मूर्तिपूजा आणि बौद्ध धर्म श्रीधर तिळवे नाईक
सर्वसाधारणपणे सर्वच बौद्ध हे मान्य करतात की कुशान काळामध्ये गौतम बुद्धाची मूर्ती प्रथम अवतरली आणि त्याची मूर्ती पूजा सुरू झाली प्रश्न असा आहे की ही मूर्ती आली कुठून सर्वच बौद्ध असे सांगतात की कुशान काळात बौद्ध धर्म सर्वत्र पसरला होता पण गमतीचा भाग असा आहे की खुद्द कनिष्क हा काही कुशान काळाचा आरंभ नाही आपण जर पाहिले तर कुशान लोकांचा सुरुवातीचा देव हा ग्रीक होता कारण हे लोक ग्रीक धर्मापासून प्रभावित होते नंतर मग अचानक सम्राट कनिष्कचा बाप क्लाडीपीएस हा शिवभक्त झाला आणि शिवाची पूजा करायला लागला आणि त्याची तशी नाणी उपलब्ध आहेत पण ही गोष्ट सांगायला बौद्ध लोक विसरतात परिणाम काय होतो की मूर्ती पूजा आधी शिवाची सुरू झाली आणि त्याच्याही आधी हर्क्युलस ची सुरू झाली हे यांच्या लक्षात येत नाही आणि बुद्धाची जी मूर्ती आहे जी नंतर सम्राट कनिष्क ने डेव्हलप केली ती भगवान शिव यांची मूर्ती बघूनच केली कारण शिव हा त्याच्या घरामध्ये आधीच आला होता आणि तो त्याच्या पूर्वजाने आणला होता
एकदा हे स्पष्ट झाले की मग भगवान बुद्धाची मूर्ती शिवावरून आली आहे की शिवाची मूर्ती भगवान बुद्धावरून आलेली आहे हे स्पष्ट व्हावे.
मुळातच आपण लक्षात घेतले पाहिजे की मूर्तिपूजा ही शैव-धर्मामध्येच होती त्यामुळे तिथे ती नैसर्गिकरीत्या आहे या उलट गौतम बुद्धाने कधीही मूर्तिपूजा सांगितलेली नाही किंबहुना त्याचा ठाम विरोध होता त्यामुळे गौतम बुद्धाची मूर्ती आधी कशाला येईल? उलट गौतम बुद्धाची मूर्ती स्वीकारणे म्हणजे गौतम बुद्धाशी प्रतारणा करणे आहे त्यामुळे बौद्धांच्या मध्ये ऍक्च्युली मूर्ती पूजेचा विचार सुद्धा नव्हता तो त्यांनी शैव धर्मापासून घेतला . त्यामुळे एकंदरच विचार लक्षात घेता गौतम बुद्धाची मूर्तीच भगवान शिव यांच्या वरून डेव्हलप झालेली आहे हे मान्य करावे लागते
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment