काम कर्म व्यवहार आणि मोक्ष
मुकुंद टाकसाळे यांनी प्रश्न विचाराला आहे तो प्रश्न पुढीलप्रमाणे
कोणालाही अखेरपर्यंत जिवंत असेपर्यंत कर्म सोडत नाही.
कर्म हे आचरण आहे. तोच धर्म. धर्म कर्म स्वतंत्र नसते. ते आत्तापर्यंतच्या अनेक वाटांवरच नेहमी आधारित राहते.
मोक्षानंतर वा समाधी नंतरही कर्म सुटतं कां
मोक्ष ही संकल्पना वा स्थिती कर्मनिरासित असते कां .
त्यापर्यंत जाणेचे त्याग टप्पे किती कसे.?
श्रीधर तिळवे नाईक म्हणजेच मी दिलेले उत्तर
उत्तर: सर्वात प्रथम क्रिया आणि कर्म यांच्यातला फरक लक्षात घेतला पाहिजे क्रियेमध्ये मध्ये मी असत नाही कर्मामध्ये मी असतो म्हणूनच ज्यांचा पिंड क्रियापिंड आहे अशा लोकांनी अशा लोकांनी क्रियातंत्राच्या मार्गाने मोक्ष मिळवावा
प्रश्न नेहमी हाच असतो की पिंड ओळखणे शिवलिंगामध्ये एक प्रकार पिंड लिंगाचा आहे त्यामध्ये स्वतःचा पिंड ओळखण्यासाठी त्या पिंडासमोर बसून संपूर्ण लक्ष पिंडीवर केंद्रित केले जाते आणि हळूहळू मग स्वतःच्या आत काय घडत जाते ते पाहिले जाते आज जे जे काही घडते त्याचे निरीक्षण आणि परीक्षण करून मग आपला पिंड काय आहे ते ओळखले जाते . सर्वसाधारणपणे मुख्य पिंड जे मानव जातीत खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत त्यांनाच महत्त्व दिले जाऊन त्यांच्या आधारित पंचतंत्रे निर्माण झाली हे पिंड पुढील प्रमाणे शरीर पिंड हा योगा कडे शैव भाषेत जोगाकडे घेऊन जातो आणि या पिंडाच्या लोकांना जोगी म्हटले जाते. पुढे या जोगीचे योगी झाले . ज्ञानपिंड इथे सर्व प्रामुख्याने ज्ञान केंद्री असतात हा पिंड असणाऱ्या लोकांना नाथ म्हणतात किंवा मग नंतरच्या बौद्ध आणि जैन दर्शनामध्ये अनुक्रमे बुद्ध आणि केवली म्हणतात तिसरा पिंड भावपिंड आहे त्यातून भाव तंत्र उदयाला आले चौथा पिंड हा शक्तीपिंड आहे त्यातून शक्ती तंत्र उदयाला आले आणि पाचवा पिंड हा क्रियापिंड आहे त्यातून क्रिया तंत्र उदयाला आले सर्वसाधारणपणे काही माणसेही जन्मतःच एक्टिविस्ट असतात त्यांना एका जागी स्वस्थ बसवत नाही कायम काही ना काही तरी काम हवे असते क्रिया ही प्रामुख्याने काम या अक्षाबाबत काम आणि अर्थ या अक्षाबाबत व्यवहार म्हणून जन्मते आणि मोक्षाबाबत ती क्रिया असते कुठल्याही माणसाला कुटुंब चुकत नाही तो कुटुंबात जन्मतो आणि कुटुंबातच मरतो साहजिकच कुटुंबाच्या संदर्भात जे सक्तीचे काम असते त्याला आपण उत्तरदायित्व म्हणतो हीच गोष्ट व्यवहाराबाबत आहे व्यवहार हा नेहमीच अर्थ म्हणजेच संसाराबाबत असतो आणि संसारामध्ये पृथ्वी येते राष्ट्र येते आपण आपला व्यवहार हा राष्ट्राने निर्माण केलेल्या संविधानानुसार करत असतो जेव्हा हा व्यवहार सक्तीचा होता तेव्हा आपण म्हणतो की हे तुझे कर्तव्य होते प्रत्येक माणसाने आपले उत्तरदायित्व आणि कर्तव्य पार पाडले पाहिजे उत्तरदायित्वाचा मुख्य आधार हा प्रेम असला पाहिजे तर कर्तव्याचा आधार निष्ठा असला पाहिजे यामध्ये संविधानाविषयी ची निष्ठा पण आहे कायद्याविषयीची निष्ठा येते .
आता झाला काम आणि अर्थ यांच्या पलीकडे जाऊन स्वतःवर काम करायचे आहे आणि मोक्षाला जायचे आहे मोक्षाची प्राप्ती करायची आहे त्याच्याबाबत साहजिकच मग अनेक प्रश्न निर्माण होतात यातील पहिला प्रश्न हा नेहमीच उत्तरदायित्वाचा असतो सर्वसाधारणपणे शैव व युरेशियन परंपरेने याबाबतीत संन्यास हा उपाय शोधलेला आहे म्हणजे काय तर उत्तरदायित्व घ्यायचेच नाही सरळ कुटुंबाचा त्याग करायचा आणि निघून जायचे पूर्वी जंगल उपलब्ध असल्याने हा उपाय खूप सोपा होता कारण पर्यावरणाचा नाश झाला नव्हता पण अलीकडे मात्र पर्यावरणाचा नाश झाल्यामुळे अशा प्रकारचा संन्यास घेता येणे अतिशय गुंतागुंतीचे होऊन गेलेले आहे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की सरळ सरळ फॉरेस्ट ऑफिसर येतात आणि ही जागा सरकारी आहे असे सांगतात मग साहजिकच तिथे संन्याशाला बसता येते की नाही हा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो आणि समोरचा फॉरेस्ट ऑफिसर आध्यात्मिक आहे की नाही यावर गोष्टी ठरतात . याला एक दुसरा पर्याय म्हणून एखाद्या मठात जाणे जो शैव उपाय आहे आश्रमात जाणे जो वैदिक श्रुतीचा उपाय आहे किंवा संघात जाणे जो श्रमण परंपरेचा उपाय आहे आजही सुरू आहे पण तिथे तरी उत्तरदायित्व चुकते का ? तर तिथे सुद्धा तुम्हाला कामाला लावले जाते . फक्त तुमचा परिवार हा संन्यासी लोकांचा परिवार होऊन बसतो म्हणजेच एका छोट्या कुटुंबातून तुम्ही महा कुटुंबात जा ता मग याचा फायदा असतो की नाही तर असतो तो म्हणजे तुमच्या सभोवताली सतत मोक्षाचे पर्यावरण जिवंत राहते ऍक्टिव्ह राहते .
दुसरा एक उपाय म्हणजे संन्यास घ्यायचा परंतु कायक संन्यास घ्यायचा जो मी स्वतः घेतलाय . तिथे तुम्ही उत्तरदायित्व निभावू शकता आणि त्याच वेळेला मोक्षाची साधनाही करू शकता इथे मुख्य प्रश्न भरान पोषण करण्याचा येतो आणि मुख्य प्रश्न हा द्वादशशील युक्त उत्तरदायित्व निभावणे आणि व्यवहार सांभाळणे हाच असतो . अनेकदा सर्वसामान्य लोकांना तुमचे प्रॉब्लेम्स कळत नाहीत आणि अनेकदा ज्यांच्याकडून काडीची ही अपेक्षा नसते अशा लोकांना तुम्ही काय आहात ते कळते. म्हणजे सर्वाधिक बदनाम झालेल्या बॉलीवूडच्या क्षेत्रामध्ये मला काही लोक असे भेटलेले आहेत की ज्यांना मला काय करायचे असते आणि मी का करतो हे व्यवस्थित कळत होते . आणि शिक्षण संस्थेसारख्या पवित्र ठिकाणी अपवादात्मक ठिकाणी मला फार अवघड गेले आहे .
थोडक्यात काय कुटुंबाचे उत्तरदायित्व टाळता येईल परंतु जिथे जाल तिथे काही गोष्टी येतीलच. काम आणि व्यवहार यांच्यापासून सुटका नाही अर्थात सामाजिक व्यवहारापासून सुटका व्हावी म्हणून जोगी लोकांच्यासाठी जोगवा मागण्याची शैव परंपरा आहे परंतु दुर्दैवाने ही परंपरा महाराष्ट्रामध्ये अत्यंत वाईट चालीशी नंतर जोडली गेली आणि जो जोगवा मागणारा आहे त्याला स्वतःलाही तो जोगी आहे याचा विसर पडायला लागला काही लोकांनी अतिरेक गाठला म्हणजे कामवासना जागृत होऊ नये म्हणून स्वतःचे लिंगच ठेचणे वगैरे वगैरे त्यातून पुन्हा काही वेगळे प्रकार आणि वाईट चालीरीती उदयाला आल्या . कामवासना अशी नष्ट होत नाही .
ज्ञान तंत्र हे शारीरिक नसल्यामुळे तिथे अशा प्रकारच्या चालीरीती उदयाला आल्या नाहीत म्हणजे इथेही बौद्ध आणि जैन लोकांच्यात संन्यासाला संन्यास आला संघ आला पण अपवाद वगळता नैतिकदृष्ट्या यांचे आचरण नेहमीच उच्च राहिलेले आहे . जैन आणि बौद्ध धर्मामध्ये तुम्हाला एक व्यवस्थाच अशी दिली गेलेली आहे की जिथे ना काम आहे ना व्यवहार ! आता समाजाच्या पातळीवर हे योग्य की अयोग्य हे ठरवणे फार अवघड आहे कारण या संघांना मिळणाऱ्या देणग्या या प्रामुख्याने राजसत्तेपासून किंवा व्यापार सत्तेपासून मिळालेल्या होत्या . आता प्रश्न असा येतो की या सत्तांच्याकडून येणारा पैसा खरोखर नैतिक असतो का ? शैव लोकांच्या मध्ये यासंदर्भात जास्त चर्चा होतात किंबहुना अपवादात्मक ठिकाणी लोकधर्म पाळणाऱ्या म्हणजेच त्या काळामधील पाशुपत धर्मी लोकांनी गौतम बुद्धाला काही ठिकाणी या अंगाने प्रश्न विचारलेले आहेत यातले अनेक प्रश्न नंतर व्यवस्थित त्रिपिटकाचे संपादन करताना वगळले गेलेले आहेत किंबहुना बुद्धाचा धम्म धर्म बनायला इथूनच सुरुवात झालेली आहे
यानंतर तुम्ही विचारलेला प्रश्न तो म्हणजे त्याग ! इथे सुद्धा अनेकदा पिंडाचा प्रश्न येतो काही लोकं टप्प्याटप्प्याने त्याग करत जातात तर काही अचानक एका क्षणात सगळ्याचा त्याग करून मोकळे होतात .
जे टप्प्याटप्प्याने त्यात करत असतात ते नेहमीच विचारत असतात की असं कसं करावं ?
स्पष्ट सांगायचे तर हा प्रश्न अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे कारण ज्या त्या व्यक्तीचा पुन्हा स्वतःचा खास म्हणावा असा पिंड असतो त्यामध्ये प्राण पिंड सर्वात महत्त्वाचा कारण त्यामुळे आपण जिवंत राहतो त्यानंतर जनूक पिंड सर्वात महत्त्वाचा कारण त्यामुळे आपले विशिष्ट पिढ्यानपिढ्यांचे ठसे आपल्याला कळतात मग संस्कार पिंड येतो आप जो प्रामुख्याने घरातल्या लोकांनी कुटुंबातल्या लोकांनी आप्तांनी नात्यांनी केलेल्या संस्कारांनी तयार होतो आणि सर्वात शेवटी अभ्यासपिंड येतो जो आपला शिक्षणाने तयार होत जातो . या सर्व गोष्टींनी मिळून आपला पिंड ज्याला जीवपिंड म्हणतात तो तयार होतो हा प्रत्येकाचा इतका वेगळा असतो की अनेकदा त्यामुळेच अनेक लोकांना इथे गुरुची गरज भासायला लागते यावर उपाय म्हणजे आपण स्वतःचे गुरु व्हायचे आणि अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने अत्यंत काळजीपूर्वक आणि सावधानता राखत ह्या सर्व पिंडांचे निरीक्षण करायचे. यालाच आपल्याकडे धारणा आणि ध्यान म्हणतात .
पण समजा माणूस अतिक्रियाशील क्रियातंत्रप्रवण असेल आणि त्याला बसणे सुद्धा अशक्य असेल तर काय करावे तर मग आपल्या क्रियांच्या वरच ध्यानधारणा करावी म्हणजे काय तर प्रथम धारणेपासून सुरुवात करावी म्हणजे चालताना चालण्यावर धारणा करावी याची सुरुवात कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस यांच्यापासून करावी म्हणजे चालताना फक्त चालण्याकडे लक्ष द्यावे बासरी वाजवताना फक्त बासरी वाजवण्याकडे लक्ष द्यावे आर्ग्युमेंट करताना फक्त आपल्या आर्ग्युमेंटवर धारणा करावी
एकदा शंभर टक्के क्रिया फोकस्ड झाली की मग हळूहळू त्यातून मी कसा काढता येईल काढून घेता येईल ते पहावयास सुरुवात करावी हे एकदा साधले की तुम्ही हळूहळू क्रियावान बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागता.
हे करताना तुमच्या लक्षात येईल की अनेकदा आपला पिंड हाच अडथळा बनून येत राहतो म्हणजे अभ्यास पिंड हा शिक्षणाने इतका व्यापलेला असतो की ते शिक्षण आपल्याला एखादी गोष्ट निखळपणाने करायला देतच नाही ती अडथळा बनायला लागते किंवा मग घरातून आलेला संस्कार असतो तर तो संस्कार तुम्हाला नीट क्रिया करू देत नाही आणि जेव्हा तुम्हाला लक्षात येते की हे आपल्या पिंडाचेच उद्योग आहेत तेव्हा हळूहळू क्रिया करताना तुम्ही जर का हा पिंड जीव पिंड आणि त्याचे अनेक उपप्रकार बाजूला करायला शिकला की हळूहळू सविकल्प समाधीच्या दिशेने तुमची वाटचाल होऊ शकते
धारणा आणि ध्यान केले की मग एक वेळ अशी येते की तुझी आहे तुझ्या पाशी म्हणजेच स्वतःचे आहे स्वतः पाशीच म्हणून जाता . समजून जाता . ज्या दिवशी या सगळ्य सगळ्या पिंडांचा आत्मस्फोट पिंड स्फोट होतो आणि फक्त प्राण पिंड वाचतो त्या दिवशी तुम्ही सविकल्प समाधीला उपलब्ध होता आणि हळूहळू काम आणि व्यवहारांकडून निष्काम आणि नि :व्यवहाराकडे तुमची वाटचाल सुरू होते
आणि शेवटची जी आहे तिथे निर्विकल्प समाधी आहे तिथे भाषाही लोप पाव त्यामुळे तिच्याविषयी काही बोलणे अशक्य आहे तिथून खऱ्या अर्थाने तुम्ही क्रियावान होता
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment