हिंदू धर्माला संस्थापक का नाही? श्रीधर तिळवे नाईक
अलीकडे रजनीकांत यांनी हिंदू धर्माची विशेषता सांगताना हिंदू धर्माला संस्थापक नाही हा पब्लिक दृष्टिकोन पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवरून मांडला अर्थातच ते काही धर्म नेते नव्हेत पण आपणाला मात्र असे का आहे हा प्रश्न विचारायला हवा
वस्तुस्थिती अशी आहे की शैव, जैन आणि बौद्ध या तिन्ही धर्मांना संस्थापक आहेत यातील शैवधर्म हा शंभू शंकर यांनी स्थापन केला तर जैन धर्म हा भगवान महावीर यांनी स्थापन केला बौद्ध धर्म हा स्पष्ट आणि स्वच्छपणे गौतम बुद्ध यांनी स्थापन केला. या तिन्ही धर्मांना संस्थापक आहेत मग संस्थापक कुठल्या धर्मांना नाही हा प्रश्न आता आपण विचारायला पाहिजे आणि मग आपल्यावर नेमके काय लादले जाते हे आपल्याला कळू शकते.
वस्तुस्थिती अशी आहे की युरेशियन धर्मांना संस्थापक नाहीत कारण हे सर्व धर्म मोक्ष मिळवलेल्या लोकांनी स्थापन केलेले नाहीत तर ते भगत समूहाने स्थापन केलेले धर्म आहेत आणि या भगतांना ब्राह्मण म्हणतात. ते श्रद्धां- आधारित धर्म आहेत .
यातील पहिला वैदिक धर्म हा सुरुवातीला धर्म नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे तो मुळातच श्रद्धा होता आणि या श्रद्धेची स्थापना वैदिक टोळ्यांच्या मध्ये स्पष्ट आणि स्वच्छ पणाने ऋषींनी केली होती आणि प्रत्येक ऋषीच्या नावाने एक मंडल आहे हे जे 10 आद्य ऋषी आहेत हेच या वैदिक धर्माचे संस्थापक आहेत परंतु ब्राह्मण कधीही त्यांचा उल्लेख धर्म संस्थापक म्हणून करत नाहीत कारण ते धर्म संस्थापक नसून श्रद्धा संस्थापक आहेत सर्वसाधारणपणे जगभरामध्ये श्रद्धांचा जो उदय झाला त्याचा अनेकदा इतिहासच मिळत नाही वैदिक लोकांच्या बाबतीत सुदैवाने असे घडते की इथे स्पष्ट आणि स्वच्छ पणाने कुणी श्रद्धा स्थापन केली याचा उल्लेख आहे ही श्रद्धा अर्थातच मंडल लिहून प्रस्थापित केलेली आहे प्रत्येक मंडलामध्ये ऋचा आहेत आणि त्यांच्या कर्त्यांची नावे ही आहेत .
ब्राह्मण ही एक भगत जमात आहे जी टोळीमध्येच काम करत असते किंबहुना जगभरामध्ये आपणाला सर्वत्र प्रत्येक टोळीमध्ये भगत दिसतात त्यांना कधी कोणी शामन म्हणतात तर कोणी ब्राह्मण म्हणतात प्रत्येक टोळीतल्या भाषेमध्ये यांना स्पष्ट आणि स्वच्छपणाने नाव दिले गेलेले आहे भारतातल्या अनेक ऑस्ट्रेलियन भाषा बोलणाऱ्या टोळ्यांच्या मध्ये आजही आपणाला भगतांना वेगळे नाव दिलेले दिसते . शैव धर्मामध्ये मात्र भगत हे नाव मांत्रिकांना मिळालेले आहे आणि भारतातल्या प्रत्येक टोळीमध्ये आपणाला भगत दिसतात आणि आजही भगत हे आडनाव लोकप्रिय आडनावांच्या पैकी एक आहे. हे टोळीचे धर्म प्रमुख होते पुढे शंभू महादेव यांचा उदय झाल्यानंतर हे सर्व भगत त्यांना शरण गेले आणि त्यांनी आपली पूजा पद्धत शाबूत ठेवून शैव-श्रुती स्वीकारली. यांच्यापैकीच अनेक लोक पुढे जाऊन पंडित झाले. अर्थात जगाच्या इतिहासामध्ये हे काही नवीन नाही. सर्वच धर्मांच्या इतिहासामध्ये हे घडलेले दिसते. त्या त्या टोळीचा भगत हा शेवटी ख्रिश्चन धर्म किंवा इस्लाम स्वीकारताना आपणाला दिसतो आणि अनेकदा हेच लोक पुढे त्या त्या धर्मामध्ये धर्मप्रमुख झालेले दिसतात भारत याला अपवाद नाही साहजिकच जेव्हा शैव तंत्र श्रुतीचा आणि तिच्यातील मोक्ष विचाराचा प्रभाव पडून वैदिक श्रद्धेचे रूपांतर भगवान ब्रम्ह , विश्वामित्र , भगवान कपिल या तीघांनी वैदिक धर्मात केले तेव्हा त्यांच्यानंतर जे वैदिक श्रद्धेचे जे प्रमुख मांत्रिक धर्माधिकारी होते म्हणजेच ब्राह्मण होते त्यांनी मोक्ष स्वीकारला आणि त्यातूनच मग वैदिक धर्माचे एक स्वरूप निश्चित झाले
या धर्माच्या आतमध्ये नंतर ब्राह्मण आणि वैश्य - क्षत्रिय यांच्यातच वाद विवाद वाढत गेले आणि ब्राह्मणांनी स्वतःचे सर्वोच्च स्थान निश्चित करण्यासाठी स्मृती वांग्मय वाढीस नेले आणि ब्राह्मण धर्म हाच वैदिक धर्म म्हणून पुढे आणायला सुरुवात केली त्याला वैश्य क्षत्रियांचा विरोध अटळ होता यातूनच वासुदेव धर्म नावाचा नवा धर्म उदयाला येऊ लागला
याही धर्माला संस्थापक नव्हता कारण ही एक वैश्य आणि क्षत्रिय यांच्यातून उदयाला आलेल्या मांत्रिक भगत लोकांची सामूहिक निर्मिती होती . विशेषता वैदिक धर्म जिथे खोलवर पोहोचला नव्हता अशा उत्तर प्रदेश आणि मध्य भारतामध्ये हा वासुदेव धर्म अधिक वाढीला लागला ग्रीक आक्रमणामुळे हे घडलेले होते पर्शियन आणि नंतर ग्रीक व पुढे शक हूण लोकांनी पराभूत केल्यामुळे वैश्य आणि क्षत्रिय लोकांचा वैदिक धर्मावरचा विश्वास उडायला लागला होता मुख्य म्हणजे यज्ञसंस्थेवरचा विश्वास उडाला या लोकांनी शैव आणि ग्रीक धर्माची पूजा स्वीकारायला सुरुवात केली ब्राह्मण हे ह्या काळामध्ये ग्रीक, हूण शक लोकांच्या राजवटीत त्यांच्याकडे नोकरी करत असल्याने त्यांनीही पूजा आत्मसात करायला सुरुवात केली. भारताच्या मंदिर निर्मितीमध्ये या आक्रमकांचा प्रचंड वाटा आहे. शैव लोकांनी अशी मंदिरे सुरुवातीला उभी केली नव्हती .शिवलिंगाची पूजा हीच खरी पूजा असे शैव मानतात व्यक्ति पूजेला फक्त तो सिद्ध असेल तरच मान्यता आहे मात्र ही पूजा सिद्धाची आहे याची कल्पना सर्व लोकांना दिली जात होती हे सिद्ध आदर्श म्हणून त्यांची मूर्ती एका अर्थाने वीर म्हणून उभी केली जात होती हे मोक्षवीर होते आणि अनेकदा मंदिरात शिवलिंग आणि बाहेर या मोक्षवीरांची मूर्ती असे निर्माण होई . शिवलिंगाला ओळख यावी म्हणून अनेकदा मोक्षिविरांच्या नावानेच मंदिराला नाव मिळे. म्हणजे ओंकार नाथांनी साधना करून ते सिद्ध झाले म्हणून ओंकारेश्वर ! बहुतेक सिद्ध हे शिवलिंगाची स्थापना मोक्ष मिळाल्यानंतर करतातच त्यातूनच शैवमंदिर उभा राहते भक्ती पेक्षा योग आणि ज्ञान यांचा प्रभाव जास्त होता त्यामुळेच ईश्वर आणि नाथ यांच्याच नावाने अनेक मंदिरे दिसतात अगदी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सुद्धा मूळचे पंढरीनाथ या नाथ संप्रदायातील मोक्ष मिळवलेल्या सिद्धाचे मंदिर आहे आणि त्यामुळे त्याच्या डोक्यावर शिवलिंग होते जे आता काढून घेण्यात आलेले आहे मात्र प्राचीन मुर्त्या अजूनही डोक्यावरचे शिवलिंग शाबूत ठेवतात आणि त्या अजूनही उपलब्ध असतात या पंढरीनाथामुळेच या परिसराला पुढे पंढरपूर हे नाव पडले.
परकीय आक्रमकांच्यामुळेच हा वासुदेव धर्म पुढे ब्राह्मण लोकांनी ताब्यात घेतला आणि त्यातूनच आत्ताच्या वैष्णव धर्माची निर्मिती झाली आता इथे संस्थापक कुठे आहे तर नाही याचे कारण पुन्हा एकदा इथे ब्राह्मण नावाच्या मांत्रिक भगतांनी मिळून कलेक्टिव्हली वैष्णव धर्म निर्माण केलेला दिसतो मात्र क्षत्रिय लोकांनी आपला वासुदेव धर्म सोडलेला दिसत नाही साहजिकच शेवटी वैष्णव धर्म हा ब्राह्मण लोकांचा ब्राह्मणधर्म आणि क्षत्रियांचा वासुदेव धर्म यांच्या संयुक्त प्रयत्नांचा एकत्रित आकार आहे ज्याला संस्थापक नाहीत
पुढे असेच काहीतरी हिंदू धर्माबाबत झालेले दिसते म्हणजे हिंदू ही संस्था हिंदू हे नाव आपणाला इसवी सन १००० पूर्वीपर्यंतच्या कुठल्याही वेदांमध्ये कुठल्याही उपनिषदामध्ये कुठल्याही स्मृतीमध्ये रामायण महाभारत या महाकाव्यांच्या मध्ये आणि अनेकदा आपल्या संतांनी लिहिलेल्या भक्ती काव्यात सुद्धा आढळत नाही ते अचानक मग 1000 वर्षानंतर कसे काय प्रभावी होत गेले ?
याबाबत स्वामी दयानंद सरस्वती यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो खरा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हा हा देश मुस्लिम लोकांच्याकडून जिंकला जाऊ लागला तेव्हा त्यांच्या दृष्टीने भारतातील सर्व धर्माचे लोक हे मूर्ती पूजक असल्याने काफीर होते या सर्व काफीर गैर मुस्लिम लोकांच्यासाठी त्यांच्याकडून जिझिया कर वसूल करण्यासाठी काही ना काहीतरी एकत्रीत नाव देणे गरजेचे होते म्हणून या लोकांनी हिंदू हा शब्द अधिकाधिक वापरायला सुरुवात केली त्यामुळेच हिंदू हा शब्द मुस्लिम राजवटीमध्ये अत्यंत प्रभावी होत गेला पुढे ब्रिटिश लोकांच्या कारकिर्दीमध्ये सुरुवातीला या सर्व मूर्ती पूजक लोकांना त्यांचे धर्माधिकारी ब्राह्मण असल्याने ब्राह्मण धर्म म्हटले जात होते पण नंतर ते लोक सुद्धा हिंदू हा शब्द वापरायला लागले म्हणजेच इथेही एका अर्थाने धर्मसंस्थापकांचा पत्ताच नव्हता कारण ज्यांनी म्हणजे ज्या मुस्लिमांनी हिंदू हे नाव दिले होते त्यांनी हिंदू ही भौगोलिक ओळख हीच धार्मिक ओळख करून टाकली आणि याला जबाबदार अर्थातच मुस्लिम राज्यकर्ते होते आणि त्यांचा धर्म होता . त्यामुळे याही धर्माचा संस्थापक कोणी विशिष्ट व्यक्ती नव्हता परंतु या काळात आपण जर का शैव लोकांच्याकडे पाहिले तर आपणाला स्पष्टपणे दिसते की शै व लोकांनी म्हणजेच बसवेश्वर आणि गुरुनानक या दोघांनीही आपले नवशैव धर्म स्थापन केले आणि या दोन्ही धर्मांना संस्थापक आहेत म्हणजेच आदि शैव या धर्माची स्थापना शंभू शंकर यांनी केली नव शैव धर्माची स्थापना बसवेश्वर यांनी केली आधुनिक शैव-धर्माची स्थापना काडसिद्धेश्वर यांनी केली असे आपणाला स्पष्ट दिसते परंतु हिंदू धर्माचा संस्थापक कोण असा प्रश्न विचारला तर आपणाला त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही कारण हा धर्मच मुळात कुठल्या व्यक्तीने स्थापन केलेला नाही आपण जास्तीत जास्त एकच गोष्ट करू शकतो ती म्हणजे या गोष्टीचे श्रेय आपण आद्य शंकराचार्य यांना देऊ शकतो आपण असे म्हणू शकतो की हिंदू धर्माची स्थापना आद्य शंकराचार्य यांनी केली कारण जो आकार आहे तो आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या वेदांत धर्मासाठी दिला होता आणि तोच वेदांती आकार आता हिंदूधर्म म्हणून वावरत आहे पण हा आकार मुळातच शैव धर्म आणि ब्रह्म धर्म यांचे मिलन होता त्यामध्ये वैष्णव नव्हते. म्हणजेच एका अर्थाने हाही धर्म शैव धर्म होता आणि वेदांचा अंत करण्यासाठीच तो जन्माला घालण्यात आला होता त्यामध्ये मग रामानुजाचार्य यांनी वैष्णव धर्म विसर्जित करून एका अर्थाने वेदांत व्यापक केला आणि इथूनच आत्ताच्या हिंदू धर्माची सुरुवात झाली म्हणजेच एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की आद्य शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्या वेदांत धर्माने आत्ताच्या हिंदू धर्माची स्थापना केली. आपण जर का बारकाईने स्वामी विवेकानंदांचे वांग्मय वाचले तर त्यांच्यावर सुद्धा वेदांताचा प्रचंड प्रभाव दिसेल आणि ते हिंदू धर्म म्हणून वेदांत सादर करत असताना दिसतील मात्र मी त्यांना वेदांत धर्म म्हणत नाही तर त्यांच्या धर्माला मी नववेदांत धर्म असे म्हणतो किंवा त्याला नवहिंदूधर्म म्हणता येईल. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो नव हिंदू धर्माचा संस्थापक आपणाला सापडतो परंतु सनातन धर्माचा संस्थापक मात्र सापडणे कठीण होते कारण ज्याला सनातन धर्म म्हटले जाते त्याच्या वैदिक धर्म अथवा वैष्णव धर्म अथवा ब्राह्मण धर्म यांच्या तिन्ही पहिल्या धर्माचे कोणीही संस्थापक नाहीत हे तिन्ही धर्म क्षत्रिय वर्णातल्या भगत लोकांनी आणि ब्राह्मण लोकांनी स्थापन केलेले आहेत. जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे धर्म इतर कुठेही स्थापन झालेले नाहीत . अपवाद अर्थातच रोमन कॅथोलिक धर्म ! हा धर्म सुद्धा जीजस नंतर होऊन गेलेल्या 12 शिष्यांच्या पुस्तकातून इसवी सन तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व भगत लोकांनी आणि राजा कॉन्स्टंटटाइन यांनी मिळून स्थापन केलेला आहे. आपण बारकाईने पाहिले तर आपल्याकडचे ऋषी आणि ख्रिश्चन धर्मातले बारा शिष्य हे सारखेच वाटतात आपल्याकडचा इंद्र आणि ख्रिश्चन लोकांचा गॉड एक सारखेच वाटतात फक्त इंद्रा भोवती अनेक देव आहेत त्याऐवजी गॉड भोवती जीजस आणि मेरी आहेत 12 शिष्य आहेत सेंट आहेत या मागचे कारण उघड आहे कारण दोघेही म्हणजे दोन्ही धर्म हे शेवटी यूरोशियन लोकांनी स्थापन केलेले धर्म आहेत दोन्ही धर्मामध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे दोन्हीही धर्म राजाला देवाचा अवतार मानतात आणि राजाच्या द्वारे धर्मनियंत्रण प्रस्थापित करून संपूर्ण समाजाला धर्मशाहीच्या चौकटीत बंदिस्त करून टाकतात आणि धर्मसत्ता प्रबळ सत्ता करून टाकतात.
थोडक्यात काय युरेशियन धर्मांना धर्म संस्थापक नाहीत कारण मुळातच हे धर्म संस्थापकानी स्थापनच केलेले नाहीत तर ते भगत लोकांनी स्थापन केलेले आहेत आणि म्हणूनच या धर्माचे धर्म संस्थापक कोण असा प्रश्न विचारला तर त्याचे खरे उत्तर ब्राह्मण हे आहे ब्राह्मण धर्म वैष्णव धर्म आणि आत्ताचा हिंदू धर्म हे सारे धर्म ब्राह्मणांनी स्थापन केलेले आहेत पण ब्राह्मण कधीही आपण हे धर्म स्थापन केल्याचा दावा करत नाहीत कारण त्यांनी या धर्मांच्या ओरिजनल संहिता निर्माण केलेल्या नाहीत तर ब्राह्मणेतरांनी निर्माण केलेल्या सहितांचा म्हणजे वैदिक ऋषींनी निर्माण केलेले वेद किंवा वाल्मिकी आणि व्यास या ऋषींनी निर्माण केलेली महाकाव्ये किंवा भारतातल्या संतांनी निर्माण केलेली भक्ती काव्ये या संहितांचा वापर करून त्यांनी अनुक्रमे ब्राम्हण धर्म, वैष्णव धर्म आणि हिंदू धर्म हे धर्म निर्माण केलेले आहेत जगात इतरत्र कुठेही असा प्रकार घडला की नाही त्याबद्दल मला शंका आहे एका अर्थाने ब्राह्मण हे ब्राह्मण्य नावाचे एक कार्पोरेट हाऊस चालवतात आणि निर्माण झालेली प्रत्येक कंपनी स्वतःच्या ताब्यात घेतात ती त्यांच्या ताब्यात कधी गेली हे अनेकदा बहुजन समाजाला कळतच नाही याचे अत्यंत लेटेस्ट उदाहरण म्हणजे बाळूमामा होय वास्तविक हे मूळचे लिंगायत संत पण त्याच्याभोवती दंतकथा निर्माण करून आता हा पंथ पूर्णपणे ब्राह्मण्याच्या आहारी गेलेला दिसतो
प्रश्न नेमका हाच आहे की ब्राह्मणेतर यातून काही शिकणार आहेत की नेहमीप्रमाणेच आपला मूर्खपणा कंटिन्यू करणार आहेत ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment