पुतिन यांची भारतभेट भाग दुसरा चौथ्या नवतेच्या केंद्रस्थानी वहन उद्योग का आहेत ?श्रीधर तिळवे नाईक 


रशियाचे अध्यक्ष येऊन गेले आणि पुन्हा एकदा तेच प्रश्न उभे ठाकले त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच होता की रशियाशी का जुळवले पाहिजे आणि चौथ्या नवतेच्या केंद्रस्थानी नेमके हेच उद्योग का आहेत यासाठी एवढ्या तडजोडी केल्या जात आहेत का?


रशियाने अमेरिकेचा केलेला सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कुठला असेल तर तो म्हणजे ऑइलच्या क्षेत्रामध्ये इतरांची मक्तेदारी होऊ दिली नाही टिकू दिली नाही आणि भारताला मुख्य म्हणजे ऑइल मिळत राहील याची खात्री दिली भारताचा सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कुठला असेल तर तो ऑइल आहे त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो आणि वेगवेगळे रिलायबल सोर्सेस शोधावे लागतात साहजिकच पुतीन यांच्या आगमनानंतर या सगळ्या प्रकारांची चर्चा भारतभर सुरू झाली पण जर का बारकाईने पाहिले तर या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे वहन ! आज प्रामुख्याने चार वहन उद्योग महत्त्वाचे ठरलेत 

१ मीडिया : जगाच्या इतिहासात कायमच ज्ञानवहन आणि अनुभव वहन केंद्रस्थानी राहिलेले आहे . यातील अनुभव वहन करणारा उद्योग म्हणजे कला क्रीडा उद्योग होय तर माहितीचे वहन करणारा उद्योग म्हणजे चॅनेल उद्योग होय मीडिया या दोन उद्योगांच्या सहाय्याने बनतो . साहजिकच ज्याच्या हाती मीडियाची दोरी तो जगाला उद्धारी जगावरती राज्य करी म्हणूनच हल्ली मीडिया केंद्रस्थानी आलेला आहे एकेकाळी कला स्वतंत्र मानली जात होती परंतु मीडियाचा मीडिया मधल्या माध्यमांचा एवढा प्रचार झाला एवढा प्रसार झाला की कला ही आता मीडियाचा भाग बनलेली आहे जर का तुम्हाला मीडिया सांभाळता आला नाही तर कला क्षेत्रामध्ये तुमचे नाव होत नाही. त्यामुळे प्रत्येक कलावंत हल्ली मीडियाला सांभाळताना दिसतो खुद्द कलावंत अनेकदा मीडिया बनलेला असतो जाहिराती करून तो ज्यांची जाहिरात करत आहे त्या चिन्हवस्तूंचा क्रयवस्तूंचा प्रतिवस्तूंचा मीडिया बनलेला असतो 


दुसरीकडे अर्थातच चॅनेल उद्योग आहे जी वर्तमानाची माहिती पुरवत असतात हल्ली हल्ली तर हिस्टरी सारखे चैनल डिस्कवरी सारखे चॅनेल इतिहासावर सुद्धा प्रभुत्व गाजवत आहेत . माझ्या क. व्ही. या काव्यसंग्रहात म्हणूनच मी चॅनेल स्वरूपात कवितांची मांडणी केली होती किंबहुना संपूर्ण या कालखंडातील कविताच मी चॅनेल सिरीज म्हणून अंडरलाईन केलेली आहे त्याचे कारण हेच आहे कला आणि मीडिया या दोन भिन्न गोष्टी आता राहिलेल्या नाहीत त्या एकच आहेत


हल्ली तर वहन करणाऱ्या वस्तू म्हणजे मोबाईल वगैरे त्यांची उत्पादने सुद्धा आपल्या ताब्यात यावेत अशा दिशेने पावले टाकली जातात म्हणजेच वहन करणाऱ्या सर्व वस्तूंचे उत्पादन सुद्धा आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न हल्ली सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये रिलायन्स सारख्या कंपनीला मोबाईल उत्पादनात प्रचंड मोठे यश पण मिळालेले दिसते एलन मस्क सारखा मस्त उद्योगपती नंबर वन त्यामुळेच झाला होता स्टीव्ह जॉब्स बिल गेट यांनी याची सुरुवात केली होती 

२ बँका: पैशाचे वहन संपत्तीचे वहन यासाठीच महत्त्वाच्या आहेत कारण पैशाचा संपूर्ण flow बँकांच्या द्वारे कंट्रोल होतो साहजिकच बँका ताब्यात ठेवल्या की तुमची धनव्यवस्था ताब्यात ठेवता येते आणि म्हणूनच हल्ली अनेक लोक आर्थिक संस्था उभा करताना दिसतात आणि त्यांचे स्वरूप एक तर बँक असते किंवा बँकांच्या सारखे असतात 

३ ऊर्जा: वीज आणि गॅस अजूनही ऊर्जेचे मुख्य सोर्सेस आहेत कॅम्पुटर मोबाईल वगैरे चिन्ह वस्तू विजेने चार्ज केल्याशिवाय चालूच शकत नाहीत त्यामुळे माहितीचे प्रत्यक्ष वहन इलेक्ट्रिसिटी मुळेच पॉसिबल असते आणि म्हणूनच अदानी ऊर्जा क्षेत्रात घुसतात शिवाय रिलायन्स गॅस मध्ये घुसते कारण अन्न शिजवायला आपणाला ऊर्जा लागते आणि गॅस ती ऊर्जा पुरवतो


४ ऑइल: प्रत्यक्ष उत्पादने तयार होतात त्यांचे वहन करण्यासाठी वाहने चालवण्यासाठी ऑइल महत्त्वाचे होऊन बसले आहे त्यामुळेच आजही भारताला रशियाशी जुळवून घ्यावे लागते आणि रशियाला सुद्धा पैशाची गरज असल्याने भारताला तेल विकणे गरजेचे बनते त्या बदल्यात भारताकडून काय घेता येईल याचा अंदाज घेण्यासाठीच पुतीन किंवा रशियन अधिकारी येत असतात अमेरिकेला हे नीट माहिती आहे म्हणूनच जर का रशियाचा ऑइल उद्योग थांबवला तर रशियाला भारताकडून मिळणारा पैशाचा फ्लो थांबेल आणि मग रशिया मोडून काढता येईल हे अमेरिकेला नीट माहिती आहे युक्रेन युद्ध थांबवण्याचा त्यांना हा एक मार्ग वाटतो. प्रत्यक्षामध्ये युक्रेन मध्ये नेमके असे काय आहे की जे युद्धापर्यंत पोहोचले आहे हे अजूनही आतबट्ट्यात आहे . पुतिन्यांच्या म्हणण्याप्रमाणे करार झाला होता तेव्हा अशा प्रकारची कोणतीही क्षेपणास्त्रे रशिया भोवती लावली जाणार नाहीत अशी गॅरंटी अमेरिका आणि युरोपने घेतली होती आणि ही गॅरंटी प्रत्यक्षात त्यांनी धुडकावली आणि हळूहळू क्षेपणास्त्रे रशियाच्या जवळ आणायला सुरुवात केली आणि जेव्हा युक्रेनमध्ये ती येणार हे स्पष्ट झाले तेव्हा मग युक्रेन ताब्यात घेणे गरजेचे बनले मुळात युक्रेनने क्षेपणास्त्र आपल्या भूमीवर लावायला अनुमती कशाला द्यायला हवी होती हा एक फार मोठा प्रश्न या संदर्भात आहे आपण अशी गॅरंटी दिली तर रशिया आपल्या विरोधात ठाकणार हे युक्रेनला माहीत नव्हते काय ? मुळातच अमेरिकेला रशियाची कोंडी का हवी आहे ? की अमेरिकन नेते अजूनही शीतयुद्धात वावरतात ? की मुळातच पुतीन यांचा यात काही वाटा आहे ? म्हणजे असे की अलीकडे पुतीन पुन्हा एकदा कम्युनिजम विषयी बोलायला लागलेले आहेत जुन्या सोवियत युनियन विषयी बोलायला लागलेले आहेत तेव्हा नवा कम्युनिझम पुन्हा उदयाला येतो आहे असे वाटल्याने अमेरिका हे सर्व करत नाही ना असा प्रश्न निर्माण होतो. 


प्रश्न असा आहे की जो कार्पोरेट कम्युनिजम किंवा कम्युनिस्ट कार्पोरेटिझम चायनाने जन्माला घातला तोच आता रशियाने स्वीकारलेला आहे मात्र त्याचा रशियन आकार अजून स्पष्ट नाही आता जर का हा कम्युनिस्ट कार्पोरेटिव्ह कार्पोरेटिझमचा फॉर्मुला जगभर पसरत गेला तर करायचे काय हा सर्वात मोठा नवा पेच उत्तर कार्पोरेट वादा पुढे उभा ठाकला आहे हे सारे युद्ध जसे दिसते तसे नाही त्यामागे अनेक वैचारिक शक्ती सुद्धा काम करताना दिसतात 


प्रश्न असा आहे की युक्रेन युद्धामध्ये उतरल्यामुळे रशिया आणि चीन युती होऊ शकते असे अमेरिकेला वाटले नाही का ? की चीन हा रशियाशी कधीही युती करणे शक्य नाही याची गॅरंटी आहे? मुळातच आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाची कोंडी करता येईल असे वाटले होते पण अचानक भारताची ऑइल ची गरज ही मध्ये आली आणि सौदी अरेबिया पेक्षा अमेरिकेपेक्षा रशियाने अधिक चीप किमतीत ऑइल ऑफर केले साहजिकच त्याचा मोह आहे अर्थात या सगळ्या व्यवहारात पैसे कोणाला सुटणार हे स्पष्ट आहे प्रत्येक जण आपापल्या माणसाचे हितसंबंध पाहतोय या नादात युक्रेंनची फडफड झाली आणि हे नेहमीच घडते महाशक्ती कधीही स्वतःच्या भूमीवर युद्ध लढत नाहीत विशेषतः अमेरिकेला तर दुसऱ्यांच्या भूमीवर युद्ध लढण्याची खुमखुमी आहे 


सगळ्यांमध्ये भारताने आयातीचा विचार केला परंतु निर्यातीचा विचार मात्र केला नाही आणि भारताच्या दुर्दैवाने भारताची निर्यात आज आवडो अगर न आवडो पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात अमेरिकेच्या संदर्भात वाटचाल करत असते मोदी यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि आता त्यांना हा साक्षात्कार झाल्याने अमेरिकेशी कशी जुळवता येईल या संदर्भात काही पावले पुढे टाकली जातील केवळ उद्योगपतींचे हित बघितले आणि सामान्य जनतेचे हित बघितले नाही की काय होते त्याचा हा नमुना आहे बरे सामान्य जनतेला या स्वस्त ऑईलचा काही फायदा झालेला दिसतोय असे दिसत नाही मालाच्या किमती काय खाली आलेल्या नाहीत आणि ऑइलचेही दर खाली आलेले नाहीत त्या उलट निर्याती बाबतीत मात्र प्रचंड नुकसान झालेले आहे आणि ते ऍडमिट केले जात नाहीये असो 


वहनकेंद्री चौथ्या नवतेमुळे अचानक वहनता केंद्रस्थानी आली आहे साहजिकच त्यामुळेच प्रत्येक उद्योगपती हल्ली या चार व्यवसायांना अंकित आणि गिळंकृत करायला बघत असतो आपल्या दिशेने वळवत असतो यामध्ये कलावंत हे तमाशगीर झालेले आहेत का हा खरा प्रश्न आहे ? प्रत्येक काळात बेशरम कलावंत असतातच ते त्या त्या युगातल्या प्रस्थापित व्यवस्थेला शरण जात त्या त्या व्यवस्थेची भलावन करत असतात कलेचे तपोवन विकायला काढत असतात त्यांची लोकसंख्या ही 90% असल्याने साहजिकच 10 टक्क्यांची नेहमीच गोची होत असते ती आता होतेच आहे यातून सुटका नाही . जो मीडियापासून स्वतःच्या कलेला वाचू शकतो तोच आजच्या काळाबद्दल अत्यंत अस्सल लिहू शकतो . अन्यथा मीडियाभाट होणे एवढा एकच पर्याय तुमच्या पुढे आहे.


श्रीधर तिळवे नाईक

Comments

Popular posts from this blog

शैव श्रुती का आवश्यक आहे