सेल्फिश नेस (एका विद्यार्थ्याला दिलेले उत्तर)श्रीधर तिळवे नाईक 


प्रश्न आएन रॅंड हिने स्वार्थाचा प्रचंड पुरस्कार केला आहे आम्ही स्वार्थी व्हावे का?


उत्तर:आयन रँड हिने "द वरचू ऑफ सेल्फिशनेस" नावाचं एक पुस्तकच लिहिले कादंबऱ्या लिहिल्या आणि स्वार्थी होणे का गरजेचे आहे या अंगाने आपली स्वतःची एक व्याख्या सादर केली तत्त्वज्ञान सादर केलं. आचार्य रजनीश ओशो यांनी पुन्हा एकदा हेच सांगितले. त्यांचा संदर्भ अध्यात्मिक होता परंतु झाले काय लोकांनी स्वार्थाच्या नावाखाली फक्त स्वतःचे हितसंबंध बाय हुक बाय क्रूक साधायला सुरुवात केली अलीकडे खूप जण स्वार्थी असणे कसे फिलॉसॉफिकली करेक्ट वगैरे सांगत असतात पण त्यांना ऍक्च्युली कशाचा संदर्भात हे म्हटले गेलेले आहे हे माहिती नसतं स्वतःच्या Passion फॉलो करणे म्हणजे स्वार्थ असेल तर तो बरा आहे पण मुळात त्याच्यासाठी स्वार्थ असा शब्द कशासाठी वापरायचा ? सर्व शैव लोकांचा यासाठी शब्द आहे आत्मकल्याण तो जास्त चांगला आहे आणि त्यात फक्त स्वतःच्या पॅशनचाच नाही तर स्वतःच्या मोक्षाचाही विचार केला जातो . सेल्फिशनेस हा शब् वापरून सगळा घोळ झालाय माझ्या मते मुळात अशा प्रकारच्या गोष्टी बोलणे चुकीचे असते या मागचे कारण काय तर होतं काय की प्रसिद्धी कमवायचे असतील आणि हल्ली प्रसिद्धि स्टंट केल्याशिवाय मिळत नाही मग असा काही शब्दांचा स्टंट करायचा असतो त्यासाठी धक्का द्यायचा असतो आणि तो धक्का देण्यासाठी म्हणून मग अशा प्रकारची स्टेटमेंट अशा प्रकारची फिलॉसॉफी मांडली जाते रजनीश्यांना तर असल्या गोष्टींचा खूपच शौक होता याला मी शॉक देण्याचा शौक म्हणजे शॉकशौक म्हणतो . हा ज्याला चढतो तो कधीकधी तात्विक पातळीवर इतका घसरत जातो की त्याला स्वतःलाही कळत नाही की शॉक देता देता तोच कम्प्लीट घीसबिट होत अनैतिक बनत चाललाय . 


भाषेच्या संदर्भात खरंतर सर्वांनी आता सावध होणं गरजेचं आहे काय होतं अनेकदा मूळ शब्दांचे अर्थ इतके वाईट केले जातात विशेषतः पुरोहित वर्ग याबाबतीत खूप नालायकपणा करत जातो तो नालायकपणा कधीकधी इतका होतो की सगळा गोंधळ उडून जातो शिवाय हा नालायकपणा शाब्दिक असल्यामुळे सहजासहजी कळत नाही परंतु तो संस्कार करत जातो दुर्दैवाने शॉक देणाऱ्या लोकांना हे कळत नाही किंबहुना त्याला ते करून घ्यायचं नसतं कारण त्यांना जी पब्लिसिटी त्या अंगाने आवश्यक वाटत असती ती मिळालेली असते अशावेळी तुम्ही सावध राहायला पाहिजे. एक तर मळात गेलं पाहिजे मुळात गेलं पाहिजे किंवा मग या शॉक-- शौकीन लोकांना नाकारले पाहिजे मला वाटते की आता वेळ असे आले आहे की या लोकांनी जे स्वतःला गुरु वगैरे समजतात अशावेळी समकालीन सामान्य माणसाला कुठल्या भाषेत आपण सांगावं हे नीट ठरवण्याची वेळ आता आलेली आहे धक्के द्याल पण तुमच्या त्या धक्क्याचा परिणाम जास्तीत जास्त पाच मिनिटे दोन दिवस दहा दिवस टिकेल पण नंतर त्या शब्दांचा जो मूळ अर्थ त्या माणसाला सामाजिक पातळीवर प्राप्त झालेला आहे तो अर्थ आणि तुमचे तथाकथित शॉक यांची भेसळ होऊन काहीतरी भलत्याच गोष्टी निर्माण होतात हिटलर याचे उत्तम उदाहरण आहे . 


तेव्हा स्वार्थी वगैरे काही होऊ नका . आत्म कल्याणी व्हा त्यासाठी स्वतःबाबत करूणेने बघायला शिका . मुख्य म्हणजे सर्वात प्रथम जसे आहात आणि परिस्थिती जशी आहे तसेच स्वतःला आणि परिस्थितीला स्वीकारा . परिस्थिती आणि स्वतःला स्वीकारले की मग स्वतःचे अनालिसिस स्वतःचे विश्लेषण अधिक चांगल्या रीतीने करता येते हे करताना जास्तीत जास्त तटस्थ व्हा बायस होऊ नका पण सर्वात स्वीकारामुळे होते हे लक्षात ठेवा स्वीकारामुळे आपोआप अनेक गोष्टी स्पष्ट होत जातात होत जातील . व्यसनी आहात तर व्यसनी आहात म्हणा उगाच व्यसनांचे तात्विक समर्थन करत बसू नका . व्यसनातून मुक्त व्हायचे असेल तर दृढ निश्चय करा की मी आता यातून मुक्त होणार उगाच जादा दारू पिली की आपण दारूतून मुक्त होऊ वगैरे वगैरे सर्व गोष्टी कल्पनाविलास आहे रजनीश यांनी ज्या काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या त्यातील ही एक ! भोगाने भोग कमी होत नाही. उलट वाढत जातो जग भोगासाठी चालते भोगण्यासाठी चालते परंतु ते नीट तेव्हा चालते जेव्हा त्याग शक्य होतो. तेव्हा जग चालवायचे की ते जग नीट चालवायचे हे ठरवा. जनावरे जग चालवतातच परंतु त्यांची ही जगे आपल्यासारखी म्हणजे माणसांच्या सारखे अफाट असत नाहीत ती लिमिटेड असतात परंतु माणूस ही एक अशी गोष्ट आहे की त्याचे जग अनलिमिटेड होऊ शकते त्याचा भोग अनलिमिटेड होऊ शकतो त्यामुळे त्याग आणि संयम फार महत्त्वाचा ! यम साधायचा असेल तर सुरुवात संयमापासूनच करावी लागते मग तुम्ही आपसूकपणे नियम पाळायला लागता वाईट गोष्टींचा  त्यागकरू शकता त्याग करू लागता .पण संयम साधता आले नाही तर काहीही शक्य होत नाही. कदाचित अनेकदा मोह होतील हे मोह तुम्ही टाळायला लागलात की लोक तुमच्या नावाने शिमगा करतील अफवा पसरवतील कारण अनेकदा त्यांना स्वतःला संयम साधलेला नसतो आणि संयम न साधना राहिलो साधणारे लोक नेहमी संयम ज्यांना साधला जातो त्यांच्या बाबतीत खोटा प्रचार करत असतात. दारुडे लोक निर्व्यसनी माणसाला सर्वाधिक बदनाम करतात हा माझा अनुभव आहे म्हणून सांगतो हे सर्व घडतच असते किंबहुना चांगला माणूस लोकांना अनेकदा सहन होत नाही. पण त्याने काही फारसे बिघडत नाही . मुख्य म्हणजे इमेज बिल्डिंगच्या मागं जाऊ नका एकदा इमेजच्या प्रेमात पडला आणि तुम्ही त्या प्रेमात पडलेल्या इमेजची स्वतःच्या व्यक्तीमत्वात वेल्डिंग करून बिल्डिंग करायला लागला की समजून चला आत मध्ये शुद्ध नैतिकतेची हवा येणे बंद होणार आहे श्वास हळूहळू काँक्रीट बनत जाणार आहे. त्यापेक्षा आपण जसे आहोत तसे स्वीकारा आणि मग त्यातील काय आपल्याला कल्याणकारी आहे आपणाला खरोखर चांगले आहे काय जमते कशाची आत Passion आहे नेमके कशाचे टॅलेंट आहे ते तपासा. सिग्मंड फ्रॉइड नावाचा एक अत्यंत फ्रॉड माणूस जन्माला आला आणि त्याने भरपूर गोंधळ घातले . रजनीश्यांच्या सारखी माणसे फ्रॉइड च्या नादाला लागून बिघडली तुम्ही बिघडू नका शेवटी हे मानसशास्त्र आहे आणि ते मेंदूतल्या मेंदूत फिरत राहते मोक्ष मनाचा अंत आहे आणि त्याची सुरुवात आत्मकल्याणापासून होते . तेव्हा स्वतः सेल्फिश बनू नका इतरांना सेल्फिश बनवू नका पण आत्मकल्याणी बना. जो आत्मकल्याण करतो तोच समाजाचेही उत्तम कल्याण करतो.


श्रीधर तिळवे नाईक



Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे