आद्य शंकराचार्यांचा अस्त श्रीधर तिळवे नाईक
भारताच्या धार्मिक इतिहासामध्ये सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व कोणते असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच काही लोक आद्य शंकराचार्यांचे नाव घेतील कारण त्यांनी काय केले त्यांचा कालखंड कोणता याविषयी प्रचंड वाद आहेत त्यातच शैव-धर्मातले आचार्य शंकर आणि हिंदू धर्मातले आद्य शंकराचार्य या एकच व्यक्ती होत्या की त्या दोन व्यक्ती होत्या याविषयी प्रचंड मोठे मतभेद आहेत अनेकदा युरेशियन परंपरा शैव लोकांना आणि बौद्ध लोकांना आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात घाल घुसळ करत असते तिचा नेमका अदमासच येत नाही त्यामुळेच इतिहासात नेमके काय घडले हे अंधुक होत जाते आचार्य शंकरांचा काळ हा गौतम बुद्धानंतरचा काळ आहे हे नक्की आहे तो साधारणपणे इसवी सन पूर्व तिसरे शतक असावा त्या उलट आद्य शंकराचार्यांचा कार्यकाळ हा सातवे ते नववे शतक यादरम्यान सांगितला जातो ही व्यक्तिरेखा होऊन गेली असं ठामपणे सांगितले जाते मात्र कधीकाळी ती खरोखरच होऊन गेली का असे प्रश्न निर्माण करण्यात आले होते मुळातच आचार्य शंकर यांचे काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न आहे मात्र आद्य शंकराचार्य यांचे काय करायचे हे अनेकांना व्यवस्थित माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती करणारे आणि बौद्ध धर्म भारतामधून गायब करण्यात महत्त्वाचा रोल पार पाडणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलेले आहे अनेकांच्या मते त्यांनीच बौद्ध धर्म नाहीसा केला अर्थातच ते जन्माने शैव होते आणि मग ते वैदिक परंपरा स्वीकारणारे झाले याबद्दल बहुतेकांना शंका नाही मुळात त्यांचे नाव शंकर असल्याने आणि शैव जनमानसात ते शंकराचे अवतार आहेत अशी श्रद्धा असल्याने ते नाव काही गायब करता आलेले नाही त्यातच भरीस भर म्हणून त्यांच्या प्रत्येक मूर्तीवर कपाळावर शैवप्रथेनुसार तीन आडवे नाम असतात साहजिकच त्यांच्या शैव असण्याबद्दल शंका नाही प्रश्न असा आहे की त्यांनी खरोखरच वैदिक परंपरा ब्राह्मणी परंपरा आणि वैष्णव परंपरा स्वीकारली होती का हा आहे हा प्रश्न फक्त सनातन धर्मियांना अत्यंत खात असतो असे नाही तर शैवधर्मी लोकांनाही तो छळत असतो त्यातच त्यांच्या नंतरचे सर्व शंकराचार्य हे कपाळावर तीन नाम ओढूनच वावरत असतात साहजिकच खुद्द शैव परंपरा चाललेली आहे असा भास त्यातून निर्माण होतो आजच्या हिंदू धर्माचे ते संस्थापक आहेत हे त्यामुळेच अधोरेखित होत असते प्रश्न असा आहे की त्यांनी स्थापन केलेला हिंदू धर्म नेमका काय होता ते खरोखरच युरेशियन परंपरा मानत होते का ? हा आहे
परिवर्तनवादी चळवळीमध्येसुद्धा शंकराचार्य हे अत्यंत प्रतिगामी म्हणून उभे केले जातात अपवाद असलेच तर कदाचित विनोबा भावे असतील कारण त्यांनी मात्र विवेक चूडा मणीचे भाषांतर करताना व्यवस्थित विवेक दाखवलेला आहे प्रत्यक्षात मात्र नेमके काय झाले याविषयी अजूनही सर्व काही अंधुक आहे शेव परंपरेमध्ये त्यांच्याविषयी आदर दाखवल्याने खूपच प्रॉब्लेम झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर वैष्णव आणि हिंदू परंपरा त्यांचं काय करतात याकडे लक्ष ठेवणे फार महत्त्वाचं आहे कारण असून अडचण नसून खोळंबा अशी त्यांच्याबाबत सध्या अवस्था आहे
शंकराचार्य हे प्रामुख्याने वेदांत तत्वज्ञानाचे प्रवर्तक पायोनियर समजले जातात त्यांचे हे श्रेय कसे काढून घेता येईल हा कायमच इथल्या युरेशियन लोकांना पडलेला प्रश्न आहे साहजिकच ब्राह्मणी परंपरेमध्ये हे श्रेय महर्षी बादरायण यांना देऊन शंकराचार्यांच्याकडून ते श्रेय काढून घेण्यात आलेले आहे आणि अलीकडे वेगवेगळ्या पोस्टमध्ये हे वारंवार सांगितले जात आहे जेणेकरून आद्य शंकराचार्यांचे श्रेय नाहीसे व्हावे जर आद्य शंकराचार्यानीं वेदांत मांडलेलाच नाही तर मग त्यांनी नेमके काय केले अद्वैत मत आधीच होते असे मानायचे का ?
दुसरी गोष्ट अलीकडे सातत्याने घडते आहे ती म्हणजे आद्य शंकराचार्यांचे अत्यंत क्रांतिकारक वाटणारे जे ग्रंथ आहेत ते पद्धतशीरपणे त्यांनी लिहिलेलेच नाहीत असा दावा केलेला आहे विकिपीडियामध्ये या संदर्भातली पूर्वीची भूमिका ही पूर्णपणे बदललेली आपणाला दिसते विशेषता विवेक चुडामणी हा त्यांचा अत्यंत गाजलेला ग्रंथ हा त्यांचा नाहीच असे म्हटले जाते शैव परंपरेमध्ये मात्र आचार्य शंकर यांनी फक्त विवेक चुडामणी आणि असेच दोन ग्रंथ लिहिले बाकीचे सर्व ग्रंथ हे नंतर आलेल्या शंकराचार्यांनी त्यांच्या नावाने लिहिलेले आहेत आणि ते मुद्दाम जाणीवपूर्वक आद्य शंकराचार्यांच्या नावाने टाकले जातात असे म्हटले जाते यातले खरे खोटे करणे फार अवघड जाते शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले की जे मठ आधी शैवांचे होते ते ताब्यात घेण्यासाठी हे सर्व रचले गेले हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण हे फक्त मठापुरते मर्यादित राहिले नाही हळूहळू सर्व श्रीमंत शैव मंदिरे ताब्यात घेतली गेली आणि नंतर आखाडे सुद्धा ! या सर्व व्यवस्था ब्राह्मणेतर चालवत होते शैव चालवत होते या व्यवस्था नेमक्या ब्राह्मणांच्या ताब्यात कधी आणि कशा गेल्या आणि त्यासाठी आद्य शंकराचार्यांचे नाव कसे वापरले गेले हा एक फार मोठा प्रश्न आहे जी भाष्ये आद्य शंकराचार्यांनी केली म्हणून सांगितली जातात ती त्यांनी खरोखर केली का असा एक फार मोठा प्रश्न आहे सध्या त्यांची भाष्येच खरी आणि त्यांनी लिहिलेले ओरिजनल ग्रंथ मात्र त्यांनी लिहिलेलेच नाही अशा प्रकारचा प्रचार चाललेला आहे म्हणजेच कळत नकळत जिथे जिथे शंकराचार्य शैव होण्याची शैव होण्याची स्थिती निर्माण होते तिथे तिथे त्यांचे काम रद्द करणे कळत नकळत सनातन धर्मी लोकांना आवश्यक वाटायला लागलेले आहे त्यातूनच मग उत्तर वेदांत असे नाव देऊन उत्तर मीमांसा असे नाव देऊन महर्षी बाजारांच्या नावाने बादरायणाच्या नावाने हे सर्व दर्शन दाखवले जाते थोडक्यात आद्य शंकराचार्यांचे सर्व श्रेय काढून घेणे चालू झालेले आहे यातून नेमके काय साधायचे आहे हे मात्र अद्याप स्पष्ट नाही मुख्य म्हणजे आद्य शंकराचार्यानीं दिलेले पंचायतन हे अजूनही सनातन धर्माला झेपत नाही ते पंचायतन आहे शिव शक्ती गणपती स्कंद आणि सूर्य हे पंचायतन पूर्णपणे शैव धर्माशी निगडित असल्याने आणि लोकधर्म शैवांचा असल्याने ते सनातनधर्मी लोकांची चांगलीच पंचाईत करते आहे कारण विष्णू खरोखरच शंकराचार्यांनी सांगितलेला नव्हता तो सूर्याच्या नावाखाली आणला गेला आणि वैदिक परंपरा जर प्रमाण मानली तर विष्णू हा खरोखरच सूर्य दैवत होता एकदा विष्णू आला की आपोआपच त्याचे सारे अवतार येतात याची सनातन धर्मी लोकांना व्यवस्थित कल्पना आहे याचबरोबर स्कंदाला हटवून सूर्य स्वीकारून त्या जागी आता विष्णू आणि सूर्य अशी दोन दैवते आणली जातात एकदा ही दोन दैवते आली की पूर्ण पणे वेदांताचे वैष्णवीकरण करणे शक्य होते मात्र तरीही शिवशक्ती आणि गणपती यांची लोकप्रियता इतकी आहे की त्यांना काढून घेणे सोपे राहिलेले नाही साहजिकच यावर उपाय म्हणून शक्ती म्हणजे महालक्ष्मी अशा तऱ्हेचे समीकरण मुद्दाम प्रमोट केले जाते आहे त्याचबरोबर शिव म्हणजे रुद्र आणि रुद्र म्हणजे शिव अशा प्रकारचे समीकरणही मांडले जात आहे आणि गणपती हा वैदिक कसा आहे तेही सांगितले जात आहे थोडक्यात म्हणजे सामान्य जनतेसाठी देण्यात आलेले हे पंचायतन व्यवस्थितपणे युरेशियन परंपरेतले आहे असे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे युरेशियन लोक अत्यंत शांतपणाने डोकं लावून काम करत असतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बहुजन समाजाला कधीही काय चालले ते कळत नाही त्याला या साध्या गोष्टी वाटतात आणि नंतर जेव्हा यांच्या मार्फत वर्ण व्यवस्था येते तेव्हा त्याला हळूहळू कळते पण तोवर फार उशीर झालेला असतो कारण एकदा विष्णू आला की कृष्ण येतो हरी येतो राम येतो आणि हे सर्वच वर्णव्यवस्था मांडतात आणि मानतात ही साहजिकच वर्णव्यवस्था आपोआपच तुमच्या हाडामासात खीळून बसायला लागते
स्कंद हटवण्याचे आणखी एक कारण साफ आहे कारण तो द्रविड आहे साहजिकच दक्षिण भारतात तो कमालीचा लोकप्रिय आहे महाराष्ट्रामध्ये त्याला खंडोबा म्हटले जात होते त्याला अत्यंत जाणीवपूर्वक शिव करून स्कंद म्हणून हटवले गेले आणि आज सामान्य बहुजन समाजात खंडोबा म्हणजे शिव असेच समीकरण रूढ झालेले दिसते हे अत्यंत जाणीवपूर्वक केलेले आहे जेणेकरून दक्षिणेशी महाराष्ट्राचे नाते तुटावे अत्यंत सूक्ष्म पातळीवर हे सर्व काही चाललेले असते दुर्दैवाने ते अनेकांच्या लक्षातच येत नाही
आता एकदा शंकराचार्य हटवले गेले की नेमके काय घडणार आहे सर्वच्या सर्व शैव संस्था ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे का ? आणि त्यांच्या आधारे पुन्हा एकदा युरेशियन लोकांची दादागिरी आणायची आहे का हा एक फार मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे जर का आद्य शंकराचार्यांचा सारखा माणूस सुद्धा नकोसा झालेला असेल तर मग खरोखरच डोके फार वेगळ्या पद्धतीने काम करते आहे याविषयी शंका नाही खरंतर विकिपीडियावरून शंकराचार्यांचे महत्त्व कसे कमी करता येईल या दृष्टीने पावले टाकण्यात आली तेव्हाच मला हा संशय आलेला होता. शैव हे आपले मुख्य शत्रू आहेत हे वैष्णव धर्माला आणि युरेशियन लोकांना व्यवस्थित माहिती आहे साहजिकच शैव लोकांचा प्रभाव जास्तीत जास्त कमी करत जायचा छाटायचा हे सतत चाललेले असते हल्ली हल्ली शिवाजी महाराज हे सुद्धा कसे वैदिक होते ते सांगण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे वास्तविक शिवाजी महाराजांना वेद माहीतच नव्हते पण हे बहुजन समाजाला कसे कळणार एकंदरीत जोवर बहुजन समाज जागृत होत नाही तोपर्यंत काही खरे नाही दुर्दैवाने हिंदू समाजावर आघात करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी पद्धतशीरपणे उभे केलेले स्ट्रक्चर म्हणजे नवय्यान होते पण आता युरेशियन लोकांनी अत्यंत पद्धतशिरपणे हे नवयान शैव धर्माच्या विरोधात उभे केलेले आहे नवयानी लोकांना आपण शैवांच्या आणि ओबीसी लोकांच्या विरोधात वापरले जात आहोत याची काहीच कल्पना नाही ते आपले सत्याच्या कैफात येऊन वाटेल तसे लिहीत सुटलेत आंबेडकरवादी लोकांना राजकारण कधीच कळत नव्हते आता तर धर्मकारण सुद्धा कळेनासे झालेले आहे असो आचार्य शंकर गमवायचे नाहीत आणि आद्य शंकराचार्य सोडून द्यायचे असे एक धोरण आता सर्वांना राबवावे लागेल कधी कधी आपला वाटणारा माणूस सोडून द्यावा लागतो. प्रश्न आद्य शंकराचार्यांशी संबंधित प्रॉपर्टीचा आहे आणि खरी गोची तिथेच आहे आत्ता अस्तित्वात असलेले शंकराचार्य पद्धतशीरपणे काढले जाऊन तिथे युरेशियन पद्धतीने पूर्णपणे काम करणारे शंकराचार्य आणले जातील याविषयी माझ्या मनात शंका नाही एकंदरच ज्या पद्धतीचा विशाल सांस्कृतिक पट व्यवस्थितपणे विणला जात आहे त्याला तोड नाही आणि नेहमीप्रमाणे शैव मात्र झोपलेलेच आहेत ते तसे रहावेत अशीच वैष्णव लोकांची इच्छा आहे हे सर्व हिंदू धर्माच्या नावाने चाललेले आहे त्यामुळे त्यात आपले काय नुकसान आहे हे शैव लोकांना कळणे अशक्य होऊन बसलेले आहे आधुनिक आणि उत्तर आधुनिक कालखंडात शैव लोकांनी स्वतःला हिंदू म्हणून घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला असे वाटले होते की हे नवे हिंदू स्ट्रक्चर अधिकाधिक पुरोगामी आधुनिक उत्तर आधुनिक होत जाईल पण प्रत्यक्षामध्ये आता गंगा उलटी वहायला लागेल अशी चिन्हे दिसायला लागलेत ब्राह्मण धर्माने नेहमीच या देशातल्या प्रत्येक धर्माचा सत्यानाश केलेला आहे वैदिक धर्माचा ब्राह्मण धर्म निर्माण करून वासुदेव धर्माचा वैष्णव धर्म निर्माण करून आणि आता वेदांत धर्माचा हिंदू धर्म निर्माण करून हा सत्यानाश होतो आहे की काय अशी शंका येण्याइतपत सर्व हालचाली बदललेल्या दिसतात
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment