राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय श्रीधर तिळवे नाईक
तुमको जगाच्या संदर्भामध्ये तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला प्रशासनीय कारणासाठी त्याची युनिट्स करावीच लागणार त्यामुळे राष्ट्रवाद ना करणारे लोक प्रॅक्टिकल नसतात अगदी यामध्ये जे कृष्णमूर्ती यांच्यासारखे लोक सुद्धा येतात मोक्षाच्या पातळीवर राष्ट्र असत नाही पण अर्थ या पातळीवर राष्ट्र अस्तित्वात तर आहेच पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लेवल ला व्यवहारिक पातळीवर ते स्वीकारावे लागते संसाराच्या संदर्भाशी निगडित असलेल्या सर्व वस्तूंचे अध्ययन अर्थविद्येत होते मितीके म्हणजे मितीनी बद्ध झालेले शक्तीचे आकार ! ती आपणाला कधीच संपूर्ण दिसत नाहीत आपणाला दिसतात ती आपल्या तथ्याशी जोडले गेलेले आकार ! त्यांना आपण वस्तू म्हणतो या वस्तूंचे प्रामुख्याने खालील प्रकार असतात
१ निसर्गवस्तू झाड मनुष्य प्राणी वगैरे
२ प्रति निसर्ग वस्तु माणसाने निसर्गातल्याच वस्तूंना आकार देऊन बनवलेल्या वस्तू उदाहरणार्थ चामड्याची पिशवी
३ पवित्र वस्तू धर्माने पवित्र म्हणून घोषित केलेल्या वस्तू
४ क्रयवस्तू माणसाने निसर्ग वापरून निर्माण केलेल्या मानवी वस्तू ज्या निसर्ग वस्तु असत नाहीत उदाहरणार्थ तलवार
५ प्रतिवस्तू निसर्गातच अस्तित्वात नसलेली आणि निसर्गाशिवाय सुद्धा निर्माण झालेली वस्तू किंवा माणसाने निर्माण केलेली वस्तू उदाहरणार्थ आगगाडी किंवा विमान
६ चिन्ह वस्तू चिन्हांच्या मुळे तयार झालेली वस्तू उदा संगणक मोबाईल फोन
७ चिन्ह प्रतिवस्तू आरटीफिशल इंटेलिजन्स किंवा तत्सम सर्व गोष्टींच्या साह्याने निर्माण केलेली आर्टिफिशियल चिन्ह वस्तू जी निसर्ग वस्तु इतकीच प्रभावी असते उदाहरणार्थ रोबो
या सर्व वस्तूंनी आपले सकल वस्तू जग बनते यातील ज्या गोष्टींच्यामुळे पैसा मिळतो त्या सर्व पैसा देणाऱ्या वस्तूंचा समावेश अर्थ वस्तूंच्या मध्ये होतो आणि अर्थ विद्येमध्ये यालाच आर्थिक उत्पन्न म्हणतात संपूर्ण राष्ट्राचे आर्थिक उत्पन्न म्हणजे राष्ट्रात पैसा देणाऱ्या निर्माण झालेल्या वस्तूंचे सकल उत्पन्न होय.
पवित्र वस्तूंची विक्री होता कामा नये असा संकेत असला तरी प्रत्यक्षात मंदिरांच्या मध्ये अनेक अशा प्रकारच्या धर्म वस्तू किंवा पवित्र वस्तू तयार होत असतात आणि त्यांची खरेदी विक्री होत असते उदाहरणार्थ गणेशोत्सव ला आपण जेव्हा गणपती आणतो तेव्हा आपण पैसे देतो आणि कळत नकळत गणपती हा अर्थ वस्तू बनतो शैव श्रुतीमध्ये याची परमिशन नाहीये तरीसुद्धा हे केले जाते त्याऐवजी ज्याने त्याने आपले पैसे किंवा तत्सम काही गोष्टी (उदाहरणार्थ अनेकदा आमच्या घरी गणपती जेव्हा बनवले जायचे तेव्हा शेतकरी लोक पिकाचा विशिष्ट भाग ठेवून गणपती घेऊन जायचे ) ठेवून गणपती न्ह्यावा अशी प्रथा आहे आता मात्र सर्वच गोष्टींचे अर्थकारण झाल्याने प्रत्येक गोष्ट अर्थवस्तू बनत जाताना दिसते . त्यात अलीकडे पवित्र वस्तू सुद्धा यायला लागलेल्या आहेत . प्रश्न आहे की त्यांना सकल राष्ट्रीय उत्पन्नात गणावे की नाही . गणण्याचा अर्थच मुळात जे घरातून गणात अर्थवस्तु म्हणून विकायला येते ते असा आहे .
प्रश्न मुळात असा आहे की प्रत्येकाला ज्या वस्तू हव्या आहेत त्या त्याला मिळायला पाहिजेत विशेषता ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या मिळायला पाहिजे आणि त्यासाठी त्याच्याजवळ उत्पन्न हवे . मातीची भांडी सतत फुटायची त्यामुळे साहजिकच कुंभार आला कायमच मातीची भांडी तयार करण्यामुळे उत्पन्न मिळत होते पण अचानक त्या जागी धातू आले आणि कुंभार बुडाले ब्रिटिशांच्या काळात हे घडले मुळातच धातूंच्या पासून भांडी बनवणे ही एकेकाळी फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होती त्यामुळे ब्रिटिशांच्या आधी याला फारसा धक्का बसला आहे परंतु नंतर मात्र सामान्य माणसाला सुद्धा धातूंची भांडी तयार मिळायला लागली आणि कुंभार पारंपारिक व्यवसायात बुडाले फक्त पवित्र वस्तू तयार करून विकणे हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन बनले. त्यामानाने चांभार तगले याचे कारण चामड्याच्या वस्तू बनवणे अजूनही संपलेले नाही शिवाय चप्पल दुरुस्ती हा अजूनही न संपलेला उद्योग आहे पूर्वीचा गाव गाडा कोसळला तो या औद्योगिकीकरणामुळे ! आणि तरी आपले लोक जाती टिकवून आहेत याला काय बोलावे ? हीच गोष्ट काहीशी धनगरांच्या बाबतीत झाली कारण अजूनही मटणाची डिमांड संपलेली नाही हाच प्रकार गवळी लोकांच्या बाबतीत आहे दूध अजूनही गरजेचे आहेच प्रश्न असा आहे की कुंभार मग शिल्प कलेकडे का वळले नाहीत ? शिल्पकलेमध्ये कुंभार समाजातील किती लोक नेमके आलेले आहेत ? धड 5% पण नाहीत . कुंभारांच्या शोकांतिकेचे खरे कारण इथे आहे . कुंभारांच्याकडे दुसरा जो पर्याय आला होता तो विटेचा कारखाना काढणे हा होता किंवा कौले बनवणे हा होता त्यात सुद्धा नंतर किती कुंभार आले ? हे प्रश्न मी मुद्दा म्हणून विचारतो आहे कारण या वस्तू क्रयवस्तू म्हणून नंतर प्रचलित राहिल्या परंतु कुंभारांची मक्तेदारी त्यावर निर्माण झाली नाही त्यातच जेव्हा विटांचे धातूपासून बनलेले साचे निर्माण झाले तेव्हापासून विटांचा कारखाना हा एक वेगळा उद्योग होऊन बसला आणि त्यातूनच विटकरी समाज निर्माण झाला संत पंढरीनाथ हे या विटकरी समाजातून आले होते आणि म्हणूनच पुढे त्यांचा विठ्ठल झाला. विटेवर उभे राहून तपस्या करण्याचे साधना करण्याचे बळ त्यांच्यामध्ये कुठून आले या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या विटेच्या कारखानदारीत आहे . सुरुवातीला दोन विटांच्यावर उभे राहून आणि मग एका विटेवर उभे राहून त्यांनी आपला योग साधला . ती वीट जर उपलब्ध झाली असती तर मला खात्री आहे तिला पवित्र वस्तूचे नामकरण मिळाले असते .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment