वीर पुरुषाचा किंवा वीर स्त्रीचा अंत्यविधी कसा करावा श्रीधर तिळवे नाईक 

१ मृत वीर पुरुषाजवळ अथवा वीर स्त्रीजवळ शिवलिंग डोक्यापाशी ठेवावे शेजारी निरंजन असावे ते तेवत ठेवावे जर युद्ध सुरू असेल तर ते जारी ठेवावे मोजक्या लोकांनीच मग अंत्यविधी करावा अंत दर्शन किती किती काळ ठेवायचे हे आपापसात आधीच निश्चित करावे यासाठी हवामानाचा अंदाज घ्यावा मात्र प्रेत काही झाले तरी सडता कामा नये याची काळजी घ्यावी

२ संपूर्ण गावात अथवा शहरात एक दिवस शोक पाळावा

३ अंतयात्रा सुरू करावी अंत्ययत्रेत मौन आवश्यक आहे कसल्याही घोषणा दिल्या जाऊ नये अगदी हर हर महादेव सुद्धा नाही घोषणा देणे किंवा जय श्रीराम म्हणणे ही वैष्णव परंपरा आहे शैव परंपरा नाही, शैव परंपरेत मौन पाळणे महत्त्वाचे असते

४ डांबरी अथवा सिमेंट किंवा तसाच आधुनिक रस्ता असेल तर सुरुवातीचे 10 सेकंद ते एक मिनिट अनवाणी चालावे आणि नंतर चप्पल घालावी किंवा बूट घालावे  जर डांबरी रस्ता नसेल आणि साधी पायवाट असेल आणि ती गरम नसेल तर मात्र अनवाणी चालायला हरकत नाही पूर्वी वाटा स्वच्छ असत त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नव्हते आता तसे राहिलेले नाही म्हणून अनवाणी फक्त दहा सेकंद ते एक मिनिट चालावे वाटा स्वच्छ आणि आरोग्यदायी असतील तर मात्र अनवाणी चालावे.

५  चितेभवताली शिवलिंगाच्या आकारामध्ये शस्त्रे रोवून ठेवावीत किंवा उभी करावीत हा त्या वीर व्यक्तीचा सन्मान असतो काही शक्य नसेल तर किमान सात काठ्या उभ्या कराव्यात. राख झाल्यावर किंवा संपूर्ण विधी पूर्ण झाल्यावर शस्त्र अथवा काठ्या काढून घ्याव्यात .

६  चितेला अग्नी द्यावा आणि मग हर हर महादेव अशी तीन वेळा घोषणा द्यावी जर सलामी द्यायची असेल तर ती हर हर महादेव म्हणत तीन वेळा द्यावी 

७ चितेला अग्नी देण्याची जागा निवडतानाच तिथे त्या व्यक्तीची समाधी बांधता येणे शक्य आहे की नाही याची चाचपणी करूनच निवडावी आणि मगच तिथे अग्निसंस्कार द्यावा किंवा तिची अंतिम इच्छा असेल त्याप्रमाणे सर्व करावे जर अंतिम इच्छा दफन करण्याची असेल तर दफन करावे आणि त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ समाधी बांधावी त्या समाधीवर त्या व्यक्तीचा जन्म आणि मृत्यू यांची नोंद करावी आणि त्याचबरोबर तिने काय कर्तृत्व गाजवले याचे स्पष्ट उल्लेख असलेला बोर्ड लावावा. समाधीच्या शेजारी एक वटवृक्ष असावा किंवा लावावा वटवृक्ष शक्य नसेल तर सात वृक्ष लावावेत किंवा शक्य असेल तर उद्यान बांधावे.

शैवाचार्य श्रीधर तिळवे नाईक 


Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे