उपयुक्ततावाद व्यवहार वाद आणि कल्पव्यवहारवाद ( मांत्रिकी) अर्थात मांत्रिक ,भगत आणि ब्राह्मण भाग सहा
मानवी जीवनामध्ये श्रद्धायुग हे एक अत्यंत गुंतागुंतीचे युग आहे कारण या युगाला शह देण्यासाठीच पुढे इंडियाना मधून मोक्ष आला युरोप मधून फिलॉसॉफी आली आणि नंतर मोक्ष आणि फिलॉसॉफीला शह देण्यासाठी युरोपमध्ये ख्रिश्चन हा रीलिजन आणि भारतामध्ये धर्म आला
श्रद्धा युगाच्या केंद्रस्थानी मुळातच अनुभव होता हा अनुभव प्रामुख्याने इंद्रिय अनुभव होता आणि प्रॉब्लेम असा होता की भवतालचे जग हे फक्त इंद्रियांनी कह्यात येत नव्हते आणि याचाच फायदा नेमका घेतला गेला . हा फायदा घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून मांत्रिक होते . जगभरामध्ये सर्व टोळ्यांच्या मध्ये हे मांत्रिक उदयाला आलेले दिसतात याला अनार्य सुद्धा अपवाद नव्हते. शैव श्रुतीची मांडणी करताना नेहमीच अनेकदा येणारा सर्वात मोठा पेच हा या अनार्य श्रद्धांचा असतो कारण या अनार्य श्रद्धांमधल्या अनेक गोष्टी आज सुद्धा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मांत्रिक लोक करत असतात .
भगवान शंकर यांनी या अनार्य श्रद्धांना छेद देण्यासाठीच शैव श्रुती जन्माला घातली आणि या मांत्रिकांचे म्हणजेच भगतांचे वर्चस्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना पंडित बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रचंड यशस्वी झाला तरी कुठे ना कुठेतरी समाजाच्या निबीड अरण्यात हे लोक स्वतःच्या वर्चस्वसंधीची वाट पाहत होते .
या मांत्रिकांचे अनेक प्रकार होते पण त्यामधले जे प्रमुख समुदाय म्हणून उदयाला आलेत ते म्हणजे भगत आणि ब्राह्मण ! यातील ब्राह्मण हे दोन प्रकारचे होते का हा एक फार मोठा ऐतिहासिक प्रश्न आहे . भगत लोक मात्र इथले स्थानिक भारतीय होते याबद्दल कोणाला शंका नाही . या भगतांना सर्वात प्रथम संधी मिळाली पुन्हा ती वैदिक धर्म भारतात आल्यानंतर आणि या युरेशियन श्रुतीची भरभराट झाल्यानंतर ! कारण त्यांच्या मदतीला या वेळेला ब्राह्मण धर्म आला आणि ब्राह्मण आणि भगत यांची युती तयार झाली.
पुढे पुढे शैव श्रुतीचे रूपांतर तंत्र श्रुतीमध्ये करण्यात जे ब्राह्मणांना यश आले त्यातून मग हळूहळू भगतांनी स्वतःला तांत्रिक म्हणवून घ्यायला सुरुवात केली आणि लोकांनीही यांना तांत्रिक असे म्हणायला सुरुवात केली आणि हे लोकही स्वतःला भगत म्हणवण्याऐवजी तांत्रिक म्हणवून घेऊ लागले कारण त्यामुळे त्यांना शैव कस्टमर मिळत होते आणि पुढे वैष्णव लोकांनी यांना तांत्रिक म्हणून स्वीकारल्यानंतर त्यांना वैष्णव कस्टमर पण मिळत गेले . तांत्रिकी ही संज्ञा बदनाम होत गेली हळूहळू तिला श्रुती म्हणण्यात येऊ लागले . मुख्य म्हणजे या सगळ्याचे लिखित डॉक्युमेंटेशन होऊ लागले साहजिकच हळूहळू शैव तांत्रिकी हा शब्द मागे पडून प्रथम शैव श्रुती आणि लिखाणात पूर्णपणे तंत्र श्रुती हा शब्द प्रस्थापित झाला अलीकडे अनेक लोक तो मुद्दाम जाणीवपूर्वक वापरतात कारण त्यामध्ये हळूहळू वैष्णव लोकांचा समावेश होऊन तांत्रिक श्रुती ही हिंदू श्रुती झाली अनेक ब्राह्मण आणि पंडित सुद्धा तांत्रिक म्हणून काम करू लागले .
एका अर्थाने वैष्णव धर्मामुळे आणि वैष्णव धर्माने तंत्र स्वीकारल्यामुळे बौद्ध धर्माने तंत्र स्वीकारल्यामुळे म्हणजेच वज्रयान स्वीकारल्यामुळे मांत्रिकी पुन्हा एकदा तांत्रिक म्हणून प्रस्थापित झाली पुन्हा एकदा धर्मामध्ये मोक्ष जाऊन त्या जागी मांत्रिकी आली आणि सगळा खेळ पुन्हा एकदा श्रद्धेचा झाला
ब्राह्मण हे सर्वात प्रथम मांत्रिक होते ऋषी सुद्धा आपण जर का ऋग्वेद पाहिला तर मांत्रिकच होते किंबहुना जो मंत्र रचतो तो ऋषी अशी व्याख्या होती मग ब्राह्मण आणि ऋषी यांच्यामध्ये काय फरक होता तर ऋषि मंत्र रचत होते आणि ब्राह्मण फक्त त्या मंत्रांना फॉलो करत होते अनुयायी होते.
मांत्रिकीचा व्यवहार हा कसा होता तर तो कल्प व्यवहार होता प्रत्यक्ष व्यवहार नव्हता . कसलीही खात्री नसताना प्रत्यक्षात काल्पनिक खात्री देत मनोकामना पूर्ण करण्याचे कर्मकांड म्हणजे मांत्रिकी होय. अनार्य लोकांच्या मध्ये या संदर्भातल्या कल्पना अतिशय स्पष्ट होत्या आणि विद्या आणि मांत्रिकी या दोन भिन्न गोष्टी आहेत याची त्यांना कल्पना होती त्यांना ताळ्यावर आणायचे म्हणूनच भगवान शंकर यांनी विद्यांचा पुरस्कार केला भगवान गणपती यांनी भगवान विनायक यांनी विद्यांचा पुरस्कार केला पण मांत्रिकीचा कधीही पुरस्कार केला नाही . तिला कायम ठामपणे विरोध केला. खरे तर भगत हे पूर्णपणे भारतामधून पराभूत होत चालले होते परंतु दुर्दैवाने नंतर काही लोकांनी खुद्द शैवांच्यातच धर्म निर्माण केला आणि या सर्व मागे गेलेल्या भगत लोकांना पुन्हा एकदा मागून यायला जागा झाली आणि हळूहळू अनेक भगत शैव धर्मामध्ये पुरोहित म्हणून स्थिर होत गेले .
जगभरातील सर्व टोळ्यांचा आपण अभ्यास केला तर आपणाला असे दिसते की मांत्रिकी सर्वत्र आहे . याला स्टेप्स मधून आलेल्या किंवा सायबेरिया आणि मंगोलिया मध्ये असणाऱ्या टोळ्यांचा सुद्धा अपवाद नव्हता तिथे मांत्रिक हा शमन होता शामन होता त्यामुळे साहजिकच जेव्हा मंगोलिया मधून या लोकांचे स्थलांतर झाले तेव्हा ते भारतात आले ते तिबेट मार्फत आले आणि तिबेट मध्ये हे लोक हळूहळू बदलत गेले आणि त्यांनी शैव लोकांचा अनार्य लोकांचा मोक्ष स्वीकारला त्यामुळे साहजिकच मूळ शामन हा शब्द स्वीकारणे अवघड गेले आणि हळूहळू हे स्वतःला श्रमण म्हणवून घेऊ लागले यामुळे झाले काय की या प्रदेशामध्ये जो मांत्रिकी स्वीकारतो तो शामन पुढे ब्राह्मण आणि जो मोक्षाला जाण्यासाठी साधना करतो तो श्रमण अशी व्यवस्था प्रस्थापित झाली आणि त्यातूनच शैव लोकांच्या श्रुती मधली एक उपश्रुती म्हणून श्रमण श्रुतीचा विकास झाला जिच्यातून आजीवक ,जैन आणि बौद्ध अशा धर्मांचा उदय झाला हे लोक अनारीय लोकांना स्वीकारायला तयार नव्हते कारण यांना स्वतःची स्वतंत्र स्वायत्त ओळख टिकवून धरायची होती .
मात्र यांच्यात सुद्धा जे सामन म्हणून टिकू इच्छित होते ते संधीची वाट पाहत होते आणि त्यांना अशी संधी महावीर आणि नंतर महायानाने दिली हळूहळू सर्व श्रमण श्रुती सुद्धा मांत्रिकीच्या प्रभावाखाली यायला लागली
अनार्य लोकांच्या मध्ये जे मांत्रिक होते ज्यांना भगत म्हटले जात होते अशा लोकांनी हळूहळू ब्राह्मण या दुसऱ्या आर्य लोकांच्यातील मांत्रिकांशी युती करून पुन्हा एकदा नवीन मांत्रिक धर्म स्थापन केला ज्याला आता आपण ब्राह्मण धर्म असे म्हणतो त्यामुळेच जेव्हा समाज शास्त्रज्ञ म्हणतात की ब्राह्मणांच्या मध्ये फक्त खरे बाहेरून आलेले ब्राह्मण 30% आहेत आणि उरलेले 70% हे इथूनच आलेले आहेत तर ते इथून आलेले जे ब्राह्मण आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून ते इथले भगत आहेत. आता प्रश्न असा आहे की सर्वच भगत असे होते का? तर नाही अनेक भगत असे होते ज्यांनी भगवान शंकरांचे शिष्यत्व पत्करले होते आणि ते स्वतः पंडित बनले होते परंतु एक वेळ अशी आली की जेव्हा पंडित लोकांनी सुद्धा मांत्रिकी स्वीकारायला सुरुवात केली आणि त्यांनीच शैव श्रुतीचे रूपांतर तंत्र श्रुतीमध्ये करण्यामध्ये प्रचंड मोठा वाटा उचलला याचे कारण स्पष्ट होते धंदा होता मांत्रिकी हा एक नेहमीच उत्तम चालणारा व्यवसाय असतो त्याचा व्यवहार कल्प व्यवहार असला तरी कल्पनेने चाललेला आणि कल्पनेच्याच आधारे चाललेला व्यवहार असला तरी त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गिऱ्हाईक आहे . आणि हे गिराईक फक्त अनार्य नाही ते आर्यसुद्धा आहे यज्ञ ही संस्था ही सुद्धा मांत्रिकी प्रधान व्यवस्था आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे . वाम पूजा हीसुद्धा अशीच मांत्रिकी व्यवस्था आहे आणि फलप्राप्तीसाठी तीच केली जाते . या दोन्हींचा आधार यजमानाला कशाला प्राप्ती करून घ्यायची असते आणि ही प्राप्ती इच्छा हीच समस्त मांत्रिकी व्यवहाराचा पाया असते .
या मांत्रिकी व्यवहारातला सर्वात मोठा टप्पा हा असतो की खुद्द राज्यव्यवस्था आणि राजा या मांत्रिकी व्यवहाराच्या सर्व व्यवहाराला स्वीकारतो मान्यता देतो आणि राजाश्रय देतो. इथेच धर्माचा उदय होतो . धर्म ही एक राज्य प्रणाली बनते राजकीय विचार प्रणाली बनते आणि संपूर्ण व्यवस्था राज्य व्यवस्थेच्या द्वारे ताब्यात घेते . म्हणजेच इथे धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येतात सैन्य सत्ता ही धर्मसत्तेद्वारे राजसत्तेच्या अंकित आणली जाते . टोळी अवस्थेत सर्वसाधारणपणे सैन्य सत्ता ही उदयाला येते आणि अनेकदा सैन्य सत्तेमधलाच मनुष्य राजा बनतो त्यामुळे ज्याला युद्धभूमीवर लढता येते तोच राजा बनतो परंतु काही धूर्त लोक नंतर असे असतात की ज्यांना समाजावर नियंत्रण हवे असते ज्यांना आपण राजकारणी म्हणतो ज्यांना लढण्याबद्दल काहीही इच्छा नसते जे कधीच युद्धाच्या मैदानावर उतरत नाही असे भित्रे पण बिलंदर लोक व्यवस्थितपणे धर्मसत्तेच्याद्वारे सैन्य सत्तेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतात आणि इथेच राजेशाही चा उदय होतो सैन्यशाही नष्ट होते सेनापतीचे टोळीप्रमुख वा राजा बनण्याचे चान्सेस नष्ट होतात . विद्या युगामध्ये निर्माण झालेल्या सर्व विद्या ज्या शहाणपण साठवत असतात त्या विद्या धर्माच्या अंकित केल्या जातात . मांत्रिकीच्या अंकित केल्या जातात आणि शेवटी त्यांची वाढ खुंटायला सुरुवात होते
हे सर्व केल्यानंतर मग मांत्रिकी काय करते ? सर्वात प्रथम ती आपण बाहेरून आलो आहोत हीच गोष्ट नाकारते आणि आपण कसे त्या त्या राज्यातलेच प्राचीन काळामध्ये नागरिक आहोत हे सांगायला लागते इतकेच नव्हे तर त्या राज्याचा इतिहास म्हणजे आम्हीच निर्माण केलेला इतिहास आहे आम्हीच घडवलेला इतिहास आहे असे सांगायला लागते . सर्व विद्या ही कशी आमचीच म्हणजेच ईश्वराची निर्मिती आहे हेही सांगायला लागते प्रत्यक्षामध्ये या विद्यांच्या उगमामध्ये किंवा विकासामध्ये या लोकांचा या मांत्रिकीचा काडीचाही वाटा असत नाही . त्यातूनच मग संपूर्ण हडप्पा संस्कृती आमची निर्मिती आहे वैदिक संस्कृतीची निर्मिती आहे अशा प्रकारचा सिद्धांत पुढे आणला जातो
प्रत्यक्षामध्ये आपण जेव्हा आलो तेव्हा आपण घोडे घेऊन आलो होतो ही मुख्य गोष्टच लपवली जाते वास्तविक तिबेट द्वारा आले काय किंवा अफगाणिस्तान द्वारा आले काय या लोकांनी सोबत घोडे आणले होते आणि घोडे ही त्यांची खासियत होती आज सुद्धा तिबेटमध्ये आणि अफगाणिस्तान मध्ये घोडे आहेत फक्त तिबेट मधले घोडे मंगोलिया मधून आले होते की नाही असा प्रश्न आपण विचारू शकतो पण हे प्रामुख्याने घोड्यावरून आले होते हीच वस्तुस्थिती आहे ज्यांचा मागमुस सिंधू संस्कृतीत आढळत नाही साहजिकच मग खोटेपणा येतो अनेक प्राण्यांना घोडे बनवले जाते . शंकर हे नंदीबैलावरून येतात मग करायचे काय तर मग स्कंद हे जे रूप आहे तेच खंडोबा म्हणून बदला आणि खंडोबाला घोड्यावर बसवा आणि त्याला शंकर करा शिवशंकर करा शिव रूप करा असा प्रकारचा उद्योग सुरू होतो म्हणजेच दक्षिण पादांक्रांत करणारा शिवपुत्र स्कंद मूळ खंडोबा बाजूला राहतो आणि घोड्यावर बसलेला खंडोबा प्रस्थापित होतो . तो साहजिकच प्राचीन काळातल्या भगतांना हवा असतो कारण त्याच्या आधारे तुमच्या मांत्रिकीच्या जुन्या प्रथा शाबूत ठेवल्या जातात देवदासी वाघ्या मुरळी या प्रथा ज्या मांत्रिकांना म्हणजे भगत आणि ब्राह्मण दोघांनाही अत्यंत आवश्यक वाटतात जिवंत होऊन पुन्हा सळसळायला लागतात
यामुळेच मी नेहमी गुरव लोकांना सांगतो की भगत बनायचे की पंडित बनायचे हे ठरवा कारण हे जर का ठरवले नाही तर पुन्हा एकदा भगतगिरीच येणार आणि भगतगिरी ही कधीही कल्याण करणारी असत नाही . तुम्ही केवळ शैव आहात म्हणजे भगतगिरी करायला मोकळे आहात असा जर का तुमचा समज असेल तर काढून टाका. शैव होण्याचा अर्थ पंडित होणे असा असतो आणि पंडित तोच होऊ शकतो जो सर्व विद्यांचा अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यांचा प्रचार करतो . ज्या गोष्टी अनाकलनीय असतात त्यांचा अनाकलनीय म्हणूनच पाठपुरावा करतो त्यांचे रूपांतर मांत्रिकी मध्ये होऊ देत नाही . उलट त्या गोष्टींना कसे वैज्ञानिक बनवता येईल ते पाहतो .
मांत्रिकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती वैज्ञानिक पुरावे कायम नाकारत राहते म्हणजे पुरातत्त्व विद्या असो अनुवंशिकी विज्ञान असो किंवा तुलनात्मक भाषा विद्या असो अशा प्रकारच्या सर्व विद्या आणि विज्ञान ती नाकारत राहते आणि जास्तीत जास्त श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा प्रचार करत राहते . साहजिकच तुम्ही कितीही वैज्ञानिक पुरावे द्या पण ती स्वीकारल्याचा आभास निर्माण करते पण प्रत्यक्षात ती ते पुरावे कधीही स्वीकारत नाही . त्यामुळे विज्ञानाला कायमच अग्नी परीक्षा द्यावी लागते आणि यदाकदाचित विज्ञानाने अग्नी परीक्षा दिली तरी ती त्या विज्ञानाला नंतर पद्धतशीरपणे अज्ञातवासात पाठवून देते वनवासात पाठवून देते. इतकेच नव्हे तर मग मांत्रिकीच्या आधी जे पुरातत्त्वविद्याने नवीन पुरावे आणलेले असतात ते सुद्धा ती नाकारत राहते कारण शेवटी आपण आधी आलो होतो किंवा सुरुवातीपासूनच आधी होतो हेच तिला सतत आग्रह पूर्वक मांडावे लागते .
इतिहास हा असा आपल्या ताब्यात ठेवण्याचे आणि पुराणांच्याद्वारे इतिहासरचना रचण्याचे सातत्यपूर्ण उद्योग हे सुद्धा मांत्रिकीचे लक्षण असते . धर्म नावाची विचार प्रणाली मांत्रिकी निर्माण करते कारण सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी हे आवश्यक असते मुख्य म्हणजे कायदे आणि कानून आपल्या हिशेबाने चालावेत ही त्या मागची आंतरिक इच्छा असते .
आता प्रॉब्लेम असा असतो की वैज्ञानिक पुरावे प्रबळ होत गेले की टिकणे अवघडून बसते मग साहजिकच पुन्हा एकदा श्रद्धेचा हवाला दिला जातो आणि हा हवाला टिकावा म्हणून वारंवार आम्ही जे सांगत आहोत ते ईश्वराने आम्हाला सांगितलेले आहे किंवा ईश्वराने आमच्या प्रेषिताला किंवा आमच्या ऋषीला सांगितलेले आहे अशा प्रकारचा दावा वारंवार पुढे आणला जातो . मांत्रिकी प्रधान धर्म मग तो धर्म ज्यू असो रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन असो इस्लाम असो किंवा तो धर्म ब्राह्मण धर्म असो किंवा तो धर्म वैष्णव धर्म असो नेहमीच परलोकांतून वा उच्च लोकांतून किंवा थेट देवाकडून आलेल्या प्रेषितांच्या वर किंवा अवतारांच्यावर विश्वास ठेवतो . इतकेच नव्हे तर जे लोक विश्वास ठेवत नाहीत त्यांच्या दैवतांना सुद्धा आपल्यात सामावून घेत त्यांना अवतार करतो त्यांचा नवा कल्प व्यवहार तयार करून त्यांच्या नावाची पुराणे रचतो . त्यांच्या वतीने त्यांच्यासाठी लोकांच्यात राबवता येतील असे मंत्र तयार करतो त्यांचीही मांत्रिकी तयार करतो . लोक फसत जातात फसत राहतात ही या मधली सर्वात मोठी शोकांतिका असते.
प्रश्न असा असतो की या मांत्रिकीला जो विरोध होतो मग तो विरोध मोक्षाच्या पातळीवर होवो किंवा विज्ञानाच्या पातळीवर होवो तो मोडून कसा काढायचा ? यासाठी मग एक तर धर्म युद्ध ही संकल्पना राबवली जाते किंवा बहिष्कार राबवला जातो आणि विरोधकांना पूर्णपणे नष्ट केले जाते किंवा मग आपल्या मांत्रिकी मध्ये बाटवले पाठवले जाते आणि हळूहळू या विरोधकांच्या पुढच्या पिढ्या आपोआपच मांत्रिकीचा पुरस्कार करायला लागतात .
हे करताना कधी कधी यांचा संघर्ष मोक्ष आणि तत्त्वज्ञान यांच्याशी होतो मग करायचे काय तर जी मोक्षिकी असते तिच्यातील सर्व गोष्टी हळूहळू आत्मसात करत त्यांना बदनाम करायचे किंवा त्यांना तात्पुरते सामावून घेऊन पुन्हा एकदा आपला धर्मच आणायचा . अनेकदा आत्मसात करण्यासाठी त्या मोक्षिकी मध्ये घुसायचे त्या धम्मामध्ये घुसायचे आणि त्याला इतके पतित करायचे की तो उभा राहू शकत नाही अशी अवस्था यावी . भारतामध्ये ब्राह्मण लोकांनी हे अनेकदा केलेले आहे म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक आपला रुद्र हा वैदिक देव शिव करून टाकला आणि गणपतीला अत्यंत जाणीवपूर्वक आत्मसात करायला सुरुवात केली त्यासाठी कथा रचल्या गेल्या मग अत्यंत स्ट्रॅटेजिकली ज्याप्रमाणे युरोपमध्ये मूळचे ग्रीकदेव नष्ट करून रोमन देव आणले गेले तसेच काहीसे गणपतीबाबत केले म्हणजे मूळ मनुष्य असलेला गणपती नाहीसा झाला आणि हत्ती पासून तयार झालेला गणपती असा एक नवा गणपती उदयाला आणून तो पूर्णपणे प्रस्थापित केला गेला . हे करताना अत्यंत जाणीवपूर्वक मोक्षामधले हत्ती हे प्रतीक राबवले गेले स्वीकारले गेले . पुढे मग सिंह (हा प्राणी भारतीय आहे की नाही याबद्दल वाद आहे मात्र तो परदेशी असल्यासारखा वापरायला गेलाय) हत्तीला भारी पडतो वगैरे सांगायला सुरुवात केली प्रत्यक्षामध्ये एक हत्ती आणि एक सिंह असा सामना झाला तर हत्ती अक्षरशा सिंहाची वाट लावतो पण तरीही जंगलचा राजा सिंह अशी इमेज केली जाते आणि सगळ्या क्षत्रियांना सिंह व सिंग असे प्रतीक रूप लावले जाते इंद्राला सुद्धा ऐरावत देऊन शेवटी त्या गजेंद्रला मगरीच्या जबड्यात दिले जाते आणि त्याची सुटका तो विष्णू करतो . हत्ती या प्रतीकाची जितकी हेटाळणी करता येईल तितकी करणे चालू होते पण जेव्हा यश मिळत नाही तेव्हा मग त्या हत्तीला स्वीकारू या असे म्हणत स्वीकारले जाते. सूर्याला घोडे दिले जातात आणि सूर्य हे शिवलिंगाचे पृथ्वीवासी लोकांच्यासाठी सर्वात मुख्य रूप आहे ही संकल्पना शैव मोक्षिकेतून गायब केली जाते . सूर्याचे राम आणि कृष्ण हे दोन शैव प्रकार अवतार म्हणून स्वीकारले जातात . शैव श्रुतीमधील सूर्याचे मुख्य रूप यम हे नाहीसे केले जाते त्याला परलोक देऊन टाकला जातो आणि अनेकदा त्याच्यातला गांभीर्य हा प्रकार नाहीसा केला जातो इतकेच नव्हे तर दक्षिण दिशा बदनाम केली जाते कारण दक्षिण दिशेत यम प्रभावी असतो .
ब्राह्मण ,ज्यू,ख्रिश्चन आणि मुस्लिम हे कसे उच्च आहेत हे वारंवार सांगितले जाते आणि इथले जे स्थानिक शैवलोक आहेत त्यांना तुम्ही कसे खालचे आहात हे सांगितले जाते त्यांच्यासाठी खास वैश्य , शूद्र अतिसुद्र आणि आदिवासी असे वर्ण निर्माण करण्यात येऊन त्यांच्यातले जे धनवान आहेत त्यांना मुद्दाम वैश्य म्हणून" मध्ये" ठेवत दलाला सारखे राबवत जनतेला आपल्या मांत्रिकीच्या कहेत आणत राज्य केले जाते. त्यांनी निर्माण केलेले सर्व उत्पादन आणि त्यांचे श्रम आपल्या ताब्यात ठेवले जाते आणि जातात . पुढे मग वैश्य आणि शूद्र यांच्यामध्ये कशी फाटा फूट होईल ते पाहिले जाते . जे गुणवान वैश्य आणि शूद्र आहेत त्यांना आपोआपच क्षत्रिय म्हणून स्टॅम्प मारत आपल्यात सामावून घेतले जाते त्याची संपत्ती आपल्या ताब्यात यावी म्हणून राज्याभिषेक सुद्धा केला जातो . हे संस्कार इतके ठसवट ठसवत जातात की शेवटी या नव्याने क्षत्रिय बनलेल्या लोकांना पूर्णपणे क्षत्रिय बनवून टाकून आपल्या मांत्रिकीच्या कह्यात आणले जाते . याचा एक दुष्परिणाम असा होतो की सर्व सत्ताधीश शेवटी मांत्रिकीच्या तालावर नाचायला लागतात. कारण नव्याने प्राप्त झालेली उच्चता ही या लोकांना अतिशय सुखद वाटत राहते आपल्याच लोकांचा विसर पडतो आपण कुठून आलो आहोत याचाही विसर पडतो त्यांच्यामध्ये एक श्रेष्ठत्व गंड निर्माण होतो आणि हा गंड शेवटी त्यांना आपल्या स्वतःच्या माणसांच्या पासून पूर्णपणे तोडतो . ही एक मांत्रिकीची स्ट्रॅटेजी असते तिला सर्वच बळी पडतात कोणीतरी एक शिवाजी महाराज असतात ज्यांना यातले राजकारण कळते आणि ते पुन्हा एकदा शैव राज्याभिषेक करून घेतात आणि शैव होतात बाकी नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेत राहतात परंतु प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचे शहाणपण घेत नाहीत . कोणीतरी एक बसवेश्वर असतो जो पंडित असतो आणि ज्याला हे व्यवस्थित कळते की काय चाललेले आहे तो मग आपली पंडितगिरी सोडत नाही उलट नवा लिंगायत धर्म स्थापन करतो कोणीतरी एक पहिला बाजीराव पेशवा असतो जो थेट आंतरजातीय जाऊ द्या अंतर धर्मीय लग्न करतो कोणीतरी एक गुरुनानक असतो जो आपली शैव श्रुती सोडत नाही उलट काळाच्या नवीन टप्प्यावर तिला नवीन वळण देतो . ओम केंद्रस्थानी आणतो . कोणीतरी एक महात्मा फुले असतो ज्याला हे राजकारण कळलेले असते तो मग बरोबर खंडोबा आणि तुळजाभवानी यांची शैव ताकद ओळखतो आणि वैष्णव अवतारांची आणि हिंदू गणपतीची कठोर मीमांसा करत नव्या काळाची नवी मांडणी करतो साहजिकच मग या सर्व लोकांना कसे काय आत्मसात करता येईल ते पाहिले जाते . लिंगायत धर्म नष्ट करून त्याजागी वीरशैव धर्म कसा येईल ते पाहिले जाते शिवाजी महाराजांच्या कडे असलेली त्यांच्या घराण्याकडे असलेली शिवशाही काढून घेतली जाते आणि पेशवाई आणली जाते . बाजीराव पेशवे यांच्या विरोधात आपोआपच मस्तानी चे प्रकरण मोठ्या प्रमाणात उभे केले जाते आणि त्यांच्या मुलांना युरेशियन बनवले जाते वर्ण जात समर्थक बनवले जाते .महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची इमेज कुठेच उभे राहणार नाही याची काळजी घेतली जाते . अहिल्याबाई होळकर यशवंतराव होळकर यांचे अत्यंत सॉलिड असलेले चरित्र पुढे आणलेच जात नाही
हे सर्व पद्धतशीर रित्या केले जात असते आणि ते कधीही शैव लोकांना कळत नाही . बहुजन हे कायम अडाणी असल्यासारखेच वावरत राहतात .
कधी कधी मग साहजिकच मांत्रिकी युती करायला लागते त्यातूनचही मग ब्राह्मण आणि ज्यू यांची युती होते ब्राह्मण आणि ख्रिश्चन यांची युती होते ब्राह्मण आणि मुसलमान यांची युती होते मुसलमान आणि ख्रिश्चन यांची ज्यू आणि ख्रिश्चन यांची युती होते यांच्यामध्ये झालेली धर्म- युद्धे विसरली जातात (ब्रिटिश मुस्लिम लीगशी युती करतात)शेवटी मग साहजिकच धर्मावर्चस्वासाठी पुढे यांच्यातच आपापसात युद्धे होतात म्हणजेच असे की विज्ञान आणि मोक्ष यांच्या विरोधात लढायचे असेल तर आम्ही युती करू नाहीतर मग आम्ही आपापसात लढू .त्यामुळेच मग कोकणस्थ ब्राह्मणांच्या विरोधात उरलेले सगळे ब्राह्मण उभे ठाकतात. ज्यू मुस्लिम आपापसात लढतात
एकदा काही मोक्षकी आणि विज्ञान यांच्याविरुद्धची युद्धे संपली की मग मांत्रिकीचा लढा दुसऱ्या मांत्रिकीशी होतो आणि प्रश्न निर्माण होतो की या मांत्रिकीला आता कसे काय नष्ट करायचे किंवा कसे आत्मसात करत स्वतःमध्ये विरघळवून घ्यायचे? म्हणजे ब्राह्मणी मांत्रिकी जेव्हा भगत मंत्रीकी पुढे उभी ठाकते तेव्हा काय करायचे ? दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये अनेकदा अशी युद्ध झालेली आहेत. आत्तासुद्धा हाच प्रश्न इस्लाम मुळे निर्माण झालेला आहे .
मला अनेक मुस्लिम लोक असे सांगतात की एकदा सगळीकडे इस्लाम झाला की सर्व जगात शांतता नांदेल पण मी गॅरंटी देतो की असे काही होणार नाही शेवटी मग हे लोक जगभर इस्लाम धर्म आला आणि सर्वच लोक मुस्लिम झाले की मग आपापसात खरा मुसलमान कोण आणि काफीर कोण यावरून आपापसात लढून एकमेकाला नष्ट करणार आहेत कारण लढणे हे या मांत्रिकीमध्येच रुजवले गेलेले असते .
मांत्रिकी ही अशी संघर्षरत असणारीच व्यवस्था असते कारण ती काल्पनिक आहे ती जर का मोक्षाकडे वळली तरच काही सुधारण्याचे चान्सेस निर्माण होतात जसे काही प्रमाणात का होईना पण ज्यू, रोमन कॅथोलिक आणि इस्लाम यांच्यापेक्षा मोक्ष स्वीकारलेले ब्राह्मण हे थोडेसे माईल्ड होत जातात . मोक्ष स्वीकारलेले सुफी आणि काही ख्रिश्चन्स माइल्ड होत जातात . तसे ते झाले नाहीत आणि त्यांनी मोक्ष स्वीकारलाच नाही की मग मात्र ते अत्यंत आक्रमक युद्धासाठी उभे राहतात आणि संपूर्ण जगभर अशांती स्थापन करत राहतात .
त्यांना यश मिळते कारण जगामधला केऑस आणि डिसऑर्डर कधीच संपत नाही जोपर्यंत या जगामध्ये आसक्ती आणि तिची भूक तृष्णा आणि निकड ही माणसांच्या मध्ये कार्यरत आहे तोपर्यंत हा chaos आणि डिसऑर्डर संपणार नाही सर्वांनी मोक्ष मिळवणे हाच मांत्रिकीवरचा विजय असतो आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा विजय कधीच मिळत नाही अजून तरी मिळालेला नाही आता भविष्यात काही आरटीफिशल इंटेलिजन्स ने चमत्कार केला तर केला! तोपर्यंत तरी मोक्षिकी हा एकमेव उपाय सध्यातरी माणसाच्या हातात आहे .
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment