क्रिकेटमधील सिलेक्शन ,राजकारण आणि जसप्रीत बुमराह श्रीधर तिळवे नाईक 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघामध्ये 50 षटकांच्या संघात बुमराहचा समावेश नाही याकडे कोणाचे लक्ष गेलेले दिसत नाही . असे काहीतरी होणार याची संभावना वाटतच होती . जो जो खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ बनण्याच्या प्रोसेसमध्ये असतो त्याला ठोकणे ही भारतीयांची एक प्रवृत्ती आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर बाबत जे राजकारण खेळले जात होते तशाच प्रकारचे राजकारण जसप्रीत बुमराहबाबत खेळले जात आहे आणि याबाबतीत व्यवस्थित मौन पाळले जात आहे 


खरे तर या संदर्भात त्याची पत्नी संजना गणेशन आपल्या नवऱ्यासाठी म्हणजेच जसप्रीत बुमराह साठी उभी राहिली होती आणि ते बरे झाले होते . सर्वसाधारणपणे दक्षिणात्य बायका आपल्या नवऱ्यामागे ठाम उभ्या असतातच पण इथे ही आवश्यकता जास्त होती पण दुर्दैवाने त्याचा फारसा फायदा बुमराहला झालेला दिसत नाही असे या सिलेक्शन वरून दिसते .


विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन कर्णधारांनी स्वतःच्या टीम मधले प्लेयर मोडीत काढण्याची भीषण सिंग बेदी परंपरा पुनर्जीवित केली आणि टीमच्या अंतर्गत सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून कोणीही उदयाला यायला लागला की त्याला मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले याची सुरुवात प्रथम बीशन सिंग बेदी यांनी केली होती पुढे महंमद अझरुद्दीन याने सचिन तेंडुलकरला कॅप्टन म्हणून मोडीत काढण्यासाठी मॅच फिक्सिंगला पूरक अशा ऍक्टिव्हिटी करून ती कंटिन्यू केली केली अर्थात बिशन सिंग बेदी यांनी सुनील गावस्कर यांच्या विरोधात राजकारण खेळून केली होती पण राजकारण यशस्वी होणार नाही लक्षात येताच त्यांनी लगेच तडजोड केली होती. अझरुद्दीन याने मात्र काय केले हे स्पष्ट आहे न्यायालयाने त्याला सोडल्यामुळे आता गप्प राहावे लागते . हीच परंपरा पुढे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चालवली. कर्णधारपदाला जे जे प्रतिस्पर्धी म्हणून दिसत होते त्या त्या सर्वांना साईडलाईन करत आहे हे या राजकारणाचे खरे मूळ असते.


जसप्रीत बुमराह हा क्रिकेट मधला असा सर्वश्रेष्ठ खेळाडू या मालिकेत बसणारा तिसरा माणूस आहे त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि त्यापूर्वी सुनील गावस्कर यांच्याबाबत जे झाले तेच राजकारण त्याच्याबाबत खेळले जात आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


जसप्रीत बुमराह जेव्हा 20 ओव्हरचा वर्ल्ड कप घेऊन आला आणि तोही एक हाती तेव्हाच त्याला मिळालेली पब्लिसिटी पाहून आता याच्या विरोधात कारस्थाने सुरू होणार याची कल्पना मला आली होती . पब्लिक मध्ये अतिशय गोड वाणीने सत्कार करायचा आणि प्रायव्हेट मध्ये व्यवस्थित ठोकायचे असे हे धोरण असते . त्यानंतर झालेल्या मालिकेमध्ये साहजिकच त्याची कोंडी सुरू झाली. मुळात बॉलिंगची ओपनिंग द्यायची नाही इथून ती सुरुवात होती. जगातला सर्वश्रेष्ठ फास्ट बॉलर तुमच्याकडे असतो आणि त्याला तुम्ही ओपन करायला देत नाही हा एक नतद्रष्टेपणा असतो तो सूर्यकुमार यादव ने तो कोहली आणि रोहित शर्मा यांचाच भावंड असल्याने कंटिन्यू केला मुळात यामागे कारण स्पष्ट आहे खरे तर बुमराहचाच कॅप्टन म्हणून क्लेम होता पण तो डावलला गेला . असेच काहीतरी हार्दिक पांड्या बाबत झाले होते .जय शहाच्या नाकावर टिच्चून जेव्हा हार्दिक पांड्या मुंबईकडे गेला तेव्हाच त्याचे कर्णधार म्हणून करिअर संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले जाणार हे उघड होते जर समोर अंबानी नसते तर कदाचित त्याला टीम मधूनच व्यवस्थित बाहेर काढले गेले असते राजकारणी लोकांचे अहंकार खेळामध्ये फार मोठे होतात सचिन तेंडुलकरला त्याची जागा दाखवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले गेले पण सचिनचा चांगुलपणा इतका मोठा होत गेला की समोरच्यांना हार स्वीकारावी लागली हार्दिक पांड्या बाबत हे घडले नाही मुळातच स्त्रियांच्या बाबतीत मोकळा असणारा पुरुष आणि पुरुषांच्या बाबतीत मोकळी असणारी स्त्री आपल्या समाजाला अजूनही मानवत नाही पूर्वी सुष्मिता सेन आणि अलीकडे दीपिका पडू कोण यांचे उदाहरण समोर आहेच . त्यामुळे हार्दिक पांड्याला कर्णधार पदावरून काढले याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही तो टीम मध्ये राहिला हा त्याच्या खेळाचा ग्रेटनेस आहे पण आता फिटनेसचा मुद्दा पुढे करून त्याला पूर्णपणे डावलेले आहे 


याची सुरुवात अर्थातच गुजरात टायटन सोडून तो मुंबईत आला तेव्हाच झाली याचा अर्थ असा नाही की त्याने गुजरात टायटन सोडला हे मला आवडले त्याने ते सोडलेले मला अजिबात आवडले नव्हते पण मला माहिती जी मिळाली त्यावरून दिसते असे की त्याच्यावर फार वेगळे प्रेशर पडत होते शिवाय मुंबईत राहिलो तर आपला संसार टिकेल अशी काहीतरी वेडी आशा त्याच्या मनात होती ती काय फुलफिल झाली नाही . मुळातच त्याच्या लाईफ पार्टनरला क्रिकेटरचे जीवन हे काय आहे हे न कळल्याने बरेचसे गोंधळ झाले त्यातच हार्दिक पांड्याचा बायकांच्या बाबतीतला मोकळेपणा आणि त्यातच त्याची शैव प्रतिमा जी नको तितकी डॉमिनेट बनून येत होती काही लोकांना नको होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम यायचा होता तो झाला(त्याने जर का भगवत गीता ही कशी त्याला प्रेरणादायी ठरली हे सांगितले असते तर तो टिकला असता) आणि सूर्यकुमार कॅप्टन झाला . जसप्रीत बुमराहचे महत्त्व कमी करण्याचे मिशन त्याच्यावर सोपवले गेले मात्र हे करताना बूमराहचा नीट वापर करता आला पाहिजे याचीही काळजी घ्यावी अशी कळत नकळत मनोधारणा होती कारण संघाने पराभूत होणेही परवडणारे नव्हते . वास्तविक बुमराह हा कॅप्टन म्हणून यशस्वी झाला होता तरीही त्याचा कॅप्टनशिपचा अधिकार पद्धतशीरपणे डावलून ही कॅप्टनशिप सूर्य कुमारला देण्यात आली त्याचे कारण पुन्हा तेच होते त्याचे महत्त्व कमी करणे . याचा कळत नकळत निगेटिव्ह परिणाम जसप्रीत बुमराह वर झालेला दिसतो पण तो सचिन तेंडुलकर सारखाच आहे. त्याच्या टॅलेंटचा दर्जा आणि चांगुलपणाच इतका मोठा आहे की तो यातूनही बाहेर पडेलच . पण आता त्याला संघाच्या बाहेर काढून त्याच्या केलेल्या खच्चीकरणाचे काय ?त्याच्यावर झालेल्या अन्यायाबाबतीत कोणीच फारसा आवाज उठवला नाही हे आत्ताच्या उत्तर आधुनिक पत्रकारितेला साजेसे आहे. त्यामुळेच त्याच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निदान पब्लिक मध्ये काही स्टेटमेंट येणे गरजेचे होते कारण त्याच्या वतीने कोणी एक तरी स्टेटमेंट करणे आवश्यक आहे तो स्वतः बोलत नाही पण त्याच्या आत मध्ये असलेली अस्वस्थता ही दिसत होती आणि मैदानात ही ती दिसत होती . हे सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर बाबत पण झाले होते. 


भारतीयांच्या ठायी मत्सर ही भावना जाती- वर्ण व्यवस्थेमुळे इतकी रुजलेली आहे की मत्सर करणे हा अनेक भारतीयांचा फावला टाईमपास असतो . त्यामुळे बूमराह ला मिळत असलेली मान्यता अनेकांना खटकणार हे स्वाभाविक होते त्याने हे लक्षात घ्यायला व्हावे होते आणि आपली स्ट्रॅटेजी डिझाईन करायला हवी होती पण त्याचा सचिन तेंडुलकर झाला . सचिन मैदानावर उत्तम स्ट्रॅटेजिस्ट होता पण दुर्दैवाने मैदाना बाहेरचे राजकारण त्याला कधीच जमले नाही नेमके हेच बुमराहबाबत होत आहे सचिनच्या बाजूने निदान लता मंगेशकर पासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत एक मुंबईतली प्रभावी मराठी लॉबी होती अशी लॉबी दुर्दैवाने बुमराहला लाभलेली नाही कारण तो ज्या बॅकग्राऊंड मधून आलाय ते बॅकग्राऊंड अशा लॉबीला पूरक ठरत नाही (त्यातच तो पंजाबी असल्याने आणि पंजाब मध्ये आप असल्याने राजकीय पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही)अशावेळी एकच शस्त्र उरते ते म्हणजे आपल्याच माणसाला मीडियामध्ये उभे करणे. ते बूमराह याने केले पण दखल किती घेतली जाईल याबद्दल मला शंका होती आणि ही शंका खरी ठरली आहे असे आता सिलेक्शन कमिटीच्या उद्योगावरून दिसते. 


एकंदरीत गौतम गंभीरला विजयाचे सर्वच्या सर्व श्रेय आपल्याकडे खेचायचे असते त्यामुळेच श्रेयस अय्यरबाबत राजकारण खेळले गेले पण पुन्हा अय्यरने स्वतःच्या खेळाच्या जीवावर कमबॅक केले. पब्लिक मध्ये बोलण्याबाबतही तो थोडा धूर्त निघाला. शिवाय साउथ इंडियन लॉबी विशेषता के श्रीकांत सरळ सरळ त्याच्या बाजूने उभा राहिला. त्यामुळेच त्याचे उपकप्तांन म्हणून आगमन झालेले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आगामी फिफ्टी-फिफ्टी वर्ल्ड कप कॅप्टनसी बाबत त्याच्या नावाचा विचार चालू आहे याचे कारण उघड आहे शुभमनचा परफॉर्मन्स अचानकपणे खालती येत चाललाय ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा जर का असेच राहिले तर कदाचित त्याला नंतर संघामधून डावलले जाऊ शकते. हीच गोष्ट विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत आहे रोहित शर्मा कॅप्टन झाला तर आपल्याला श्रेय मिळणार नाही याची जाणीव गौतम गंभीर याला आहे त्यामुळेच रोहित शर्माला कॅप्टनशिप देण्याऐवजी जाणीवपूर्वक शुभमन गिलला ही कॅप्टनशिप दिलेली आहे 


या सगळ्यांमध्ये जसप्रीत बुमराह ची कॅप्टनसी ही पूर्णपणे सचिन तेंडुलकरच्या कॅप्टनसीप्रमाणेच तोडण्यात आलेली आहे. त्याचा संघात समावेशच करायचा नाही म्हणजे कॅप्टनसी त्याला द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही असे हे गणित आहे त्या मागचे कारण उघड आहे कारण जसप्रीत बुमराह कॅप्टन झाला तर गौतम गंभीरला पूर्ण श्रेय मिळणे शक्य नाही .


याबाबतीत सिलेक्शन कमिटीच्या बाजूने फक्त एकच मुद्दा आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह हा दहा ओवर्स टाकण्यासाठी पुरेसा सक्षम नसणे. आता जो मनुष्य कसोटी क्रिकेट खेळतो त्याच्याकडे 50-50 ची क्षमता नसते यावर कोण विश्वास ठेवेल ? प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती नाही असेही मला कळलेले आहे. कुठल्याही फास्टर बॉलरला सतत प्रॅक्टिस लागते त्यामुळे जर का यदा कदाचित आगामी वर्ल्डकप मध्ये बुमराहला खेळवायचे असेल तर त्याला विश्रांती देण्यापेक्षा अधिकाधिक खेळवणे जास्त गरजेचे आहे. जर का त्याला खेळवायचेच नसेल तर मात्र हे पॉलिटिक्स आहे. 


या दौऱ्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा परफॉर्मन्स देखील आजमावला जाईल जर का ते चांगले खेळले तरच त्यांना वर्ल्डकप मध्ये संधी मिळेल अन्यथा त्यांनाही घरी पाठवण्याची तयारी गौतम गंभीरने बहुदा चालवलेली दिसते. गौतम बुद्ध गंभीरच्या डोक्याबद्दल शंका नाही तो उत्तम स्ट्रॅटेजीस्ट आहे याबद्दलही शंका पण त्याचा अहंकार हा फार मोठा अडथळ आहे . बीशन सिंग बेदीचा असाच अहंकार होता परिणाम अजित वाडेकर सारखा कॅप्टन हा कधी बाहेर गेला आणि दिसेनासा झाला हे भारताला कळले देखील नाही. अर्थात त्याने नंतर व्यवस्थापक होऊन पुन्हा आपल्या टॅलेंटची चुणूक दाखवली जसप्रीत बुमराह विषयी असे काही होऊ नये अशी अपेक्षा.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे