अण्णा हजारे आणि मोदी श्रीधर तिळवे नाईक 

मी स्वतः अण्णा हजारेंचा पक्ष घेत असलो तरी त्यांच्या आंदोलनामुळे एक पॉझिटिव्ह स्पेस हिंदुत्ववादासाठी तयार झाली ही वस्तुस्थिती! हे असे अनेकदा होते म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर भारतात हिंदू धर्म नावाची एक गोष्ट सेटल झाली आणि वैष्णव धर्म हिंदू धर्म म्हणून सेटल झाला भगवद्गीता हिंदू धर्माची धर्मग्रंथ झाली जर ब्रिटिश नसते तर हे झाले नसते. यातून पुढे मग कधी ना कधीतरी वर्ण जात वाद येणारच होतात तो आला कारण एकदा भगवद्गीता हाच धर्मग्रंथ असे तर भगवान कृष्ण यांनीच वर्णव्यवस्था तयार केलेली आहे आता एकदा भगवानांनीच वर्णव्यवस्था तयार केली म्हटल्यावर ती कशी काय मोडणार आणि तुटणार आणि ती मोडणार आणि तुटणार नसेल आणि ती जर का अशी दैवी असेल तर त्या संदर्भात पुरोगामी लोकांनी केलेली सगळी आंदोलने मातीत मिळणार हे ही नक्कीच असते आपल्या पुरोगामी लोकांना ही साखळी कळत नाही. त्यांना असे वाटते की वारकरी चळवळ हा फार इनोसंट चळवळीचा प्रकार आहे प्रत्यक्षात तो मुखवटा होता आणि खरा चेहरा वर्ण जाती व्यवस्था स्पॉन्सर करणारा वैष्णव धर्माचा होता. विसाव्या शतकातच वारकरी चळवळ प्रस्थापित झाली हा काही योगायोग नाही त्याआधी ही चळवळ कुठे होती याचे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन होणे आवश्यक आहे . कारण ही काही प्राचीन गोष्ट नव्हे ही मध्ययुगीन गोष्ट आहे. आणि मध्य युगामध्ये कसे पुरावे तयार होत याचाही वैज्ञानिक अभ्यास एकदा सर्वांनीच करायला हवा. आता पुन्हा एकदा वैष्णो धर्माचा कमबॅक झालेला आहे त्यामुळे सर्वत्र वर्ण आणि जाती यांचा गजबजाट आहे. काँग्रेसने गीता आणि गीता धर्माला प्रचंड पाठिंबात सुरुवातीपासूनच दिलेला आहे त्यातूनच तर रानडे वारकरी चळवळीचा इतिहास मांडतात टिळक भगवद्गीतेवर प्रचंड मोठे पुस्तक लिहितात आणि गांधी हृदयाशी हे राम धरून असतात या सर्व गोष्टी पुरोगामी वादाकडे नेणाऱ्या आहेत असे अनेकांना वाटत होते अशा प्रकारचा गैरसमज हा काही फक्त भारतातच नव्हे तर युरोपमध्ये सुद्धा होता त्यातूनच मग प्रोटेस्टन धर्माचा प्रचंड पुरस्कार करणे म्हणजे पुरोगामी वादी होणे असा अर्थ रोड झाला होता मग याच प्रोटेस्टंट वादाच्या प्रेमात पडलेल्या आणि कधीकाळी धर्मगुरू होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या हिटलर्याने हिटलर याने प्रोटेस्टन धर्मातून जी लोकांचा द्वेष घेतला जीव लोकांचा द्वेष घेतला आणि हा द्वेष दुसऱ्या महायुद्धामध्ये टर्न झाला रूपांतरित झाला. प्रोटेस्ट करणारे धर्म म्हणून जे धर्म प्रस्थापित झाले त्यांचे नेमके म्हणणे काय होते त्यांची मांडणी नेमकी काय होती हे एकदा नीट तपासले जाणे आवश्यक आहे आपल्याकडे सुद्धा ब्राह्म समाजापासून जे अनेक प्रॅक्टिस धर्म तयार झाले प्रोटेस्ट करणारे धर्म तयार झाले ते नेमके काय करत होते हे पाहणे आवश्यक आहे कारण या सर्वांचा आदर्श प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म होता. फक्त शैव यामधून निसटले याचे एकमेव कारण म्हणजे सर्व लोकांचा पुरोगामी वाद हा अत्यंत ओरिजिनल भारतीय प्रकार आहे तो बसवेश्वर यांच्यामुळे सुरू होतो आणि त्याची सुरुवात ही युरोपच्याही आधी आहे . यह लोकांचा अतिशय प्रॅक्टिकल विचार बसवेश्वर करतात कारण ते शेवटी शैव आहे आणि पाशुपत दर्शनातून आलेले आहेत. आज ना उद्या आहे सर्व काही नीट कळेलच. 

 ब्रिटिश लोकांच्या मुळे ज्याप्रमाणे यशवंतराव होळकर हा शेवटचा शैव योद्धा पराभूत झाल्यानंतर आणि त्यानंतर शैव असलेल्या शीख धर्मातील रणजीत सिंग यांचा वारस पराभूत झाल्यानंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक शैव धर्म साईडलाईन करायला सुरुवात केली आणि याचा पुरेपूर फायदा ब्राह्मण धर्माला म्हणजेच नंतरच्या वैष्णव धर्माला झाला आणि ही जी निगेटिव्ह स्पेस ब्रिटिशांच्यामुळे तयार झाली होती शैव लोकांच्या पराभवामुळे तयार झाली होती ती स्पेस वैष्णव धर्माला उपलब्ध झाली आणि त्यामुळेच ब्रिटिश लोकांनी हस्तक्षेप करत न्यायाच्या क्षेत्रामध्ये कोर्टाच्या क्षेत्रामध्ये भगवद्गीता हा वैष्णव ग्रंथ हिंदू धर्मग्रंथ बनवला. एकीकडे हिंदू धर्म म्हणजे वैष्णव धर्म नव्हे असे सांगायचे आणि दुसरीकडे मात्र कोर्टात सर्वच शैव धर्मी लोकांना गीतेची शपथ घ्यायला लावायची अशा प्रकारे हा वैष्णव प्रचार होता आणि हा प्रचार केवळ ब्रिटिशांच्या मुळेच शक्य झाला त्यांनी जर का हा उद्योग केला नसता तर वैष्णव लोकांना आपला नवीन धर्मग्रंथ मिळाला नसता शैव लोकांच्या डोक्यावर वैष्णव धर्मग्रंथ हा स्वतःचा धार्मिक ग्रंथ म्हणून नाचला नसता. तेव्हा स्पेस तयार करणे हे दिसायला किरकोळ कारण असते जे निगेटिव्ह स्पेस तयार करते प्रत्यक्षात ते प्रचंड फंक्शनल असते . अण्णा हजारे गांधीवादी आहेत आणि गांधीवाद वैष्णववादी आहे म्हणजेच पुन्हा एकदा वैष्णव वादानेच ब्राह्मण धर्माला स्पेस तयार करून दिलेली दिसते हे कसे घडते तर त्या स्पेस मधून मुख्य स्पेस धारकाला हाकलून काढत हे घडत असते इथे हेच घडलेले आहे ब्रिटिश काळामध्ये शैव धर्माने बहुजन समाजामध्ये व्यापलेली स्पेस त्याच्याकडून काढून घेण्यात आली त्यासाठी महात्मा फुले यांचे नामोनिशान 19 व्या शतकाच्या इतिहासातून मिटवण्यात आले आणि हे करणारे सर्व ब्राह्मणधर्मी होते हे विसरू नका आणि ही ब्रिटिश लोकांनी शैव लोकांना खाली करायला लावलेली रिकामी करायला लावलेली स्पेस वैष्णव धर्माला कळत नकळत उपलब्ध करून देण्यात आली आणि त्याचा पुरेपूर फायदा ब्राह्मण धर्माने घेतला आणि वैष्णव-धर्माच्या नावाने हिंदू धर्माच्या नावाखाली सर्व शैव आपल्या टापाखाली आणायला सुरुवात केली. वैष्णो धर्माची ही घौडदौड अजूनही चालू आहे पण सुदैवाने दक्षिण भारत याबाबतीत शहाणा आहे. म्हणून वाचलाय महाराष्ट्र लोकांनी मात्र आपला सर्व शहाणपणा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून स्वतःचा सत्यानाश ओढवून घेतलेला आहे त्यामुळेच मी मागेच एकदा प्रेडिक्शन केल्याप्रमाणे आज ना उद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशातला माणूस असणार आहे. वैष्णोधर्माने मुख्य देवता म्हणून वैष्णव देवता आणलेलीच आहे जी मूळची शैव होती आता मुख्य माणूस म्हणजेच मुख्यमंत्रीपद वैष्णव असलेल्या आणि उत्तरेकडून आलेल्या माणसाला देण्यात आले की गेल्या दोनशे वर्षांमधल्या सर्व वैष्णव घटकपटींना खटपटींना यश मिळाले असे म्हणता येईल ते आज ना उद्या मिळेलच कारण महाराष्ट्र धर्म हा आता वैष्णव धर्म बनलेला आहे. यादवांनी शेवटी मलिक अंबरच्या चरणी महाराष्ट्र अर्पण करावयाला मदत केली होती काँग्रेसने आणि आता भाजपने याचीच पुनरावृत्ती केलेली होती. मलिक अंबर हा निदान उत्तम राज्यकर्ता होता आणि शेवटी त्याने उत्तरे विरोधात बंड केलेच आपल्याकडे सत्तेवर आलेला उत्तरेकडचा मुख्यमंत्री हा हे बंड करेलच याची खात्री नाही. आणि तो जर का मलिक अंबर सारखा चांगला नसेल तर मग महाराष्ट्राचे देव भले करो. श्रीधर तिळवे नाईक श्रीधर तिळवे नाईक 

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे