युरेशियन परंपरेमध्ये एकच वेद असताना त्याचे चार वेद कसे आणि का बनले श्रीधर तिळवे नाईक 

मला स्वतःला ऋग्वेद का प्रिय आहेत हे सर्वात प्रथम पुन्हा एकदा मी सांगतो माझ्या मते भारतामधील श्रद्धांचे स्वरूप काय होते हे जर कळायचे असेल तर ऋग्वेदासारखे माध्यम नाही इतक्या तपशीलवार आपणाला श्रद्धेची माहिती इतरत्र क्वचितच मिळते इथे आपणाला एका श्रद्धेतील दैवतरूप मिळते त्या दैवतांच्या केल्या जाणाऱ्या प्रार्थना मिळतात आणि या प्रार्थनांच्यातून टोळ्यांची श्रद्धा नेमकी काय होती आणि त्यांच्या भोवताली त्यांच्या पर्यावरणामध्ये नेमके काय काय होते ते स्पष्ट होते खरे तर युरेशियन परंपरेमधील टाईम लाईन ही जास्त स्पष्ट आहे म्हणजे वेदातील भूगोल जे भारतीय आणि अभारतीय असे दोन्ही आहेत उपनिषदांच्या मधील भूगोल जे स्पष्ट आणि स्वच्छपणाने भारतातच लिहिले गेले आणि नंतर ब्राह्मण ग्रंथांच्या मधून आलेले भूगोल यांची एक टाईम लाईन तयार करून आपणाला उत्तर भारतातील भूगोलाचा इतिहास लिहिता येतो मला ऋग्वेद प्रिय आहेत ते त्यामुळे ! त्यांच्याकडे मी धार्मिक डॉक्युमेंट म्हणून कमी आणि ऐतिहासिक डॉक्युमेंट म्हणून अधिक पाहतो कारण जगातील इतर कुठल्या देशांच्या टोळ्यांच्या मध्ये अशा प्रकारचे चित्रीकरण मला दिसत नाही 


या ऋग्वेदा मधूनच पुढे धर्म कसा निर्माण होतो हे जर आपल्याला शोधायचे असेल तर ऋग्वेद आणि स्मृती यांची तुलना उपयुक्त ठरते आपण जर का जुड्या एक आणि इस्लाम आणि रोमन डोळ्यांचा डोळ्यांचा अशा तऱ्हेने अभ्यास करायला गेलो तर आपणाला अशा लिंक सापडत नाहीत पण युरेशियन भारतीय परंपरेमध्ये मात्र आपणाला सर्वच लिंक उपलब्ध आहेत म्हणजेच ऋग्वेदापासून सुरुवात होऊन ही श्रद्धा पुढे विकास होत महा श्रद्धा म्हणजेच धर्म म्हणजेच रीलिजन किंवा मजहब कशी बनली हे आपणाला स्पष्टपणे कळते 


ऋग्वेदामध्ये १० मंडले आहेत हे सर्वांनाच माहिती आहे माझ्या मते हे जे ऋषी आहेत ते त्या त्या टोळीचे प्रमुख मांत्रिक असावेत आणि त्यांनी त्या त्या टोळीसाठी हे ब्रह्म म्हणजेच मंत्र रचलेले असावेत या दहाही टोळ्या भारतामध्ये कधी आल्या याचे एक अंदाजे काल- आकलन आपल्याकडे आहे आणि त्यानुसार साधारणपणे इसवी सन पूर्व १५०० म्हणजे साडेतीन हजार वर्षांपूर्वी हे लोक भारतात आलेले असावेत ऋग्वेदाचे महत्त्व असे आहे की त्यामुळे आपणाला आलेल्या दहाही टोळ्यांचे नेमके श्रद्धा स्वरूप काय होते ते स्पष्ट दिसते एकाच वेळेला यांच्यामध्ये आपापसात इंटर कनेक्शन आहे आणि त्याचवेळी काही बाबतीत मतभेद आहेत विशेषत: विश्वामित्रांच्या बाबतीत हे मतभेद खूपच टोकाचे झालेले दिसतात याचे कारण ते फक्त ऋषी नाहीत तर ते राजेही आहेत म्हणजे त्या टोळीचे प्रमुखही आहेत साहजिकच आपल्या टोळीसाठी त्यांनी पूर्णपणे एक वेगळी प्रति सृष्टी एक प्रति श्रद्धा निर्माण केली आणि एक आचरणाची नवीन पद्धत शोधून काढली जी साहजिकच मोक्षाकडे झुकत गेली त्या उलट वशिष्ठ जे होते ते मात्र प्रामुख्याने वैश्य लोकांचे वा टोळीचे प्रमुख ऋषी असल्याने त्यांचे काही मतभेद विश्वामित्रांशी नंतर झालेले असावेत ज्याचे प्रतिबिंब रामायणात पडलेले आहे. 

युरेशियन परंपरेमध्ये एकच वेद असताना त्याचे चार वेद का बनले श्रीधर तिळवे नाईक 


भारताच्या इतिहासामध्ये ऋग्वेद आणि त्यातून निर्माण झालेली युरेशियन परंपरा ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि ती अतिशय महत्त्वाची आहे कारण तिचा प्रभाव आजही युरेशियामधून येणाऱ्या लोकांच्यावर पडत असतो नंतरही युरेशिया मधून आलेल्या लोकांच्या वर पडलेला आहे मात्र या परंपरेबाबत जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करायला हवा तो अनेकदा उपस्थित केला जात नाही तो म्हणजे मूळ ऋग्वेद संहिता नेमकी किती मोठी होती आणि तिच्यामध्ये नेमके काय काय होते ?


महर्षी वेद व्यास यांनी चार वेदांचे संकलन केल्यानंतर आपणाला एक सातत्यक्रम दिसतो पण महर्षी वेद व्यास यांच्यापूर्वी नेमका ऋग्वेद काय होता हा प्रश्न मात्र कोणीच विचारत नाही त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मी देतो आहे 


सामवेद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ऋग्वेदच आहे मग झाले काय ?


वस्तुस्थिती अशी आहे की ऋग्वेद ही संहिता भारतात येण्यापूर्वीच निर्माण झाली होती आणि बहुदा ती युरेशियामध्येच किंवा काहींच्या मते अफगाणिस्तानामध्ये निर्माण झाली या संहितेतील अनेक उल्लेख हे युरेशियाशी कनेक्टेड वाटतात फक्त प्रश्न भौगोलिक उल्लेखांचा आहे बाकी जी देव व्यवस्था आहे ती स्पष्टपणे युरेशियन आहे आणि इंद्र ही व्यवस्था निर्माण करून पुन्हा युरेशियामध्येच गेला असे दिसते त्याच्यानंतर जे इंद्र झाले त्यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे पण तो पुरेसा स्पष्ट नाही नंतर इंद्रपरंपरेचा प्रभाव ओसरला कारण इंद्राचे प्रभुत्व नष्ट झाले 


मग सामवेद वेगळा का काढावा लागला . याचे कारण भारतामध्ये आल्यानंतर साहजिकच यामध्ये काही अधिक ऋचांची भर पडली आणि या ऋचा कुठे समाविष्ट करायच्या त्या समाविष्ट केल्यामुळे ऋग्वेद अपवित्र होईल का असा प्रश्न निर्माण झाला. साहजिकच मग ऋग्वेदात नसलेल्या आणि भारतामध्ये निर्माण झालेल्या या ऋचांना जागा देण्यासाठी सामवेद निर्माण करण्यात आला म्हणजेच ऋग्वेदात नसलेल्या पण सामवेदात असलेल्या सर्व ऋचा या भारतात निर्माण झालेल्या आहेत. 


मग प्रश्न यजुर्वेदाचा येतो हा वेद वेगळा का काढावासा वाटला ?


याचे कारण ही स्पष्ट आहे कारण भारतामध्ये जो अनार्य लोकांशी ज्यांना यजुर्वेदामध्ये सुरुवातीला समान दर्जा दिला गेला आहे त्यांच्याशी झालेला टकराव हे ते कारण आहे . ऋग्वेदाचा एक भागच हा यजुर्वेद होता आणि प्रत्यक्ष यज्ञाचे अँपलिकेशन कसे करायचे त्या संदर्भातला हा भाग होता परंतु भारतात आल्यानंतर विशेषत: उत्तर प्रदेश उत्तराखंड वगैरे वगैरे प्रदेश हे भौगोलिक दृष्ट्या वेगळे असल्यामुळे तिथे काही अँपलिकेशन्स बदलली आणि त्यामुळे साहजिकच मूळ ऋग्वेदाच्या एप्लीकेशनचा हा भाग पुन्हा एकदा वेगळा काढण्यात आला आणि त्यातून यजुर्वेद निर्माण करण्यात आला काही नवीन गोष्टी ज्या भारतातल्या होत्या त्यांचा समावेश आपोआपच झाला 


प्रश्न मग अथर्ववेदाचा येतो हा वेदसुद्धा ऋग्वेदाचा भाग होता आणि मारण आणि तारण मंत्र ज्याला आपण आज काळी जादू म्हणतो तिचा हा भाग होता आणि त्या भागाचाही समावेश हा ऋग्वेदातच होत होता परंतु पुन्हा एकदा तोच प्रश्न आला की भारतात आल्यानंतर त्याचे एप्लीकेशन बदलले त्यामुळे साहजिकच हा ही भाग ऋग्वेदापेक्षा वेगळा काढण्यात आला आणि अथर्ववेद हळूहळू तयार झाला 


प्रश्न असा आहे की असे चार वेद निर्माण करण्याची गरज का भासली ?


याचे कारण समोर उभा ठाकलेला भारतीय लोकांचा शैव धर्म होय . भगवान शंकर यांनी वेद दिले असे कायमच युरेशियन परंपरा सांगत असते पण ती हे सांगत नाही की हे वेद कोणते? मुळातच ऋग्वेदसुद्धा वेद नव्हता ही संहिता होती आणि वेदाला वेद म्हटले जात नव्हते तर संहिता म्हटले जात होते परंतु इथले जे भारतीय लोक होते ते मात्र वेदू हा शब्द वापरत होते आणि निष्णात असलेल्या लोकांना वैदु किंवा वैद्य असा शब्द होता वेदांचा प्रभाव इतका होता की युरेशियन लोकांनी हा शब्द चटकन स्वीकारला आणि आपला संहिता हा शब्द बाजूला केला तुम्ही जर का रोमन कॅथॉलीक परंपरा पाहिली तर तुम्हाला हे दिसेल की तिथे सुद्धा होली बुक ही संकल्पना आहे ही बुक ही संकल्पना आणि आपली युरेशियन परंपरेतली संहिता ही संकल्पना सारख्याच आहेत कारण त्यांच्या पावित्र्याला आणि त्यांना म्हणजेच बुक्स आणि संहितांना पवित्र मानणे ही युरेशियन परंपरेमधली रूढी आहे ती जशी रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये घुसली तशीच ती भारतीय धार्मिक परंपरेमध्येसुद्धा घुसली आणि अर्थातच पुढे इस्लाममध्ये घुसली या संहितांची संहिता किंवा संथा (हा शब्द संहिता या शब्दापासूनच आलाय)द्यायची असेल तर साहजिकच इथल्या स्थानिक लोकांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पद्धतीने ती देणे गरजेचे होते सुरुवातीला हा मोकळेपणा युरेशियन परंपरेमध्ये होता नंतर तो नाहीसा झाला साहजिकच मग वेदूपासून वेद हा शब्द तयार करत आपल्या सहितांना सुद्धा या लोकांनी वेद म्हणायला सुरुवात केली आता प्रश्न चार का तर त्याचे कारण असे होते की भगवान शंकरांनी भारतीय लोकांना चार वेदु दिले होते ते पुढील प्रमाणे 


१ आयुर्वेद हा स्वतःच्या शरीराविषयी आणि स्वतःच्या आत असलेल्या शरीराविषयी अधिकाधिक ज्ञान गोळा करत होता एका अर्थाने जीवाचे स्वतःच्या शरीराविषयीचे असलेले ज्ञान यामध्ये समाविष्ट होते 


२ ज्योतिष वेद : हा जीवाच्या स्वतःच्या शरीराच्या बाहेर असलेल्या संसाराविषयी अधिकाधिक ज्ञान गोळा करत होता एका अर्थाने जीवाला त्याच्या आसपास असणाऱ्या संसाराविषयीचे या ब्रम्हांडा विषयीचे असलेले ज्ञान यामध्ये समाविष्ट होते 


३ नाट्यवेद यामध्ये ज्ञानाच्या अभिव्यक्ती विषयीचे ज्ञान होते हे ज्ञान कसे सादर करायचे आणि या ज्ञानाच्या संदर्भामध्ये नेमके खोलवर काय आहे या अंगाने याची चर्चा आहे अगदी भाषेचेही चर्चा नाट्यवेदाचा भाग म्हणून येते 


४ शस्त्र वेद: या जगात फक्त ज्ञान असून उपयोगी होत नाही त्या ज्ञानाचे आणि ज्ञानातून निर्माण होणाऱ्या संस्थांचे संरक्षण करावे लागते आणि हे संरक्षण शंकरांच्या काळात शस्त्रांनीच करावे लागते म्हणूनच शस्त्रांचे सुद्धा ती कशी तयार करायची आणि कशी वापरायची या संदर्भातले ज्ञान दिले गेले आणि एका अर्थाने संरक्षणाची ही तजवीज केली गेली एका अर्थाने हा संरक्षण वेद आहे 


हे चार वेद सातत्याने भारतीय परंपरेमध्ये शैव लोकांनी निर्माण केल्यामुळे साहजिकच स्वतःला युरेशि लोकांना असे वाटले की आपणही चार वेद निर्माण केले पाहिजेत आणि म्हणूनच मग असलेल्या ऋग्वेद नावाच्या संहितेमधून त्यांनी आपले चार वेद निर्माण केले हे चारही वेद म्हणजे श्रद्धा होत्या ज्ञान नव्हते पण श्रद्धा युगात सुद्धा जे जे ज्ञान मिळते ते आपणाला या चार वेदांच्यामध्ये उपलब्ध असलेले दिसते मुळात प्रामुख्याने या प्रार्थना आहेत आणि त्या मांत्रिकांनी तयार केलेल्या आणि मांत्रिकांनी म्हणावयाच्या प्रार्थना आहेत त्या काळामध्ये मंत्र म्हणजेच ब्रह्म होते ब्रह्म या शब्दाचा अर्थच श्रद्धेशी निगडित आहे ब्रह्म म्हणजे मंत्र ज्याला येतात तो ब्राह्मण ! पुढे ब्रह्म या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेवाने बदलला आणि साहजिकच मग अनेक गोष्टी बदलल्या आणि ज्याला ब्रह्म प्राप्त होते म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त होतो तो ब्राह्मण अशी नवीन व्याख्या ब्रह्मदेवाने केली हा अर्थातच शैव परिणाम होता. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही परंपरा अर्थातच पुढे विश्वामित्राने अधिक व्यापक केली आणि तिला काही नवीन डायमेन्शन दिल्या पुढे उपनिषदांच्या मध्ये ती अधिकाधिक बहरत गेली आणि खुद्द ब्राह्मण वर्णामध्ये ब्राह्मण या शब्दाची व्याख्या काय आणि कोणती स्वीकारायची म्हणजे पारंपारिक ऋग्वेदिक व्याख्या स्वीकारायची की ब्रह्मदेवाने दिलेली नवीन व्याख्या स्वीकारायची असा प्रश्न निर्माण झाला ज्यांनी नवीन व्याख्या स्वीकारली त्यांनी पुढे वेदांची व्याप्ती वाढवायला सुरुवात केली आणि उपनिषदांना सुद्धा वेदांच्या मध्ये समाविष्ट केले पण पहिली व्याख्या मानणाऱ्या लोकांनी वेदांची व्याख्या अधिक व्यापक करत त्यामध्ये अगदी रामायण आणि महाभारत यांचा सुद्धा समावेश केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोक्ष जाऊन धर्म केंद्रस्थानी आला पहिली ऋग्वेदिक व्याख्या केंद्रस्थानी आली त्यासाठी ब्रह्मदेवाचे महत्त्व कमी करण्यात आले वैष्णव धर्माचा हा सर्वाधिक निगेटिव्ह इम्पॅक्ट होय .


दुर्दैवाने या परिणामामुळेच हळूहळू पारंपारिक ऋग्वेदिक व्याख्याच ब्राह्मण लोकांनी कवटाळली आणि मोक्षाला कवटाळणारे उदाहरणार्थ अष्टा वक्र ब्राह्मण लोक अल्पसंख्यांक होत गेले आणि मांत्रिक ब्राह्मण बहुसंख्यांक होत गेले आणि त्यामुळेच युरेशियन परंपरेची फार मोठी शोकांतिका झाली आणि भारतात डार्क युग निर्माण झाले.


अलीकडच्या काळात म्हणजे विसाव्या शतकात जे कृष्णमूर्ती आणि रमण महर्षी वारंवार दुसऱ्या व्याख्येची आठवण करून देतात याचे कारण त्यांची मोक्षाला झालेली उपलब्धता आहे मधल्या काळामध्ये या दोघांचा ब्राह्मण लोकांच्यावर चांगला प्रभाव पडत होता पण दुर्दैवाने पुन्हा एकदा मांत्रिक ब्राह्मण प्रमोट करणारे वाढत चाललेले दिसतात . मूळ ऋग्वेदिक संहिता ही तिला मोक्ष माहीत नसल्याने पूर्णपणे श्रद्धा केंद्रित असणार परंतु आपल्याला सध्याची उपलब्ध संहिता आहे तिच्यामध्ये मोक्षाची बीजे आहेत मात्र उपनिषदांच्या मध्ये मात्र आपणाला स्पष्ट आणि स्वच्छपणाने मोक्ष दिसतो मात्र आपण एक गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे की मूळ चार वेदांच्या मध्ये उपनिषदांचा समावेश होत नाही. थोडक्यात चार वेद निर्माण झाले त्याला कारण एका अर्थाने देशी करण्याची प्रक्रिया आहे आणि चारच का तर त्याचे कारण शैव-धर्मात चार वेद होते म्हणून हे आहे मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरेसे आहे 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे