मोहन भागवत ,परशुराम, ग्रीक रोमन संस्कृतीचा विनाश आणि भारतातला पुरोगामी वाद श्रीधर तिळवे नाईक 

मोहन भागवत हे कदाचित आतापर्यंत झालेल्या सर्व संघचालकांच्या मध्ये सर्वाधिक पुरोगामी सरसंघचालक आहेत. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे की त्यांना अजूनही शैव हिंदुत्व मी स्वीकारले आहे असे म्हणता येत नाही कारण ते खूप अडचणीचे ठरेल याची त्यांना कल्पना आहे. मात्र ते सातत्याने या अंगाने काही विधाने करत असतात यातील एक विधान हल्ली गाजते आहे ते म्हणजे ग्रीक आणि रोमन संस्कृती यांचा जसा विनाश झाला तसा हिंदूंचा झाला नाही हिंदू नसतील तर जगाचा नाश होईल . आणि दुसरे विधान हे परशुराम हा ब्राह्मण नव्हता बढई समाजातला होता .


प्रथम आपण ग्रीक रोमन संस्कृती संदर्भात पाहू.कवी इकबाल त्याने सुद्धा यासंदर्भात टिपणी केलेली होती आणि कुछ तो है जिससे हमारा वजूद मिटता नही हिंदू है हम हिंदुस्तान है हमारा अशा टाईपच्या कविता लिहिलेल्या होत्या . त्यामध्येही बाकीच्या म्हणजे ग्रीक रोमन संस्कृती जशा नष्ट झाल्या तशी हिंदू संस्कृती नष्ट झाली नाही असेच गृहीतक अध्यारत होते. 


प्रत्यक्षामध्ये नेमके काय झालेले आहे ? हे मात्र कोणीही तपासायला जात नाही याचे कारण युरेशियन हा प्रकार काय आहे हे १९८० पर्यंत अनेकांना कळालेच नाही १९८० नंतर मात्र संपूर्णपणे रशिया मधले मंगोलिया मधले युरेशिया मधले उत्खननाचे अनेक संदर्भ उदयाला यायला लागले आणि जेनेटिक्स च्या बाबतीत काही वेगळीच प्रगती झाली आणि त्यातूनच हे स्पष्ट झाले की युरेशिया हा एक पूर्ण स्वतंत्र असा अभ्यासाचा विषय आहे . एक स्वतंत्र अभ्यासाची शाखा आहे जिला आता आपण युरेशियालॉजी म्हणू शकतो .


या युरेशियालॉजी मधून तिच्या झालेल्या आत्तापर्यंतच्या अभ्यासातून निघालेले काही निष्कर्ष तर खूपच धक्कादायक होते म्हणजे युरेशियामधूनच उदयाला आलेली चंगेज खानची संस्कृती आणि खुद्द चंगेज खानचे असलेले वंशज आणि त्यांची संख्या ती अक्षरशा कोट्यावधीत आहे इतके शारीरिक संबंध एकाच माणसाच्या ठाई एकवटावेत हे जगातले एकमेव उदाहरण आहे.


हेच लोक सैबेरिया आणि मंगोलिया या दोन प्रदेशातून इतरत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले हे आता स्पष्ट झालेले आहे . त्याच लोकांनी इंडिया मध्ये सुद्धा वाया इराण अफगाणिस्तान आणि वाया तिबेट असा प्रवेश केला हे आता स्पष्ट होते आहे. याच लोकांनी युरोप आफ्रिका या खंडांच्या वर आक्रमण केले हे आता स्पष्ट झाले आहे आणि यांच्या आक्रमणाचे पुढे काय झाले याचाही एक ग्राफ आता तयार झालेला आहे .अर्थातच नंतर याच लोकांनी युरोपमधून पुन्हा अमेरिकेवर आक्रमण केले आणि तिथे सुद्धा तिथले स्थानिक धर्म नष्ट करून गोऱ्या लोकांची संस्कृती प्रस्थापित केली . हे लोक प्रचंड हिंसक आणि सत्तापीपासू आहेत हे आता स्पष्ट झालेले आहे. किंबहुना ज्याप्रमाणे श्रद्धा ही आफ्रिकेची मोक्ष इंडियाची फिलॉसॉफी युरोपची देणगी आहे त्याच प्रमाणे किताबी राजकीय विचार प्रणाली ही युरेशियन देणगी आहे. या लोकांनी जगातल्या सर्व संस्कृती नष्ट करण्याचा जणू काय विडा उचललेला आहे . आणि याच लोकांच्या प्रभावातून युरोप आणि आफ्रिकेत ज्यू, रोमन कॅथोलिक , इस्लाम आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चन असे चार धर्म जन्मलेले आहेत हे आता स्पष्ट झालेले आहे. तर इंडोशियामध्ये वैदिक ,ब्राह्मण, वैष्णव असे तीन धर्म याच लोकांनी जन्माला घातलेले आहेत . म्हणजे जगातले सात धर्म या लोकांनी जन्माला घातलेले आहेत आणि हे सातच्या सात धर्म हे त्या त्या प्रदेशातल्या मूळ धर्मांच्या आधारे या लोकांनी निर्माण केलेले आहेत आणि हे सारे धर्म युरेशियन लोकांच्या सत्ताकरणाचे भाग आहेत . हे सातच्या सात धर्म पॉलिटिकल आयडीओलॉजीज आहेत. फक्त सांख्य , ब्रम्ह, जैन आणि बौद्ध हे चारच धर्म असे आहेत की जिथे इंडोएशिया आणि युरेशिया यांचा समतोल साधलेला आहे. 


प्रश्न असा आहे की हिंदू हा धर्म असाच इंडोयुरेशियन समतोल साधणार आहे की पुन्हा एकदा युरेशियन मॉडेल निर्माण करणार आहे ? आणि सध्या आपण ह्या क्रायसीस मधून चाललेलो आहे आणि सतत बदलणाऱ्या भूमिका आपल्याला गोंधळात टाकत आहेत . कधी हे युरेशियन होतात आणि कधी हे इंडोएशियन होतात आणि जेव्हा जेव्हा हे युरेशियन होतात तेव्हा तेव्हा साहजिकच मग त्या विरोधात उभे राहावे लागते कारण मग हे वर्ण जाती व्यवस्था घेऊन येतात .


साहजिकच यामध्ये एक वर्णजात विरोधी ठाम भूमिका घेऊन येणारा मनुष्य सरसंघचालक होणे हे अत्यंत आवश्यक होते आणि हे काम मोहन भागवतांच्या मुळे झाले. साहजिकच आम्ही शैव लोकांनी त्यांना विरोध करणे नाकारले आणि त्याचे अनेक पडसाद निर्माण झालेले दिसतात. याबाबतीतले सर्व शैव आचार्यांचे ज्यात राजर्षी महाराजांच्यापासून सद्गुरूंच्या पर्यंत सर्व येतात त्यांचे म्हणणे स्पष्ट आहे. ते म्हणजे काही झाले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना ही जर का आतून बदलत असेल तर आपण तो बदल घडवून आणायला मदत केली पाहिजे. आणि यदाकदाचित असा बदल झाला नाही तर मग संघर्ष अटळ आहे तो आपण करूच .


भागवतांची निवड ही या पार्श्वभूमीवर झालेली आहे . कारण तेच असे होते की जे आतून जात वर्ण विरोधी आहेत. त्यामुळे त्यांनीच हळूहळू संघ बदलायला बदलाची सुरुवात करायला आरंभ केला . ओबीसी बीसी आणि आदिवासी या लोकांनी त्याला प्रतिसाद सुद्धा दिला . मात्र गोंधळ असा आहे की अजूनही ब्राह्मणी हिंदुत्वाचा पगडा संघावरून सुटत नाहीये 

आणि खरा संघर्ष तिथेच निर्माण होतो आहे. 


साहजिकच भागवतांची सगळी विधाने ही अशी येतात उदाहरणार्थ भागवत यांनी मध्यंतरी एक विधान केले होते की वर्ण जात व्यवस्था पंडितांनी निर्माण केलेली आहे . वास्तविक पंडितांनी या व्यवस्थेला विरोध केला होता परंतु ब्राह्मण हा शब्द वापरण्या ऐवजी पंडित हा शब्द त्यांनी वापरला होता . वर्ण जात व्यवस्था ही ब्राह्मण वर्णानेच निर्माण केलेली आहे ब्राह्मण लोकांनीच निर्माण केलेले केलेली आहे परंतु आता ब्राह्मणाने पंडित हा शब्द वापरला पाहिजे असे त्यांना वाटते जर का तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही ब्राह्मण असा शब्द वापरू नका पंडित असा शब्द सरसकट वापरा . आणि पंडित वर्ण जात व्यवस्था मानत नाहीत असे सांगा त्या उलट तुम्ही उलट खेळत आहात म्हणजे पंडित हा शब्द वर्ण जात व्यवस्थेशी रिलेटेड करायचा आणि ब्राह्मण हा शब्द वर्ण जात व्यवस्था निर्माण करणाऱ्या लोकांच्यातून काढून टाकायचा . आता हे असत्य आहे आणि अशक्य ही आहे तर ते तुम्ही कसे काय करायचे त्यापेक्षा सरळ सरळ सांगा की ब्राह्मणांनी ही वर्ण जात व्यवस्था निर्माण केली आणि ती व्यवस्था आता आम्ही सोडत आहोत आणि त्या जागी आम्ही पंडितांची व्यवस्था स्वीकारत आहोत . नाही तरी पंडित हा शब्द सर्व जगाने आता स्वीकारलेला आहे आणि तो कुणालाही वापरला तरी चालतो कुणाचेही काहीही ऑब्जेक्शन येत नाही त्यामुळे सर्व ब्राह्मणांनी पंडित म्हणवून घ्यावे असे मी नेहमीच सांगत असतो. किंबहुना ब्राह्मण बदललेत हे कळणार कसे ? तर हे करण्याचा एकच उपाय आहे की तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणे बंद करा आणि स्वतःला पंडित म्हणवून घ्या . त्यामुळे सर्व ब्राह्मण एकत्र येतील त्यांच्यातल्या जाती नाहीशा होतील आणि सर्वजण पंडित होतील शिवाय जे जे विद्वान लोक आहेत ज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे लोक येतात त्यांना आपण पंडित म्हणूया . (खरे तर बाबासाहेब आंबेडकरांना महापंडित म्हटले पाहिजे .) म्हणजे एक सर्वव्यापक ज्ञानक्षेत्रीय ओळख प्रस्थापित होते . पण ते करण्याऐवजी जर का तुम्ही उलटे करायला लागला तर गोंधळ होणार .


आता मुद्दा आपण ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा घेऊ तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रोमन संस्कृती नष्ट झालेली नाही आत्ताची जी युरोपची संस्कृती आहे तिच्यावर रोमन संस्कृतीचाच प्रभाव आहे आणि रोमन कॅथोलिक धर्म हा रोमन संस्कृतीचेच बाय प्रॉडक्ट आहे . त्या उलट प्रोटेस्टंट ख्रिश्चन हा ग्रीक आणि रोमन संस्कृतीच्या प्रभावातून वेगळा निर्माण झाला . त्यामुळे रोमन संस्कृती नष्ट झालेलीच नाही फक्त ती आता युरोपियन संस्कृती म्हणून उदयाला आलेली आहे आणि जगभर फंक्शनल आहे . टेंभुर्णा ग्रीक संस्कृती नष्ट झाली होती परंतु तिचे पुन्हा पुनर्जीवन झालेले त्यामुळे तीही नष्ट झालेली नाही आणि तीही युरोपियन संस्कृती म्हणून उदयाला येते आहे आली आहे किंबहुना जिला आज आपण युरोपियन संस्कृती मानतो किंवा वाईट संस्कृती म्हणतो ती ग्रीक आणि रोमन यांचे मिळून तयार झालेले बाय प्रॉडक्ट आहे .


प्रश्न असा आहे की मग नष्ट काय झाले तर त्याचे उत्तर असे की ग्रीक धर्म नष्ट झाला. ज्याप्रमाणे भारतामध्ये इंद्र नाहीसा झाला त्याचप्रमाणे ग्रीक धर्मातला zyus नष्ट झाला त्या देवतांची प्रभाव नष्ट झाली परंतु कदाचित आता त्याचे पुनर्जीवन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भारतात सुद्धा वैदिक धर्माची संस्कृती पुन्हा एकदा उदयाला येते आहे जी नष्ट झाली होती. आताही नष्ट कोणी केली ? तर ती युरोशियामधून आलेल्या अत्यंत आक्रमक असलेल्या रोमन लोकांनी नष्ट केलेली आहे . म्हणजेच एका अर्थाने हा सुद्धा सैबेरियन लोकांचा उद्योग आहे . हिंदू नष्ट झाले नाहीत त्याचे एकमेव कारण म्हणजे भारतातली शैव संस्कृती ! ती नष्ट करण्याचे प्रयत्न अनेक वर्षे सतत चालूच आहेत . पण अजून तरी ती टिकून आहे कारण ती बहुजनांची आहे.


आता असाच गोंधळ तुम्ही परशुरामांच्या बाबतीत घालत आहात. 


हे मी एका लेखात स्वतंत्रपणे सिद्ध केलेले आहे की शैव परशुराम वेगळा जो भगवान शंकरांचा शिष्य होता आणि विष्णूचा अवतार असलेला वैष्णव परशुराम हा वेगळा जो या मूळ शैव परशुरामापासून प्रेरणा घेऊन जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आणि जो वर्ण जात वादी आहे . हे दोन परशुराम वेगळे आहेत पण ते इंटरमिक्स करण्याचा एक नवीन उद्योग चालू झालेला आहे .


भगवान शंकरांनी अपरांत म्हणजेच गुजरात ते केरळ ची किनारपट्टी ही परशुराम यांच्याकडे सोपवली होती कारण ते सर्वोत्कृष्ट योद्धे होते . मी हे नेहमीच सांगत आलेलो आहे की शैवधर्म हा पशुपालक कालखंडामध्ये जन्मलेला आहे आणि त्या काळामध्ये मुळात वर्ण जात नव्हतीच कारण हा कालखंड साधारणपणे इसवी सन पूर्व दहा हजार ते बारा हजार आहे . भगवान शंकर यांनी नांगरट शेतीचा शोध लावल्यानंतर साहजिकच ही शेती सर्वत्र व्हावी म्हणून त्यांनी अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले त्यापैकी अपरांत मध्ये त्यांनी आपला हा परम शिष्य परशुराम पाठवला मुळात संपूर्ण पश्चिम ही गणपतीकडे दिली होती आणि साहजिकच परशुराम आणि गणपती यांच्यात सुद्धा एक भांडण झालेले आहे ज्यातून पुढे एकदंत कथा निर्माण झाली . परंतु नंतर तोडगा निघाला आणि अपरांत परशुराम यांना देण्यात आला आणि तिथे सर्व कोळी लोक होतेच जे पुढे महादेव कोळी म्हणून पुढे आले. आगरी म्हणून पुढे आले. या सर्वांना एकत्र आणून शेती करणे हा एक फार मोठा प्रकल्प परशुराम यांनी हातात घेतला आणि संपूर्ण कोकणाचे भवितव्य बदलले हे भवितव्य बदलल्यानंतर मग ते पुन्हा एकदा आपल्या साधनेत लीन झाले आणि शेवटी मोक्षाला उपलब्ध झाले. त्यांच्या या कार्यामध्ये काही लढवय्या समाजातल्या लोकांनी अडथळा आणला आणि त्यांनी सर्वांना पराभूत केले . 


यांच्यापासून प्रेरणा घेत पुढे जेव्हा नवा अवतार निर्माण करणे गरजेचे झाले तेव्हा हीच कथा ब्राह्मण व वैष्णव धर्माने उसनी घेऊन आपला परशुराम उभा केला . कळत नकळत भागवत यांना हे मान्य असावे त्यामुळेच ते मूळ परशुरामाकडे आलेले दिसतात म्हणजे परशुराम हा ब्राह्मण नव्हता हे त्यांनी सांगून टाकले आहे . परशुराम जो मूळचा शैव आहे तो ब्राह्मण नव्हता हे असे मान्य होणे हे गरजेचे आहे पण प्रॉब्लेम असा आहे की जात दिल्याशिवाय युरेशियन लोकांचे भागत नाही . भगवान शंकरांच्या कालखंडामध्ये दगडफोडे वडार ही एक स्वतंत्र समाज म्हणून अस्तित्वात असलेली जमात होती. पण ती जात नव्हती तर तो समाज होता आणि शैव गणामध्ये सर्व समाज समान असतात आणि त्यांच्या कामानुसार विभागणी होते . वडारी हा असा समाज आहे जो दगडांच्या पासून वाडे बनवतो . आत्ताच्या भाषेत सांगायचे तर हे प्राचीन शैव संस्कृतीतले आर्किटेक्ट आणि इंजिनियर आहेत आणि याच समाजातून शैव परशुराम आले होते . साहजिकच दगडापासून हत्यार बनवण्यात ते अत्यंत मास्टर होते. त्या काळामध्ये सर्वच लढवय्ये लोक दगडाचीच शस्त्रे वापरत होते पण परशुराम यांनी यापुढे जाऊन सुत समाजाशी म्हणजे सुतार समाजाशी संधान साधत त्यांच्यापासून सर्वच्या सर्व लाकूड विद्या शिकत सुतारविद्या शिकत लाकूड आणि दगड एकत्र करून एक अत्यंत प्रभावी शस्त्र तयार केले ज्याला आज आपण त्यांची कुऱ्हाड म्हणतो . साहजिकच त्यांच्यापुढे कुठलाही योद्धा टिकला नाही. भागवत हेच सांगत आहेत फक्त आडून आडून सांगत आहेत . धातू हा या काळामध्ये मुळात कच्चे मटेरियल म्हणून अस्तित्वातच नव्हता हे आपण लक्षात घेतले पाहिजे धातूचे युग मेटल एज हे थोडेसे नंतर आलेले आहे . भगवान शंकर यांच्या काळामध्ये प्रामुख्याने पशुचे चामडे , लाकूड आणि दगड हेच प्रमुख कच्चे मटेरियल होते आणि त्यांच्यापासूनच सर्व गोष्टी बनवल्या जात. आज सुद्धा कातडे काढण्याची विद्या शंकराने शोधली हे सर्वांना मान्य आहे वाघाचे कातडी त्यांनी प्रथम सोलून दाखवले आणि तिथूनच आमच्या या उद्योगाची सुरुवात झाली असे या क्षेत्रातले उद्योजक सांगतात. यातूनच पुढे चर्महर नावाचा एक नवा समाज निर्माण झाला . परशुराम यांनी या तिन्ही गोष्टी अत्यंत व्यवस्थितपणे एकत्र आणून एक नवे हत्यार एक नवे शस्त्र तयार केले.


मोहन भागवत हीच गोष्ट आडून आडून सांगत आहेत . माझ्या मते गोष्ट स्पष्ट सांगा. प्रत्येक वेळेला ब्राह्मणी हिंदुत्व आणि शैव हिंदुत्व या दोघांना सांभाळत अशी विधाने करत बसणार आहात ? 


मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मिशन आत्ताचे आहे ते हिंदूंच्या अंतर्गत असलेली वर्ण जात व्यवस्था संपूर्णपणे नष्ट करून फक्त हिंदू ही ओळख प्रस्थापित करत सर्व हिंदूंचे संघटन सर्व भारतीयांचे संघटन करणे हे आहे. त्यासाठी तुम्ही मेहनत करत आहात याबद्दल काही शंका नाही परंतु मला असे वाटते की आता वेळ आलेली आहे की स्पष्टपणे आणि स्वच्छ पणाने गोष्टी बोलाव्यात. 


संपूर्ण जगाला सध्या इस्लामच्या धोक्याने ग्रासलेले आहे . संपूर्ण जग इस्लाममय करणे हे इस्लामचे मिशन आहे आणि ते स्पष्ट पणाने सांगितले पण जात आहे . ते लपवले जात नाही. केवळ भारतातल्या पुरोगामी लोकांनी ताकाचे भांडे लपवावे तसे ते लपवले म्हणून काही ते लपून राहणार नाही. मुळात इस्लामनेच कधी ते लपवलेले नाही . त्या विरोधात किमान भारतातले सर्व धर्म शाबूत ठेवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. नाहीतर आपला पण पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश होऊ शकतो . तो तसा होऊ नये म्हणून ही धडपड आहे. तुमच्या या धडपडीत बहुजन समाज सामील होत आहे पण तुम्ही जर का त्यालाच विश्वासात घेणार नसाल तर प्रॉब्लेम होणार . तेव्हा स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे. तुम्ही संदीग्ध बोलता आणि त्यातून फक्त गोंधळच निर्माण होतो अनेकदा तुम्ही ब्राह्मणी हिंदुत्वाच्या बाजूने आहात की नाही आहात हे स्पष्ट होत नाही. त्या पदाला काही अडचणी आहेत हे आम्ही समजू शकतो परंतु किती काळ समजून घ्यायचे. ?अडचण ही काही काळासाठी असते. मला वाटते की हा काळ संपलेला आहे . आता ठाम भूमिका घ्यायला हरकत नाही .


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे