अवधूत परळकर यांना दिलेले उत्तर ते म्हणतात

Shridhar Tilve ज्यांना प्रश्न कळतात त्यांना नाहीच सापडत सोल्युशन. ज्यांच्यापाशी सोल्यूशन आहे त्यांना ते कोणत्या प्रश्नाचे सोल्युशन आहे कळत नाही.


जी ए कुलकर्णी स्टाईल उत्तर.


माझे उत्तर

Awdhoot Parelkar सर माझ्यापुरते एक सोल्युशन आहे ते म्हणजे धर्म नाकारायचा आणि मोक्ष स्वीकारायचा निर्वाण स्वीकारायचे कैवल्य स्वीकारायचे प्रत्येक देशाची स्वतःची म्हणून एक धारा असते किंबहुना परंपरा आणि धारा यांच्यामध्ये फरक हाच असतो परंपरा जुन्याकडे घेऊन जाते तर धारा काही नवी सोल्युशन सुचवण्या इतपत मोकळी असते मोक्ष ही या देशातील कायमच एवर ग्रीन गोष्ट आहे आणि नवे नवे मोक्षक (सिद्ध आणि बुद्ध) ती अधिकाधिक नवीन करत असतात त्यामुळे ठामपणे उभे राहणारा धर्म आणि सतत कात टाकणारी मोक्ष धारा यांच्यात कायमच संघर्ष होत राहतो आणि प्रत्येक सिद्ध आणि बुद्ध हा संघर्ष आपल्या पद्धतीने लढत असतात तेव्हा धर्माविरोधात जर का समाजवादाने मोक्ष स्वीकारला असता तर ही लढाई खूप व्यवस्थित झाली असती मी समाजवादाकडून आंबेडकरवादाकडे गेलो याचे कारण हेच होते आंबेडकरांनी निर्वाण संकल्पना स्वीकारली होती त्या संकल्पनेचे त्यांचे अर्थ निर्णयन मात्र मोक्षाच्या अभावी नको तितके जडवादी झाले होते माझ्यासाठी ते स्वीकार करण्याजोगे नव्हते आणि नाही . भगवान शंकरांची किंवा भगवान बुद्धाची निर्वाण संकल्पना जडवादी नाही किंवा ती सामाजिक ही नाही मात्र ती कल्याणवादी आहे तेव्हा मोक्ष स्वीकारा सोलुशन समोरच आहे पण ते घ्यायचे नाही अशी समाजवाद्यांची अवस्था आहे निदान यदा कदाचित जडवाद सोडायचा नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांची निर्वाण संकल्पना तरी घेता येतेच आणि मग धर्मांच्या वर टीका करता येते धर्म साईडलाईन करता येतो मी स्वतः एक गोष्ट नेहमीच मांडत असतो ती म्हणजे शैव श्रुतीमध्ये अर्थ काम आणि मोक्ष हे तीन अक्ष आहेत धर्म हा अक्ष या श्रुतीचा भाग नाही एकदा ही भूमिका घेतली की धर्म नाहीसा करता येतो असो 


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे