पुन्हा एकदा दशशक्ती दशहरा: शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक 


संस्कृत मधून काहीही आलं की ते फार प्रमाण असतं असा काहीतरी गैरसमज आपल्याकडे संस्कृतला प्रमाण मानल्याने झालेलां आहे मुळात बहुजन समाजाला शब्दप्रामाण्य स्वीकारायला लावणे ही ब्राह्मण्य आणु पाहणाऱ्या मानणाऱ्या लोकांची सर्वात मोठी ताकद असते. त्यातूनच मग अलीकडे वैष्णव लोक शैव धर्मामध्ये प्रचंड हस्तक्षेप करताना दिसतात .खालील फिरणारा मेसेज हा त्याचा आणखी एक पुरावा 


प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ॥

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तथा ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम् ॥

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ॥

🙏


हैप्पी नवरात्रि

वास्तविक नवरात्र हा दशरात्र आहे हे मी खूपदा सांगितले आहे आणि दशहरा म्हणजे पार्वतीच्या मोक्षाचा उत्सव होय हेही खूपदा सांगून झालेले आहे शैव लोकांचे हे मोक्ष उत्सव कसे मोक्षापासून तोडण्यात आले हा एक फार मोठा इतिहास आहे वरील संस्कृत रचना म्हणजे त्या दिशेने झालेला आणखी एक प्रयत्न ! मुळात ज्या दशशक्ती आहेत त्या पुढील प्रमाणे 


१ कामाक्षी मीनाक्षी किंवा सुंदरा: या सर्व शरीराशी संबंधित आहेत 

२ शांभवी अथवा श्री विद्या :ही बुद्धी ,विद्या ,प्रज्ञा आणि महाप्रज्ञा यांच्याशी संबंधित आहे 

३ भवानी : ही प्रामुख्याने भावांशी भावनांशी संबंधित आहे आपल्याकडे महाराष्ट्राची कुलदेवता म्हणून आपण जो तुळजापूरच्या भवानीचा वारसा सांगतो तो सार्थच आहे 


४ पार्वती अथवा गौरी : ही अहंकाराशी म्हणजे अहमच्या आकाराशी ,मी पनाशी, मनाशी , साकार रूपाशी संबंधित आहे कारण पार्वती हे साकार रूप आहे गौरी या शब्दाचा गोऱ्या रंगाची एक मुलगी असा नाही तर मुलगी किंवा स्त्री असा आहे आपल्याकडे हिंदी बेल्ट मध्ये गोरी किंवा छोरी असे सर्रास म्हटले जाते मराठीमध्ये या गौरीचे पोर पोरगी पोरी झाले आहे 


५ जगदंबा किंवा अंबाबाई : ही सृजनशीलतेशी संबंधित आहे संपूर्ण जगाचे सृजन करणारी अंबा म्हणजेच आई म्हणजे जगदंबा 


६ भैरवी :ही क्रियेशी संबंधित आहे 


७ दुर्गा दुर्ग म्हणजे अवकाश ही अवकाशाशी संबंधित आहे 


८ महाकाली ही काळाशी संबंधित आहे 


९ प्रचंडी किंवा चंडी ही या ब्रम्हांडांच्या प्रचंड अवस्थेशी संबंधित आहे 


१० हरा ही मोक्ष स्थिती आहे 


प्रत्येक स्त्रीचे शरीर हे या दशशक्तींनी युक्त असते . म्हणजेच ती सौंदर्य युक्त असते ती बुद्धीयुक्त प्रज्ञा युक्त असते ती भावयुक्त भावनायुक्त असते ती मनयुक्त असते मी पण युक्त असते ती सृजनशील युक्त असते सृजन युक्त असते ती क्रिया किंवा कर्मयुक्त असते ती अवकाशयुक्त असते ती काळयुक्त असते ती अवस्था युक्त असते ती स्थितीयुक्त असते 


बाकीची जी शक्तीची रुपे आहेत ती अनेकदा त्या त्या सिद्ध झालेल्या मोक्षाला पोचलेल्या स्त्रियांची रूपे आहेत म्हणजे कात्यायनी ही सिद्ध स्त्री होती शैव लोकांच्या मध्ये सर्व सिद्धांची मंदिरे होतात त्यात स्त्री सिद्ध सुद्धा येतात तेव्हा आपला शैवधर्म काय आहे ते समजून घ्या सर्व काही युरेशियन करण्याची एक खेळी आपल्याकडे नेहमीच खेळली जाते हा मेसेज म्हणजे त्याचाच एक भाग आहे सर्व काही वेदांशी जोडून घ्यायचे शंकराला रुद्र करून शंकरानेच कशी वर्ण व्यवस्था आणि वेद सांगितलेले आहेत हे बिंबवायचे आणि मग वर्ण व्यवस्था लादायची असा हा प्रकार आहे प्रत्यक्षात शंकर हा इतका प्राचीन आहे की त्यावेळी वेद सुद्धा अस्तित्वात नव्हते त्यामुळे वर्ण व्यवस्थेचा संबंधच येत नाही शंकराच्या काळामध्ये गण व्यवस्था होती आणि त्याच्याभोवती सर्व गण होते हे लक्षात घ्या म्हणूनच जेव्हा त्याचा पुत्र विनायक प्रमुख झाला तेव्हा त्याला गणपती म्हटले गेले वर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रियांचे स्थान हे शूद्र आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आज तुम्हाला स्वीकारताना काही वाटणार नाही पण तुमच्या नंतरच्या पिढ्यात ज्या स्त्रिया येतील त्यांच्या वाट्याला हा शूद्र दर्जा येईल हे तुम्हाला चालणार आहे का हेही स्वतःला विचारा वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था पद्धतशीरपणाने अहंकार उजवतात रुजवतात तो स्वीकारू नका हवे तर स्मृती वांग्मय नीट वाचा त्यात काय लिहिले आहे हे नीट पहा अर्धवट ज्ञान हे अनेकदा धोकादायक असते तेव्हा इकडचे तिकडचे वाचण्यापेक्षा थेट स्मृती मनुस्मृती वगैरे नीट खोलात जाऊन वाचा 


शैव धर्मामध्ये शिव आणि शक्ती दोघे मिळून संसार निर्माण करतात पसारा निर्माण करतात(पैस म्हणजे अवकाश यावर ज्ञानेश्वरांनी खूप छान लिहिले आहे आणि दुर्गाबाई भागवत यांचा एक निबंधच आहे तो वाचा ) इतर सर्व धर्मांच्या मध्ये फक्त पुरुषच संसार निर्माण करतात फक्त शैवधर्मच असा आहे आहे की जिथे दोघे मिळून संसार निर्माण करतात हे लक्षात घ्या स्वतःला पुरुषांच्या पेक्षा कुठेही कमी समजू नका . तुमच्या ठायी दशशक्ती आहेत त्यांचा विकास करा दशहरा हा दहाही शक्तींचा विकास आहे वाढ आहे आणि शेवटी हरा म्हणजेच मोक्ष स्थिती प्राप्त होते पार्वती ही जगातील मोक्ष मिळवणारी पहिली स्त्री होती तिचा हा उत्सव आहे एवढे लक्षात ठेवा बाकी तुमची इच्छा आहेच तुमचे स्वातंत्र्य आहेच गुलाम होण्याचे स्वातंत्र्य देणारे लबाड पुरुष सर्वत्र आहेतच .


शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे