शैववादाची भविष्यातली दिशा श्रीधर तिळवे नाईक
कुठल्याही नेटवर्कमध्ये भविष्याच्या दिशेने कसे जायचे हेही ठरवावे लागते .केवळ अंदाज घेत काम करेन हा बाणा परवडत नाही. आहे हे अटळ असले तरी त्या अटळतेवर विश्वास ठेवून चालत नाही . म्हणूनच मग शैववादाला काम करावे लागते
हे काम तीन दिशांना नेता येते
१ पशु मानववाद : माणसाला सर्वात प्रथम जर कुठली गोष्ट स्वीकारायची असेल तर ती म्हणजे तो मानव आहे आणि पशु ही आहे म्हणजेच त्याचे किंगडम ऍनिमल आहे जगातल्या सर्व इतर तत्त्वज्ञानांना पशुपनाचा पाशवी पणाचा प्रॉब्लेम असला तरी शैव तत्वज्ञानाला हा प्रॉब्लेम नाही कारण ते सर्वात प्राचीन आहे. पशुपालन कालखंडात तो जन्मलेला आहे . त्याची सुरुवातच मी पशु आहे आणि शिव हा पशुपती आहे या गृहीतकाने होते त्यामुळेच मानव आहे पण हा मानव प्रथम पशु आहे हे पहिले गृहीतक आहे त्यामुळे उगाच मानवा विषयीच्या ज्या अतिरंजीत दैवी कल्पनाविलास चाललेले असतात त्या कल्पनांना तिलांजली देता येते आणि माणसाच्या पशूला सर्व पशुपणाच्या कसोट्या लावून नीट बघता येते आपल्यातल्या पशुला नीट न्याहाळता येते त्याचे सेलिब्रेशन करण्याऐवजी त्याच्या मर्यादा नीट जाणता येतात चौथ्या नवते मध्ये पशु animal पुन्हा परतलाय अशावेळी शैव श्रुतीची अधिकच आवश्यकता भासते कारण माणूस प्रथम पशु मानव आहे हे ओळखणे हे अत्यंत आवश्यक आहे हे ह्या श्रुतीने ओळखलेले आहे . तेव्हा प्रथम हा मग पशु माणूस नीट ओळखा . त्याशिवाय भविष्य साकार करता येणे अशक्य आहे मात्र ही प्रथम पायरी आहे .
२ महादेवमानव : माणूस हा फक्त पशु किंवा माणूस नाही त्याच्यामध्ये काहीतरी या सर्वाला ओलांडून जाणारे असे आहे तर हे जे ओलांडून जाणारे आहे त्याला आपण आता देव असे म्हणतो आणि माणूस त्यामुळेच महादेव सुद्धा होऊ शकतो महादेव हा फक्त बाहेर नाही तर तो माणसाच्या आत मध्ये आहे आणि तो सतत उत्क्रांत होत असतो स्वतःचे तंत्रज्ञान आणि ज्ञान उत्क्रांत करत असतो त्यामुळेच देव होण्याच्या दिशेने त्याची सतत वाटचाल सुरू असते त्यासाठी तो अत्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आणि नेणीवपूर्वक पण प्रयत्न करतो स्वतःला माणसाची जी अनहंस enhance करण्याची क्षमता आहे ती इतर प्राण्यांच्या मध्ये तुलनेने खूपच कमी आहे माणूस मात्र निसर्गानेच देणगी दिल्याने स्वतःला अनेकदा पार करू शकतो माणसाचे ध्येय फक्त पशु राहणे हे नाही देव होणे हे सुद्धा आहे म्हणूनच महादेव ही संकल्पना फक्त आरती ओवाळण्यासाठी नाही तर प्रत्यक्षात ती कृतिशील जीवन जगण्याची प्रेरणा आहे . आपण पशु मानवाचा अतिमानव transcehuman होऊ शकतो महादेव होऊ शकतो हा आत्मविश्वास प्रत्येक माणसाने बाळगला पाहिजे जीवन म्हणजे सतत स्वतःला उत्क्रांत करत सतत स्वतःच्या क्षमता वाढवत सतत स्वतःला दैवी अधिक दैवी बनवणे . निसर्गाच्या मर्यादा सतत ओलांडत अति निसर्ग होणे अति मानव होणे . माणसात ही सुपर माणूस होण्याची क्षमता आहे आणि आणि माणसाने ही क्षमता पूर्णपणे कमावली पाहिजे जीवन म्हणजे मिळालेली संधी आहे तर ती संधी वाया घालवता कामा नये अनेक भूक्कड लोक कायम दुःखी असतात तर असे दुःखी बिखी राहणे याला काही अर्थ नसतो माणसाने सतत स्वतःच्या दुःखाची सुद्धा कारण मीमांसा त्या कारणांच्या वर मात करत पुढे गेले पाहिजे . शेपूट ते घालतात जे पशु मानव बनून थांबतात माणूस शेपूट घालत नाही त्याला शेपूट कसे फेकून द्यायचे हे माहीत असते माणसाने धैर्यशील असले पाहिजे आत्महत्येमध्ये काहीच धाडस नाही स्वतःच्या उत्क्रांतीत धाडस आहे हे माणसाने कधीही विसरता कामा नये. त्याने असा समाज निर्माण केला पाहिजे जो महादेवाने गजबजलेला असेल . ज्यात प्रत्येक जण देव बनलेला असेल . त्यासाठी त्याला नवीन विज्ञान तंत्रज्ञान चिन्ह विज्ञान चिन्ह तंत्रज्ञान अत्यंत कुशलतेने हाताळायला आले पाहिजे माणसाने नेहमी स्वतःला कौशल्यपूर्ण बनवले पाहिजे स्वतःची कौशल्ये सतत वाढवत नेले पाहिजेत. अनेकदा आसपास अंधाराने माहोल भरलेला असतो अशावेळी कुठलाही अंधार परमनंट नसतो यावर विश्वास ठेवावा लागतो . माणसाने स्वतः तर बदललेच पाहिजे पण स्वतःचा समाजही बदलला पाहिजे तो अधिकाधिक नैतिक केला पाहिजे . माणसातला पशु त्याला कायमच भ्रष्ट करायला बघत असतो भ्रष्टाचार हा माणसातल्या पशुने काढलेला शॉर्टकट आहे त्यावर मात केली पाहिजे . सतत कयामत आल्यासारखे वागणे हा मूर्खपणा आहे हा आळस आहे कुणीतरी दिलेल्या निगेटिव्ह संकल्पनांना अजिबात थारा देऊ नये माणसाने स्वतःच्या पॉझिटिव्हिटी वर विश्वास ठेवला पाहिजे महादेव होणे म्हणजे अखंड पॉझिटिव्ह असणे होय . महादेवाची भक्ती म्हणजे अखंड पॉझिटिव्हिटी तेवत ठेवणे . निराश होऊ नका . वाटचाल करत रहा जो थांबतो तो संपतो . हरहर महादेव म्हणणे म्हणजे सर्व संकटांना हरवू शकतो त्यांचे हरण करू शकतो हा विश्वास प्रकट करणे . संघटित व्हा संकटावर मात करा समाज बदला जर बदलत नसेल तर चळवळी उभ्या करा . घाबरून जाऊ नका .
३ मोक्ष मानव शिव मानव : केवळ माणूस म्हणून महादेवमानव बनून थांबू नका मोक्ष मानवा शिव मानव व्हा. जे आहे त्याही पलीकडे खूप काही आहे जे शून्यात जाऊन विसर्जित होते बाकीच्या प्राण्यांचे मृत्यू कसेही होतील पण माणसाचा मृत्यू मात्र त्या शून्यात विलीन होण्यातच शानदार होतो . तेव्हा नैतिकता कमवा . आत्म संघर्ष करावा लागेल मोक्ष या अक्षाशी संबंधित नियम पाळा सुरुवातीला खूप कठीण वाटेल कदाचित पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल की असे जगणे खूप सोपे आहे आपल्यालाच त्याची सवय नव्हती .
१ मर्त्यता :अमरत्वातून मुक्त व्हा जास्तीत जास्त पुढच्या तीन पिढ्यांची वैयक्तिक काळजी घ्या झाडे कापू नका उगाच प्राण्यांची हत्या करू नका जसे तुम्हाला मरायचे नाही तसे त्यांनाही मरायचे नसते एवढे लक्षात ठेवा
२ सुकाम :कोणावरही जबरदस्ती करू नका प्रथम अनुमती विचारा अनुमती असेल तरच कामवासनेला प्रज्वलित करा अन्यथा करू नका नियंत्रण ठेवा .
३ अपरिग्रह :वाजवीपेक्षा प्रचंड काहीतरी साठा करून ठेवणे चुकीचे असते आपल्या कुटुंबाला काय आवश्यक आहे त्या आवश्यक गोष्टींचा साठा करा
४ सुश्रम :भ्रष्टाचार न करणे भ्रष्टाचार करू नका स्वतःच्या श्रमातूनच पैसा कमवा दुसऱ्यांचे श्रम चोरू नका चोरी तर अजिबात करू नका दुसरा जो काही काम करेल त्याचा योग्य तो मोबदला द्या कमी पैसे देणे ही सुद्धा चोरी आहे त्यामुळे कसल्याच प्रकारे चोरी होणार नाही याची काळजी घ्या
५ अहिंसा : कुठल्याही मनुष्याची हत्या करू नका अपवाद फक्त तो माणूस जर स्वतःच इतरांचे प्राण घेणार असेल तर त्यांच्या आणि स्वतःच्या संरक्षणासाठी आणि युद्धात हत्या करा अन्यथा शक्य असेल तर तीन वेळा वॉर्निंग द्या तरीही ऐकत नसेल तर जखमी करा जखमी करून सुद्धा थांबत नसेल तर मगच अशा हिंसक माणसाला ठार मारण्याचा विचार करा . अहिंसक,चांगल्या आणि सज्जन माणसाला कधीही कसलाही त्रास देऊ नका त्याची हिंसा करू नका. शक्य असेल तर कुठल्याही प्राण्यालाही मारू नका आणि जे प्राणी दुर्मिळ होत चालले त्यांना तर अजिबात मारू नका.
६ अप्रमाद : कसलाही बायस असता कामा नये सत्य असत्य यांची चिकित्सा करा कुठलीही कृती करण्याआधी आपल्या हातून कोणता प्रमाद तर होत नाही ना याची कठोर तपासणी करा . निर्णय घेताना प्रमोद होणार नाही याची काळजी घ्या इतरांच्या बाबतीत प्रमाद होणार नाही याबाबत तर डबल काळजी घ्या . आळसाचा पूर्णपणे त्याग करा. आळसामुळे अनेक प्रमाद होत असतात आपण योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य ती मेहनतच करत नाही म्हणूनच आळस संपूर्ण फेका अनेक दुःखांच्या मुळाशी आळस असतो हे लक्षात घ्या. कृतीचा मुख्य शत्रू आळस आहे . आळस कृती करू देत नाही क्रियावान बनवत नाही म्हणूनच क्रियावान व्हा आळस संपूर्ण झटका. आळसामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. व्यायाम करा योगासने करा आणि आवश्यक असेल तर जिम पण करा . मार्शल आर्ट शिका . म्हणजे भयाने कुठला प्रमाद होणार नाही .
७ अव्यसन : कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका दारू सिगरेट पिऊ नका नशा करू नका बेभान होऊ नका व्यसन म्हणजे गुलामगिरी !गुलामगिरी कोणाचीच करू नका आणि तुम्ही स्वतःही कोणालाही गुलाम करू नका. अगदी बाईचे किंवा पुरुषाचेही व्यसन लागू शकते त्यामुळे कुठल्याच प्रकारची गोष्ट व्यसन होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या सर्व नातेपनामध्ये व्यसन हे फार मोठे शत्रू म्हणून असते.
८ आनंद : प्रेम व्हा करुणा व्हा आनंदी राहा स्वतःच्या कुटुंबातील लोकांच्यावर प्रेम करा त्यांच्याबद्दल करुणा बाळगा आणि आपले कुटुंब सतत आनंदी राहील याची काळजी घ्या. जग अजिबात दुःखाने भरलेले नाही जग आनंदाने भरलेले आहे. तुम्ही स्वतःला दुःखी बनवलेले आहे स्वतःचा आनंद स्वतःच शोधा . मात्र हा आनंद दुसऱ्या कोणाचा आनंद हिसकावून मिळवता कामा नये. माणसांच्या वर प्रेम करा. त्यांच्या चुकांच्या विषयी करुणा बाळगा . मात्र चुका या चुकाच आहेत हेही सांगा . यदा कदाचित स्वतःची चूक झाली तर ताबडतोब स्वीकारा . दुसऱ्याची चूक म्हणतो ती सुद्धा चूक असू शकते इतका विवेक बाळगा . जर समोरचा बरोबर ठरला तर त्याला दाद द्या आणि मी चुकीचा आहे तूच बरोबर आहेस मी तुला चुकीचा ठरवल्याबद्दल क्षमा कर म्हणत क्षमा मागा .वाद विवादाला अजिबात घाबरू नका मात्र वाद विवादातून संवाद साधा. वैचारिक शत्रूंना फक्त वैचारिक शत्रूच माना. त्यांच्या विरोधात काहीही शारीरिक करू नका . जर ते तुम्हाला मारण्यासाठीच आले तर मात्र प्रतिकार करा स्वतःचे संरक्षण करणे हा तुमचा हक्क आहे स्वतःच्या लोकांचे संरक्षण करणे हाही तुमचा हक्क आहे पण आक्रमण शक्यतो टाळा . आक्रमण करणे हेच आता संरक्षण आहे असे वाटले तरच आक्रमण करा .
९ आस्तेय :कोणाचीही कसलीही बौद्धिक संपदा मानसिक संपदा त्याला न विचारता वापरू नका आणि दुसऱ्यांच्या सृजनशीलतेचे दुसऱ्याच्या कामाचे कुठलेही श्रेय स्वतः उपटू नका . ज्याने जे जे काम केले आहे त्याचे काम ऍप्रिसिएट करा त्यांचे क्रेडिट त्यांचे श्रेय त्यांनाच द्या .
१० अकीर्ती : कीर्तीच्या पलीकडे जा. कीर्तीसाठी हपापू नका . चांगल्या कामाने कीर्ती कमवा . वाईट कामाने प्रसिद्धी मिळते प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नका चांगल्या कामाने कीर्ती मिळते कीर्ती कमवा प्रतिष्ठा कमवा . तुमचे कामच तुम्हाला कीर्ती मिळवून देईल यावर विश्वास ठेवा. आळसाचा त्याग करा . आळस अनेक दुःखांना निमंत्रण देतो एवढे लक्षात ठेवा.
११ सत्य: सत्यप्राप्ती करा. त्यासाठी जगातून सर्व ज्ञान गोळा करा सर्व प्रकारचे ज्ञान गोळा करा. शिक्षण संस्था उभारा . आपल्या प्रत्येक मुलाला शिकवा शाळेत पाठवा कॉलेजमध्ये पाठवा विद्यापीठात पाठवा उच्च शिक्षणासाठी पाठवा. जास्तीत जास्त भाषा शिका. जास्तीत जास्त विज्ञान शिका . तंत्रज्ञान शिका चिन्ह विज्ञान शिका चिन्ह तंत्रज्ञान शिका. खरे बोला. इकडच्या गोष्टी तिकडे सांगू नका .थापा तर अजिबात मारू नका .जिथे खरे बोलणे शक्य नसेल तिथे मौन पाळा. ज्ञानाबाबत विज्ञानाबाबत चिन्ह विज्ञानाबाबत चिन्ह तंत्रज्ञानाबाबत तंत्रज्ञानाबाबत सतत अद्ययावत रहा .
१२ अमद : अहंकार विरहित व्हा अहंकार अनेकदा आपल्याकडून चुकीच्या गोष्टी करून घेतो म्हणून मद नको आणि माजही नको
या गोष्टी आयुष्यात अंतिम पातळीवर तुमची काळजी घेतील . या गोष्टी तुमच्या आयुष्याची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतील.
मोक्ष ही अंतिम दिशा आहे म्हणूनच मोक्ष मानव बना शिव मानव बना तिच्या दिशेने बाकीच्या दोन दिशा न्या तुमच्यातला पशु मानव प्रथम महादेव मानव बनवा आणि मोक्ष मानव बनवा त्यात सर्वांचेच शिवकल्याण असेल
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment