शकत नाही ही शिस्त जो घालून देतो तो शास्ता असतो आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी जे करतात ते शासन संस्था चालवत असतात ते शासक असतात प्रशासक असतात जर शासक आणि प्रशासक शिस्त पाळत नसतील तर त्यांना शासक आणि प्रशासक राहण्याचा काडीचाही अधिकार नाही स्वतः शिस्त पाळत नाहीत त्यांना शिस्तीच्या अंमलबजावणीचे कार्य देता येत नाही देऊ नये शिस्तीतून अनेकदा शास्त्र निर्माण होते आणि इथून शास्त्री आणि ठोंबे निर्माण व्हायला लागतात आणि वाट लावायला लागतात शास्त्री म्हणजे कर्मठ पुस्तकी शिस्तीचा पुरस्कार करणारा आणि अंतिमतः शिस्तीला पूजणारा आणि शिस्तीला पूजवणारा मनुष्य आणि शेवटी कुजवणारा मनुष्य होय आणि शास्त्रीला कसलाही विचार न करता फॉलो करणारा असतो तो अनेकदा ठोंब्या बनतो.
शिस्त ही तथ्याच्या गतीनुसार त्या गतीच्या होणाऱ्या ज्ञानानुसार बदलत असते हा बदल जर का शिस्त सामावून घेणे हा बदल स्वीकारणे बंद करत असेल तर मग ती शिस्त कुजायला लागते म्हणूनच समाजामध्ये तथागतांची सतत गरज असते हे तथागत नेहमीच बदललेल्या शिस्तीची जाणीव देत असतात प्रत्येक तथागत स्वतःच्या काळाची शिस्त निर्माण करतो आणि त्याचबरोबर हेही सांगतो की पुढचा तथागत ही शिस्त बदलू शकेल जर का तथागत निर्माण होणे बंद झाले तर मग फक्त बुद्धिमान लोक निर्माण होतात आणि शास्त्रीय लोक शिस्तीचे प्रवक्ते बनतात आणि एक कर्मठ पणा पसरायला लागतो गेल्या हजार वर्षांमध्ये भारतामध्ये तथागत प्रभावी झाले नाहीत कारण भक्तीचा कल्लोळ उडाला आणि भक्त आणि संत कधीही शिस्त निर्माण करू शकत नाहीत त्यांचे सारे विवेचन भावकेंद्री भक्तीभावतंत्री असते परिणाम एवढाच झाला फक्त भाव वाढत गेला भक्तिभाव वाढत गेला आणि मग ज्ञानतंत्र बंद पडले आणि त्याचा भारतीय समाजावर अतिशय वाईट परिणाम झाला इस्लामने दिलेला हा एका अर्थाने फार मोठा सीडबॅक आणि सेटबॅक होता. फक्त इबादत केंद्रीय म्हणजेच भाव केंद्र असलेल्या धर्मांचा उदय झाला आणि तेच धर्मराज्य करायला लागले की मग शिस्त म्हणून जे काही उदयाला येते ते फार उथळ असते. अनेकदा अगदी संत सुद्धा भाव केंद्रीय असतात आणि त्यामुळे साहजिकच भावाच्या अंगाने जेवढी शिस्त मानता येईल तेवढेच ते मानतात आणि मांडतात परिणामी पुराणे आणि कुराणे वाढत जातात त्यांचा प्रभाव वाढत जातो आणि संत सुद्धा अनेकदा पौराणिक आणि कुराणिक लिहायला लागतात
समाज म्हणूनच फक्त भावतंत्रे असून चालत नाही आणि त्याच्या अभावी चालत नाही भाव असावाच लागतो परंतु तोच फक्त असला की गडबड सुरू होते त्याच्यामध्ये शरीर तंत्र म्हणजेच योगतंत्र , ज्ञानतंत्र , क्रिया तंत्र आणि शक्ती तंत्र ही सुद्धा ऍक्टिव्ह असावी लागतात जो पंचतंत्राने युक्त असतो तोच खरा समाज ! समाजातला पुरोहित वर्ग हा नेहमीच भावतंत्र जिवंत ठेवतो आणि इतर सर्व तंत्रे मुद्दाम म्हणून मारत असतो कारण इतर तंत्रांच्या मधून त्याला पैसे मिळण्याची शक्यता नसते मुळातच योगा करण्याची किंवा ज्ञान मिळवण्याची त्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारी नसते भावतंत्र अनेक शॉर्टकट पुरवते साहजिकच ते पुरोहिताला सोयीचे असते आणि भक्तालाही ! प्रत्यक्षामध्ये अनेकदा या भावतंत्रामध्ये पुरोहित खऱ्या भावांचा भक्ती भावाचा सत्यनाश करत असतो म्हणूनच संत तुकारामांच्यासारखे संत पुरोहिताविरोधात बंड करतात आणि पुरोहितशाही त्यांना त्यांच्या वह्या बुडवायला लावते प्रत्यक्षामध्ये वह्या बुडल्या नाहीत कारण तुकाराम वाणी असल्यामुळे त्यांना टिकणारा कागद आणि टिकणारी शाई व्यवस्थित माहिती होती ते तंत्र त्यांना माहीत होते कारण हिशेब लिहिणे त्यांना माहीत होते आणि त्या काळामध्ये हिशेब लिहिणाऱ्या सर्व वाणी लोकांना टिकणारा कागद आणि टिकणारी शाई व्यवस्थित माहिती होती कारण त्यांच्या व्यवसायाची ती गरज होती विशेषता जे वाणी सावकारी करत होते त्यांना तर कागदपत्रे वर्षानुवर्षी टिकणे आवश्यक होते ब्राह्मणांना याची बहुदा कल्पना नसावी कारण एकंदरच ब्राह्मण अडाणी होते म्हणजे एका अर्थानेच तुकारामांच्या जवळ कागद आणि पेपर आणि लिखाण आणि शाई यांचे ज्ञान होते आणि या ज्ञान तंत्रानेच त्यांच्या भक्ती भावाने भरलेल्या वह्या वजनाने हलक्या असल्या तरी तरंगल्या आणि पुढे तरल्या वही भिजली हिचकी वही झाली भिजकी वही झाली पण बुडाली नाही कारण तुकारामांना ते आधी सावकारी करत असल्याने वह्या टिकवण्याचे टेक्निक व्यवस्थित माहिती होते मराठी टीकाकारांना एकंदरच वैश्य समाजाबद्दल आणि वाणी समाजाबद्दल काडीचीही माहिती नसल्याने आणि त्यांना ती माहिती घेण्याची गरज नसल्याने कारण ते धंदाच कधी करत नसल्याने हे कळणे अशक्य होते आणि म्हणूनच अनेक कल्पनाविलास केले गेले
तुकाराम संत असून सुद्धा अनेकदा ज्ञान केंद्रीय ज्ञानतंत्री माणसासारखे का बोलतात हे समजायचे असेल तर त्यांचे हे वाणी असणे समजून घेणे फार आवश्यक आहे म्हणूनच आपण तुकारामांचे नाते सिद्ध गौतम यांच्याशी जुळवू शकतो कारण ज्ञान हाच घटक दोघांना जुळवतो मला तुकाराम (आणि ज्ञाननाथ ही )आवडतो कारण तो ज्ञानतंत्राची उपेक्षा करत नाही उलट भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालतो आणि म्हणूनच कदाचित बंडखोर होतो तो जर सदेह वैकुंठाला पाठवला गेला नसता तर आपणाला महाराष्ट्रामध्ये दुसरा मराठी पद्धतीचा गौतम बुद्ध दिसला असता तुकाराम हा भक्ती तंत्राने पोहोचलेला संत प्रत्यक्षाशी प्रचंड नाते जोडून आहे
थोडक्यात काय जे प्रत्यक्ष आहे त्याचे सत्य, माया , वास्तव , तथ्य आणि ठसे हे पाच खांब आहेत यातला प्रत्येक खांब आपण नीट समजून घेतला पाहिजे नाहीतर मग केवळ गोंधळ माजतील ,माजतात आणि आता माजत आहेत
श्रीधर तिळवे नाईक
अक्ष आणि परोक्ष श्रीधर तिळवे नाईक
मागील लेखात आपण प्रत्यक्ष आणि अक्ष यांचा संबंध पाहिला आता आपण परोक्ष आणि अक्ष यांचा संबंध तपासायचा आहे
परोक्ष म्हणजे काय याविषयी फारशी चर्चा युरेशियन परंपरेमध्ये होत नव्हती कारण अनुमानात्मक प्रमाण हेच सातत्याने युरेशियन धर्मांनी पुढे आणलेले आहे शैव श्रुतीमध्ये मात्र परोक्ष चा विचार केला गेला आहे पण तो नेमका काय आहे हे आता फार उपलब्ध नाही म्हणून पुन्हा एकदा तो चर्चेला घेतोय
परोक्ष म्हणजे प्रत्यक्षाने निर्माण केलेली जीवामधली उपस्थिती जिच्यात प्रत्यक्ष मात्र प्रत्यक्ष उपस्थित नसते . सर्वसाधारणपणे याची सुरुवात ठशापासून होत असली तरी ठसे (इंप्रेशन्स) सुद्धा अनेकदा प्रत्यक्षच असतात परंतु मनुष्य तिथे थांबत नाही तो या ठशांच्या मधून अनेक गोष्टी निर्माण करतो म्हणजे परोक्ष निर्माण करतो परोक्षा मधली एक गोष्ट म्हणजे विचार दुसरी गोष्ट अर्थातच भाव ! भाव असोत किंवा विचार असोत हे नेहमीच जड असतात मटेरियल असतात आज ना उद्या भाव आणि विचार यांचे अचूक आणि त्वरित वजन करता येईल जरी आता ते शक्य होत नाही मात्र ते जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्या मेंदूचे दुनिया बदलून गेलेली असते अर्थात हे परोक्ष बायोलॉजिकल मटेरियल असणार हे उघडच आहे या दोन्ही गोष्टी ह्या परोक्ष असतात आणि त्यांचा दैनंदिन वापरावर प्रचंड प्रभाव असतो आपण अनेकदा आयुष्यामध्ये ठसे जसे आहेत तसे वापरत नाही परिणामी आपले भाव आणि विचार हे कधीही शुद्ध स्वरूपात असत नाहीत त्यांच्यात अनेकदा आपली भाषा त्या भाषेचे व्याकरण आपला कल्पनाविलास आपले हितसंबंध अशा अनेक गोष्टी मिसळत जातात ज्यामुळे अनेकदा जेव्हा पुन्हा एकदा ती गोष्ट ती वस्तू ती व्यक्ती आपल्यासमोर येते तेव्हा आपण अनेकदा त्या व्यक्तीला थेट बघण्याऐवजी आपले सारे ठसे आणि त्या ठश्याशी जोडले गेलेले आपले परोक्ष यांच्या चष्म्यातून पाहायला लागतो हा परोक्षाचा चष्मा आपणाला काही नीट बघू देत नाही
परोक्ष सर्वात पहिली गोष्ट निर्माण करते ती म्हणजे प्रतिमा इमेज आणि दुसरी गोष्ट निर्माण करते ती म्हणजे आयडिया संकल्पना! आपले भाव आणि विचार हे नेहमीच प्रतिमा आणि संकल्पना यांनी युक्त असतात . किंबहुना भाषा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रतिमा आणि संकल्पना यांची जंजावळ ,आप्तावळ, गोतावळ आणि मातावळ असते आपण झाड या प्रत्यक्षाला झाड हा शब्द देतो म्हणजेच प्रतिमा देतो आणि संकल्पना देतो त्यामध्ये आपल्या आतल्या झाडाचे त्या झाडाशी असोसिएट असलेल्या अनेक गोष्टींचे ठसे आणि त्यांच्यातून निर्माण झालेली प्रतिमा असते प्रतिमांचा पुंज संकल्पना निर्माण करतो गणिताचे आकडे हे एकाच वेळी प्रतिमा असतात आणि संकल्पना ही असतात अनेकदा आपण या प्रतिमा आणि संकल्पनांच्या आधारे जग पाहायला शिकतो ठसे हे बिंब असू शकतात आणि प्रतिबिंब ही असू शकतात त्यांची आपल्याला होणारी प्राप्ती ही नेहमीच इंद्रियांच्या द्वारे होत असते आणि त्यांचा अंतिम शेवट अनेकदा आपल्या मज्जा संस्थेत आणि मेंदूत होत असतो मज्जा संस्था ही प्रत्येक पेशीत उपलब्ध असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे ठसे , प्रतिमा आणि संकल्पना यांच्या मधून आपली स्मृती तयार होत जाते नवीन संकल्पना तयार करणे हे तत्त्वज्ञ लोकांचे काम असते हे दिसायला फार सोपे असते परंतु प्रत्यक्षात एखादी संकल्पना नवी शोधणे हे फार अवघड काम आहे कारण अनेकदा आपण वापरत असलेल्या संकल्पना ह्या प्रचलितच असतात आणि त्या आधी तरी कोणी शोधून ठेवलेल्या असतात भारतामध्ये संकल्पनांचा इतिहास लिहिला जात नाही त्यामुळे विचारांचा इतिहास लिहिला जात नाही आणि यामुळे अनेकदा फालतू फालतू लोक स्वतःला तत्त्वज्ञ म्हणून मिरवत असतात विचारवंत असणे आणि तत्त्वज्ञ असणे यामध्ये फार मोठा फरक आहे विचारवंत फक्त इतरांचे विचार मांडत राहतो अनेकदा सोपे करून मांडत राहतो पण काही नवीन संकल्पना मांडू शकत नाही परंतु तत्त्वज्ञ मात्र नेहमीच नवीन संकल्पना शोधून देतो या संकल्पना जर का प्रत्यक्षाशी जुळल्या तरच आपण त्या स्वीकारतो अन्यथा आणखी एक कल्पनाविलास म्हणून सोडून देतो संकल्पनातून पुढे जे तयार होते त्याला आपण नक्ष असं म्हणतो म्हणजेच ज्यात अक्ष असत नाही ते नक्ष होय .ते उपस्थित असते आणि तरीही नसते या नक्षवरूनच आपणाला नकाशा हा शब्द मिळालेला आहे नक्ष हा नेहमीच एक डिझाईन म्हणजेच साकृती जिच्यात नक्षीही येते सादर करत असतो जेव्हा नक्ष किंवा साकृती नकाशा बनतो तेव्हा तो सर्वत्रिक रित्या अनेकदा स्वीकारला जातो गुगल मॅप मुळे आपणाला आता नकाशा किती महत्त्वाचा आहे ते सांगायची गरज नाही किंबहुना नेटवर्क म्हणजे अनेकदा ऍक्टिव्ह नकाशाच असतो
परोक्ष हे काल्पनिक असते का तर माझ्या मते नाही आपल्याकडे जे कृष्णमूर्तींच्या सारख्या विचारवंतांच्या मुळे अनेकदा ते काल्पनिक वाटण्याची शक्यता असते पण प्रत्यक्षामध्ये परोक्ष काल्पनिक असत नाही ते जैविक असते आणि जगण्याच्या ऍक्टिव्हिटी चा भाग असतो मात्र अनेकदा त्यामध्ये कल्पना मिसळतात आणि त्यामुळेच ते काल्पनिक वाटावे इतके आभासी होत जाते मोक्ष मिळाला की तुम्ही केवळ ठशांच्या आधारे जगायला लागता आणि आवश्यक असेल तेव्हा संकल्पना प्रतिमा वापरता. सर्वसाधारणपणे परोक्ष्याशी ज्ञानात्मक यथायोग्य सांगड किंवा आत्ताच्या भाषेत नेटवर्क जुळवणाऱ्या संकल्पना मोक्ष मिळालेला मनुष्यही वापरत असतो मात्र काल्पनिकतेला तो व्यवस्थित वगळून सादर होत जातो
परोक्ष हा सध्याच्या नवीन ज्ञान शाखांच्या मध्ये अचानक महत्त्वाचा घटक बनत चाललेला आहे माणसाच्या आत मध्ये किंवा माणसाच्या मेंदूमध्ये माणसाच्या शरीरामध्ये काय घडते यावर आत्ता जितके संशोधन सुरू आहे तितके कदाचित कुठल्याच काळात झाले नव्हते भारतीय लोकांनी मात्र या संदर्भात फार भरीव काम केले आहे असे म्हणता येणार नाही अपवाद आहेत पण हे अपवादच नियम सिद्ध करतात असो
श्रीधर तिळवे नाईक
अक्ष , अपरोक्ष आणि चिन्हकी श्रीधर तिळवे नाईक
मराठी भाषेमध्ये जे काही शब्द पूर्णपणे distorte झाले त्यामध्ये कदाचित अपरोक्ष या शब्दाचा प्रथम क्रमांक लागावा मराठी ही अशी एकमेव संस्कृती आहे जिथे शैव धर्मी शब्द अजूनही वापरत असतात म्हणजे ध्यानासाठी असलेला छान हा शैव शब्द फक्त मराठी भाषेतच तुम्हाला उपलब्ध दिसेल आणि अलीकडे तो चायना मध्ये गेल्याने चायना मध्ये ध्यानाला छानच म्हणतात . अपरोक्ष या शब्दाचे सुद्धा असेच झालेले आहे मात्र त्याचा नेमका अर्थ आता मराठी लोक विसरून गेलेत कारण मराठी लोक हल्ली विठ्ठलवादी झालेले आहेत
मराठीमध्ये आपण सर्रास "त्याच्या अपरोक्ष आपण हे काम केले ''असे म्हटले जाते म्हणजेच तो नसताना त्याच्या अनुपस्थितीत अशा प्रकारचा अर्थ अपरोक्ष या शब्दाला प्राप्त झालेला आहे प्रत्यक्षामध्ये त्याचा अर्थ परोक्ष नाही ते अपरोक्ष म्हणजेच परोक्षाच्या अनुपस्थितीत जे परोक्षाला सादर करत असते ते अपरोक्ष होय
म्हणजेच एका अर्थाने प्रत्यक्षाच्या अनुपस्थितीत जे जीवामध्ये घडते ते परोक्ष आणि परोक्षाच्या अनुपस्थितीत जे जीवांच्या पुढे घडत असते सादर होत असते ते अपरोक्ष होय . हे सर्वसाधारणपणे चिन्हकीच्याद्वारे केले जाते. भाषा ही चिन्हकीचे अतिशय महत्त्वाचे अंग असल्याने अनेकदा अपरोक्ष हे नेहमीच भाषेच्याद्वारे सादर होताना अधिकाधिक दिसते .भाषेला प्रत्यक्ष सादर करणे कधी शक्य नसते त्यामुळेच भाषा फक्त अपरोक्ष सादर करू शकते म्हणजेच माणसाच्या किंवा जीवाच्या आत प्रत्यक्ष विषयी जे परोक्ष तयार होते ते भाषा सादर करू शकते. आपल्या सर्व चिन्हकीच्या व्यवहारामध्ये एप्लीकेशन मध्ये हे अतिशय आद्य प्रमेय आहे आणि दुर्दैवाने त्याकडे पाश्चात्य तत्व धारेने दुर्लक्ष केल्यामुळे आपण सुद्धा पाश्चात पद्धतीला शरण जात दुर्लक्ष करत असतो .पाश्चिमात्य लोकांना सर्व अक्कल दिलेली आहे अशी समजूत झाल्याने आपल्याकडे ह्या चुका होत असतात
प्राचीन काळी हे अपरोक्ष अतिशय मर्यादित होते कारण मुळातच चिन्हसृष्टी प्रभावी असली तरी ती केंद्रस्थानी आलेली नव्हती चौथ्या नव्हते मध्ये मात्र अचानक ती केंद्रस्थानी आली किंवा चिन्हसृष्टी प्रचंड प्रभावी झाल्याने व मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी आल्याने चौथी नव्हता निर्माण झाली आणि अपरोक्षाचा विचार फार महत्त्वाचा बनत चाललेला आहे एकेकाळी अपरोक्षाला हुबेहूब प्रत्यक्ष निर्माण करणे अशक्य बनत होते कारण फक्त भाषाच मुख्य चिन्हकी होती भाषा ही अनेकदा हुबेहूबीकरण करण्यात अपयशी ठरते त्यामुळे अपरोक्ष हे स्पष्टपणे वेगळे काढून दाखवता येत होते पण अचानक दृश्य भाषेमध्ये क्रांती होत गेली आणि डिजिटल क्रांतीने दृश्यतेचे हुबेहूबीकरण प्रचंड वाढवत नेऊन शेवटी ते शंभर टक्के आणि नंतर हळूहळू ते स्पेशल इफेक्ट, विजुअल इफेक्ट टाकत एकशे दहा टक्के 120% असे enhance करत नेले आणि आज अवस्था असे आहे की अपरोक्ष हेच प्रत्यक्षापेक्षासुद्धा सुंदर वाटायला लागले आहे .या एका क्रांतीमुळे मानवी जीवन संपूर्ण बदललेले आहे आज आपण तिला चौथी नवता म्हणतो किंवा चिन्हक्रांती म्हणतो कारण चिन्ह वस्तू semiodities निर्माण होणे हे सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसते इतकेच नव्हे तर चिन्ह वस्तूंना निर्माण करणारे संगणकांच्या सारखी चिन्हयंत्रे आणि चिन्ह तंत्रे प्रचंड वेगाने विकसित होत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे नवीन योग व युग निर्माण करत आहेत अपरोक्ष हे जर का असेच वाढत राहिले तर त्याचा नेमका परिणाम काय होईल याचा अंदाज अजूनही कोणाला येत नाही फक्त आपल्याजवळ एक भीती उरलेली आहे ती म्हणजे हे अपरोक्ष प्रत्यक्षाला खाऊन टाकेल
मला स्वतःला हे अशक्य वाटण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे शिवाची उपस्थिती ! मानवी जीवनामध्ये शिव हा नेहमी प्राण म्हणून उपस्थित असतो आरटीफिशियल इंटेलिजन्स कितीही डेव्हलप झाला तरी तो प्राण निर्माण करू शकेल का हा माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे आपण मृत्यूला नेहमीच प्राण जाणे किंवा प्राणज्योत मालवली असे म्हणतो कारण जे जीवन आहे ते प्राणामुळेच अस्तित्वात असते यालाच आध्यात्मिक भाषेत पुढे जाऊन शिवाशिवाय शक्ती म्हणजे शव होय असे म्हटले जाते कारण प्राणाशिवाय जीव म्हणजे मृतदेह होय अलीकडे अनेकदा वैष्णव आणि हिंदू लोक हे वचन नेमके उलटे बोलतात जे काही उरेल ते कितीही ऍक्टिव्ह असले तरी प्राण नसल्यावर शव काय करू शकेल ?
मला जर का कोणी या चिन्हसृष्टीय क्रांतीची अंतिम (अचीवमेंट )प्राप्ती कुठली असा प्रश्न विचारला तर माझे उत्तर आहे प्राण निर्माण करणे
बघू ,आरटीफिशियल इंटेलिजन्सला प्राण निर्माण करणे जमते काय ?
श्रीधर तिळवे नाईक
अक्ष आणि प्रत्यक्ष श्रीधर तिळवे नाईक
शैवधर्मी लोकांच्यात अक्ष ही संकल्पना फार महत्त्वाची मानली जाते अक्ष म्हणजे डोळा असा अर्थ असला तरी तो अलीकडचा अर्थ आहे असे अनेकांना वाटते प्रत्यक्षात तो फार प्राचीन आहे पहिला डोळा दुसरा डोळा आणि तिसरा डोळा यातील तिसरा डोळा ही संकल्पना भारतात भगवान शंकरांच्या मुळे खूपच लोकप्रिय झाली त्याचा संबंध थेट मोक्षाशी आहे किंबहुना मोक्ष हाच तिसरा अक्ष तिसरा डोळा होय तो ज्याचा उघडला तोच सत्य होऊन जातो सत्य शोधले जात नाही सत्य होता तुम्ही सत्य होता म्हणजे जो निरीक्षक आहे तो सत्य होतो जेव्हा तुम्ही सत्य होता तेव्हा तुम्ही नाहीसे झालेले असता म्हणजेच निरीक्षकच नाहीसा झालेला असतो साहजिकच सत्याविषयीचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनतात आणि मोक्ष अनाकलनीय राहतो म्हणूनच मोक्षाबाबत मोक्ष म्हणजे ज्ञानाचा अंत असेही म्हटले जाते आपल्याकडे सत्य हा शब्द अलीकडे इतक्या उथळ पद्धतीने वापरला जातो की तो जणू काय ज्ञान या प्रक्रियेशी संबंधित आहे असे वाटत राहते याचे कारण पाश्चात्य देशांमध्ये सत्य हा शब्द फारच सोपा करून वापरला जातो ज्ञानतंत्र नेहमी सत्यापाशी पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच सत्य हेच शिव असते शिव हेच सत्य असते शिव हेच शून्य असते शून्य हेच सत्य असते शिव शून्य सत्य या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत तर एकालाच दिलेली वेगवेगळी नावे आहेत त्याला एक ही म्हणणे अवघड आहे कारण त्याला शून्य म्हटले जाते जय कृष्णमूर्ती यांनी त्याला फक्त "ते ''असे नाव दिले होते मोक्षाानंतर ते कायमस्वरूपी अवतरत राहते तुमच्यात आणि तुमच्या बाहेर किंबहुना तुमचे आणि तुमच्या बाहेरचे यामध्ये वेगळेपण राहत नाही व्यवहारामध्ये तुम्ही येता तेव्हा कधीकधी हे अवतरण थोडेसे बॅकसीटला जाते तेही समोरच्याला कम्फर्टेबल वाटावे म्हणून ! अर्थात हा ही निर्णय कुठलाही मनुष्य घेत नसतो तर सत्यच हा निर्णय घेत असते किंबहुना हे घडत असतं आणि त्याची आपोआपता कोणीही थांबवू शकत नाही मुळात लोक पूर्ण पणे स्वतःला बंद करून असतात ते अंतात जगत असतात मर्यादेत जगत असतात चुकून एखादा कोणी थोडासा जरी ओपन झाला तरी त्याला अचानक मग त्याचा प्रत्यय येतो आणि तो मग समोरच्या अवतरण पुढे स्तब्ध होतो झोपतो अनेकदा भक्त होतो समोरच्या व्यक्तीला जिच्यामार्फत हे अवतरण पोचलेले असते गुरु करतो अर्थात हे खूप दुर्मिळ घडतं . पण ते कधी कधी घडत आणि घडलं की मग एक वेगळाच फिनॉमिना सुरू होतो
दुसरा शब्द आहे माया !!! इंद्रियांच्या मर्यादेत आणि इंद्रियांच्या मार्फत तयार झालेल्या इंद्रिय उपकरणांच्या मर्यादेत जे जे येऊ शकते ते माया ! माया हे असे वास्तव असते जे संपूर्णपणे कधीच दिसत नसते आपल्याला हे ब्रम्हांड कधीही अजूनही संपूर्ण दिसलेले नाही पण ते असते आणि त्या असण्याला आपण माया म्हणतो माया म्हणजे दिसणारे असणे किंवा इंद्रियशक्य होणारे असणे
वास्तव म्हणजे इंद्रिय बद्ध होणारे असणे किंवा इंद्रिय बद्ध माया ! माया इंद्रिय शक्य असते तर वास्तव इंद्रिय बद्ध असते इंद्रियांच्या कक्षात येथे किंवा इंद्रियांनी बनवलेल्या उपकरणांच्या कक्षेत येते माणूस आपल्या इंद्रियांचे एक्सटेंशन करू शकतो दुर्बिन वगैरे गोष्टी बनवू शकतो म्हणून इंद्रियांचे एक्सटेंशन सुद्धा आता इंद्रियांच्यात सामील करावे लागते इंद्रिय शक्य आणि इंद्रिय बद्ध या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे माणसाला मर्यादित उपस्थितीचा शाप आहे ही उपस्थितीची मर्यादा त्याच्या शरीराची मर्यादा असते तो शरीर ओलांडून आपली उपस्थिती वाढवत राहतो वेगवेगळ्या उपकरणांच्याद्वारे स्वतःला अधिकाधिक सर्वत्र उपस्थित करायला लागतो पण तरीही या सर्व उपस्थितीला मर्यादेचा शाप आहे आणि इथूनच माणसाच्या ज्ञानाच्या मर्यादेला सुरुवात होते अलीकडे ती अधिकाधिक समजून येऊ लागली आहे एकेकाळी विज्ञानाची जी प्रचंड हवा झाली होती तिला आता या मर्यादित उपस्थितीने वेसण घातलेली आहे मर्यादित उपस्थितीचा सिद्धांत नेमका अचूक कसा मांडायचा हा फार मोठा प्रश्न या क्षणी विज्ञाना पुढे आहे कारण माया सतत बदलत असते स्वतःची उपस्थिती सादर करते गायब होते गायब होते सादर करते आणि तिचा वेग इतका प्रचंड आहे की तो पकडे पर्यंत नाहीसा झालेला असतो यातूनच मग तथ्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणजेच जे वास्तव शेवटी इंद्रियांच्या मर्यादेत शक्य होते आणि इंद्रियांना गोचर होते त्याच्याच आधारे शेवटी माणसाला जगावे लागते खरंतर माणसाला जगण्यासाठी ते पुरते म्हणूनच अनेकदा तथ्याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही अशा प्रकारचे सिद्धांतन होऊ शकते अनेकदा तर माणसाने तथ्याच्या पलीकडे का जावे असा प्रश्न निर्माण होतो अनेकदा सर्वसामान्य पद्धतीने सामाजिक पद्धतीने जगताना आपण तथ्याच्याच आधारे जगत असतो सत्य माया आणि वास्तव हे आपल्याला जगण्यासाठी फार गरजेचे वाटत नाही थोडक्यात जगण्यासाठी तथागत असणे पुरते पण माणसाची गंमत अशी आहे की माणसाला धड तथागत सुद्धा होता येत नाही जो तथ्याची गतीच जाणतो तो तथागत ! गौतम बुद्ध स्वतःला तथागत म्हणून घेतो त्याचे कारण तथ्याच्या पलीकडे त्याच्या काळामध्ये जाणे गरजेचे वाटत नव्हते पण नंतर विसाव्या शतकामध्ये खूप परिस्थिती बदलत गेली आता हे तथ्य तरी स्थिर असते का तर नाही त्या तथ्याला गती असते आणि म्हणूनच तथागत असणे म्हणजे फक्त तथ्यच जाणणे नव्हे तर सत्याची गती जाणणेही असते म्हणजेच निरीक्षक तथागत होतो तेव्हा जेव्हा तो तथ्य आणि तथ्याची गती जाणतो आपला सगळा आयुष्याचा खेळ हा तथ्याच्या आधारे खेळला जातो तथ्य जाणण्यासाठी प्रज्ञा अत्यंत आवश्यक असते मात्र दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा प्रज्ञाने जगत नसतो तर आपण मर्यादित प्रज्ञा म्हणजेच बुद्धी वापरत असतो कारण आपल्याला तथ्यापेक्षा त्यातून मिळणाऱ्या रिझल्ट वर अधिक फोकस करायचा असतो
हे तथ्य माणसाच्या इंद्रियांच्यात आणि मेंदूमध्ये आणि अवयवांच्या मध्ये गोचर होऊन ठसते या ठसण्यामुळेच ठसे निर्माण होतात आणि माणूस म्हणजे ठशांची जत्रा बनतो एका अर्थाने माणसात उमटलेले तथ्य म्हणजे ठसा होय माणूस असे ठसे गोळा करत जातो आणि त्यातूनच त्याचे ठाशीव तयार होते स्मृती या ठाशीवचा एक भाग असते आणि ती जेव्हा ठसे ठोस होतात तेव्हा बनते याचा एक दुष्परिणाम असा होतो की आपण ठशांच्यातच संतुष्ट राहायला लागतो आणि ठाशीव बनत जातो म्हणजेच एका अर्थाने आपणाला तथागत व्हायचे नसते आपणाला ठाशीव व्हायचे असते कधीकधी बुद्धिमान व्हायचे असते जास्तीत जास्त तथागत आणि बुद्ध व्हायचे असते
जेव्हा आपण या अवस्था ओलांडून तथागतच्या पलीकडे तथ्याच्या पलीकडे जातो तेव्हा आपोआपच भाषा संपलेली असते आणि मौन येते जो तथ्याच्या पलीकडे जातो तो मुनी असतो म्हणूनच गौतम बुद्धाचा उल्लेख अनेकदा शाक्य मुनी असा केला जातो किंबहुना अशोकाच्या कालखंडापर्यंत गौतम बुद्धाला शाक्य मुनीच म्हटले जात होते आणि ते योग्य होते एका अर्थाने मुनी, तथागत , बुद्ध , बुद्धिमान आणि ठाशिव (शैव परिभाषेत ज्याला शिवाचा "ठो'' ही कळत नाही असा मनुष्य म्हणजे ठाशीव ! हा ठाशिव जेव्हा बुद्धिमत्ता गमावतो तेव्हा तो ठोंब्या बनतो )या एकाच उपस्थितीच्या पंचमिती five डायमेन्शन आहेत आणि या उपस्थितीला सिद्ध म्हणता येते सिद्ध म्हणजे जो सत्याला उपलब्ध झाला आहे तो ! आणि म्हणूनच गौतमचा प्रश्न आला की तो सिद्ध गौतम होतो सिद्धार्थ होतो सिद्धार्थ गौतम होतो पण एकंदरीत जगभरात गौतम बुद्ध गौतम बुद्ध हे इतकं झालं आहे की शाक्य मुनी हे अशोक कालीन नावसुद्धा आता गायब झालेले दिसते याचे कारण मुळातच गौतम बुद्धाने या संदर्भात पाळलेले मौन आहे अनेकदा होते असे की जे रिसिव्ह करणारे असतात त्यांच्या मर्यादा पाहून बोलावे लागते सिद्ध गोतमने हे वारंवार केलेले आहे
ज्ञानतंत्राने मोक्षाला पोचलेला मनुष्य हा फक्त कधीच आपल्या मोक्षा पाशी थांबत नाही तो गणपती अथवा शास्ता बनतो आणि शिस्त देतो ही शिस्त त्या त्या काळामध्ये काय योग्य आहे हे पाहून दिली जाते आणि ती फक्त त्या काळापूर्तीच मर्यादित असते दुर्दैवाने आपल्याकडे ती जणू काय अमर असल्यासारखे सर्व काही चालत चालते यातूनच मग शिस्त तुमच जाते आणि तुंबत जाते आणि एकदा का तिचे वाहने तिचे प्रवाही असणे बंद झाले की ती शिस्त तो धम्म कुजायला लागतो श्रमण परंपरेने शै व शिस्तीला धम्मा असे का म्हटले हा फार मोठा प्रश्न आहे कारण धम्म म्हटल्यानेच पुढे मग धर्म झाला आणि कुठल्याही गोष्टीचा धर्म झाला की राजकारण सुरू होते किंबहुना मी खूपदा सांगितलेले आहे की धर्म ही राजकीय विचार प्रणाली असते आणि हे लक्षात न घेणारे लोक मग तिला आध्यात्मिक वगैरे मानून फार मोठा घोटाळा समाजामध्ये माजवत असतात शिस्तीची आवश्यकता असते किंबहुना समाज शिस्तीशिवाय चालूच शकत नाही ही शिस्त जो घालून देतो तो शास्ता असतो आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी जे करतात ते शासन संस्था चालवत असतात ते शासक असतात प्रशासक असतात जर शासक आणि प्रशासक शिस्त पाळत नसतील तर त्यांना शासक आणि प्रशासक राहण्याचा काडीचाही अधिकार नाही स्वतः शिस्त पाळत नाहीत त्यांना शिस्तीच्या अंमलबजावणीचे कार्य देता येत नाही देऊ नये शिस्तीतून अनेकदा शास्त्र निर्माण होते आणि इथून शास्त्री आणि ठोंबे निर्माण व्हायला लागतात आणि वाट लावायला लागतात शास्त्री म्हणजे कर्मठ पुस्तकी शिस्तीचा पुरस्कार करणारा आणि अंतिमतः शिस्तीला पूजणारा आणि शिस्तीला पूजवणारा मनुष्य आणि शेवटी कुजवणारा मनुष्य होय आणि शास्त्रीला कसलाही विचार न करता फॉलो करणारा असतो तो अनेकदा ठोंब्या बनतो.
शिस्त ही तथ्याच्या गतीनुसार त्या गतीच्या होणाऱ्या ज्ञानानुसार बदलत असते हा बदल जर का शिस्त सामावून घेणे हा बदल स्वीकारणे बंद करत असेल तर मग ती शिस्त कुजायला लागते म्हणूनच समाजामध्ये तथागतांची सतत गरज असते हे तथागत नेहमीच बदललेल्या शिस्तीची जाणीव देत असतात प्रत्येक तथागत स्वतःच्या काळाची शिस्त निर्माण करतो आणि त्याचबरोबर हेही सांगतो की पुढचा तथागत ही शिस्त बदलू शकेल जर का तथागत निर्माण होणे बंद झाले तर मग फक्त बुद्धिमान लोक निर्माण होतात आणि शास्त्रीय लोक शिस्तीचे प्रवक्ते बनतात आणि एक कर्मठ पणा पसरायला लागतो गेल्या हजार वर्षांमध्ये भारतामध्ये तथागत प्रभावी झाले नाहीत कारण भक्तीचा कल्लोळ उडाला आणि भक्त आणि संत कधीही शिस्त निर्माण करू शकत नाहीत त्यांचे सारे विवेचन भावकेंद्री भक्तीभावतंत्री असते परिणाम एवढाच झाला फक्त भाव वाढत गेला भक्तिभाव वाढत गेला आणि मग ज्ञानतंत्र बंद पडले आणि त्याचा भारतीय समाजावर अतिशय वाईट परिणाम झाला इस्लामने दिलेला हा एका अर्थाने फार मोठा सीडबॅक आणि सेटबॅक होता. फक्त इबादत केंद्रीय म्हणजेच भाव केंद्र असलेल्या धर्मांचा उदय झाला आणि तेच धर्मराज्य करायला लागले की मग शिस्त म्हणून जे काही उदयाला येते ते फार उथळ असते. अनेकदा अगदी संत सुद्धा भाव केंद्रीय असतात आणि त्यामुळे साहजिकच भावाच्या अंगाने जेवढी शिस्त मानता येईल तेवढेच ते मानतात आणि मांडतात परिणामी पुराणे आणि कुराणे वाढत जातात त्यांचा प्रभाव वाढत जातो आणि संत सुद्धा अनेकदा पौराणिक आणि कुराणिक लिहायला लागतात
समाज म्हणूनच फक्त भावतंत्रे असून चालत नाही आणि त्याच्या अभावी चालत नाही भाव असावाच लागतो परंतु तोच फक्त असला की गडबड सुरू होते त्याच्यामध्ये शरीर तंत्र म्हणजेच योगतंत्र , ज्ञानतंत्र , क्रिया तंत्र आणि शक्ती तंत्र ही सुद्धा ऍक्टिव्ह असावी लागतात जो पंचतंत्राने युक्त असतो तोच खरा समाज ! समाजातला पुरोहित वर्ग हा नेहमीच भावतंत्र जिवंत ठेवतो आणि इतर सर्व तंत्रे मुद्दाम म्हणून मारत असतो कारण इतर तंत्रांच्या मधून त्याला पैसे मिळण्याची शक्यता नसते मुळातच योगा करण्याची किंवा ज्ञान मिळवण्याची त्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारी नसते भावतंत्र अनेक शॉर्टकट पुरवते साहजिकच ते पुरोहिताला सोयीचे असते आणि भक्तालाही ! प्रत्यक्षामध्ये अनेकदा या भावतंत्रामध्ये पुरोहित खऱ्या भावांचा भक्ती भावाचा सत्यनाश करत असतो म्हणूनच संत तुकारामांच्यासारखे संत पुरोहिताविरोधात बंड करतात आणि पुरोहितशाही त्यांना त्यांच्या वह्या बुडवायला लावते प्रत्यक्षामध्ये वह्या बुडल्या नाहीत कारण तुकाराम वाणी असल्यामुळे त्यांना टिकणारा कागद आणि टिकणारी शाई व्यवस्थित माहिती होती ते तंत्र त्यांना माहीत होते कारण हिशेब लिहिणे त्यांना माहीत होते आणि त्या काळामध्ये हिशेब लिहिणाऱ्या सर्व वाणी लोकांना टिकणारा कागद आणि टिकणारी शाई व्यवस्थित माहिती होती कारण त्यांच्या व्यवसायाची ती गरज होती विशेषता जे वाणी सावकारी करत होते त्यांना तर कागदपत्रे वर्षानुवर्षी टिकणे आवश्यक होते ब्राह्मणांना याची बहुदा कल्पना नसावी कारण एकंदरच ब्राह्मण अडाणी होते म्हणजे एका अर्थानेच तुकारामांच्या जवळ कागद आणि पेपर आणि लिखाण आणि शाई यांचे ज्ञान होते आणि या ज्ञान तंत्रानेच त्यांच्या भक्ती भावाने भरलेल्या वह्या वजनाने हलक्या असल्या तरी तरंगल्या आणि पुढे तरल्या वही भिजली हिचकी वही झाली भिजकी वही झाली पण बुडाली नाही कारण तुकारामांना ते आधी सावकारी करत असल्याने वह्या टिकवण्याचे टेक्निक व्यवस्थित माहिती होते मराठी टीकाकारांना एकंदरच वैश्य समाजाबद्दल आणि वाणी समाजाबद्दल काडीचीही माहिती नसल्याने आणि त्यांना ती माहिती घेण्याची गरज नसल्याने कारण ते धंदाच कधी करत नसल्याने हे कळणे अशक्य होते आणि म्हणूनच अनेक कल्पनाविलास केले गेले
तुकाराम संत असून सुद्धा अनेकदा ज्ञान केंद्रीय ज्ञानतंत्री माणसासारखे का बोलतात हे समजायचे असेल तर त्यांचे हे वाणी असणे समजून घेणे फार आवश्यक आहे म्हणूनच आपण तुकारामांचे नाते सिद्ध गौतम यांच्याशी जुळवू शकतो कारण ज्ञान हाच घटक दोघांना जुळवतो मला तुकाराम (आणि ज्ञाननाथ ही )आवडतो कारण तो ज्ञानतंत्राची उपेक्षा करत नाही उलट भक्ती आणि ज्ञान यांची सांगड घालतो आणि म्हणूनच कदाचित बंडखोर होतो तो जर सदेह वैकुंठाला पाठवला गेला नसता तर आपणाला महाराष्ट्रामध्ये दुसरा मराठी पद्धतीचा गौतम बुद्ध दिसला असता तुकाराम हा भक्ती तंत्राने पोहोचलेला संत प्रत्यक्षाशी प्रचंड नाते जोडून आहे
थोडक्यात काय जे प्रत्यक्ष आहे त्याचे सत्य, माया , वास्तव , तथ्य आणि ठसे हे पाच खांब आहेत यातला प्रत्येक खांब आपण नीट समजून घेतला पाहिजे नाहीतर मग केवळ गोंधळ माजतील ,माजतात आणि आता माजत आहे
त
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment