अक्ष , अपरोक्ष आणि चिन्हकी श्रीधर तिळवे नाईक
मराठी भाषेमध्ये जे काही शब्द पूर्णपणे distorte झाले त्यामध्ये कदाचित अपरोक्ष या शब्दाचा प्रथम क्रमांक लागावा मराठी ही अशी एकमेव संस्कृती आहे जिथे शैव धर्मी शब्द अजूनही वापरत असतात म्हणजे ध्यानासाठी असलेला छान हा शैव शब्द फक्त मराठी भाषेतच तुम्हाला उपलब्ध दिसेल आणि अलीकडे तो चायना मध्ये गेल्याने चायना मध्ये ध्यानाला छानच म्हणतात . अपरोक्ष या शब्दाचे सुद्धा असेच झालेले आहे मात्र त्याचा नेमका अर्थ आता मराठी लोक विसरून गेलेत कारण मराठी लोक हल्ली विठ्ठलवादी झालेले आहेत
मराठीमध्ये आपण सर्रास "त्याच्या अपरोक्ष आपण हे काम केले ''असे म्हटले जाते म्हणजेच तो नसताना त्याच्या अनुपस्थितीत अशा प्रकारचा अर्थ अपरोक्ष या शब्दाला प्राप्त झालेला आहे प्रत्यक्षामध्ये त्याचा अर्थ परोक्ष नाही ते अपरोक्ष म्हणजेच परोक्षाच्या अनुपस्थितीत जे परोक्षाला सादर करत असते ते अपरोक्ष होय
म्हणजेच एका अर्थाने प्रत्यक्षाच्या अनुपस्थितीत जे जीवामध्ये घडते ते परोक्ष आणि परोक्षाच्या अनुपस्थितीत जे जीवांच्या पुढे घडत असते सादर होत असते ते अपरोक्ष होय . हे सर्वसाधारणपणे चिन्हकीच्याद्वारे केले जाते. भाषा ही चिन्हकीचे अतिशय महत्त्वाचे अंग असल्याने अनेकदा अपरोक्ष हे नेहमीच भाषेच्याद्वारे सादर होताना अधिकाधिक दिसते .भाषेला प्रत्यक्ष सादर करणे कधी शक्य नसते त्यामुळेच भाषा फक्त अपरोक्ष सादर करू शकते म्हणजेच माणसाच्या किंवा जीवाच्या आत प्रत्यक्ष विषयी जे परोक्ष तयार होते ते भाषा सादर करू शकते. आपल्या सर्व चिन्हकीच्या व्यवहारामध्ये एप्लीकेशन मध्ये हे अतिशय आद्य प्रमेय आहे आणि दुर्दैवाने त्याकडे पाश्चात्य तत्व धारेने दुर्लक्ष केल्यामुळे आपण सुद्धा पाश्चात पद्धतीला शरण जात दुर्लक्ष करत असतो .पाश्चिमात्य लोकांना सर्व अक्कल दिलेली आहे अशी समजूत झाल्याने आपल्याकडे ह्या चुका होत असतात
प्राचीन काळी हे अपरोक्ष अतिशय मर्यादित होते कारण मुळातच चिन्हसृष्टी प्रभावी असली तरी ती केंद्रस्थानी आलेली नव्हती चौथ्या नव्हते मध्ये मात्र अचानक ती केंद्रस्थानी आली किंवा चिन्हसृष्टी प्रचंड प्रभावी झाल्याने व मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी आल्याने चौथी नव्हता निर्माण झाली आणि अपरोक्षाचा विचार फार महत्त्वाचा बनत चाललेला आहे एकेकाळी अपरोक्षाला हुबेहूब प्रत्यक्ष निर्माण करणे अशक्य बनत होते कारण फक्त भाषाच मुख्य चिन्हकी होती भाषा ही अनेकदा हुबेहूबीकरण करण्यात अपयशी ठरते त्यामुळे अपरोक्ष हे स्पष्टपणे वेगळे काढून दाखवता येत होते पण अचानक दृश्य भाषेमध्ये क्रांती होत गेली आणि डिजिटल क्रांतीने दृश्यतेचे हुबेहूबीकरण प्रचंड वाढवत नेऊन शेवटी ते शंभर टक्के आणि नंतर हळूहळू ते स्पेशल इफेक्ट, विजुअल इफेक्ट टाकत एकशे दहा टक्के 120% असे enhance करत नेले आणि आज अवस्था असे आहे की अपरोक्ष हेच प्रत्यक्षापेक्षासुद्धा सुंदर वाटायला लागले आहे .या एका क्रांतीमुळे मानवी जीवन संपूर्ण बदललेले आहे आज आपण तिला चौथी नवता म्हणतो किंवा चिन्हक्रांती म्हणतो कारण चिन्ह वस्तू semiodities निर्माण होणे हे सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेले दिसते इतकेच नव्हे तर चिन्ह वस्तूंना निर्माण करणारे संगणकांच्या सारखी चिन्हयंत्रे आणि चिन्ह तंत्रे प्रचंड वेगाने विकसित होत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे नवीन योग व युग निर्माण करत आहेत अपरोक्ष हे जर का असेच वाढत राहिले तर त्याचा नेमका परिणाम काय होईल याचा अंदाज अजूनही कोणाला येत नाही फक्त आपल्याजवळ एक भीती उरलेली आहे ती म्हणजे हे अपरोक्ष प्रत्यक्षाला खाऊन टाकेल
मला स्वतःला हे अशक्य वाटण्याचे कारण एकच आहे ते म्हणजे शिवाची उपस्थिती ! मानवी जीवनामध्ये शिव हा नेहमी प्राण म्हणून उपस्थित असतो आरटीफिशियल इंटेलिजन्स कितीही डेव्हलप झाला तरी तो प्राण निर्माण करू शकेल का हा माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे आपण मृत्यूला नेहमीच प्राण जाणे किंवा प्राणज्योत मालवली असे म्हणतो कारण जे जीवन आहे ते प्राणामुळेच अस्तित्वात असते यालाच आध्यात्मिक भाषेत पुढे जाऊन शिवाशिवाय शक्ती म्हणजे शव होय असे म्हटले जाते कारण प्राणाशिवाय जीव म्हणजे मृतदेह होय अलीकडे अनेकदा वैष्णव आणि हिंदू लोक हे वचन नेमके उलटे बोलतात जे काही उरेल ते कितीही ऍक्टिव्ह असले तरी प्राण नसल्यावर शव काय करू शकेल ?
मला जर का कोणी या चिन्हसृष्टीय क्रांतीची अंतिम (अचीवमेंट )प्राप्ती कुठली असा प्रश्न विचारला तर माझे उत्तर आहे प्राण निर्माण करणे
बघू ,आरटीफिशियल इंटेलिजन्सला प्राण निर्माण करणे जमते काय ?
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment