इंद , हिंद ,मेलूहा समाज श्रीधर तिळवे नाईक 

भारतामध्ये हिंदू आणि मेलुहा या शब्दाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि मला पुन्हा एकदा इथे सांगायचे आहे की मूळ शब्द इंदू इंद हाच होता आणि त्यापासूनच नंतरच्या शब्दांची उत्पत्ती झालेली आहे भारतामध्ये शैव लोकांनी ज्या काही देणग्या दिल्या त्यामधली एक म्हणजे त्यांचे शैव कॅलेंडर भारतातले शैव कॅलेंडर हे नेहमीच पक्ष मानते आठवडा नाही सप्ताह नाही हे लक्षात घेतले पाहिजे 27 नक्षत्रांचा खेळ इथे चालतो आणि वार नसून तिथी महत्त्वाचे असते आणि ही तिथी चंद्राला धरून असते म्हणून त्याला इंदू म्हणजेच चंद्राचे कॅलेंडर म्हणतात हे कॅलेंडर पाळणारे जाणणारे लोक म्हणजे इंदू लोक होय आतूनच पुढे हिंद हा शब्द आलेला आहे आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी सतत वापरलेला हिंदवी हा शब्द आलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे भारतीय समाजाला हिंदवी समाज म्हणा असे मी नेहमी सांगत असतो त्याचे कारण हिंदवी हा शब्द सुद्धा इंदू पासून आलेला आहे.


ही चर्चा करताना १८९४ मध्ये नेपाळमधील सापडलेल्या रुम्मिनदेई स्तंभलेखाचा उल्लेख वारंवार केला जातो याचे कारण इतरत्र नसलेला पण इथे असलेला उल्लेख तो उल्लेख हिंद या शब्दाशी निगडित आहे स्तंभ लेखाचा मूळ पाठ पुढीलप्रमाणे आहे


रुम्मिनदेई स्तम्भलेख : मूलपाठ

१ – देवानंपियेन पियदसिन लाजिन वीसति-वसाभिसितेन


२ – अतन आगाच महीयिते हिद बुधे जाते सक्य-मुनी ति [ । ]


३ – सिला-विगड-भीचा१ कालापित सिला-थमे ( -थभे ) च उसपापिते [ । ]


४ – हिंद भगवं२ जाते ति लुंमिनि-गामे उबलिके कटे


५ – अठ-भागिये च [ ॥ ]


इथे बुद्धाचा उल्लेख हिंद भगवन असा केलेला आहे त्याचा अर्थ हिंद या प्रदेशाचा भगवन असा होतो बुद्धाचा जन्म लुंबिनी मध्ये झाला आणि तो जन्माने नेपाळी होता हे इथे स्पष्ट आहे पण हे आपण वर्तमानाच्या अंगाने म्हणू शकतो परंतु प्रत्यक्ष त्या काळात नेपाळ हा सुद्धा हिंदचा भाग होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे नेपाळचा प्राचीन राजवंश हा मल्ल होता तर बुद्धाची माता कोळी होती हे लक्षात घेतले तर बुद्धाचे असलेले व्यापारी लोकांचे नाते स्पष्ट होईल. या समाजाची चर्चा पुढे आता घेतच आहे.


मी नेहमीच एक गोष्ट सातत्याने मांडत असतो ती म्हणजे या देशाचे नाव कायमच इंदू होते आणि त्याचा संबंध थेट चंद्र केंद्री कालगणनेशी आहे . कुठल्याही सिंधू नावाच्या नदीशी नाही . मग नेपाळमध्ये आपणाला हा उल्लेख का दिसतो याचे कारण स्पष्ट आहे कारण नेपाळचा संबंध चायनाच्या संस्कृतीशी अधिक चांगला होता आणि चायनीज प्रवासी नेहमीच भारताचा उल्लेख करताना हिंद असा करतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे अनेकदा फक्त पाश्चात्त्य देशांच्या कडे पाहिले जाते आता तिथे सुद्धा मेगास्टिनीस यांनी केलेल्या पुस्तकाचा उल्लेख इंडिका म्हणजेच इंडिका असा आहे इंदिका असा आहे 


दुसरा उल्लेख जो आफ्रिकेमध्ये आपणाला दिसतो तो मेलूहा असा आहे त्याचा स्पष्ट आणि स्वच्छअर्थ मल्ल लोकांचा देश असा आहे प्राचीन काळामध्ये व्यापारी लोकांशी आलेल्या संपर्कातून ही संज्ञा तयार झालेली मल्ल हा शब्द मल्लाह पासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ जे पाण्यावर नौका चालवू शकतात असे लोक म्हणजेच वाणी आणि पणी लोक असा होतो आफ्रिकेमधील लोकांचा संबंध या वाहने आणि पाणी लोकांशी होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे त्यांना मेलोहा मध्ये कोणते राजे होते याविषयी काहीही देणे घेणे नव्हते त्यामुळे भारतातल्या राजवटी विषयी त्यांना काही माहिती नाही ज्याप्रमाणे इथल्या मेलो हा लोकांना आफ्रिकेमध्ये कुठल्या राजवटी होत्या याविषयी कसलेही देणे घेणे नव्हते फक्त आपला व्यापार कसा चालेल हे दोन्ही कडचे व्यापारी पाहत होते मुळात व्यापारी लोकांच्या वर त्या काळामध्ये संपूर्ण प्रभुत्व मिळवणे कोणाला शक्य नव्हते राजांचे लक्ष प्रामुख्याने झोप येणारा म** आहे जो येणारा म** आहे त्याच्यावर होते किंबहुना महाला शब्द सुद्धा म** हा शब्द सुद्धा माल हा शब्द सुद्धा मल्ल पासूनच तयार झालेला आहे जय मल्हार लोक घेऊन येतात तो माल होय आजचा मॉल हा शब्द सुद्धा या मालापासूनच तयार झालेला आहे माला या शब्दाचा अर्थ सुद्धा सर्व मालाची गुंफण या अर्थाने पण आहे माळ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माल उतरवण्याची जागा होय . अनेकदा येथे भटके आणि व्यापारी लोक आपले तंबू टाकत आणि माल उतरवत 


माल विकतात ते मल्ल हे साधारण दिसतेच पण मल्ल नेमके कुठून आले हा एक वादग्रस्त प्रश्न आहे कारण मल्ल पासून निषाद तयार झाले की निशादांच्या पासून मल्ल आले हा एक फार मोठा गुंतागुंतीचा प्रॉब्लेम आहे . हे सर्वशैव इतिहासाशी निगडित असल्याने त्यावर फारसे मटेरियल उपलब्ध नाही आणि यासंदर्भातल्या मौखिक परंपरा या जवळजवळ आता नाहीशा झालेत कारण मुळातच उत्तर प्रदेश आणि बिहार आणि मध्य प्रदेश आणि ओरिसा काही प्रमाणात या संदर्भातले मटेरियल जास्त मोठ्या प्रमाणात राखून होते इथे वैष्णव धर्माचा प्रचार झाल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी नष्ट केल्या सिंधू संस्कृतीच्या पतनानंतर जंगलामध्ये गेलेले आणि पुन्हा आदिवासी जीवन स्वीकारलेल्या लोकांच्या अनेक पुराव्याच्या गोष्टी या हळूहळू नामशेष झाल्या मात्र तिथे ज्या कथा येतात त्यावरून आपणाला काही अंदाज येतो


सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हे सर्व लोक पणी होते आणि पाण्याशी निगडित असल्यानेच त्यांना पणी हा शब्द मिळाला होता त्या काळामध्ये रस्ते बांधणे अतिशय कठीण होते ज्या पायवाटा वाटा निर्माण होतील त्याच पण नद्या मात्र खोल् आणि खुल्या होत्या आणि मुख्य म्हणजे चांगल्या अवस्थेत होत्या त्यामुळे साहजिकच नदीमार्फत व्यापार करणे हे सर्व लोकांना परवडणारे होते 


पणण लोकांचे समुदायांमध्ये सर्वसाधारणपणे पुढील समाज होते 


१ नावाडी(नाखवा ) आणि नाविक : हे लोक साधारणपणे नावांशी रिलेटेड होते नावाडी होते ते नाव चालवत तर नाविक जे होते ते नावा बनवत पुढे पुढे या नावा अधिक मोठ्या होत गेल्या आणि त्यासाठी स्पेशल सुतार निर्माण झाले यांनाच उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने मल्लाह म्हटले जाईल आणि मल्लारी हा एकेकाळी या लोकांचा देव होता याच लोकांच्यातून पुढे मल्ल नावाचा गण उदयाला आला पुढे पुढे कुस्ती हा जो खेळ उदयाला आला त्याचे कारण नावा चालवून चालवून या लोकांचे शरीर अतिशय पिळदार बनलेले असायचे आणि कुस्ती ही मुळातच नाव चालवण्याची ताकद नावाड्यामध्ये आलेली आहे की नाही हे आजमावण्यासाठी उत्तम खेळ होता पण त्यातूनच मग हातपाय शस्त्र विकसित होत गेले मग काठी कारण पहिले शस्त्र हे एका अर्थाने नाव चालवायला लागणारी काठी होती ही काठी अधिकाधिक विकसित होत गेली तिचाच पुढे भाला बनला कालांतराने धनुष्य बाण ! कारण पाणी रेटण्याची कला अधिक स्मार्ट बनत गेली उत्तर भारतात अनेक ठिकाणी हे लोक मल्लाह आणि मांझी म्हणून ओळखले जातात प्राचीन काळामध्ये मल्ल गणातील लोकांची सेवा करणारे म्हणून हे नाव उदयाला आले आणि ते पसरत गेले प्रामुख्याने सरकारी कामाशी निगडित असल्याने त्यांना अधिक चांगला दर्जा प्राप्त होत गेला 


२ महादेव कोळी :हे कोळी होते आणि पुजारीही होते याचे सर्वात मोठे कारणच हे होते की शैव लिंगांना जलाभिषेक सक्तीचा असल्याने आणि भाविकांना स्नान करून येणे गरजेचे असल्याने शैव लिंगांना सतत जलाभिषेक करत यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे याच लोकांना शक्य होते साहजिकच देऊळ साफ करण्यासाठी लागणारे पाणी नदीपासून आणणे आणि शिवलिंगावर पाणी ओतून जलाभिषेक करणे हे या लोकांना जास्त शक्य होते आणि त्यामुळेच पुजारी म्हणून आपसूकच हे लोक उदयाला आले . आणि त्यातूनच काही लोकांच्यावर कायमस्वरूपी ही जबाबदारी पडत हळूहळू हा समाज बनत वाढत गेला पुढे जबाबदारी कायमची टाकण्यात आली आणि या लोकांनी व्यापार बंद केला आणि हे 24 तास पुरोहित बनले महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे ओरिजनल पुजारी हे महादेव कोळी आहेत ज्यांना शांभवी ब्राह्मण किंवा सारस्वत ब्राह्मण म्हंटले जाते ते मुळचे महादेव कोळी आहेत. अनेक सर्व मंदिरात महादेव कोळी पुरोहित होते त्यांना पेशवाई मध्ये कुठल्या कुठल्या मंदिरातून कसे कसे हाकलले गेले हा फार मोठा इतिहास आहे अगदी शांभवी ब्राह्मणांना किंवा सारस्वत ब्राह्मणांना आजही ब्राह्मण म्हणून मान्यता दिली जात नाही अनेक अन्न संशय असतो कारण ते मूळचे महादेव कोळी आहे ते व्यवस्थित सर्वांना माहिती आहे फक्त जीएसबी लोक आपण शूद्र वर्णात जाऊ ही भीती वाटत असल्याने ही गोष्ट नाकारत असतात खुद्द विठ्ठलाचे मंदिर सुद्धा महादेव कोळ्यांचेच मंदिर होते आणि विठ्ठल हा शैव देवता होता अगदी काशीची सुद्धा मालकी याच लोकांच्याकडे होती ती सुद्धा हळूहळू काढून घेण्यात आली 


३ मिठागरी महाराष्ट्रात आगरी: मीठ हे अन्नासाठी किती आवश्यक आहे हे सांगणे न लगे . समुद्राच्या काठी असलेल्या कोळी लोकांनी नेमकी कधीपासून मीठ बनवायला सुरुवात केली हे सांगणे अशक्य आहे मूळचे कोळी असलेले जे लोक मीठ बनवायला शिकले ते वेगळे होत त्यांच्यापासून मिठागरी समाज तयार झाला मिठाची आगरे यां लोकांच्याकडे असल्याने त्यांना वैष्णव जाणीवपूर्वक बनवणे फार गरजेचे बनत गेले आणि ती प्रक्रिया अजूनही चालू आहे पण हे सगळे मूळचे शैव होते आणि कधी ना कधीतरी त्यांना हे कळेलच 

४ निषाद : जे कोळी नंतर शेती करायला शिकले ते निषाद झाले पाशुपतदर्शनाचा अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा असा ज्याला अलीकडे बळी वंश म्हणतात तो हिरण्य वंश निषाद वंशातूनच आलेला आहे नंतरच्या काळात वैष्णव बनलेल्या यादवांशी त्यामुळेच या लोकांचे सतत युद्ध चाललेले असते. एका अर्थाने ज्या पणी लोकांनी शस्त्रे उचलून हळूहळू आपली सत्ता निर्माण केली राजसत्ता निर्माण केली ते शासक बनत गेले आणि त्यांच्यातून निषाद निर्माण झाले दुर्दैवाने यांना इसवी सन पूर्व १५०० च्या आसपास सिंधू संस्कृतीचे प्रभुत्व कमी झाल्यानंतर जंगलात जाऊन राहावे लागले त्यामुळे महाभारतामध्ये हे दुय्यम होत गेले पण तरीही एकलव्य हा अर्जुनाच्या आणि कर्णाच्या तोडीस तोड होता ही वस्तुस्थिती त्याचा मागितला गेलेला अंगठा आणि त्याने कापून दिलेला अंगठा आता अजराअमर झालेला आहे . अर्थातच शेवटी निषाद आणि यादव युद्धात यादव लोक स्वतःतच आपापसात भांडून नष्ट झाल्याने फक्त श्रीकृष्ण उरला आणि शेवटी त्यालाही एका निषादाने संपवले आणि हे वैर कायमचे संपले मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यादव सुद्धा वीरयोद्धे होते आणि निशांत सुद्धा वीर योद्धे होते किंबहुना ही एका अर्थाने प्रभुत्वाची लढाई होती आणि ती निदान महाभारत काळात तरी निषाद लोकांनी जिंकली. 


५ केवट : हे कोळी लोकांच्या मधले अतिशय कट्टर असे लोक होते त्यांनी शेती करायला ठाम नकार दिला आणि आपला नावा बनवण्याचा उद्योग कायम स्वरूपात स्वीकारला पुढे पुढे नावा चालवणारे लोक कमी होत गेले तसे हे लोक नाव सुद्धा चालवू लागले आज अनेकदा आपण नाव असा शब्द तुझे नाव काय माझे नाव काय तुझे आडनाव काय अशा रूपात वापरत असतो त्याची सुरुवात या लोकांनी केली असे म्हणतात . आपण नाव म्हणतो आणि त्यावरून आपली ओळख निश्चित करतो यावरूनच पणी लोकांचा किती प्रभाव आपल्यावर आहे हे स्पष्ट व्हावे 

६ मल्ल :हे सरळ सरळ राजे बनत गेले आणि हा या लोकांच्यातून उदयाला आलेला शासक समुदाय होता यांचे स्वतंत्र गण होते आणि ते संपूर्ण भारतभर अस्तित्वात असलेले दिसतात यांचेही हे कट्टर शैव असल्याने नंतर महाभारतात यादवांचे शत्रू म्हणून चित्रण झालेले दिसते जरासंध हा अत्यंत उत्तम योद्धा होता श्रीकृष्णाने त्याला भिमाच्या साह्याने कसे हरवले याच्या कथा येतातच बौद्ध वाङ्मयामध्ये सुद्धा अंगुत्तर निकाय मध्ये त्यांचा उल्लेख एक स्वतंत्र जनपद म्हणून आहे 

७ लिच्छवी: हे लोक प्रामुख्याने मोक्षधारणा प्रबळ असल्याने वेगळे होतात महावीर आणि बुद्ध हे दोघेही मृत्यूसाठी मल्ल गणाची निवड करतात मात्र महावीरांचा जन्म हा लीच्छवी लोकांच्यात झालेला आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे यांना नंतर क्षत्रिय म्हणण्यात आले तरी हे मूळचे पणी लोक आहेत आणि व्यापारी आहेत जैन धर्मामध्ये सर्वाधिक व्यापारी का आहेत या गोष्टीचे साधे आणि सरळ उत्तर महावीर हे स्वतः व्यापारी वर्गातून आले होते हे आहे पण ते स्वीकारणे अनेकांना जड जाते हे एकाच वेळेला शासक पण होते आणि व्यापारीही होते एका अर्थाने हे मर्कंटाइल स्टेट होते त्यांचे मल्ल लोकांशी सतत असलेले वैर हा एक फार मोठा गुंतागुंतीचा प्रकार आहे. हे लोक बुद्धिबळाला जास्त महत्व देत तर मल्ल शारीरिक बाळाला त्यामुळे वेगळे वाटतात. पण दोघांचेही उगमस्थान एकच आहे 

८ वाणी :हे हळूहळू विकसित होत गेले कारण काही नाव चालवणारे लोक माल स्वतःच आणायचा आणि स्वतःच विकायचा असे करू लागले हळू हळू या लोकांनी नावा चालवणे बंद करून त्यासाठी स्वतंत्र नाविक नेमले आणि हे फक्त माल गोळा करायला येऊ लागले त्यातूनच मग माल वाहन करणारे ते वहाणी व पुढे वाणी असे समीकरण रूढ होत गेले आणि हे दुकान थाटून पिढी थाटून आपला माल विकू लागले नदीकाठी आलेल्या मालाला प्रामुख्याने बैलगाडी मध्ये सरकवणारे लोक यातूनच निर्माण होत गेले


९ सुतार : मालाची निर्माण क्षमता वाढत गेली तसे तसे त्यांचे वहन करणारे लोक निर्माण व्हायला लागले आणि वाहनांची आवश्यकता ही वाढली सुरुवातीच्या काळामध्ये भगवान शंकरांच्या काळात हत्तीवरून देवाण-घेवाण होत होती परंतु पुढे बैलगाडीचा विकास झाला(भगवान शंकर बैलावरून बसून लग्नाला येतात पण बैलगाडीत बसत नाही ते लक्षात घेण्याजोगे आहेत याचा अर्थ बैलगाडीचा शोध लागण्याआधी ते होऊन गेले असा होतो त्यांच्या संदर्भात घोड्यांचा तर उल्लेख सुद्धा येत नाही याचा अर्थ ते आर्य लोकांच्या वेदांच्या आधीच होऊन गेलेले आहेत ) आणि बैलगाड्या लाकडांच्या पासून तयार होत असल्याने साहजिकच सुतार समाजाला स्वतंत्रपणाने बैलगाड्या निर्माण करायला लागल्या याशिवाय लाकडांच्या पासून तयार होणारे सामान सुद्धा सुतार निर्माण करू लागले आणि लाकडाचा माल तयार करणारे लोक ते सुतार असा एक वेगळा सुत किंवा सुतार समाज तयार झाला कर्ण हा या समाजातून आला होता त्याला सुतपुत्र म्हणून हिणवले गेले असले तरी प्रत्यक्षात तो केवळ रथ तयार करत नव्हता तर त्याला रथ चालवता येत होता आणि तो उत्कृष्ट महारथी होता यांच्यातून आणि वडारी समाजातून पुढे स्थापत्यकार निर्माण झाले 


१० वंजारी :बैलगाड्यांचा शोध लागल्यानंतर मात्र वाहन अतिशय उत्तम होऊ लागले आणि साहजिकच यातून एक मोठा समाजच निर्माण झाला तो म्हणजे वंजारी होय मालाचे दळणवळण करणे हे या लोकांचे प्रमुख काम होते माल घेणे आणि पोहोचवणे असा हा एक मोठा प्रचंड उद्योगच निर्माण झाला आज सुद्धा भारतात साधारणपणे 80 लाखाच्या आसपास हा समाज आहे ब्रिटिश काळात त्याला घरघर लागली कारण रेल्वे आली पण तोपर्यंत हा अतिशय श्रीमंत समाज होता आणि तो वाणीपणी समाजाचा भाग होता हे लक्षात घेतले पाहिजे 


११ बंजारी :कुठलाही दीर्घ प्रवास हा अत्यंत कंटाळवाणा असतो साहजिकच मनोरंजन ही त्याची गरज भाग असते ही गरज भागवण्यासाठीच कलावंतांचा एक मोठा भाग हा व्यापारी लोकांशी जोडला गेला आणि त्यातूनच मग बंजारी असा एक नवीन समाज निर्माण झाला हा समाज वंजारी समाजाचा भाग होता की नाही असा एक फार मोठा वादाचा प्रश्न सतत निर्माण होतो आणि याचे अद्यापही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही मात्र एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे हे लोक उत्तम संगीत आणि गाणे जाणत होते .


१२ यक्षक: हा समाज अर्थातच व्यापारी तांडांच्या संरक्षणासाठी म्हणून निर्माण झाला कारण माल हा कायमच किमती असायचा आणि त्याचे रक्षण करणे हे गरजेचे असायचे हा फिरता होता 

१३ रक्षक समाज हा प्रामुख्याने गावात किंवा नगरात असायचा आणि मालाचे रक्षण करायचा पुढे पुढे गावाचे रक्षण करण्याची जबाबदारी याच्यावर आली महाराष्ट्रात ही जबाबदारी प्रामुख्याने पूर्वाश्रमीच्या महार लोकांच्यावर होती त्यांच्याविषयी इतके लिहिले गेले आहे की मी काही लिहिण्याची गरज नाही गरज पडली तर हे लोक सहजरीत्या राजाच्या सैन्यांमध्ये भरती होत . कारण राज्याचे रक्षण म्हणजेच गावाचे ही रक्षण असे आणि गरज असेल तेव्हा राजाला कुमक पोहोचवणे गरजेचे होते आणि ही कुमक नेहमीच गावातून जात असे 

१४ चांभार समाज : बैलगाड्यांना आणि बैलांना वेसण घालणं आवश्यक होत शिवाय पाण्याची पिशवी सोबत असणे अत्यंत गरजेचे असते तर पिशव्या या प्राचीन काळापासून चामड्याच्याच बनत त्यामुळे साहजिकच त्या बनवणाऱ्या लोकांचा एक स्वतंत्र समाज तयार झाला तो म्हणजेच चांभार होय अनेकदा किमती माल चामड्याच्या पिशवीतूनच नेता येणे शक्य असे उदाहरणार्थ सोने आणि चांदी असे धातू किंवा नाणी किंवा हीरे मणी त्यामुळे चांभार हा समाज सुद्धा चांगलाच श्रीमंत होता 


१४ ढोर हा प्रामुख्याने पाण्याशी निगडित होता पाण्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आणि पाणी साठवण्याची जबाबदारी याच्याकडे होते पुढे पुढे चांभारांना हे मदत करायला लागले आणि त्यातून चांभारांच्या मध्येच त्यांचे विसर्जन होऊ लागले परंतु प्रत्यक्षात हा एक पूर्णपणे वेगळा समाज आहे ज्याचे नाते प्रामुख्याने पाण्याशी आहे विशेषत: जनावरांना आणि ढोरांना पाणी पाजणे ही या लोकांची जबाबदारी असायची विशेषत :सरोवरांच्या संदर्भामध्ये ही जबाबदारी जास्त वाढत होती. नदीचे पाणी खुले होते परंतु सरोवर व तलावाबाबतीत मात्र काळजी घेणे आवश्यक असायचे .


१५ माग समाज: माग काढतो तो माग समाज होय याला महाराष्ट्रामध्ये मांग असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षामध्ये हा माग समाज आहे आणि एकेकाळी हा फक्त व्यापारी लोकांच्यासाठी नवीन मार्गांचे किंवा जुन्याच हरवलेल्या मार्गाचे माग काढण्याचे मागोवा घेण्याचे काम करत असे याशिवाय तो पुरोहित कामे सुद्धा करत होता यांच्यातूनच पुढे माग ब्राह्मण नावाची कम्युनिटी तयार झाली आणि अनेकदा यांना थेट ग्रीस पर्यंत रस्ते माहिती होते त्यामुळे हे बाहेरून आलेत असेही मत तयार झाले यांच्यामध्ये जेवढी त्या काळातली आंतरजमातीय लग्न झाले असतील तेवढी कोणातच नसावी कारण मुळातच वाटा पळवाटा माहीत असल्याने हे त्यामध्ये निपुण होत व भटकते असल्याने अनेक प्रकारच्या समुदायांशी यांचे फार चांगले संबंध होते या लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम ब्राह्मण लोकांनी केला कारण यांना व्यापार करणाऱ्या लोकांच्या पासून इन्कम होता तो इन्कमच समुद्र पर्यटन बंदी केल्यानंतर थांबला आणि हे लोक गावांमध्ये आले आणि कळत नकळत शेवटी मांग बनत गेले 

१६ पणी : जो व्यापार पूर्वी फक्त नदीतून चालत असे तो हळूहळू समुद्राद्वारे सुरू झाला आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्राद्वारे करू लागला त्यातूनच लोकसंख्येचे दळणवळण सुरू झाले हे सर्व पणी समाज करत होता ग्रीक मध्ये यांना फिनिशयन म्हणण्यात आले भारतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराला यांनीच सुरुवात केली हे एका अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचे नेते असल्याने उरलेल्या सर्व समाजांना सोबत घेऊन चालत आणि त्यातूनच मग मेलुहा नावाचा एक मोठाच्या मोठा समाज तयार झाला हा संपूर्ण समाज भटका होता कारण व्यापार त्या काळामध्ये एका जागी राहून करणे मुश्किल झाले होते. यांच्यामागे असलेला उत्पादक समुदाय हा एक वेगळी संस्कृती घेऊन उभा होता त्यामध्ये प्रामुख्याने सोनार कुंभार यांच्यासारखे लोक होते जे व्यापारामध्ये थेट नव्हते ते फॅक्टरी सारखे दुकान टाकत स्वतः चे उत्पादन तयार करत होते व व्यापारी लोकांना विकत होते . पण मेलूहा समाजातले लोक मात्र व्यापारासाठी म्हणून भटकत होते किंवा व्यापाराशी निगडित होते . प्रदेशांची आणि परदेशी लोकांशी त्यांचा स्पष्ट आणि स्वच्छ संबंध येत होता आणि म्हणूनच त्यांच्या नावांची नोंद आपणाला इतर संस्कृतीमध्ये सुद्धा झालेली दिसते हे सर्वच्या सर्व शैव समाज होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे अनेकांच्या कुलदेवता या नेहमीच शैव होत्या उदाहरणार्थ वंजारी या लोकांची कुलदेवता ही खंडोबा आहे या लोकांच्या मध्ये उच्च नीच असे काहीही नव्हते ते नंतर वैष्णव धर्माने निर्माण केले आणि यांचा सत्यानाश केला 


थोडक्यात काय मेलुहा समाज हा प्रामुख्याने व्यापारी होता आणि व्यापाराशी निगडित अनेक ऍक्टिव्हिटीज करत होता. ब्राह्मण धर्माने आणि वैष्णव धर्माने आणलेल्या समुद्र पर्यटन बंदी नंतर या लोकांना प्रचंड फटके पडले किंबहुना अत्यंत पैशाने आणि सर्वच बाजूने श्रीमंत असलेल्या या शैव समाजाला पूर्णपणे गाळून टाकण्यासाठी म्हणूनच समुद्र पर्यटन बंदी पद्धत आणली गेली दुर्दैवाने ही खेळी कधीही या समाजाला कळली नाही आणि त्याची फार मोठी किंमत शेवटी या लोकांनी मोजली या लोकांच्या वाताहातीला ब्राह्मण वैष्णव धर्म जबाबदार आहे अर्थातच अलीकडे तीही जबाबदारी कशी टाळता येईल या दिशेने मांडणी येते आहे . थोडक्यात काय या समाजाने आता स्वतः सावध व्हावे हे उत्तम .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे