आशुतोष दिवाण यांच्या एका पोस्टवर केलेली कॉमेंट श्रीधर तिळवे नाईक 


पाशुपत दर्शनामध्ये संन्यास घेणाऱ्या व्यक्तीला कंपल्सरी एक महिना भिक्षा मागायची दीक्षा दिली जाते आणि जोपर्यंत हा एक महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत तो संन्याशाला योग्य झाला आहे असे मानले जात नाही आता हे उरले नाही परंतु त्या मागचा जो इसेन्स आहे तो तुम्ही सांगता तोच आहे माणसाला खूप लाज असते आणि मागायची तर खूप लाज असते त्यामुळे ही लाज निघून जावी म्हणून भिक्षा हा उपाय शोधला गेला आणि तो भगवान शंकर यांनी प्रथम शोधला ही वस्तुस्थिती ! माणसाला वाटणारे सर्वात मोठे भय हे मृत्यूचे असते आणि म्हणून एक महिना स्मशानात राहणे ही मोक्ष मिळवण्याची दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे कारण स्मशानात राहिला की तुम्ही मृत्यूला सतत बघत राहता आणि मृत्यू मधून हळूहळू मृत्यूच्या भयामधून हळूहळू मोकळे होत जाता. शंकराला स्मशानवासी असे जे म्हटले जाते त्याचे कारण हे आहे कारण त्याने हे स्मशान वैराग्य इंट्रोड्यूस केले या दोन गोष्टी मूलभूतपणे केल्या की बऱ्याचशा गोष्टी नीट दिसायला लागतात बाकी लोकांनी जे म्हटले आहे त्यातला एक मुद्दा नक्की आहे तो म्हणजे भारतापेक्षा अधिक उजवी असलेली जीवनशैली तिकडे मिळते आणि या जीवन शैलीचाच मोह सर्वांना आहे ज्यांना हा मोह नाही ते आरामात भारतात दिवस काढतात. ट्रम्प आता या जीवनशैलीलाच छेद करत आहेत त्यामुळे प्रथमच या जीवनशैलीला सुद्धा त्रास होऊ शकतो हे नवीन सत्य उदयाला आलेले आहे कधी नव्हे ते हिंदू लोकांच्या वर हल्ले होत आहेत जे पूर्वी घडले नव्हते उलट आता कायदेशीर रित्या अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला कायदेशीर असल्यामुळे त्याचे परिणाम अधिक व्यापक आहेत . प्रथमच अमेरिकेतल्या हिंदू लोकांना असे वाटले की ते आऊटसाईडर आहेत परंतु ब्राह्मणांना असे काही प्रथमच वाटते आहे का तर नाही. ? ब्राह्मण कायमच भारतामध्ये आऊटसाईडर म्हणून जगत असतात .त्यामुळेच मी हिंदुत्वाची परीक्षण करताना अनेकदा बाहेरून हिंदुत्वाला जो पाठिंबा मिळत आहे त्याचे कारण देताना सांगितले होते की आज ना उद्या या लोकांना परदेशातून आपल्या स्वतःच्या देशात परतावे लागेल आणि हे माहीत असल्यामुळे कळत नकळत हे भारतात हिंदूही ओळख तयार करायला अधिकाधिक मदत करत आहेत जेणेकरून यदा कदाचित त्या देशातून हाकलले गेले तर त्यांच्या हक्काच्या देशामध्ये त्यांचा परतण्याचा मार्ग सुकर होईल . किंबहुंना भारत हे ह्या लोकांचे परतण्याचे हक्काचे आश्रयस्थान आहे हे त्यांना नीट माहित आहे. बदल काय झाला तर जी केवळ भीती वाटत होती ती आता वस्तुस्थिती म्हणून पुढे येत आहे . जे फक्त शक्यता वाटत होते ते खरोखरच तसे होताना दिसेल अशी जगभरातली स्थिती होते आहे. या स्थितीचा अंदाज विश्व हिंदू परिषदेला व्यवस्थित आलेला होता . आणि त्याचा पुरेपूर फायदा विश्व हिंदू परिषदेने उठवलेला पण आहे . उत्तराधुनिकतेने धर्माबरोबरच स्थानिकता केंद्रस्थानी आणली लोकल डिस्कोर्सेस महत्त्वाचे केले आणि आता अवस्था अशी आहे की या लोकल डिस्कोर्सनेच स्थानिक संस्कृती अतिशय महत्त्वाची मानत कळत नकळत स्थानिक संस्कृतीवर नेमाडे यांच्या भाषेत सांगायचे तर देशी संस्कृतीवर राष्ट्रवादाची मोहर उठवत राष्ट्रीय डिस्कोर्स उभे करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याकडे हिंदुत्व हा असा डिस्कोर्स आहे पण याला काउंटर म्हणून मग अँटी ब्राह्मण डिस्कोर्स जो ब्राह्मणांना बाहेरून आलेले आहेत वगैरे मानतो संपूर्ण ब्राह्मण वर्ग बाहेरून आलेला वगैरे वगैरे मानतो असा एक डिस्कोर्स उदयाला येणारच होता आता आलेला आहे .याचे कारण याच वेळेला नेमके जेनेटिक्स आले . आज ब्राह्मण प्रचंड घाबरले त्याचे सर्वात मोठे कारण जेनेटिक्स आहे. या भयापोटी मग आपले वर्चस्व राहिले तरच आपण इंडियात टिकून राहू अशी काहीतरी धारणा झालेली आहे जिची प्रत्यक्षात खरोखर गरज आहे का ? पुरोगामी कालखंडामध्ये अनेक ब्राह्मण कसलीही लाज न बाळगता भिक्षा मागत होते आणि त्याला एक वेगळे नाव पण त्यांनी दिलेले होते . वार लावण्याची पद्धत त्यातूनच आली होती . ब्राह्मण हा या देशातला कायमच भयग्रस्त असलेला असा वर्ण आहे पण भयग्रस्त लोक ज्या प्रकारचे राजकारण करतात ते राजकारण अनेकदा भयावह असते आणि नेमके तेच झाले आहे मुख्य म्हणजे स्वतःची आयडेंटिटी पण टिकवायची आहे आणि बाहेरून आलोय हेही स्वीकारायचे आहे किंवा नाकारायचे आहे पण एक गोष्ट नक्की आऊटसाईड असण्याचे फिलिंग घ्यायचे आहे अशा एका विचित्र कात्रीमध्ये ब्राह्मण सापडलेले असतात. स्वतःची मुळे कशी रुजवायची हा ब्राह्मण लोकांच्या पुढचा कायमचाच मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आता अमेरिकेसारख्या देशांमध्ये आज ना उद्या उभा राहणार होता तो राहिला आहे कारण अमेरिकेत सहज मुळे रुसतील असे वाटले होते परंतु तिकडचे लोक आता ही मुळे रुजू द्यायला तयार नाहीत तर मग काय करणार ? यातच भरीत भर अशी आहे की यामध्ये सुद्धा ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद आहेच आणि कळत नकळत हिंदुत्व हे ब्राह्मणांनी आणलं असं गृहीत धरत आता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थलांतरित झालेले जे ब्राह्मणतर आहेत ते आता कळत नकळत या सर्व गोष्टींच्यासाठी किंवा ट्रम्प जे करत आहेत त्यासाठी हिंदुत्वाला दोष देणे किंवा ब्राह्मणांना दोष देणे यापैकी एक पद्धत फॉलो करणे अटळ आहे. कधी नव्हे ते माझा अंदाज चुकला नाही तर ब्राह्मणांच्या स्थलांतरांच्या इतिहासामागे आता हात धुवून लोक लागतील . फक्त आंतरराष्ट्रीय नव्हे तर प्राचीन काळामध्ये या भारतामध्ये ब्राह्मणांनी वारंवार केलेली स्थलांतरे आता पृष्ठभागावर आल्याशिवाय राहणार नाहीत याचे कारण जसे ब्राह्मणांना भारतात परतायचे नाही तसे ब्राह्मणे तर लोकांनाही भारतात परतायचे नाही त्यांना ही अलीकडे अमेरिकेत आणि युरोपमध्ये कायमचे सेटल होण्याची स्वप्ने पडत असतात. आपण एका गुंतागुंतीच्या संकटसंघर्षामध्ये उभे आहोत त्यामुळे लाज सोडून देणे हा त्यावरचा एक नक्कीच प्राथमिक उपाय असणार आणि हे आता आपल्या मुलांना पुन्हा शिकवावे लागेल की काम मागायला लाजू नका आपली गरज असेल तर मागायला लाजू नका. एका अर्थाने हे पारंपारिक भिक्षेचे पुनरागमन असेल . असो लिहित गेलो तर आणखीन एक लेख होईल . श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे