ब्रिटिश , क्षत्रिय आणि आत्ताचे काही प्रश्न (पुन्हा आरक्षण) भाग पाचवा श्रीधर तिळवे नाईक 

भारतामध्ये आरक्षणामध्ये एक पॅटर्न दिसतो आणि या पॅटर्नमध्ये ब्रिटिश काळात सुद्धा स्वतःचा आकार टिकून धरणारे शैव वीर समाज दिसतात प्रथम जाट पंजाब हरियाणा मग गुजर राजस्थान मग पाटीदार पटेल गुजरात मध्ये आणि आता मराठा महाराष्ट्रामध्ये ! योगायोगाने प्रत्येक आंदोलन आरक्षणासाठीच ! हे सर्व काय आहे हे समजायला फार बुद्धी ताणावी लागत नाही हे सर्व मूळचे वीर समाज आहेत जे शैव होते आणि यातील काही आता वैष्णव बनत गेले स्वतःला क्षत्रिय समजत गेले या सगळ्याच समाजांना शेतीपासून उत्पन्न होते आणि त्यातील इन्कम कमी झाल्यापासून हा सगळा प्रश्न उद्भवलेला आहे हा प्रश्न आर्थिक आहे पण या आर्थिक मागासले पणामागे काय आर्थिक कारण आहे हे शोधण्याची या लोकांना भडकवणे सुरू झाले आणि तुम्ही सामाजिक दृष्ट्या सुद्धा मागासलेले आहात असे बिंबवणे ही सुरू झाले साहजिकच मग सामाजिक मागासलेपण हाच आधार असलेले आरक्षण धोरण तुमच्यासाठी योग्य आहे असे सांगितले जाऊ लागले जेणेकरून हे लोक स्वतःच स्वतःला आम्ही सामाजिक मागासलेले आहोत असे जाहीर करतील नेमके हेच घडले आणि स्वतःच्या शेती मधल्या पराजित झालेल्या अर्थकारणाला सामाजिक कारण देऊन आरक्षण आंदोलन उभे केले गेले यामध्ये एक गोष्ट विसरण्यात आली ती म्हणजे असे केले की आपण ओबीसी मध्ये जातो आणि ब्राह्मणवाद कधीही या ओबीसी वादाच्या आधारे तुम्ही शासक समाज होता हे विसरून तुम्ही वीर समाज होता हे विसरून आणि विसरायला लावून तुम्हाला शूद्र हा दर्जा देऊ शकतो 


आता हे साध्य कसे करायचे तर तुम्हालाच सांगायचे की तुम्ही शासक समाज आहात पण मंडलो आयोगामुळे राजकीय आरक्षण मिळाले आणि त्यामध्ये तुमच्या जागा कमी व्हायला लागल्या पण जर का तुम्हाला ओबीसी आरक्षण मिळाले तर या आरक्षणात असलेल्या राजकीय जागा तुम्हाला मिळतील जेणेकरून ओबीसी लोकांच्यासाठी असलेल्या राखीव जागांच्या मधून ओबीसी कॅंडिडेट निवडून येता कामा नयेत मी नेहमीच सांगत आलोय की ही एक व्यापक शैवविरोधी मोहीम आहे जी सहजासहजी दिसत नाही मंडल आयोगामुळे नव्याने जागृती आलेला ओबीसी वर्ग अचानक आता आपली मुळे शोधायला लागलेला आहे साहजिकच आज ना उद्या तो शैव होणार हे स्पष्ट आहे तो तसा होण्याआधीच उपाययोजना केली तर हे थांबवता येईल हे ब्राह्मणवादाच्या व्यवस्थित लक्षात आलेले आहे त्यामुळेच या वीर समाजांना सर्वत्र या अंगाने भडकवणे सुरू झाले आहे उपाययोजना सुरू झालेली आहेत 


यालाच पूरक म्हणून अलीकडे पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख भागवत यांनी पुन्हा स्टान्स बदलला आणि वर्णव्यवस्था पंडित लोकांनी निर्माण केली असे सांगितले आत्तापर्यंत मी असे समजत होतो की मनु, याज्ञवल्क, व्यास वगैरे स्मृति लिहिणारे सर्व ऋषी आहेत भागवत यांच्यामुळे ते अचानक पंडित असल्याचा साक्षात्कार झाला ही अर्थातच पंडितांच्या विरोधात मोहीम आहे काश्मीर मधील पंडितांचा प्रश्न कुठल्याच बाजूने का उचलला गेला नाही हे यावरून स्पष्ट व्हावे म्हणजेच ब्राह्मणांनी केलेल्या सर्व अनिष्ट कर्मांची जबाबदारी आता शैव असलेल्या पंडितांच्या वर टाकायची असे हे कारस्थान आहे काही वर्षांपूर्वी मनु हे राजा होते आणि क्षत्रिय होते त्यामुळे वर्णव्यवस्था क्षत्रिय लोकांनी निर्माण केली असे बिंबवण्याचा प्रयत्न झाला होता पण तो काही क्षत्रिय लोकांनी स्वीकारला नाही म्हणून आता पंडितांच्या वर या सर्व गोष्टींची जबाबदारी टाकणे सुरू झालेले आहे 


जर का ब्राह्मणधर्म प्रस्थापित करायचा असेल तर शैवधर्मामध्ये फूट पडली पाहिजे हे व्यवस्थित ब्राह्मणधर्मी लोकांना कळलेले आहे त्यातूनच मग मराठा आणि कुणबी , क्षत्रिय आणि शूद्र यांच्यात स्पष्ट विभागणी व्हावी आणि होत नसेल तर ती सर्व शासकांनी करावी ही ब्राह्मणवादाची अपेक्षा आहे त्यासाठी मराठा हे ओबीसी लोकांच्यात जाऊ नयेत किंबहुना जाट असोत की पटेल असोत यातील कोणीही ओबीसी होऊ नये अशीच ब्राह्मणधर्मी लोकांची इच्छा आहे त्याचबरोबर जे जातील ते व्यवस्थित कुणबी म्हणून आणि शूद्र म्हणून स्थापित होतील याचीही काळजी घ्यावी असे धोरण आहे 


ब्रिटिशांच्या काळात महात्मा फुले यांच्यामुळे सुरुवातीला ब्राह्मण- ब्राह्मणेतर असे गणित होते आणि ते यशस्वी होण्याची शक्यता ही निर्माण झाली होती कारण राजे लोकांनी विशेषता महाराष्ट्रातल्या राजे लोकांनी ते स्वीकारायला सुरुवात केली होती पण आत्ताच्या काळात हे हँडल करणे सोपे नाही हे कळून चुकल्याने हे म्हणजे नुसतं ब्राह्मण ब्राह्मण केलं की मतं मिळत नाही ते कळल्याने ब्राह्मणवादाने आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये बदल केलेला आहे त्यातूनच मग क्षत्रिय आणि वैश्य ज्यांना एकेकाळी परशुरामाने सर्व क्षत्रिय मारले व कलियुगात वैश्य उरलेले नाहीत असे सिद्धांत मांडून या लोकांनी ब्राह्मणेतर कॅटेगिरीत टाकून शेवटी शूद्र केले होते त्या सर्वांना आता पुन्हा एकदा आपल्या धर्मात घेऊन नवे बळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे यात जे कोणते मासे गळाला लागतील ते सर्व ओपन कॅटेगिरी जाते जातील आणि एकदा का ओपन कॅटेगरी मधले सर्व लोक आरक्षण विरहित झाले की ते आपोआप स्वतःला उच्च वर्णीय समजतील आणि वर्ण व्यवस्था स्वीकारतील असे हे गणित आहे ज्या लोकांनी एकेकाळी आपण शूद्र आहोत हे स्वीकारले ते लोक क्षत्रियत्व आणि वैश्यत्व का नाकारतील? माणसाचा उच्च असण्याचा गंड हा इतका नैसर्गिक आहे की प्रत्येकाला उच्च व्हायचे असते सत्ताधारी व्हायचे असते आणि वर्णजातीव्यवस्थेत तर उच्चपणाची पुढच्या सात पिढ्यांची सोय होऊन जाते आणि कदाचित त्यानंतर सुद्धा सोय उरण्याची शक्यता असते तर अशा या हितसंबंधांना अत्यंत पूरक असलेल्या वर्ण जाती व्यवस्थेला कोण नकार देईल ? या देशातले ब्राह्मण क्षत्रिय आयुष्यात कधीही वर्ण व्यवस्था सोडणार नाहीत कारण ती त्यांच्या फायद्याची आहे जोपर्यंत क्षत्रिय शूद्र मांडले गेले होते तोपर्यंत ब्राह्मणेतर चळवळीमध्ये क्षत्रिय सहभागी व्हायला तयार होते पण आता त्याची गरज उरलेली नाही कारण ब्राह्मण धर्म आता नव्या एकविसाव्या शतकात क्षत्रियांना क्षत्रिय म्हणून आणि वैश्यांना वैश्य म्हणून मान्यता देत असल्याने ती व्यवस्था स्वीकारायला या लोकांना प्रॉब्लेमच नाही थोडे पुढे मग कधी जर का कोणी बुद्ध आणि तुकाराम यांच्यासारखा संघर्ष करणारा निर्माण झाला तर मग संघर्ष होत राहीलच पण असे संघर्ष हे लोक आपापसात मिटवतात आणि या संघर्षात लोक आपल्या बाजूने यावे म्हणून शूद्र ,अतिशूद्र आणि आदिवासी यांचा वापर करतात यापुढेही हे चालू राहील पण मुळात संघर्ष नेहमी वैदिक परंपरेमध्ये ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय असाच असतो आणि तो थेट ऋग्वेदिक काळापासून विश्वामित्रांपासून सुरू आहे त्यामुळेच प्रश्न या सगळ्या संदर्भामध्ये ओबीसीबीसी आणि आदिवासी यांचाच आहे या लोकांना शैवधर्म या कॅटेगरी खालीच एकत्र यावे लागेल दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना अजूनही हे समजत नाही पण त्यांना ते समजेल अशी भीती मात्र आता ब्राह्मण धर्मात निर्माण झालेली आहे त्यामुळेच मग एका बाजूला हर हर महादेव म्हणत सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे मात्र व्यवस्थितपणे शैवधर्म नाहीसा कसा होईल या हिशेबाने कारवाया चालवत राहायच्या करत राहायच्या 


जरांगे यांच्या पाठीमागे फडणवीस आणि शरद पवार यांचा काही ताळमेळ आहे का ते बघावे लागेल आता तर अशी स्थिती आहे की अजित पवार भाजपकडे जाणे ही सुद्धा एक खेळी होती काय आणि ती दोघांनाही मान्य होते की काय अशी शंका येण्याइतपत सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत याही पुढे जाऊन मोदी आणि हजारे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत काय तेही तपासले पाहिजे ब्राह्मणधर्म व जैन धर्म यांची युती झालेली आहे किंबहुना ती पूर्वीच आठव्या शतकापासूनच शैव धर्मविरोधात विशेषता पाशुपत आणि नाथ या दोन शैव धर्माविरोधात झाली होती तिचे पुनर्जीवन झालेले आहे त्यातून तर शाकाहारवादाचा प्रश्न आणलेला आहे बौद्ध धर्म हा अंतिमतः युरेशियन धर्म आहे त्यामुळे दलितांच्यापैकी जे नव बौद्ध आहेत ते सुद्धा प्रस्थापित ब्राह्मण धर्माला सामील होऊ शकतात सम्राट हर्षवर्धन याने एकदा बौद्ध भिख्खूची यासंदर्भात खरडपट्टी काढली होती त्यामुळे रामदास आठवले ही सुरुवात असेल तर शेवट काय असेल याचा अंदाज येऊ शकतो याचा अर्थ स्पष्ट आहे की शैवधर्म हा आपला मुख्य शत्रू आहे हे लक्षात आलेल्या युरेशियन धर्मांनी एकत्र येऊन व्यवस्थितपणे आपल्या चाली गेल्या वीस वर्षात खेळायला सुरुवात केलेली आहे नेहमीप्रमाणे शैव धर्मी लोक गाफील आहेत अपेक्षा फक्त मोदी यांच्याकडून होत्या पण आता त्या बहुदा धुळीस मिळतील इतके ते वैष्णव होत चाललेले आहेत 


जरांगे हे एका विशाल बुद्धिबळाच्या पटावरचे तात्पुरते वजीर आहेत आणि आपण वजीर आहोत या एका भूमिकेतच ते इतके खुश आहेत की त्यांना नटसम्राट असल्याचे फिलिंग येते आहे. आपण कुणबी आहोत की मराठे आहोत हे त्यांना स्वतःलाच अजून ठरवता आलेले नाही किंवा आपण मराठे आहोत हे त्यांना माहिती आहे आणि मराठ्यांच्या राजकीय आरक्षणामध्ये वाढ व्हावी म्हणून त्यांनी ही खेळी खेळलेली आहे जेणेकरून सर्व ओबीसी मतदारसंघांमध्ये ओबीसी लोकांची ओबीसी उमेदवारांची हार निश्चित व्हावी आणि तिथे सर्व स्वतःला क्षत्रिय समजणारे मराठे कुणबी उमेदवार निवडून यावेत अशी ही योजना आहे मग पक्ष कोणताही असो. त्यामुळेच अधून मधून सर्व कुणबी लोकांना तुम्ही आमच्यापेक्षा खालचे आहात आणि केवळ आरक्षण मागितले म्हणून आम्हाला तुमच्या लेव्हलचे समजू नका आमची लेवल हाय आहे हे सांगितले जात आहे. यात खरी पंचाइत कुणबी लोकांची झालेली आहे कारण ज्या तऱ्हेची योजना समोर येते आहे ती लक्षात घेता अनेक मराठे म्हणजे साधारणपणे जे क्षत्रिय म्हणून घेतात ते कुणबी सर्टिफिकेट सादर करून मूळ कुणबी असलेल्या लोकांच्या जागा बळकवणार हे आता निश्चित आहे शिवाय ओबीसी मध्ये अनेक जाती आहेत म्हणजेच भविष्यात जवळजवळ सर्व आरक्षण कुणबी सर्टिफिकेट देऊन खाल्ले गेले तर आश्चर्य नाही कुणी सांगावे कदाचित हीच योजना आहे 


शैव धर्मी लोकांच्या मध्ये तीन जाती अत्यंत प्रबळ होत्या माळी ,वंजारी आणि धनगर! त्यातील वंजारी आणि धनगर यांना बरोबर ओबीसींच्या मधून वगळून स्वतंत्र आरक्षण दिले गेले तेव्हाच याची शंका आली होती ही शैव-धर्मामध्ये पाडलेली उघड उघड फूट आहे आता फक्त ओबीसींच्या मध्ये माळी उरलेले आहेत म्हणजेच आता इतर ओबीसी असलेल्या लोकांच्या जागा माळी आणि मराठे यांच्यात विभागल्या जातील यात इतर ओबीसी जातींच्यावर नेमका किती अन्याय झालेला आहे याचे संख्याशास्त्रीय विश्लेषण होणे अत्यंत आवश्यक होईल 


एकंदरच अकराव्या शतकामध्ये रामानुजाचार्य यांनी वेदांतात प्रवेश करून एका वैष्णव डावाची सुरुवात केली आणि हा डाव यशस्वी होत महाराष्ट्रात तो वारकरी झाला आणि शेवटी पेशवाई आली 1984 नंतर भाजपने रामानुजाचार्य यांच्या ऐवजी थेट भगवान राम आले त्यांच्या जन्मस्थानाच्या आधारे राम मंदिराची तयारी करून दुसऱ्या वैष्णव डावाची तयारी सुरू केली आणि आता हळूहळू हा डाव यशस्वी होताना दिसतो आहे रामानुजाचार्य यांनी सुरू केलेल्या वैष्णव डावाला शेवटी मुस्लिम आकार प्राप्त झाला हे फार विचित्र होते त्यामुळे शिवाजी महाराजांना नाईलाजाने का होईना परंतु सर्व युरोशियन धर्मांना मान द्यावा लागला व मदत करावी लागली पण आता अशा काही मुस्लिम आक्रमणाची शक्यता आहे का हा प्रश्न आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माझ्या मते इस्लामच्या लोकसंख्येचे आक्रमण हे अत्यंत सायलेंट आहे पण ते आहे या आक्रमणाविरुद्ध जर का ह्या ओबीसी ,बीसी आणि आदिवासी लोकांची गरज लागली तर मग पुन्हा एकदा हे लोक त्यावेळेला आलेल्या शिवाजी महाराजांच्या नावाने शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देतीलच कारण जेव्हा संरक्षणाची गरज होते निर्माण होते तेव्हा तेव्हा बरोबर शैव आठवतात अगदी फडणवीसांना सुद्धा जेव्हा जरांगे यांच्याविरुद्धचा संघर्ष हिंसक वळण घेऊ शकतो अशी भीती वाटली तेव्हा आई तुळजाभवानी आणि आई अंबाबाई यांची व यांच्या आशीर्वादाची बरोबर आठवण झाली होती दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या गोष्टी शैवधर्मी लोकांना ओबीसीबीसी आणि आदिवासी लोकांना कळतच नाहीत 


ब्राह्मण धर्मी लोक कधीच एका पिढीचा विचार करत नाहीत ते पुढच्या चार पिढ्यांचा विचार करून आपल्या चाली खेळत असतात भाजपमध्ये मोदी यांच्यामुळे ब्राह्मण धर्माला छेद बसेल असे वाटले होते पण प्रत्यक्षात असे खरोखर घडले आहे की नाही हा आता प्रश्न पडावा अशा काही गोष्टी समोर येत आहेत एक गोष्ट मात्र नक्की आहे ज्या दिवशी शैवधर्मी लोकांना असे वाटेल की मोदी हे आपले नेते नाहीत त्या दिवशी मोदी सत्तेवर राहणार नाहीत त्यांच्या इलेक्शन हरण्याची ही सुरुवात असेल शिवाजी महाराज आमचे होते आणि शेवटच्या बाजीराव विरोधात सर्वात मोठी लढत शैव असलेल्या होळकरांनीच दिली होती दुर्दैवाने नेमके याच वेळेला इंग्रज आले होते अन्यथा होळकरांची पेशवाई सुरू झाली असती आणि शैवधर्म सर्वत्र विजयी झाला असता मुस्लिम आक्रमणाच्या वेळी प्रतिकार करताना राजपूत लोकांच्या बाबतीतही नेमके हेच घडले प्रत्येक वेळेला उदार स्वभाव दाखवायचा आणि शत्रूंनी त्या उदारतेचा फायदा घ्यायचा हे शैव किती वेळा रिपीट करणार आहेत हे एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या पासून आपण काहीच शिकत नाही आहोत हे दुर्दैव ! 

या सगळ्याचा एक परिणाम साफ आहे तो म्हणजे हळूहळू सर्वशैव वीर समाजाचा त्या त्या राज्यात होणारा अस्त! आणि हेच प्लॅनिंग आहे . महाराष्ट्रात मराठा नावाचा समाज जो अत्यंत जाणीवपूर्वक वेगवेगळ्या जातीत आणि जमातीत वाटला गेला तो आता पूर्ण पणे वाटला जाईल आणि यापुढे मराठा केवळ स्वतःला क्षत्रिय म्हणवून घ्यायला लागतील 

प्रश्न असा आहे की भाजपला आणि हिंदुत्वाला हे परवडणार आहे का ? एका अर्थाने स्वतःचीच संरक्षण व्यवस्था भाजप आणि हिंदुत्व काढून घेत आहे याचे परिणाम दोन आहेत एक तर २०८५ च्या आसपास जेव्हा इस्लामचा पूर्णपणे या देशात उदय होईल तेव्हा त्याच्याशी लढायला योग्य ती प्रतिकारशक्तीच समाजात नसेल किंवा मग प्रतिकार करणारे सर्वशैव समाज एकत्र येतील आणि या वेळेला मात्र ब्राह्मण धर्मी लोकांना क्षमा मिळणार नाही अशा प्रकारची क्षमा तुम्हाला वारंवार इतिहासात केली गेली आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ती 21व्या शतकात सुद्धा पुन्हा दिली जाईल कदाचित तुमच्यापैकी काहीजण मुस्लिम धर्माला जाऊन मिळू शकतात आणि ही लढाई पुन्हा एकदा मुस्लिम ब्राह्मण क्षत्रिय युती विरुद्ध प्रतिकार करू पाहणारा आणि संघटित झालेला शैव समाज अशी असेल या भ्रमात ब्राह्मणधर्मी लोकांनी राहू नये की मुस्लिम लोक या वेळेला ब्राह्मणधर्मी लोकांना क्षमा करतील. एक गोष्ट लक्षात घ्या 1850 पर्यंत या देशांमध्ये मुस्लिम लोकांची संख्या ही पाच टक्के सुद्धा नव्हती आपल्याकडे हा एक फार मोठा गैरसमज आहे की फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या होती सॉरी टू से परंतु ही वस्तुस्थिती नव्हती अगदी जास्तीत जास्त जरी लोकसंख्या गृहीत धरली तरी सुद्धा ही लोकसंख्या दहा ते पंधरा टक्क्यांच्या वर नव्हती हीच वस्तुस्थिती आहे 1850 नंतर अचानक ती प्रचंड प्रमाणात वाढत गेली एकीकडे हिंदू लोक आपली लोकसंख्या कमी करत आणत होते आणि त्याच वेळेला या कालखंडामध्ये मुस्लिम मात्र आपली लोकसंख्या सातत्याने वाढवत होते आणि जगभरात हा फिनोमिना घडलेला आहे तो काही भारतातच घडला असं कोणी समजायचं कारण नाही त्यामुळे बहुसंख्य जेव्हा मुस्लिम होतात तेव्हा काय होते हे आपण जम्मूमध्ये आणि काश्मीरमध्ये अनुभवलेले आहे आता पुन्हा एकदा असंच धर्मांतर करत मुस्लिम म्हणून स्वतःच सिक्युअर आयुष्य तयार करायचं असेल तर मग प्रश्नच नाही प्रश्न फक्त हाच उरेल की या लोकांनी मग हिंदुत्वाचा लढा उभा केला कशाला ? एकंदरीत हिंदुत्ववाद हा अत्यंत चुकीच्या दिशेने चाललेला आहे ही चाल कायम राहिली आणि ब्राह्मणवाद बोकाळत राहिला तर हिंदुत्ववादाचा अस्त 2085 च्या आसपास खुद्द मुस्लिम धर्माकडूनच होईल तेव्हा वीरता विखरून ठेवण्याआधी दहा वेळा विचार करा 

श्रीधर तिळवे नाईक

ब्रिटिश , क्षत्रिय आणि आत्ताचे प्रश्न आरक्षण आणि गॅझेट श्रीधर तिळवे नाईक भाग सहावा 

गेला आठवडा अचानक गॅजेट समोर आणल्यामुळे गॅजेट्स वर चर्चा सुरू आहेत आणि प्रत्येक जण हे सांगतो आहे की या गॅजेट्स मध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचे प्रतिपादन केलेले आहे प्रत्यक्षामध्ये असे काहीही प्रतिपादन त्यामध्ये नाहीये उलट कुणबी आणि मराठा या दोन वेगळ्या जाती आहेत असाच उल्लेख केलेला दिसतो मात्र हा उल्लेख अँग्रीकल्चरल कम्युनिटी असा एकत्र केल्याने असा आभास होतो की हे सर्व काही एक आहे प्रत्यक्षात हे सर्व शेती हा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना एकाच पॅरेग्राफ मध्ये समाविष्ट केले गेलेले आहे या काळामध्ये नेमके काय झाले होते याचे अधिक स्पष्ट प्रतिबिंब सातारा गॅझेट मध्ये आहे या गॅझेटमध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे की मराठा शेती व्यवसायाकडे परतले त्यात return असा शब्द स्पष्टपणे वापरलेला दिसतो आणि त्या पॅराग्राफ च्या शेवटी मराठे काय काय करत आहेत हे सांगितले आहे त्यामध्ये अगदी व्यापार सुद्धा आहे याशिवाय वकील , कामगार , शिपाई असे अनेक व्यवसाय मराठा या लेबल खाली टाकलेले आहेत आणि त्या काळातले मराठा लोक या सर्वच व्यवसायांच्या मध्ये काम करत होते असे सांगितलेले आहे याउलट कुणबी मात्र फक्त शेती करतात कधी शेतकरी म्हणून तर कधी शेतमजूर म्हणून असे स्पष्टपणे सुचवलेले आहे त्यामुळे सातारा गॅजेट हे प्रत्यक्षामध्ये या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत हे सांगते याचा पुरावा म्हणूनच कोर्टात सादर केले जाईल 


या सातारा गॅझेट मध्ये कुणबी आणि मराठा यांच्यात विवाह होतात असे सांगताना सर्वसाधारणपणे मराठा मुलगा आणि कुणबी मुलगी यांच्यात अपवादात्मक वेळेला विवाह होतो आणि मराठा मुलगी आणि कुणबी मुलगा यांच्यात विवाह होताना मात्र तो मराठा अतिशय गरीब असतो तोच फक्त अशा प्रकारचा विवाह करतो असेही सांगितलेले आहे म्हणजेच आंतरजातीय विवाह अपवादात्मकच होते हेच हे गॅजेट सांगत आहे अन्यथा मराठा मराठ्यांच्या मध्ये आणि कुणबी कुणबीच्यामध्येच लग्न करत होते मग हे दोन वर्ग मानता येतील का ? म्हणजे जो आर्थिक दृष्ट्या प्रबळ आहे तो मराठा आणि आर्थिक दृष्ट्या जो कमकुवत आहे आणि शेतीकडे वळला आहे तो कुणबी असे म्हणता येईल का? हा खरा प्रश्न आहे पण मग रोटी बेटीचा व्यवहार सहजरीत्या होत होता का? तर असे दिसत नाही  


मी थोडासा कोल्हापूरच्या गावागावातून हिंडलेला मनुष्य आहे माझा अनुभव सांगतो की रोटी व्यवहार अलीकडच्या काळात घडत होता ही वस्तुस्थिती आहे पण ज्याला बेटी व्यवहार म्हणतात तो काही फारसा आढळत नव्हता आणि याबाबतीत सातारा गॅझेट जे सांगते तीच वस्तुस्थिती आहे की एखादा मराठा जर का गरीब असेल तरच त्याच्या घरातील विवाह हा कुणबी समूहामध्ये होत होता 


आता या सगळ्या नोंदणीच्या आधारे पुन्हा एकदा जर का मराठा जो आता गरीब झालेला आहे तो कुणबी म्हणून स्वतःची नोंद करणार म्हणजेच इथे त्याचा वर्ग म्हणून जो उच्च वर्गामध्ये समावेश होत होता तो उच्चवर्ग हरवल्यामुळे आणि ह्याला शेती मधले धोरण जबाबदार असल्यामुळे तो कुणबी बनणार आहे एकंदर आत्तापर्यंतचा इतिहास बघता आणि या "अर्थ" या संस्थेचा प्रभाव बघता या लोकांनी कितीही ओरडून सांगितले तरी यांना मराठा म्हणून मान मिळणे अशक्य आहे यांना शेवटी धनगरांना जसे धनगर केले गेले वंजारी लोकांना जसे वंजारी केले गेले माळी लोकांना जसे माळी केले गेले तसेच कुणबी केले जाणार आणि मी म्हणतो ते हेच आहे की इथेच मराठा आणि कुणबी अशा दोन स्वतंत्र जाती आता निर्माण होणे अटळ आहे आणि हे असे व्हावे अशीच वैष्णववादाची इच्छा आहे  


मुळातच मराठा हा एक शैव वीर समाज होता आणि त्यामध्ये माळी धनगर वंजारी वगैरे सर्वांचा समावेश होता हे मी अनेकदा सांगितलेले आहे तो व्यवस्थित ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक फोडला कारण शेवटी त्यांची लढाई मराठ्यांशी झाली होती खरे तर हा सर्व फाटाफुटीचा खेळ ब्रिटिशांच्या पासूनच सुरू होतो त्यांना काही करून मराठ्यांना सर्व बाजूंनी दाबून टाकायचे होते आणि ते त्यांनी केले त्यासाठी जनगणना वापरल्या किंबहुना जनगणनेचा उद्देश हाच होता की सर्वांना जातींना छोट्या छोट्या ओळखी द्याव्यात आणि शैव समाज विखुरून पडावेत मनुस्मृती अधिकृतपणे स्वीकारणारी राजवट म्हणजे ब्रिटिश राजवट होय हे आपण अजूनही लक्षात घेत नाही हे स्वीकारण्याचे कारण सुद्धा हेच होते की ती ब्रिटिश लोकांनाही फायदेशीर होती ब्रिटिश सत्ताधारी लोकांना जे अपेक्षित होते ते सर्वत्रच घडत गेलेले दिसते जे सत्ताधारी होते त्या लोकांना त्यांनी व्यवस्थित क्षत्रिय मानत म्हणत त्यांना तनखा देत वेगळे काढले म्हणजेच एका अर्थाने इथल्या नेतृत्व करणाऱ्या वीर समाजाला त्याच्या सैन्यापासून त्यांनी तोडले याचाच दुष्परिणाम म्हणून अनेक मराठा सैनिक विशेषता कोल्हापूर संस्थान सातारा संस्थान या प्रदेशांमध्ये कुणबी म्हणून शेतीकडे वळले या संदर्भात तुकारामाचे उदाहरण घेता येण्याजोगे आहे मूळचा व्यवसायाने वाणी आणि सावकार असलेला हा महापुरुष नंतर शेतीकडे वळलेला दिसतो कारण ज्याला मोक्ष हवा असतो त्याला वैष्णव लोकांच्या मध्ये रणांगणावर राहणे फार कठीण जाते कारण विठ्ठल शेवटी निशस्त्र देव होता त्याची उपासना शस्त्र हातात धरून करता येणे अशक्य होते त्या उलट खंडोबा आणि तुळजाभवानी कायमच हातात शस्त्र धरून असल्याने कळत नकळत रणांगणावरचा मराठा खंडोबा आणि तुळजाभवानीला सोडायला तयार नव्हता त्या उलट कुणबी लोकांना मात्र विठ्ठल आणि खंडोबा तुळजाभवानी यांचा समतोल साधत जगणे शक्य होते कारण नांगर शस्त्र नव्हते तर अस्त्र होते युद्धाच्या वेळेला खंडोबा आणि शांततेच्या काळात विठोबा असे या काळातील कुणबी लोकांचे धोरण दिसते त्या उलट जे जे नॉन कुणबी होते ते मात्र खंडोबा आणि तुळजाभवानी यांच्या भावमार्गात भावतंत्रात पूजा करण्यात मग्न होते कारण राज्य करण्यासाठी तुम्ही सशस्त्र असणे गरजेचे असते त्यामुळेच अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर ताबडतोब भाजपच्या हिंदुत्ववादी लोकांनी विशेषत: मोदी यांनी पुन्हा एकदा हर हर महादेव सुरू केले म्हणजेच अजूनही हिंदुत्वाची युद्ध घोषणा हर हर महादेवच आहे ती जय श्रीराम असा करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला स्वीकार मिळालेला नाही म्हणून मग पुन्हा एकदा हर हर महादेव चे पुनरा आगमन ! 


आता आपण थोडा हैदराबाद गॅजेटचा विचार केला तर तिथे काय दिसते ? तर तिथे कुणबी मराठा ही पूर्णपणे स्वतंत्र जात म्हणून वेगळी काढलेली आहे आणि बाकीच्या सर्व जातींचा उल्लेख वेगळा केलेला आहे त्यामध्ये शिंदे सुद्धा येतात कारण शिंदे या गणाची उदय रेखा ही साताऱ्यापासून सुरू होते आणि ते हैदराबादच्या निजामाच्या क्षेत्रात सुद्धा मराठा म्हणून काम करत होते या गॅझेटमध्ये सुद्धा मराठा कुणबी अडीच ते तीन लाख आणि इतर जे मराठा आहेत जे उच्चकुलीन क्षत्रिय समजतात त्यांना सरळ सरळ वेगळे काढलेले आहे कारण निजामाच्याच काळामध्ये हे लोक स्वतःला उच्च कुलिन क्षत्रिय समजायला लागलेले होते म्हणजेच कोर्टामध्ये प्रत्यक्ष जेव्हा सुनावणी होईल तेव्हा ही सर्व गॅझेट जी सरकारने आता मान्य केलेली आहेत ती मराठा आणि कुणबी असे दोन वेगळे समाज अशा दोन वेगळ्या जाती प्रस्थापित करायला मदतच करतील यांच्याच आधारे मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगळ्या काढल्या जातील आणि जी अपेक्षित फूट आहे ती पडेल आणि मी म्हणतो त्याप्रमाणे जो अजेंडा बाराव्या शतकात सुरू झाला तो एका अर्थाने आता पूर्ण होईल . 


जरांगे यांना हे सर्व राजकारण कळत असेल का? याबद्दल मला स्वतःला प्रचंड शंका आहेत कारण भल्या भल्या पुरोगामी लोकांनाही ते कळत नाही म्हणून तर ते हिंदुत्ववादा पुढे हरले मनोज जरांगे यांना असे वाटते की गॅझेट मध्ये अँग्रीकल्चरल कम्युनिटी मध्ये मराठ्यांचा उल्लेख आहे म्हणजे त्यांचा कुणबी म्हणूनच उल्लेख आहे प्रत्यक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी कुणबी मराठा असे प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र लोकसंख्या देत वेगळे काढले गेलेले आहेत आणि शेती हा व्यवसाय मानत शेती करणारे लोक एका कॅटेगरीमध्ये घेतलेले आहेत प्रॉब्लेम असा आहे की शेती हा व्यवसाय करणे हे मागासलेपणाचे लक्षण मानले जाऊ शकत नाही अन्यथा शरद पवार सुप्रिया सुळे आणि असे अनेक नेते कागदपत्रांच्यावर शेतकरी आहेत अनेक करोडपती कागदावर शेतकरी आहेत बॉलीवूड मधले स्टार सुद्धा अगदी अमिताभ बच्चन सुद्धा शेतकरी आहेत तेव्हा शेती हा व्यवसाय सामाजिक मागासलेपणाचे लक्षण होऊ शकत नाही आणि हे फडणवीस यांना व्यवस्थित माहित आहे त्यामुळे त्यांनी अत्यंत शिताफीने हा चेंडू कोर्टाच्या दरबारात टाकलेला आहे तिथे काय निर्णय होणार हे स्पष्ट आहे . किंबहुना ब्राह्मणांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच असते कि ते सर्वात प्रथम शेवट बघतात आणि मग स्वतःची योजना आखायला सुरुवात करतात . 


थोडक्यात काय जरांगे युद्ध जिंकलेले आहेत पण तहात हरवलेले आहेत आता कोर्टातला निर्णय सांगेल की ते हरले आहेत की जिंकले आहेत शक्यता हरण्याचीच जास्त दिसते अर्थात हे आता सांगणे अडचणीचे आहे हे मला माहित आहे पण हे सत्य अनेक लोक सांगतच आहेत फक्त त्यांनी न सांगितलेले मुद्दे मी इथे घेतले एवढेच 


भारतीय वीर समाज हे वैष्णव आणि हिंदू झाल्यापासून नेहमीच लढाया जिंकतात प्राण गमावतात आणि मग जिंकलेला प्रदेश परत करतात गजनी पासून ते पाकिस्तान युद्धापर्यंत हेच घडलेले आहे मात्र शत्रूने उदाहरणार्थ चीनने जिंकलेला प्रदेश म्हणजे उदाहरणार्थ तिबेट अजून सुद्धा परत केलेला नाही हे ते विसरतात हे घडते कारण हे सगळे रामायणाचे साईड इफेक्ट आहेत म्हणजे अयोध्यातले आपले सैनिक आणायचे नाहीत भरत आणि शत्रुघ्न यांना आणायचे नाही तर अनार्य म्हणजे शैव लोकांचेच सैनिक सोबत घ्यायचे त्यांनाच मरायला पाठवायचे त्यांच्यातल्याच वाली आणि सुग्रीव या संघर्षाचा फायदा घेऊन वाली सारख्या महायोद्धाला कपटाने संपवायचे जे उरलेले मूर्ख आहेत त्यांना सोबत घ्यायचे त्यांच्याकडून जे आपल्याला हवे ते घ्यायचे आणि स्वतःच्या अंगाला फार काहीही लावून न घेता विमानात बसून स्वतःच्या राजधानीत परतायचे देवेंद्र फडणवीस यांनी हेच केलेले आहे त्यांनी मराठ्यांनाच म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे नेते जरांगे यांच्या पुढे पाठवले त्यांच्याकडूनच स्वतःला हवा असलेला तह घडवून आणला आता या तहाची जबाबदारी मराठे लोकांच्या वरच पडणार आहे म्हणजे कोर्टात हे आरक्षण जेव्हा कोसळेल तेव्हा फडणवीस म्हणतील की हा तह काही मी केला नव्हता तो तर खुद्द मराठे लोकांनीच केलेला होता याला मी राम धोरण म्हणतो याला आमच्या गावच्या भाषेत दुसऱ्याच्या काठीने साप बडवणे आणि मारणे म्हणतात म्हणजे "बाबरी मशिद सुद्धा आम्ही पाडणार नाही तुम्ही सगळे वीर आहात जा आणि पाडा नंतर मंदिर बांधायला आम्ही येतो सगळा पैसा आम्हीच गोळा करतो तुम्ही पैशाचा हिशेब विचारायचा नाही "


असो जोपर्यंत बहुजन xx आहेत तोपर्यंत त्यांना आणखी xx कायमच बनवले जाणार त्यांना शहाणे करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यांना शैव श्रुती अथवा बौद्ध धम्म देणे त्यातील बौद्ध धर्माची शक्यता संपल्यानेच मी आता शैव श्रुतीचा आणि त्यातील धर्मांचा मी उल्लेख करत असतो जैन धर्माचा उल्लेख मी करत नाही कारण हा धर्म आता स्पष्ट आणि स्वच्छपणाने ब्राह्मण धर्माला जाऊन मिळालेला आहे तो जर का वर्ण जाती व्यवस्थेतून पुन्हा बाहेर पडला भगवान महावीर यांच्या मूळ धम्माकडे उद्देशाकडे परतला तर मात्र त्याचेही स्वागत आहे


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे