उपयुक्ततावाद व्यवहार वाद उत्तर व्यवहार वाद आणि जालव्यवहार वाद १० श्रीधर तिळवे नाईक 

आपण अनेक पेपरमध्ये हळूहळू व्यवहार वाद अशी गोष्ट समजून घेतो आहे आणि त्याचबरोबर त्याच्या नवीन काही दिशा शोधतो आहोत. आपण हे पाहतो आहोत की ज्ञानाची नवता आणि ज्ञानाची जूनता यांचा आयुष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो आता आपण आता मूलभूत गोष्टीवर चर्चा करू. माणसाचे जीवन हे प्रामुख्याने कशावर अवलंबून असते असा प्रश्न जर का आपण मोक्षवादी लोकांना विचारला तर त्याचे स्पष्ट आणि स्वच्छ उत्तर मोक्षकी देते ते म्हणजे प्राण आणि प्राणायाम ! मी हे खूपदा सांगितलेले आहे की भगवान शंकर ही कदाचित पहिली अशी व्यक्ती होती की जिने माणसाचे प्राणी असणे माणसाचे पशु असणे अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ पणाने आणि ठामपणाने स्वीकारले कुठलाही परलोकाचा अलौकिक मुलामा दिला नाही आणि त्याचबरोबर हा प्राणी मोक्ष अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो हेही त्यांनी स्वतःच्या जीवनशैली मधून सिद्ध केले . त्यामुळेच पशुपतिनाथ हे नाव त्यांनी अभिमानाने मिरवले . हेच नाव पुढे शिव ह्या तत्वालाही दिले आणि एक नवीन तत्त्वज्ञान पशुपती या आपल्या शिष्याला दिले जो मूळचा बहुदा नेपाळी असावा किंवा पंजाबी ! हेच तत्त्वज्ञान पुढे पाशुपत दर्शनाच्या द्वारे मोक्ष मिळालेल्या नकुलिश यांनी नव्याने सादर केले आणि त्यातूनच पुढे पाशुपत दर्शन आणि पाशुपत धर्म यांचा उदय झाला आणि यातूनच लोकशैवधर्म भारतामध्ये प्रचलित झाले ज्यातील एक नाथधर्म सुद्धा होता ज्यातून पुढे जैन धर्म उदयाला आला आणि जैन धर्मामुळेच बौद्ध धर्म सुद्धा उदयाला आला आणि पुढे मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांच्यामुळे नवनाथ धर्म पुन्हा उदयाला आला . याच पाशुपत धर्मामधून पुढे बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली . आणि एक पुरोगामी नवा धर्म कसा स्थापन करता येतो तो कसा विज्ञानाशी आणि कायकशी जोडता येतो आणि शिवकल्याणाशी जोडता येतो हे नव्याने सादर केले या सगळ्या प्रवाहांच्या मध्ये आपण एक गोष्ट कॉमन बघू शकतो आणि ती कॉमन गोष्ट म्हणजे प्राण आणि प्राणायाम होय . आज विज्ञानामध्ये सुद्धा प्राणवायूचे ऑक्सिजनचे असलेले महत्त्व सर्वांना माहिती आहे म्हणूनच त्यासंदर्भातच आता आपण काही चर्चा करतो आहे .


आमच्या पिढीमध्ये ज्या काही नवीन ज्ञानाच्या लाटा आल्या त्यामधल्या काही महत्त्वाच्या लाटा या ऑक्सिजन संदर्भात होत्या . जवळजवळ सर्व उत्तर आधुनिकता आणि आधुनिकता यांचा यावर विश्वास होता की ऑक्सिजन हाच प्राण जिवंत ठेवणारा आहे पण पुढे असे लक्षात आले की पृथ्वीवर ऑक्सिजनपूर्वी सुद्धा जीवन अस्तित्वात होते . इतकेच नव्हे तर अंतराळामध्ये गेलेल्या गोष्टींच्याद्वारे हळूहळू हेही स्पष्ट होत आहे की अंतराळामध्ये ऑक्सिजन नसून सुद्धा काही प्रमाणात का होईना पण अतिशय सूक्ष्म पद्धतीची अशी जीवसृष्टी अस्तित्वात आहे . याचा अर्थ स्पष्ट होता प्राण फक्त प्राणवायूमुळे नव्हता तर इतरही वायूंच्यामुळे अस्तित्वात होता आणि म्हणून ऑक्सिजनलाच प्राणवायू म्हणणे बरोबर नाही पुढे आणखी लक्षात आले की पृथ्वीवर एक कालखंड असाही होऊन गेलेला आहे ज्यावेळी ऑक्सिजन शिवाय एक जीवसृष्टी अस्तित्वात होती . ग्रेट ऑक्सिडेशन एक्सिटस्टींशन होण्यापूर्वी ऑक्सिजनने कोणी जगत नव्हते उलट ऑक्सिजन निर्माण झाला सायनो बॅक्टेरिया मुळे आणि ऑक्सिजन शिवाय जगणारे सर्वजण मारले गेले म्हणजेच ऑक्सिजन जिवंत जीवन देणारा होण्याआधी किलर होता आणि हे सत्य काहीसे धक्कादायक आहे पण मग लक्षात येते की जी गोष्ट जगवते तीच मारणारी ही असू शकते . जीवन आणि मृत्यू हे असे एकत्र जोडलेले असतात पुढे पुन्हा दुसरी गोष्ट अशी घडली की खुद्द पृथ्वी मध्ये पृथ्वीवर जिथे ऑक्सिजन पोहोचत नव्हता तिथे सुद्धा जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे आता लक्षात आलेले आहे आणि आत्ता या क्षणी ते अस्तित्वात आहे . ही अतिशय प्राथमिक अवस्था असेल पण आहे परंतु इतरत्र तिथे जे काही वायू आहेत त्यांच्या आधारे एखादी प्रगत वायूसृष्टी प्रगत जीवसृष्टी असू शकते त्यामुळे मुद्दा आता असा आहे की ऑक्सिजन हाच तुमच्या जीवसृष्टीच्या केंद्रस्थानी असेलच याची खात्री नाही माझ्या मनामध्ये ऑक्सिजन बद्दल आदर आहे आणि मी त्यावर कविताही लिहिली आहे परंतु मला हेही माहिती आहे की मी माणूस म्हणून होमो सोपियन म्हणून ऑक्सिजनमुळे अस्तित्वात आहे याचा अर्थ संपूर्ण जीवसृष्टी तशी आहे असा नाही होत .


या अंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात कारण ज्ञान हे कायम नवीन जेव्हा येते तेव्हा त्याचे काय करायचे हा फार मोठा प्रश्न असतो पुन्हा तंत्रज्ञान निर्माण होते म्हणजे आता असे समजा की आपण जर का असे फुफ्फुस तयार केले जे प्राणवायू बरोबर कार्बन डाय-ऑक्साइड सुद्धा शोषून घेईल आणि त्या कार्बनडाय-ऑक्साइडच्या आधारे पण जर आपला मेंदू आणि जीव जगू शकेल तर मग पर्यावरणाचा संपूर्ण प्रश्नच बदलून जातो आणि हा जो तंत्रज्ञान शाखेचा पॉसिबिलिटी ग्राफ असतो तो फार वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतो. आता आपण अशा प्रकारचे फुफ्फुस जे आरटीफिशियल असेल तयार करू शकतो का ते माणसाला बसवू शकतो का शकू का आणि समजा एखाद्या चिप्स सारखे ते बसवता आले फुफ्फुसात तर आपण मग कार्बनडायऑक्साईड आणि ऑक्सिजन अशा दोन्ही वायूंच्यामुळे जगू शकू म्हणजे समजा इमर्जन्सी मध्ये आणीबाणी मध्ये आपणाला ऑक्सिजन कमी पडत असेल तर आपण कार्बन-डाय-ऑक्‍साईडचे चीप किंवा कृत्रिम फुफ्फुस ऑन करायचे तर अशा जेव्हा शक्यता निर्माण होत जातात तेव्हा तुमचा व्यवहार बदलत जातो ऑक्सिजनच्या वापराबाबत तुम्ही अधिक संवेदनशील होता आणि ज्याच्या आधारे प्राणायाम हवा आहे तो प्राणायाम म्हणजे फक्त ऑक्सिजनचा आयाम नाही तर इतर कुठल्याही वायूचा आयाम होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात यायला लागते तुमची प्राणवायू या शब्दाची व्याख्या बदलते कारण आता कुठलाही वायू प्राणवायू बनू शकतो .आता हे प्रश्न काही जे कृष्णमूर्ती आणि ओशो रजनीश्यांना पडणे शक्य नाही पण मला ते पडले याचे कारण साधना करताना मग आणखीन काही शक्यता दिसायला लागल्या. सर्वसाधारणपणे शरीर तंत्रामधल्या (इतर तंत्रांनी मोक्ष साधू इच्छिणाऱ्या साधकांनी या भानगडीत पडू नये )प्राणायाम करताना एक गोष्ट तुम्ही मूलभूत शिकता ती म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या दरम्यान जो एक क्षण असतो त्यात मृत्यू असतो आणि हा मृत्यू जर का तुम्ही अधिकाधिक लांबवत नेला तर तुमच्या मोक्षाच्या शक्यता अधिकाधिक वाढत जातात . आणि याचे कारण असे असते की संपूर्ण मेंदूच प्राणायामाची निगडित असल्यामुळे जर का त्याला अचानक तुम्ही मृत्यूची सवय लावायला लागला की तो मृत्यू झाला मोक्ष बनत जातो परंतु त्याचबरोबर ही प्रोसेस फक्त सेपियन ला लागू आहे की इतर प्राण्यांना ही लागू आहे असा प्रश्न निर्माण होतो .त्यामुळे इतर प्राण्यांच्या बाबतीत किंवा वनस्पतींच्या बाबतीत मोक्षाची शक्यता काय असू शकते याच्या नवीन चाचपण्या करण्याची चाचण्या करण्याची गरज निर्माण होते विशेषतः मोक्षाच्या संदर्भामध्ये हे शक्य होते उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा वनस्पतींच्या संदर्भात मोक्षाचा प्रश्न येतो तेव्हा वनस्पती या कार्बनडायऑक्साईडच्या साह्याने सुद्धा प्राणायाम साधत असतील कारण प्राण त्यांच्यात पण असतो परंतु तो प्राण कार्बनडायऑक्साइडच्या आधारे चाललेला आहे आपल्या शेजारचे हे उदाहरण आहे परंतु ते आपल्याला आधी कळत नाही आणि इथेच आपल्या ज्ञानाच्या सर्व मर्यादा दिसतात आणि आपल्यावर ज्ञानाचे होणारे संस्कार आपल्याला कसे जवळची गोष्ट बघू देत नाहीत तेही कळते. अनेकदा मी बघितलेले आहे की प्राणायाम करणाऱ्या राजयोगी माणसाला दोन श्वासांच्या मधला हा मृत्यू हा कणा आहे हेच कळत नाही . त्यामुळेच शिव जेव्हा म्हणतो की मी मृत्यू आहे तेव्हा त्याचा अर्थ काय आहे हे कळायला हवा. आपल्याकडचा ब्राह्मण लोकांचा मूर्खपणा इतका आहे की त्यांनी काय शिव म्हणतो आहे ते लक्षातच घेतले नाही आणि त्याला मृत्यूचा देव करून टाकला संहाराचा प्रलयाचा देव करून टाकला. शैव श्रुती काय आहे हे माहीत नसले की अडाणीपणाने काय काय गोष्टी होतात याचे हे एक फक्त उदाहरण आहे असा अडाणीपणा कुठे कुठे युरेशियन श्रुतीमध्ये आहे त्याची अजून कल्पना सुद्धा भारतीयांना आलेली नाही ते आपले युरेशियन श्रुतीमध्ये गायन करत बसले आहेत करत आहेत परंतु यामुळे कधी कधी फार गोंधळ निर्माण झालेला असतो . एकदा का तुम्ही त्या मृत्यूला स्पर्श करून आला की तुम्हाला वर्ण जात व्यवस्था सुचत नाही कारण तुम्हाला एकच गोष्ट माहिती असते ती म्हणजे आपण सर्व प्राणी आहोत प्राण हा आपला प्राण आहे आणि होमोसेपियन म्हणून फक्त आपल्यामध्येच अशा प्राणायाम द्वारा मोक्षाची शक्यता आहे इतरांच्या मध्ये असलेली मोक्षाची शक्यता काय आहे हे आपणाला कधीही कळू शकत नाही किंवा आता कळाले तरी आपल्याला हा आरंभ आहे हे लक्षात घ्यावे लागते 


तुम्ही म्हणाल हे तुम्ही आता का सांगता आहात याचे कारण स्पष्ट आहे की व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद यांना या गोष्टी माहीत नव्हत्या त्यांचा विचार आता नव्या व्यवहारवादामध्ये ज्याला मी जालव्यवहारवाद Netpragmatism म्हणतो करायला लागतो आणि मला हे सांगायचे आहे की प्राण ही मूलभूत गोष्टच आपण जर का चर्चेला घेतली तर व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद यांना माहीत नसलेला अनेक प्रकारच्या ज्ञानांचा जो अव्याप्त प्रकाश आहे जो आधीच्या लोकांना माहीत नव्हता त्याला आपणाला आता भेटावे लागते आणि त्याला आपणाला असे म्हणावे लागते की बाबा धन्यवाद तू व्यवहार वाद आणलास किंवा आणलीस पण आता हा नवाव्यवहार आहे हा जाल व्यवहार वाद आहे ही पुढची स्टेप आहे हे जर का आपणाला कळले नाही तर मग काहीच कळले नाही 


चौथी नवता ही या जालव्यवहारवादाला धरून असते ती आस्थापन वाद , व्यवस्थापन वाद , उपयुक्ततावाद ,व्यवहार वाद आणि उत्तर व्यवहार वाद या सर्वांना सामावून घेत पुढे सरकते 

श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे