Posts

Showing posts from December, 2025
 आशुतोष दिवाण यांच्या एका पोस्टवर केलेली कॉमेंट श्रीधर तिळवे नाईक  पाशुपत दर्शनामध्ये संन्यास घेणाऱ्या व्यक्तीला कंपल्सरी एक महिना भिक्षा मागायची दीक्षा दिली जाते आणि जोपर्यंत हा एक महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत तो संन्याशाला योग्य झाला आहे असे मानले जात नाही आता हे उरले नाही परंतु त्या मागचा जो इसेन्स आहे तो तुम्ही सांगता तोच आहे माणसाला खूप लाज असते आणि मागायची तर खूप लाज असते त्यामुळे ही लाज निघून जावी म्हणून भिक्षा हा उपाय शोधला गेला आणि तो भगवान शंकर यांनी प्रथम शोधला ही वस्तुस्थिती ! माणसाला वाटणारे सर्वात मोठे भय हे मृत्यूचे असते आणि म्हणून एक महिना स्मशानात राहणे ही मोक्ष मिळवण्याची दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे कारण स्मशानात राहिला की तुम्ही मृत्यूला सतत बघत राहता आणि मृत्यू मधून हळूहळू मृत्यूच्या भयामधून हळूहळू मोकळे होत जाता. शंकराला स्मशानवासी असे जे म्हटले जाते त्याचे कारण हे आहे कारण त्याने हे स्मशान वैराग्य इंट्रोड्यूस केले या दोन गोष्टी मूलभूतपणे केल्या की बऱ्याचशा गोष्टी नीट दिसायला लागतात बाकी लोकांनी जे म्हटले आहे त्यातला एक मुद्दा नक्की आहे तो म्हणजे भारतापे...
 उपयुक्ततावाद व्यवहार वाद उत्तर व्यवहार वाद आणि जालव्यवहार वाद १० श्रीधर तिळवे नाईक  आपण अनेक पेपरमध्ये हळूहळू व्यवहार वाद अशी गोष्ट समजून घेतो आहे आणि त्याचबरोबर त्याच्या नवीन काही दिशा शोधतो आहोत. आपण हे पाहतो आहोत की ज्ञानाची नवता आणि ज्ञानाची जूनता यांचा आयुष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो आता आपण आता मूलभूत गोष्टीवर चर्चा करू. माणसाचे जीवन हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असते असा प्रश्न जर का आपण मोक्षवादी लोकांना विचारला तर त्याचे स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर मोक्षकी देते ते म्हणजे प्राण आणि प्राणायाम ! मी हे खूपदा सांगितलेले आहे की भगवान शंकर ही कदाचित पहिली अशी व्यक्ती होती की जिने माणसाचे प्राणी असणे माणसाचे पशु असणे अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ पणाने आणि ठामपणाने स्वीकारले कुठलाही परलोकाचा अलौकिक मुलामा दिला नाही आणि त्याचबरोबर हा प्राणी मोक्ष अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो हेही त्यांनी स्वतःच्या जीवनशैली मधून सिद्ध केले . त्यामुळेच पशुपतिनाथ हे नाव त्यांनी अभिमानाने मिरवले . हेच नाव पुढे शिव ह्या तत्वालाही दिले आणि एक नवीन तत्त्वज्ञान पशुपती या आपल्या शिष्याला दिले जो मूळचा बहुदा ने...
उपयुक्ततावाद व्यवहार वाद आणि कल्पव्यवहारवाद ( मांत्रिकी) अर्थात मांत्रिक ,भगत आणि ब्राह्मण भाग सहा मानवी जीवनामध्ये श्रद्धायुग हे एक अत्यंत गुंतागुंतीचे युग आहे कारण या युगाला शह देण्यासाठीच पुढे इंडियाना मधून मोक्ष आला युरोप मधून फिलॉसॉफी आली आणि नंतर मोक्ष आणि फिलॉसॉफीला शह देण्यासाठी युरोपमध्ये ख्रिश्चन हा रीलिजन आणि भारतामध्ये धर्म आला  श्रद्धा युगाच्या केंद्रस्थानी मुळातच अनुभव होता हा अनुभव प्रामुख्याने इंद्रिय अनुभव होता आणि प्रॉब्लेम असा होता की भवतालचे जग हे फक्त इंद्रियांनी कह्यात येत नव्हते आणि याचाच फायदा नेमका घेतला गेला . हा फायदा घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून मांत्रिक होते . जगभरामध्ये सर्व टोळ्यांच्या मध्ये हे मांत्रिक उदयाला आलेले दिसतात याला अनार्य सुद्धा अपवाद नव्हते. शैव श्रुतीची मांडणी करताना नेहमीच अनेकदा येणारा सर्वात मोठा पेच हा या अनार्य श्रद्धांचा असतो कारण या अनार्य श्रद्धांमधल्या अनेक गोष्टी आज सुद्धा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मांत्रिक लोक करत असतात . भगवान शंकर यांनी या अनार्य श्रद्धांना छेद देण्यासाठीच शैव श्रुती जन्माला घातली आणि या मांत्रिकांचे म्हणजेच...
 उपयुक्ततावाद व्यवहार वाद आणि सत्य ४ श्रीधर तिळवे नाईक  मागील लेखामध्ये आपण संस्काराहारी ही संकल्पना मांडली आणि संस्कारांचा थोडासा विचार केला आता त्या पुढे जाऊन आणखी काही करता येते का ते पाहू . आपण आधीच पाहिले आहे की आपण सत्य वास्तव आणि तथ्य यांच्या अंगाने पाहावे लागते पण त्याचबरोबर आपण हेही पाहिले की अनेकदा हेतूग्रस्त आणि पूर्वग्रह ग्रस्तता कशी ग्रासून टाकत राहते . प्रश्न असा आहे की मग यांना ओलांडून जाता येते का ? आपल्याकडे त्यातूनच बुद्धिमत्ता विचार किंवा बुद्धी विचार आणि प्रज्ञा विचार हा वेगळा केला जातो म्हणूनच आता आपण त्या अंगाने चर्चा करत आहोत. पहिला प्रश्न अर्थातच प्रज्ञा म्हणजे काय ? प्रज्ञा आणि बुद्धिमत्ता एक आहे का ?  प्रज्ञा म्हणजे प्राणाशी जोडली गेलेली बुद्धिमत्ता ! त्यामुळेच I Q शी तिचे नाते नसते . आणि ती शक्तीला प्रतिभा बनवते . क्रिएटिव्ह बनवते . जर का शक्ती प्राणाशी जोडली गेली नसेल तर ती अनेकदा स्टिरीओ टाईप जाते . स्मृतीत अडकत जाते .स्मृति ही मेंदूशी निगडित घटना आहे पण तिचे ॲक्सेसीलेरेशन त्वरण हे बुद्धिमत्तेशी आणि प्राणाशी निगडित आहे मोक्ष काय करतो तर सविकल...
अर्वाचीन स्वच्छंद वादी कवितेचा दुसरा जनक श्रीधर तिळवे नाईक  श्रीधर हे माझे नाव माझ्या वडिलांच्या वडिलांचे असलेले पण मराठीत आपल्या नावाचे कुणी आहे का म्हणून शोध घेताना दोन श्रीधर सापडले आणि आश्चर्यकारकरीत्या दोघेही समकालीन लोकांच्या पेक्षा अधिक लोकाभिमुख होते . एकाने रामायण महाभारत व्यवस्थित आणले आणि दुसरा श्रीधर कुलकर्णी मात्र प्रचंड बंडखोर होता. त्याने ब्राह्मण असूनही सर्व काही धुडकावले आणि आपल्या पद्धतीने जीवनशैली निर्माण केली त्याने आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे पूर्वाश्रमीच्या महारणीवर प्रेम केलं आणि त्यांचा रोमान्स हा खऱ्या अर्थाने रोमँटिक होता . अर्वाचीन होता कारण तो ब्राह्मण आणि महार या भारतीय समाजातील सर्वात उच्च आणि सर्वात निम्न असा दोन जातींच्या मधला लिविंग रिलेशन होता. अर्थातच हे सर्व शक्य होते याचे कारण तो शैव होता त्याचा पहिला साक्षात्कार वाराणशीलाच होता म्हणजे काशीला होता त्याच्या भाषेत विश्वेश्वर आणि रुद्र ! आपली ओळख करून देताना त्याने या दोघांचे नाव घेतलेले आहे शैव हे कायम कसे वेगळे असतात हा प्रश्न मराठीला पडत नसतो पण मला कायम पडत असतो कारण मराठी वाङ्मयाचा इतिहास ल...
 नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधी यांची रिपीटेशन आहे का श्रीधर तिळवे नाईक  भारतीय राजकारणाचा विचार करताना नेहमीच पंतप्रधानकेंद्री विचार अनेकदा पुढे येतो आणि कळत नकळत या प्रकारची मांडणी ही एका अर्थाने फार पारंपारिक होत जाते कारण या मांडणीमध्ये सुद्धा राजा महत्त्वाचा बनतो किंवा राणी महत्त्वाची बनते.  दुर्दैवाने आपल्या आकलनासाठी विशेषतः लोकांना कळावे म्हणून आपणाला कधीकधी ही मांडणी स्वीकारावी लागते कारण प्रत्यक्ष व्यवस्थेमध्ये आणि संरचनेमध्ये असाच केंद्रीयपणा आलेला असतो जो कळत नकळत सरंजामशाहीवादीच असतो.  भारताचा इतिहास पाहिला तर आपणाला स्पष्टपणे दिसते की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परंपरेनुसार मध्यबिंदू साधण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये कधीही दोन टोके चालत नाहीत सुवर्णमध्य साधावा लागतो आणि गौतम बुद्ध यांच्यापासून याला अधिकच चालना मिळालेली दिसते. भगवान शिव यांच्यामध्ये हा मध्यबिंदू अधिक व्यवस्थित होता परंतु पुढे गौतम बुद्ध यांच्या कालखंडामध्ये तो मध्यबिंदू किंचित अहिंसेकडे वळला .  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर गौतम बुद्धाचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे साहजिकच त्यांन...
 विनोद कुमार शुक्ल : विधान छंदाचा अभूतपूर्व कवी गेला श्रीधर तिळवे नाईक  विनोद कुमार शुक्ल गेले ते कवितेच्या इतिहासामध्ये नेमके कुठे उभे आहेत हे कळायचे असेल तर प्रथम आपणाला कवितेचा छंदात्मक इतिहास तपासला पाहिजे . कवितेच्या इतिहासामध्ये जगातल्या जवळजवळ सर्वच धारांच्या मध्ये टोळ्यांच्या मध्ये कवितेची सुरुवात ही नेहमीच मात्रा छंदाने झाली कारण तिथे केवळ सामुदायिक लिखाण नव्हते तर सामुदायिक गायन आणि नृत्य सुद्धा केले जाई. पुढे मग पंडित लोक घुसले आणि त्यांनी लोकपरंपरा बाजूला करून वृत्तछंदात म्हणजे अक्षरगणवृत्तात लिहायला सुरुवात केली. साहजिकच कविता म्हणजे ती छंदातच असली पाहिजे अशी धारणा अभिजात पंडिती परंपरेमध्ये घट्ट होत गेली आणि अभिजात परंपरा कायमच आपला हट्ट लोकपरंपरेवर लादण्याचा प्रयत्न करू लागली परंतु लोक परंपरेने कधीही त्याला दाद दिली नाही . यादृष्टीने मराठीतील पंडिती कवी बघण्याजोगे आहेत. आणि त्यांना समकालीन असणारे शाहिरी वाङ्मय बघावे . त्यानंतर भारतातल्या संतांच्यापैकी मराठी परंपरेमध्ये मराठी संतांनी काही प्रमाणात एक वेगळा मात्रा छंद विकसित केला तो म्हणजे अक्षरी अभंग होय ह्यात म...