मानवजात पुन्हा पुन्हा युगाच्या शेवटच्या टोकावर सुसाईडकडे का जाते ? श्रीधर तिळवे नाईक 

पुरोगामी वादामध्ये पुरोगामी महानवतेच्या शेवटी दोन आयडियालॉजीज आर्थिक पद्धतीने उदयाला आल्या. पहिली भांडवलवाद याची सुरुवात ऍडम स्मिथने केली होती आणि शेवटी तिचा शेवट साम्राज्यवादात झाला याउलट भांडवलशाहीला शह देण्यासाठी म्हणून समाजवाद आणि साम्यवाद आले यातील समाजवादाचा शेवट हा फॅसीझम आणि नाझीझममध्ये झाला तर साम्यवादाचा शेवट अत्यंत क्रूर असलेल्या स्टॅलिनवाद माओवाद व उत्तर कोरियन किम jong ऊनवादात झाला . 

प्रश्न असा आहे की हे प्रत्येक युगाच्या अंतामध्ये असे घडते का? की असे झाल्यानंतर त्या युगाचा अंत होतो ? 

कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात झाली की ती सुरू करणाऱ्या लोकांना भयंकर त्रास दिला जातो कधी कधी मृत्युदंडाची सजा दिली जाते . पुरोगामी वाद याला अपवाद नाही त्यामुळेच ब्रुनोला जिवंत जाळले गेले बेकन गॅलिलिओला तुरुंगात पाठवण्यात आले आणि अशाच कित्येकांच्या आहुती दिल्या गेल्या. फ्रेंच राज्यक्रांती मधले अनेक क्रांतिकारक शेवटी गिलोटिन खाली गेले अमेरिकेला स्वतःचे स्वातंत्र्य युद्ध करून मिळवावे लागले.

पण तरीही एक संविधान आल्याने काहीतरी फलश्रुती दिसली परंतु या फलश्रुतीचा लाभ न झालेल्या लोकांच्याकडून काही तत्त्वज्ञान आले पण आश्चर्यकारकरीत्या ते आकलनाच्या बाबतीत प्रचंड कमी पडत गेले याचे कारण शेवटी जे निर्माण होते ते अनेकदा व्यक्तिकेंद्री नसून समूह केंद्री असते आणि समूह केंद्रीयता ही अनेकदा आकलनाच्या बाबतीत अत्यंत कडवट आणि कठोर होत जाते. ती व्यक्तीची प्रतिभा नाकारत राहते कर्तुत्व नाकारत राहते आणि त्यातून मग व्यक्तीवादाची हत्या करण्यासाठी म्हणून व्यक्तींचीच हत्या केली जाते .

साम्राज्यवादी लोक आणि साम्यवादी लोक यांच्यातला फरक त्यामुळेच आपणाला अस्पष्ट वाटायला लागतो साम्राज्यशाहीच्या विरोधात आम्ही उभे ठाकलो आहोत असा दावा करणारे साम्यवादी आपापल्या देशांमध्ये कसे क्रूर होत गेले याचा इतिहास उपलब्ध आहे. अर्थात यांचे समर्थन करणारे मार्क्सवादी लोक नेहमीच आजही बाजू मांडायला बघत असतात पण त्यांच्या या बाजू मांडण्यामुळेच साम्यवादाचे सर्वाधिक नुकसान झाले . चर्चने आपल्याकडून झालेल्या सर्व चुकांच्या बद्दल माफी मागितली परंतु साम्यवादी लोकांनी अशा प्रकारच्या किती माफी मागितल्या हा एक प्रश्न आहे. अर्थात अनेक लोकांनी नंतर समाजवाद आणि साम्यवाद यांचा त्याग मात्र केलेला दिसतो.

हे असे का घडते ? माझ्या मते प्रत्येक महानवता ही प्रारंभवाद मध्यवाद आणि अंतवाद वा उत्तर वाद अशा तीन टप्प्यातून जाते यातील अंत वादाला मी उत्तर वाद असे म्हणतो कारण ती नेहमीच असा दावा करत येते की जे काही होते आहे विशेषत: जे शोषण होते आहे ते त्या नवतेने निर्माण केलेल्या महाजालामधून निर्माण होते म्हणजे पुरोगामी लोक नेहमीच दावा करत होते की पुरोगामी लोकांनी निर्माण केलेल्या नवीन व्यवस्थेमुळे कामगारांचे शोषण होत आहे आणि त्यावर उत्तर क्रांती हे आहे साहजिकच चीन काय रशिया काय क्रांती झाली परंतु जी व्यवस्था जिला मी पुरोगामी वादाची शेवटची अवस्था म्हणतो शेवटची व्यवस्था म्हणतो ती आतापर्यंतच्या सर्व व्यवस्थांच्या पेक्षा अधिक भयानक होती कारण यांनी जे बळी घेतले ते समूहाच्या नावाखाली घेतले आणि त्यामुळे साहजिकच प्रचंड मोठ्या संख्येने माणसांची हत्या झाली. ही हत्या इतकी होती ती जवळजवळ युद्धाच्या समर प्रसंगात होणाऱ्या हत्यांच्या पेक्षा कधी कधी जास्त झाली. आणि हे सर्व उत्तर वादाच्या तत्त्वज्ञानाच्या नावाने घडत गेले 

आपण जर का हेच धर्मयुगाबाबत पाहायला गेलो तर असे दिसते की आरंभीच्या काळामध्ये लोकशैवधर्म ,सांख्य धर्म आणि ब्रह्म धर्म यांना संघर्ष करावा लागला. नंतर धर्म युगाच्या मध्यवादी अवस्थेत जैन आणि बौद्ध धर्म निर्माण झाले आणि त्यांनी काही अतिशय चांगल्या राजवटी निर्माण केल्या उदाहरणार्थ अशोकाची राजवट ही तत्कालीन इतर राजवटींच्या पेक्षा अधिक बरी होती अर्थात ती निर्दोष नव्हती पण तुलनेने बरी होती परंतु नंतर आपण जर का धर्म युगाचा उत्तर कालखंड पहायला लागलो तर आपणाला वैष्णव धर्म , आणि इस्लाम धर्म असे दोन उत्तर धर्म दिसतात आणि या दोन्ही धर्मांनी मानव जातीला प्रचंड त्रासच दिलेला दिसतो . या दोन धर्मांनी मिळून केलेल्या हत्या आणि द्वितीय महायुद्धात हिटलरमुळे झालेला संहार यांच्यात फारसा फरक दिसणार नाही म्हणजे इथेही शेवटी हाच प्रश्न निर्माण होतो की धर्मयुगाच्या शेवटी हे असे का व्हावे ? अगदी ख्रिश्चन धर्माच्या बाबतीत सुद्धा आपणाला असे दिसते की या उत्तर कालखंडामध्ये हा उत्तरकालीन ख्रिश्चन धर्म पूर्णपणे बिघडलेला होता आणि पूर्णपणे हजारो लोकांच्या हत्या घडवणारा होता.

आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का आपण 1950 नंतर उदयाला आलेल्या उत्तरऔद्योगिक कालखंडाकडे पाहिले तर आपणाला नेमके असेच चित्र दिसते . सुरुवातीच्या कालखंडामध्ये आधुनिक युगाला सुद्धा त्रासच सहन करावा लागला मात्र हा त्रास तुलनेने आधीच्या युगांच्या पेक्षा कमी होता . प्रामुख्याने प्रस्थापित असलेल्या स्टालीन वाद, फासीवाद ,नाझीवाद आणि माओवाद यांनीच आधुनिकतेला त्यांच्या त्यांच्या देशामध्ये खूप त्रास दिला असे आपणाला दिसते पण तरीही आधुनिकता प्रस्थापित झालीच आणि तिने नवीन संरचना निर्माण केल्या जगात सर्वत्र औद्योगिक युग हळूहळू कार्पोरेट पद्धतीने प्रस्थापित होत गेले. मात्र उत्तर संरचनावादाच्या कालखंडामध्ये हळूहळू पुन्हा एकदा सगळा समूह वाद उदयाला आलेला दिसतो ज्याने सब्जेक्ट इज डेड अशी घोषणा केली आणि एकदा सब्जेक्ट डेड झाल्यानंतर मग आपोआपच राष्ट्रीय स्वंयसेवक संघासारखी व्यक्तिवाद दाबणारी संघटना सर्वंकष बनत जाते आणि तिला पाठिंबाही मिळायला लागतो उत्तर आधुनिकतेने अशा अनेक धार्मिक संघटनांना बळ पुरवले यातूनच पुढे मुस्लिम लीग वाद , खोमिनी वाद निर्माण झाला. आणि शेवटी हळूहळू आता आपणाला ट्रम्प यांच्यासारख्या राज्य करणाऱ्या लोकांना फेस करावे लागत आहे . उत्तराधुनिक सत्ताधारी लोक कसे असतात याचा हा एक नमुना आता सादर होतो आहे. म्हणजेच उत्तर आधुनिकतेच्या नावाखाली दोन्ही बाजूला शंखच आहे. एका बाजूला इस्लामिक सत्ताधारी आहेत तर दुसऱ्या बाजूला ट्रम्प सारखे निखळ स्वार्थी असे उत्तर कार्पोरेट वादी लोक आहेत. या दोन्ही पार्ट्यांच्यामध्ये अधूनमधून समझोता होतो खरा परंतु तो टिकत नाही इथेही तो टिकणे शक्य नाही. मात्र अधून मधून हे हातात हात घालून चालतील याबद्दल काही शंका नाही या सगळ्यांच्या मध्ये सामान्य माणसाची जी फरफट चाललेली असते तिचे काय हा एक फार मोठा प्रश्न आहे . प्रश्न असा आहे की पुन्हा पुन्हा असा उत्तरवाद,(सौष्ठवच्या पहिल्याच अंकात- १९९२ एका कवितेमध्ये मी ही टर्म वापरली होती.) येत असतो मी या कवितेत उत्तराधुनिकतेच्या उत्तरवादाच्या या भानगडींना तपस्यांची सपाटी आपटी असे म्हटले होते पुढे वर्ल्ड इज फ्लॅट आले खरे पण माझ्या मते आपटी सपाटीच होती आणि जे सपाट होते ते आपटतच होते . या परिस्थितीत 32 वर्षांनी सुद्धा काहीच फरक पडू नये ही मात्र खरोखर ट्रॅजेडी म्हटली पाहिजे . ही ट्रॅजेडी संपण्यासाठी आपण आणखी एका महायुद्धाची तयारी तर करत नाही आहोत ना अशी शंका मला नेहमीच येत असते. माणसाची जमात स्वतःला जेवढी शहाणी समजती तितकी ती असत नाही हे इतिहासात अनेकदा सिद्ध झाले आहे.

मी माझ्या आयुष्यामध्ये कायमच सर्व उत्तरवादांच्या विरोधात लिहीत राहिलो उभा ठाकलो . पण मला वाटते की आपण आता उत्तर आधुनिकतेच्या शेवटच्या अंतवादामध्ये उभे आहोत . आणि सगळ्याच उत्तरवादाचा समग्र विचार ज्यामध्ये धर्म युगातला उत्तरवाद पुरोगामी युगातला उत्तर वाद आणि आधुनिक युगातला उत्तर वाद म्हणजेच उत्तर आधुनिक वाद या सगळ्यांचा एकदा नीट धांडोळा घेणे आवश्यक आहे . पुन्हा पुन्हा प्रत्येक युग जे नवे असूनही आत्महत्या करायला का जाते आणि ते आत्महत्या करायला जात नसेल तर आपण त्याला आत्महत्या करायला का भाग पाडतो असा प्रश्न आता विचारायला हवा . असे तर झालेले नाही की ना की या खराब शराबची आपल्याला जास्त नशा चढते होती असते आणि आहे ? 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे